< 1 राजे 7 >

1 शलमोनाला स्वत: साठी महाल बांधण्यास तेरा वर्षे लागली.
På sit Palads byggede Salomo i tretten År; så fik han hele sit Palads færdigt.
2 त्याने लबानोनगृह वनातील घरही बांधले. त्याची लांबी शंभर हात, रूंदी पन्नास हात व उंची तीस हात होती. ती ईमारत गंधसरुच्या स्तंभाच्या चार रांगावर असून प्रत्येक स्तंभावर गंधसरूच्या तुळ्या ठेवल्या होत्या.
Han byggede Libanonskovhuset, hundrede Alen langt, halvtredsindstyve Alen bredt og tredive Alen højt, hvilende på tre Rækker Cedersøjler med Skråstøtter af Cedertræ.
3 त्यावर छत म्हणून गंधसरुच्या लाकडाची पाटण होती. प्रत्येक ओळीत पंधरा खांब अशा पंचेचाळीस खांबांवर तुळ्या होत्या.
Det var oven over Rummene tækket med Cederbjælker, der hvilede på fem og fyrretyve Søjler, femten i hver Række.
4 तिन्ही मजल्यावर तुळ्या असून भिंतींवर समोरासमोर येतील अशा खिडक्यांच्या तीन ओळी होत्या.
Der var tre Lag Bjælker, og Lysåbning sad over for Lysåbning tre Gange.
5 दोन्ही टोकांना तीन तीन दरवाजे होते. दाराची कवाडे आणि चौकटी काटकोन चौकोनात होत्या.
Alle Døre og Lysåbninger havde firkantede Bjælkerammer, og Lysåbning sad over for Lysåbning tre Gange.
6 शलमोनाने एक द्वारमंडपही उभारला होता. हा राजासनाचा मंडप पन्नास हात लांब आणि तीस हात रुंद होता. दर्शनी बाजूला आधार देणाऱ्या स्तंभाची रांग होती.
Fremdeles opførte han Søjlehallen, halvtredsindstyve Alen lang og tredive Alen bred, med en Hal, Søjler og Trappe foran.
7 मग सिंहासनावर बसून न्यायनिवाडा करण्यासाठी त्याने एक दालन बांधून घेतले. त्यास त्याने “न्यायासनाचा मंडप” असे नाव दिले होते. हे दालनही जमिनीपासून छतापर्यंत गंधसरुच्या लाकडाने आच्छादलेले होते.
Fremdeles opførte han Tronhallen, hvor han holdt Rettergang, Domhallen; den var dækket med Cedertræ fra Gulv til Loft,
8 याच्याच आतल्या बाजूला त्याचे घर होते. त्याची बांधणी न्यायासनाच्या मंडपासारखीच होती. मिसरच्या फारो राजाची कन्या म्हणजे शलमोनची पत्नी हिच्यासाठीही त्याने असाच महाल बांधून घेतला.
Hans eget Hus, det, han boede i, i den anden Forgård inden for Hallen, var bygget på samme Måde. Og til Faraos Datter, som Salomo havde ægtet, opførte han et Hus i Lighed med denne Hal.
9 या सर्व इमारतींच्या बांधकामात किंमती दगडी चिरे वापरले होते. पुढून मागून घासून ते करवतीने योग्य मापाने कातले होते. पायापासून वळचणीपर्यंत त्यांचाच वापर केला होता. अंगणाभोवतालच्या भिंतीही याच बहुमूल्य दगडांनी बांधल्या होत्या.
Det hele var af kostbare Sten, tilhugget efter Mål, tilsavet både indvendig og udvendig, lige fra Grunden til Murkanten, hvilket også gjaldt den store Forgård uden om Templets Forgård.
10 १० पायासाठी वापरलेले चिरेही असेच प्रशस्त व भारी होते. काहींची लांबी आठ व इतरांची दहा हात होती.
Grunden blev lagt med kostbare, store Sten, nogle på ti, andre på otte Alen.
11 ११ त्यांच्यावर आणखी चांगल्या प्रतीचे चिरे आणि गंधसरुचे वासे होते.
Ovenpå lagdes kostbare Sten, tilhugget efter Mål, og Cederbjælker.
12 १२ महाल, मंदिर आणि द्वारमंडप यांच्या सभोवती भिंत होती. तिला दगडांच्या तीन चिऱ्या आणि गंधसरुच्या लाकडाची एक ओळ परमेश्वराच्या मंदिराचे आतले अंगण व त्या मंदिराची देवडी यांच्याप्रमाणे ही रचना होती.
Den store Forgård var hele Vejen rundt omgivet af tre Lag tilhugne Sten og et Lag Cederbjælker, ligeledes HERRENs Huss Forgård, den indre, og Forgården om Paladsets Forhal.
13 १३ राजा शलमोनाने सोराहून (तायरहून) हिराम नावाच्या मनुष्यास निरोप पाठवून यरूशलेम येथे बोलावून घेतले.
Kong Salomo sendte Bud til Tyrus efter Hiram.
14 १४ हिरामची आई नफताली वंशातील होती. त्याचे वडिल सोराचे (तायरचे) होते. ते चांगले तांबट कारागीर होते. हिराम हा एक ज्ञानाने, बुद्धीने, आणि कसबी तांबट होता. म्हणून शलमोन राजाने त्यालाच बोलावून घेतले. त्यानेही हे आमंत्रण स्विकारले. राजाने हिरामला सर्व पितळी कारागिरीवरील प्रमुख म्हणून नेमले. हिरामने पितळेपासून बनवलेल्या सर्व वस्तू घडविल्या.
Han var Søn af en Enke fra Naftalis Stamme, men hans Fader var en Kobbersmed fra Tyrus. Han sad inde med Visdom, Forstand og Indsigt i at udføre alskens Kobberarbejde; og han kom til Kong Salomo og udførte alt det Arbejde, han skulde have udført.
15 १५ हिरामने दोन पितळी स्तंभ घडवले. ते स्तंभ अठरा हात उंचीचे होते. त्या प्रत्येकाला वेढावयास बारा हात दोरी लागे.
Han støbte de to kobbersøjler foran Forhallen. Den ene var atten Alen høj; den målte tolv Alen i Omkreds; den var hul, og Kobberet var fire Fingerbredder tykt. Ligeså den anden Søjle.
16 १६ शिवाय त्याने त्या खांबाच्या शेंड्यावर बसवण्यासाठी पितळेच दोन ओतीव कळस केले. त्या एकाएका कळसाची उंची पाच पाच हात होती.
Og han lavede to Søjlehoveder til at sidde oven på Søjlerne, støbt af Kobber, hvert Søjlehoved fem Alen højt.
17 १७ या खांबाच्या घुमटांना आच्छादण्यासाठी दोन जाळीदार, साखळीची आच्छादने केली. एकाला सात व दुसऱ्याला सात.
Og han lavede to Fletværker, flettet Arbejde, Snore, kædeformet Arbejde, til at dække Søjlehovederne oven på Søjlerne, et Fletværk fil hvert Søjleboved;
18 १८ याप्रकारे त्याने खांब तयार करून त्यांच्या शेडंयावर प्रत्येक कळसास झाकण्यासाठी जाळ्यांच्या एका रांगेवर डाळिंबाच्या दोन रांगा केल्या.
og han lavede Granatæblerne, to Rækker rundt om det ene Fletværk; der var 200 Granatæbler i Rækker rundt om det ene Søjlehoved; på samme Måde gjorde han også ved det andet.
19 १९ जे कळस देवडीच्या खांबांच्या शेंड्यांवर होते त्यांच्या चार हात जागेत कमळांचे काम केले होते.
Søjlehovedeme på de to Søjler var liljeformet Arbejde.
20 २० हे घुमट स्तंभावर बसविलेले होते. परडीच्या आकाराच्या जाळीवर ते बसवले होते. या सगळ्या कळसांच्या भोवती रांगेने दोनशे डाळिंबे लावली होती.
Søjlehovederne sad på de to Søjler.
21 २१ हे दोन पितळी स्तंभ हिरामने द्वारमंडपाशी लावले. दक्षिणेकडील खांबाला याखीन (तो स्थापील) आणि उत्तरे कडील खांबाला बवाज (त्याच्या ठायी सामर्थ्य) असे नाव ठेवले.
Derpå opstillede han Søjlerne ved Templets Forhal; den Søjle, han opstillede til højre, kaldte han Jakin, og den, han opstillede til venstre, kaldte han Boaz.
22 २२ कमळाच्या आकाराचे कळस या खांबांवर चढवले आणि या दोन स्तंभाचे काम संपले.
Øverst på Søjlerne var der liljeformet Arbejde. Således blev Arbejdet med Søjlerne færdigt.
23 २३ मग त्याने एक गंगाळसागर ओतविला होता, त्याचा काठाकडला व्यास दहा हात होता; त्याचा आकार गोल असून त्याची उंची पाच हात होती व त्यास वेढायला तीस हात दोरी लागत असे.
Fremdeles lavede han Havet i støbt Arbejde, ti Alen fra Rand til Rand, helt rundt, fem Alen højt; det målte tredive Alen i Omkreds.
24 २४ या हौदाच्या कडेल्या बाहेरच्या बाजूला एक पट्टी बसवली होती. तिच्याखाली पितळी रानकाकड्यांच्या दोन रांगा होत्या. या काकड्या हौदाचाच एक भाग म्हणून एकसंधपणे करून घेतल्या होत्या.
Under Randen var det hele Vejen rundt omgivet af agurklignende Prydelser, der nåede helt omkring Havet, tredive Alen; i to Rækker sad de agurklignende Prydelser, støbt i eet dermed.
25 २५ बारा पितळी बैलांच्या पाठीवर हा हौद विसावलेला होता. बैलांची तोंडे बाहेरच्या बाजूला होती. तिघांची तोंडे उत्तरेला, तिघांची दक्षिणेला, तिघांची पूर्वेला आणि तिघांची पश्चिमेला होती.
Det stod på tolv Okser, således at tre vendte mod Nord, tre mod Vest, tre mod Syd og tre mod Øst; Havet stod oven på dem; de vendte alle Bagkroppen indad.
26 २६ हौदाची जाडी वितभर होती; आणि वरची कड कटोऱ्याच्या कडेसारखी अथवा कमळफुलासारखी उमललेली होती. यामध्ये दोन हजार बथ पाणी मावत असे.
Det var en Håndsbred tykt, og Randen var formet som Randen på et Bæger, som en udsprungen Lilje. Det tog 2000 Bat.
27 २७ मग हिरामने दहा पितळी चौरंग बनवले. प्रत्येक चौरंग चार हात लांब, चार हात रुंद आणि तीन हात उंच होते.
Fremdeles lavede han de ti Vognstel af Kobber; hvert Stel var fire Alen langt, fire Alen bredt og tre Alen højt.
28 २८ चौरंग याप्रकारे बनविण्यात आले होते; त्यास पत्रे लावलेले होते आणि या पत्र्यास सभोवार कंगोरे होते.
Og Stellene var indrettet så ledes: De havde Mellemstykker, og Mellemstykkerne sad mellem Rammestykkerne.
29 २९ पितळी पत्रे आणि चौकट यांच्यावर सिंह, बैल व करुब देवदूत यांचे कोरीव काम होते. सिंह आणि बैल यांच्याखाली फुलांची वेलबुट्टी बसवलेली होती.
På Mellemstykkerne mellem Rammestykkerne var der Løver, Okser og Keruber, ligeledes på Rammestykkerne. Over og under Løverne og Okserne var der Kranse, lavet således, at de hang ned.
30 ३० प्रत्येक चौरंगाला पितळी धुऱ्यांवर पितळेची चारचार चाके लावलेली होती आणि चारही कोपऱ्यातून प्रशस्त घंगाळासाठी पितळी आधार दिलेले होते. त्यावरही फुलांचे सुबक काम केलेले होते.
Hvert Stel havde fire Kobber hjul og Kobberaksler. De fire Hjørner havde Bærearme; under Bækkenet var Bærearmene faststøbt, og midt for hver af dem var der Kranse.
31 ३१ कळसाच्या आतल्या बाजूपासून वरपर्यंत त्याचे तोंड एक हात उंच होते हे तोंड बैठकीसारखे असून त्याचा व्यास दीड हात होता, त्यावर काही कोरीव काम होते, त्याच्या पट्टया गोल नसून चौकोनी होत्या.
Dets Rand var inden for Bærearmene, een Alen høj, og den var rund: også på Randen var der udskåret Arbejde. Mellemstykkerne var firkantede, ikke runde.
32 ३२ चारही चाके पट्यांच्या खाली होती व प्रत्येक चाकाच्या धुऱ्या तळाशी जोडल्या होत्या, त्या प्रत्येक चाकाची उंची दीड हात होती.
De fire Hjul sad under Mellemstykkerne, og Hjulenes Akselholdere sad på Stellet; hvert Hjul var halvanden Alen højt.
33 ३३ रथाच्या चाकांसारखी ही चाके होती. आणि त्याच्या धुऱ्या धावा, आरे आणि तुंबे असे सर्वकाही ओतीव पितळेचे होते.
Hjulene var indrettet som Vognhjul, og deres Akselholdere, Fælge, Eger og Nav var alle støbt.
34 ३४ प्रत्येक चौरंगाच्या चारही कोपऱ्यांना आधार दिलेले होते. तेही एकसंध होते.
Der var en Bæream på hvert Stels fire Hjørner, og Bærearmene var i eet med Stellet;
35 ३५ प्रत्येक चौरंगावर अर्धा हात उंच गोलाकार झाकण होते, व त्या झाकणाचे टेकावे व त्याच्या पट्टया ही चौरंगाशी अंखड होत्या.
og oven på Stellet var der en Slags Fatning, en halv Alen høj og helt rund; og Akselholdere og Mellemstykker sad fast på Stellet.
36 ३६ चौरंगाची बाहेरची बाजू आणि चौकट यांच्यावर करुब देवदूत, सिंह, खजूरीची झाडे यांचे कोरीव काम पितळेचे केलेले होते. ही नक्षी अगदी भरगच्च असून त्यामध्ये कुठेही मोकळी जागा नव्हती. शिवाय भोवताली फुलांची नक्षी होती.
På Fladerne indgraverede han Keruber, Løver og Palmer, efter som der var Plads til, omgivet af Kranse.
37 ३७ हिरामने अशाप्रकारे अगदी एकसारखे एक असे दहा पितळी चौरंग घडवले. हे सर्व ओतीव काम होते त्यामुळे ते तंतोतंत एकसारखे होते.
Således lavede han de ti Stel; de var alle støbt på samme Måde, med samme Mål og af samme Form.
38 ३८ हिरामने अशीच दहा गंगाळे केली. ती या दहा चौरंगासाठी प्रत्येकी एक याप्रमाणे होती. प्रत्येक गंगाळाचा व्यास चार हात होतो. त्यामध्ये चाळीस बथ पाणी मावू शकत असे.
Tillige lavede han ti Kobberbækkener; fyrretyve Bat tog hvert Bækken, og hvert Bækken målte fire Alen, et Bækken til hvert af de ti Stel.
39 ३९ त्याने पाच बैठकी मंदिराच्या उत्तरेला आणि दक्षिणेला पाच व गंगाळसागर मंदिराच्या उजवीकडे पूर्व दिशेला ठेवल्या.
Og han satte fem af Stellene ved Templets Sydside, fem ved Nordsiden; og Havet opstillede han ved Templets Sydside, ved det sydøstre Hjørne.
40 ४० याखेरीज हिरामने वाडगी, पावडी, लहान गंगाळे बनवली. शलमोन राजाने सांगितले ते सर्व हिरामने केले. परमेश्वराच्या मंदिरासाठी हिरामने ज्या वस्तू घडवल्या
Fremdeles lavede Hirom Karrene, Skovlene og Skålene. Der med var Hiram færdig med alt sit Arbejde for Kong Salomo til HERRENs Hus:
41 ४१ त्यांची यादी पुढीलप्रमाणे: दोन स्तंभ स्तंभाच्या कळसांवर बसवायच्या दोन घुमट्या त्यांच्या भोवतीच्या दोन जाळ्या
De to Søjler, og de to kuglefornede Søjlehoveder ovenpå, de to Fletværker til at dække de to kugleformede Søjlehoveder på Søjlerne,
42 ४२ या दोन जाळ्यांसाठी चारशे नक्षीदार डाळिंबे तयार केली खांबाच्या शेंडयावरील प्याल्याच्या आकाराचे कळसाचे भाग झाकावयाच्या जाळ्यासाठी या डाळींबाच्या दोन-दोन रांगा होत्या.
de 400 Granatæbler til de to Fletværker, to Rækker Granatæbler til hvert Fletværk til at dække de to kugleformede Søjlehoveder på de to Søjler,
43 ४३ दहा चौंरग व त्यांच्यावरील दहा गंगाळे,
de ti Stel med de ti Bækkener på,
44 ४४ एक गंगाळसागर व त्याच्याखालचे बारा बैल;
Havet med de tolv Okser under,
45 ४५ याखेरीज हंडे, पातेली, पावडी अशी परमेश्वराच्या मंदिरासाठी वेगवेगळी पात्रे शलमोन राजाच्या इच्छेखातर हिरामने बनवले. ते सर्व लखलखीत पितळेच होते.
Karrene, Skovlene og Skålene. Alle disse Ting, som Hiram lavede for Kong Salomo til HERRENs Hus, var af blankt Kobber.
46 ४६ सुक्कोथ आणि सारतान यांच्यामध्ये यार्देन नदीच्या तीरावर असलेल्या मैदानावर शलमोन राजाने हे काम करायला सांगितले. पितळ वितळवून मातीच्या साच्यात हे ओतकाम करण्यात आले.
I Jordanegnen lod Kongen dem støbe, ved Adamas Vadested mellem Sukkot og Zaretan.
47 ४७ या सगळ्यासाठी किती पितळ लागले ते शलमोन राजाने बघितले नाही. वजन करायचे म्हटले तरी ते खूपच होते. त्यामुळे या सर्व वस्तूंचे नक्की वजन कधीच माहीत झाले नाही.
Salomo lod alle Tingene uvejet på Grund af deres såre store Mængde, Kobberet blev ikke vejet.
48 ४८ शलमोनाने परमेश्वराच्या मंदिरासाठी सोन्याच्याही कितीतरी वस्तू करवून घेतल्या. त्या अशा: सोन्याचे मेज (देवाची सोन्याची वेदी समर्पित भाकर ठेवण्यासाठी)
Og Salomo lod alle Tingene, som hørte til HERRENs Hus, lave: Guldalteret, Guldbordet, som Skuebrødene lå på,
49 ४९ शुद्ध सोन्याच्या समया. (या परमपवित्र गाभाऱ्यासमोर उजवीडावीकडे पाच पाच लावलेल्या होत्या) सोन्याची फुले, दिवे आणि चिमटे ही सोन्याची करवली होती.
Lysestagerne, fem til højre og fem til venstre, foran Inderhallen, af purt Guld, med Blomsterbægrene, Lamperne og Lysesaksene af Guld,
50 ५० पेले, कातरी, कटोरे, चमचे व धूपदाने ही शुद्ध सोन्याची करवली होती; तसेच मंदिराचा आतील भाग म्हणजे परमपवित्रस्थान यांचे दरवाजे व पवित्रस्थानाच्या दाराच्या बिजागऱ्या सोन्याच्या बनवल्या होत्या.
Fadene, Knivene, Skålene, Kanderne og Panderne af fint Guld, Hængslerne til Dørene for den inderste Hal, det Allerhelligste, og til Dørene for den yderste Hal, det Hellige, af Guld.
51 ५१ परमेश्वराच्या मंदिराचे हे काम शलमोन राजाने स्वत: च्या हाती घेतले ते संपवले. मग आपले वडिल दावीद यांनी समर्पिलेले सोने, चांदी व पात्रे ही शलमोनाने आत आणून परमेश्वराच्या मंदिराच्या भांडारात ठेवली.
Da hele Arbejdet, som Salomo lod udføre ved HERRENs Hus, var færdigt, bragte Salomo sin Fader Davids Helliggaver, Sølvet og Guldet, derind og lagde alle Tingene i Skatkamrene i HERRENs Hus.

< 1 राजे 7 >