< १पेत्र. 1 >
1 १ येशू ख्रिस्ताचा प्रेषित पेत्र ह्याजकडून, पंत, गलतीया, कप्पदुकिया, आशिया व बिथुनिया या प्रांतात उपरी म्हणून पांगलेल्या देवाच्या लोकांस पत्र,
Petorosi, mwapositola wa Jesu Kirisite, kuva yedi ve nako, vava kwetwa, mukati kose ka Potiasi, Magalatia, Cappadocia, Asia, ni Bathiania.
2 २ देवपित्याच्या पूर्वज्ञानानुसार, आत्म्याच्या पवित्रीकरणाद्वारे, येशूच्या आज्ञेत राहण्यासाठी त्याचे रक्त शिंपडून निवडलेले तुम्हास कृपा व शांती विपुल मिळोत.
Cho kutenda kezivo yokuvusu ye Ireenza Ishetu. Ivali cho kuchenisa ni Luhuwo lo kuzumina ni kwi tilela malaha a Jesu Krisite. Linu chisemo chive ni we, ni kozo yako iyekeze.
3 ३ आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव आणि पिता धन्यवादित असो! त्याने आपल्या महादयेने येशू ख्रिस्ताला मृतांतून उठवून आपल्याला एका जिवंत आशेत पुन्हा जन्म दिला आहे,
Ke Ireenza ni Esi wa Jesu Krisite a fulyolwe. Muvukando bwe chishemo chakwe, cha tuha ku zwala cihya ke sepo yo kuyola. Ichi chiyolo chi keza kezila yo kuvuka kwa Jesu Krisite kuva fwile.
4 ४ आणि त्याद्वारे मिळणारे अविनाशी, निर्मळ व अक्षय वतन स्वर्गात तुमच्यासाठी राखून ठेवले आहे,
Kono ichi ciyolo chisa maani, kese chive ni vuvi, kete ni chi mane. chivi kilwe inwe kwiwulu.
5 ५ आणि शेवटच्या काळात प्रकट करण्याकरता सिद्ध केलेल्या तारणासाठी तुम्ही देवाच्या सामर्थ्याने विश्वासाद्वारे, राखलेले आहात.
Mu silelezitwe cha maata a Ireenza che tumero, cho kuhazwa kulivelelwe kuvoneka kumani mani enako.
6 ६ आणि या कारणास्तव, आताच्या काळात, निरनिराळया प्रकारच्या परीक्षांमुळे तुम्हास थोडा वेळ भाग पडल्यास तुम्ही दुःख सोशीत असताही आनंदित होता.
Mi usangite kuamana nezi, ni kuvavulyo kuswanela kuti nova lizuwi vuvi mu bukabo vushutana shutana.
7 ७ म्हणजे, नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने करतात, त्या सोन्याहून मोलवान असलेल्या तुमच्या विश्वासाची परीक्षा, येशू ख्रिस्ताचे येणे होईल त्यावेळी, प्रशंसेला, गौरवाला व मानाला कारण व्हावी.
Uko kulika itumelo yenu, mi kwina vutokwa ahulu kuhita gaunda isinyeha, ni hailikwa mumulilo. Izi zitendehala kuti itumelo iwanike mwi tumbo, ikanya, ni kute kuku bonahaza Jesus Christe.
8 ८ तुम्ही त्यास बघितले नसताही तुम्ही त्याच्यावर प्रीती करता आणि त्यास पाहिले नसताही त्याच्यावर विश्वास ठेवून, तुम्ही अवर्णनीय, गौरवी आनंदाने उल्लसीत होता.
Kena muvamuvoni, kono mumusaka. Kamumu voni hanu, kono muzumina kwali ni mutavite ni tavo isawambiwa, inkanya ye tavo.
9 ९ कारण, तुमच्या विश्वासाचे प्रतिफळ, म्हणजे तुमच्या आत्म्याचे तारण तुम्ही मिळवत आहात.
Kono hanu mutambula kwenu bulyo mupuzo we tumelo yenu, kuhazwa kwo luhuwo lwenu.
10 १० तुम्हास प्राप्त होणार्या कृपेविषयी ज्या संदेष्ट्यांनी संदेश सांगितले ते या तारणाविषयी विचार व शोध करीत होते.
Vafolofita vava sakisisi ni kwiza ahulu kuamana zo kuhazwa, kuamaana ni chisemo chese chibe cenu.
11 ११ त्यांच्यामधील ख्रिस्ताचा आत्मा जेव्हा ख्रिस्ताच्या दुःखांविषयी व त्यानंतरच्या त्याच्या जिवंत उठण्याच्या गौरवी गोष्टींविषयी पूर्वीच सांगितले होते, तेव्हा त्याने कोणता किंवा कोणत्या प्रकारचा काळ दर्शवला याचा ते विचार करीत होते.
Chiva sakisisa kwi ziva uzo ni lili ni Luhuwo lwa Krisite haluvali kuwamba kuvali. Inzi ziva pangahali ziva wambirwa havusu kuamaana ni kunyadiswa kwa Christe zitu ze kanya kuzwa aho.
12 १२ त्यांना प्रकट झाले होते की, स्वर्गातून खाली पाठवलेल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने, तुम्हास शुभवर्तमान सांगणार्यांनी आता ज्या गोष्टी तुम्हास सांगितल्या, त्यामध्ये ते स्वतःची नाही, पण तुमची सेवा करीत होते. त्या गोष्टी न्याहाळून पाहण्याची इच्छा देवदूतांना आहे.
Zive zinveki kuva vopolofita kuti hati vavali kulitusa avo vene, kono enwe. Ichi chi vavali kutenda kuamaana ni zitu zi muva wambilwi kamukwa wo Luhuwo Lujolola, uvatumwa kuzwa kwi wulu. Izi zitu nanga magiloyi alakazwa kuvoniswa.
13 १३ म्हणून तुम्ही आपल्या मनाची कंबर कसून सावध रहा आणि येशू ख्रिस्ताचे येणे होईल त्यावेळी तुमच्यावर जी कृपा होणार आहे तिच्यावर पूर्ण आशा ठेवा.
Cwale mutende muzezo yenu hande. Musiye kukolwa. Muvike isepo yose muchisemo chileta kwi ziveka kwa Jesu Krisite.
14 १४ तुम्ही आज्ञांकित मुले होऊन, तुमच्या पूर्वीच्या अज्ञानातील वासनांप्रमाणे स्वतःला वळण लावू नका.
Ha tuli tuvana ve chilila, musiye ku swana itakazo nezina zimuvali kwichilile ni musezi niti.
15 १५ परंतु तुम्हास ज्याने पाचारण केले तो जसा पवित्र आहे तसे तुम्ही आपल्या सर्व वागण्यात पवित्र व्हा.
Kono iye avamisupi u jolola, inwe, nanwe, mujolole mumaikuto enu wonse.
16 १६ कारण असे जे पवित्र शास्त्रात लिहिले आहे की, “तुम्ही पवित्र असा कारण मी पवित्र आहे.”
Kakuli kuñoletwe, “Mu jolole, kakuli ime ni jolola.”
17 १७ आणि पक्षपात न करता, जो प्रत्येक मनुष्याचा कामाप्रमाणे न्याय करतो त्यास तुम्ही जर पिता म्हणून हाक मारता, तर तुमच्या प्रवासाच्या काळात तुम्ही भय धरून वागले पाहिजे.
Mi hamusupa “Ishetu” iye yenke uyatula zwimwi ni ku sena isovozi kuamana ni mutendo wo mutu, muhinde inako mumusipili ni sabo.
18 १८ कारण तुम्हास माहीत आहे की, तुमच्या पूर्वजांनी लावून दिलेल्या निरर्थक आचरणातून चांदीसोन्यासारख्या नाशवंत गोष्टीद्वारे, तुमची सुटका केली गेली नाही.
Mwizi kuti hati kavali ke silivera ni gauda efwa iva muhanzi kuvu holo ye mimitedo imuva lituti kuve ishenu.
19 १९ निष्कलंक व निर्दोष कोकरा झालेल्या ख्रिस्ताच्या मोलवान रक्ताद्वारे तुम्ही मुक्त झाला आहात.
Hakuli vulyo, u va hazwa ni malaha avutokwa a Krisite, avali kuswana ni imbelele isena chivata.
20 २० खरोखर, जगाच्या स्थापने अगोदर, तो पूर्वीपासून नेमलेला होता. पण या शेवटच्या काळात तो तुमच्यासाठी प्रकट झाला,
Krisite ava saliwa pili ni misumo ye kanda, kono hanu chali zivahalisa kwenu mwinako ya manimani.
21 २१ आणि त्याच्याद्वारे तुम्ही देवावर विश्वास ठेवला; कारण देवावर तुमचा विश्वास व तुमची आशा असावी म्हणून त्यास मृतांतून उठवून गौरव दिला.
Chakwe muzumina kwe Ireenza, ava muvusi kuvafu mi kuvamwi chavaha ikanya kuti itumero yavo ni sepo ive kwe Ireenza.
22 २२ तुम्ही जर आत्म्याच्याद्वारे, सत्याचे आज्ञापालन करून, निष्कपट बंधुप्रेमासाठी आपले जीव शुद्ध केले आहे, तर तुम्ही आस्थेने एकमेकांवर मनापासून प्रीती करा.
Muvatendi luhuwo lwenu kujolola choku zumina kwi niti. Ichi chivalikutenda mulelo wo vulikani mwi rato, cwale mulisake ahulu mwi kulo.
23 २३ कारण तुम्ही नाशवंत बीजाकडून नाही पण अविनाशी बीजाकडून, म्हणजे देवाच्या, जिवंत टिकणार्या वचनाच्याद्वारे तुमचा पुन्हा जन्म पावलेले आहात. (aiōn )
Linu mu vanzalwa chihya, isini ketanga ivola, kono che tanga isavoli, muvuhalo ni lizwi lye Ireenza likalilila. (aiōn )
24 २४ कारण पवित्रशास्त्रात असे लिहिले आहे, “सर्व मानवजाती गवतासारखी आहे व तिचे सर्व वैभव गवताच्या फुलासारखे आहे गवत वाळते व त्याचे फूल गळते.
Ke “nyama yonse iswana sina lyani, ni ikanya yateni yonse iswana nipalisa ya lyani. Lyani lizuma, ni palisa ziwila hasi,
25 २५ परंतु परमेश्वराचे वचन सर्वकाळ टिकते.” तुम्हास त्याच वचनाचे शुभवर्तमान तुम्हास सांगण्यात आले ते तेच आहे. (aiōn )
Kono lizwi ye Ireenza likalilila kuya kwile. “Ichi makande malotu ave zibiswa kwenu. (aiōn )