< 1 राजे 7 >
1 १ शलमोनाला स्वत: साठी महाल बांधण्यास तेरा वर्षे लागली.
[建造宮室]此後,撒羅滿為自己建造宮室,十三年方纔完成。
2 २ त्याने लबानोनगृह वनातील घरही बांधले. त्याची लांबी शंभर हात, रूंदी पन्नास हात व उंची तीस हात होती. ती ईमारत गंधसरुच्या स्तंभाच्या चार रांगावर असून प्रत्येक स्तंभावर गंधसरूच्या तुळ्या ठेवल्या होत्या.
他建造的,有黎巴嫩林宮,長一百肘,寬五十肘,高三十肘;有三行香柏木柱子,柱子上端有香柏木托梁。
3 ३ त्यावर छत म्हणून गंधसरुच्या लाकडाची पाटण होती. प्रत्येक ओळीत पंधरा खांब अशा पंचेचाळीस खांबांवर तुळ्या होत्या.
上面蓋上香柏木板;每行十五根柱子,共有四十五根。
4 ४ तिन्ही मजल्यावर तुळ्या असून भिंतींवर समोरासमोर येतील अशा खिडक्यांच्या तीन ओळी होत्या.
窗戶有三排,三排窗戶彼此相對。
5 ५ दोन्ही टोकांना तीन तीन दरवाजे होते. दाराची कवाडे आणि चौकटी काटकोन चौकोनात होत्या.
門和窗戶都是方形;三層窗戶都彼此相對。
6 ६ शलमोनाने एक द्वारमंडपही उभारला होता. हा राजासनाचा मंडप पन्नास हात लांब आणि तीस हात रुंद होता. दर्शनी बाजूला आधार देणाऱ्या स्तंभाची रांग होती.
又造了有圓柱的大廳,長五十肘,寬三十肘;大廳前面另有一個廊子,廊子前面有柱子和頂蓋。
7 ७ मग सिंहासनावर बसून न्यायनिवाडा करण्यासाठी त्याने एक दालन बांधून घेतले. त्यास त्याने “न्यायासनाचा मंडप” असे नाव दिले होते. हे दालनही जमिनीपासून छतापर्यंत गंधसरुच्या लाकडाने आच्छादलेले होते.
他又造了一廳,中間設有審判的座位,在那裏審案;從地面到梁,都是用香柏木舖蓋的。
8 ८ याच्याच आतल्या बाजूला त्याचे घर होते. त्याची बांधणी न्यायासनाच्या मंडपासारखीच होती. मिसरच्या फारो राजाची कन्या म्हणजे शलमोनची पत्नी हिच्यासाठीही त्याने असाच महाल बांधून घेतला.
廳後的另一院內,有君王住的宮室,建築式樣,完全與審判廳相同;為君王所娶的法郎公主,也建造了與審判廳相同的宮室。
9 ९ या सर्व इमारतींच्या बांधकामात किंमती दगडी चिरे वापरले होते. पुढून मागून घासून ते करवतीने योग्य मापाने कातले होते. पायापासून वळचणीपर्यंत त्यांचाच वापर केला होता. अंगणाभोवतालच्या भिंतीही याच बहुमूल्य दगडांनी बांधल्या होत्या.
從外院直到大院的這一切建築,從地基到屋頂,都是用按尺寸鑿好,用鋸內外鋸平的寶貴石頭建造的。
10 १० पायासाठी वापरलेले चिरेही असेच प्रशस्त व भारी होते. काहींची लांबी आठ व इतरांची दहा हात होती.
地基也都是用貴重巨大的石頭砌成的,有的十肘長,有的八肘長;
11 ११ त्यांच्यावर आणखी चांगल्या प्रतीचे चिरे आणि गंधसरुचे वासे होते.
上面有按尺寸鑿好的貴重石頭和香柏木。
12 १२ महाल, मंदिर आणि द्वारमंडप यांच्या सभोवती भिंत होती. तिला दगडांच्या तीन चिऱ्या आणि गंधसरुच्या लाकडाची एक ओळ परमेश्वराच्या मंदिराचे आतले अंगण व त्या मंदिराची देवडी यांच्याप्रमाणे ही रचना होती.
大院四周的牆有三層鑿好的石頭和一層香柏木板;上主的殿宇的內院和殿廊,都包圍在內。兩根銅柱
13 १३ राजा शलमोनाने सोराहून (तायरहून) हिराम नावाच्या मनुष्यास निरोप पाठवून यरूशलेम येथे बोलावून घेतले.
撒羅滿王派人由提洛將希蘭接來。
14 १४ हिरामची आई नफताली वंशातील होती. त्याचे वडिल सोराचे (तायरचे) होते. ते चांगले तांबट कारागीर होते. हिराम हा एक ज्ञानाने, बुद्धीने, आणि कसबी तांबट होता. म्हणून शलमोन राजाने त्यालाच बोलावून घेतले. त्यानेही हे आमंत्रण स्विकारले. राजाने हिरामला सर्व पितळी कारागिरीवरील प्रमुख म्हणून नेमले. हिरामने पितळेपासून बनवलेल्या सर्व वस्तू घडविल्या.
希蘭是納斐塔里支派一個寡婦的兒子,他父親是提洛的一個銅匠;他多才多藝,會做一切銅工。他來到撒羅滿前,為他做一切工作,
15 १५ हिरामने दोन पितळी स्तंभ घडवले. ते स्तंभ अठरा हात उंचीचे होते. त्या प्रत्येकाला वेढावयास बारा हात दोरी लागे.
鑄了兩根銅柱:一根高十八肘,周徑十二肘,四指厚,中空;另一根也是這樣。
16 १६ शिवाय त्याने त्या खांबाच्या शेंड्यावर बसवण्यासाठी पितळेच दोन ओतीव कळस केले. त्या एकाएका कळसाची उंची पाच पाच हात होती.
製了兩個銅鑄的智頭,安在柱子頂端:一個柱頭五肘,另一個柱頭也高五肘。
17 १७ या खांबाच्या घुमटांना आच्छादण्यासाठी दोन जाळीदार, साखळीची आच्छादने केली. एकाला सात व दुसऱ्याला सात.
他又製了兩個銅網,為遮護柱子頂端的柱頭:這一個柱頭有一個銅網,另一個柱頭也有一個銅網。
18 १८ याप्रकारे त्याने खांब तयार करून त्यांच्या शेडंयावर प्रत्येक कळसास झाकण्यासाठी जाळ्यांच्या एका रांगेवर डाळिंबाच्या दोन रांगा केल्या.
在網子周圍,又製了兩行石榴,遮住柱頭:兩個柱頭都是如此。
19 १९ जे कळस देवडीच्या खांबांच्या शेंड्यांवर होते त्यांच्या चार हात जागेत कमळांचे काम केले होते.
柱子頂端上的柱頭,刻有百合花形像,四肘高。
20 २० हे घुमट स्तंभावर बसविलेले होते. परडीच्या आकाराच्या जाळीवर ते बसवले होते. या सगळ्या कळसांच्या भोवती रांगेने दोनशे डाळिंबे लावली होती.
兩根柱子頂端上的柱頭突起處,網子後面,各有石榴二百個,分行圍繞著。
21 २१ हे दोन पितळी स्तंभ हिरामने द्वारमंडपाशी लावले. दक्षिणेकडील खांबाला याखीन (तो स्थापील) आणि उत्तरे कडील खांबाला बवाज (त्याच्या ठायी सामर्थ्य) असे नाव ठेवले.
他將兩根柱子豎立在殿廊的前面:給立在右邊的柱子,起名叫雅津;給立在左邊的柱子,起名叫波阿次:
22 २२ कमळाच्या आकाराचे कळस या खांबांवर चढवले आणि या दोन स्तंभाचे काम संपले.
這樣,柱子的工作就算完成了。銅海
23 २३ मग त्याने एक गंगाळसागर ओतविला होता, त्याचा काठाकडला व्यास दहा हात होता; त्याचा आकार गोल असून त्याची उंची पाच हात होती व त्यास वेढायला तीस हात दोरी लागत असे.
他又鑄造了一座銅海,圓形,直徑十肘,高五肘,周徑三十肘。
24 २४ या हौदाच्या कडेल्या बाहेरच्या बाजूला एक पट्टी बसवली होती. तिच्याखाली पितळी रानकाकड्यांच्या दोन रांगा होत्या. या काकड्या हौदाचाच एक भाग म्हणून एकसंधपणे करून घेतल्या होत्या.
銅海邊緣下面周圍有匏瓜,每肘十個,四面圍繞著銅海;匏瓜分成兩行,是鑄銅海時鑄上去的。
25 २५ बारा पितळी बैलांच्या पाठीवर हा हौद विसावलेला होता. बैलांची तोंडे बाहेरच्या बाजूला होती. तिघांची तोंडे उत्तरेला, तिघांची दक्षिणेला, तिघांची पूर्वेला आणि तिघांची पश्चिमेला होती.
銅海安放在十二隻銅牛上;三隻向北,三隻向西,三隻向南,三隻向東。銅海安放在牛背上,牛尾朝裏。
26 २६ हौदाची जाडी वितभर होती; आणि वरची कड कटोऱ्याच्या कडेसारखी अथवा कमळफुलासारखी उमललेली होती. यामध्ये दोन हजार बथ पाणी मावत असे.
銅海厚一掌,邊像杯邊,形似百合花,可容兩千「巴特。」盆與盆座
27 २७ मग हिरामने दहा पितळी चौरंग बनवले. प्रत्येक चौरंग चार हात लांब, चार हात रुंद आणि तीन हात उंच होते.
又鑄造了十個銅盆座,每個長四肘,寬四肘,高三肘。
28 २८ चौरंग याप्रकारे बनविण्यात आले होते; त्यास पत्रे लावलेले होते आणि या पत्र्यास सभोवार कंगोरे होते.
盆座的造法是這樣:盆座有鑲板,鑲板裝入框架內,
29 २९ पितळी पत्रे आणि चौकट यांच्यावर सिंह, बैल व करुब देवदूत यांचे कोरीव काम होते. सिंह आणि बैल यांच्याखाली फुलांची वेलबुट्टी बसवलेली होती.
在框架中間的鑲板上刻有獅子、牛和革魯賓的形像,在框架上也有雕刻;獅子和牛的形像下,刻有花紋浮雕。
30 ३० प्रत्येक चौरंगाला पितळी धुऱ्यांवर पितळेची चारचार चाके लावलेली होती आणि चारही कोपऱ्यातून प्रशस्त घंगाळासाठी पितळी आधार दिलेले होते. त्यावरही फुलांचे सुबक काम केलेले होते.
每個盆座有四個銅輪和銅軸;盆底有四腳作支柱,支柱是鑄成的;每邊都刻有花紋。
31 ३१ कळसाच्या आतल्या बाजूपासून वरपर्यंत त्याचे तोंड एक हात उंच होते हे तोंड बैठकीसारखे असून त्याचा व्यास दीड हात होता, त्यावर काही कोरीव काम होते, त्याच्या पट्टया गोल नसून चौकोनी होत्या.
盆座的口,從座底至口邊高一肘半;口成圓形,為安放銅盆之用;在口的邊緣上也有雕刻;盆座的鑲板是四方形的,而不是圓形的。
32 ३२ चारही चाके पट्यांच्या खाली होती व प्रत्येक चाकाच्या धुऱ्या तळाशी जोडल्या होत्या, त्या प्रत्येक चाकाची उंची दीड हात होती.
四個輪子是在鑲板之下,輪軸與座底相接;輪子高一肘半。
33 ३३ रथाच्या चाकांसारखी ही चाके होती. आणि त्याच्या धुऱ्या धावा, आरे आणि तुंबे असे सर्वकाही ओतीव पितळेचे होते.
輪子的製法和車輪的製法一樣,輪軸、輪輞、輪輻和輪轂,都是鑄成的。
34 ३४ प्रत्येक चौरंगाच्या चारही कोपऱ्यांना आधार दिलेले होते. तेही एकसंध होते.
每個盆座有四根支柱支持四角,支柱與盆座是一塊鑄成的。
35 ३५ प्रत्येक चौरंगावर अर्धा हात उंच गोलाकार झाकण होते, व त्या झाकणाचे टेकावे व त्याच्या पट्टया ही चौरंगाशी अंखड होत्या.
盆座頂上有一個圓架,高半肘;在座頂上有柄,鑲板與座是一塊鑄成的。
36 ३६ चौरंगाची बाहेरची बाजू आणि चौकट यांच्यावर करुब देवदूत, सिंह, खजूरीची झाडे यांचे कोरीव काम पितळेचे केलेले होते. ही नक्षी अगदी भरगच्च असून त्यामध्ये कुठेही मोकळी जागा नव्हती. शिवाय भोवताली फुलांची नक्षी होती.
鑲板壁上刻有革魯賓、獅子和棕樹;四周空處另刻有花紋。
37 ३७ हिरामने अशाप्रकारे अगदी एकसारखे एक असे दहा पितळी चौरंग घडवले. हे सर्व ओतीव काम होते त्यामुळे ते तंतोतंत एकसारखे होते.
十個盆座都是這樣做的:鑄法、尺寸和式樣完全相同。
38 ३८ हिरामने अशीच दहा गंगाळे केली. ती या दहा चौरंगासाठी प्रत्येकी एक याप्रमाणे होती. प्रत्येक गंगाळाचा व्यास चार हात होतो. त्यामध्ये चाळीस बथ पाणी मावू शकत असे.
又製了十個銅盆,每個銅盆可容四十「巴特;」每個銅盆高四肘;十個銅盆座上,每個安放一個銅盆。
39 ३९ त्याने पाच बैठकी मंदिराच्या उत्तरेला आणि दक्षिणेला पाच व गंगाळसागर मंदिराच्या उजवीकडे पूर्व दिशेला ठेवल्या.
他把盆座,五個放在殿的右邊,五個放在殿的左邊;至於銅海,他放在殿右靠東南方。希蘭所製物品
40 ४० याखेरीज हिरामने वाडगी, पावडी, लहान गंगाळे बनवली. शलमोन राजाने सांगितले ते सर्व हिरामने केले. परमेश्वराच्या मंदिरासाठी हिरामने ज्या वस्तू घडवल्या
希蘭又製造了鍋、鏟和盤:這樣,希蘭為撒羅滿作完了上主殿宇的一切工作:
41 ४१ त्यांची यादी पुढीलप्रमाणे: दोन स्तंभ स्तंभाच्या कळसांवर बसवायच्या दोन घुमट्या त्यांच्या भोवतीच्या दोन जाळ्या
計有柱子兩根,柱子頂端球形的柱頭兩個,遮護柱子頂端球形柱頭的網子兩個,
42 ४२ या दोन जाळ्यांसाठी चारशे नक्षीदार डाळिंबे तयार केली खांबाच्या शेंडयावरील प्याल्याच्या आकाराचे कळसाचे भाग झाकावयाच्या जाळ्यासाठी या डाळींबाच्या दोन-दोन रांगा होत्या.
兩個網子上的石榴四百個,─每個網子上有兩行石榴,為遮護柱子頂端的兩個球形柱頭,
43 ४३ दहा चौंरग व त्यांच्यावरील दहा गंगाळे,
盆座十個,放在座上的盆子十個,
44 ४४ एक गंगाळसागर व त्याच्याखालचे बारा बैल;
銅海一個,銅海下的銅牛十二隻,
45 ४५ याखेरीज हंडे, पातेली, पावडी अशी परमेश्वराच्या मंदिरासाठी वेगवेगळी पात्रे शलमोन राजाच्या इच्छेखातर हिरामने बनवले. ते सर्व लखलखीत पितळेच होते.
鍋鏟和盤:以上一切器皿,都是希蘭給撒羅滿用光滑的銅,為上主的殿製造的,
46 ४६ सुक्कोथ आणि सारतान यांच्यामध्ये यार्देन नदीच्या तीरावर असलेल्या मैदानावर शलमोन राजाने हे काम करायला सांगितले. पितळ वितळवून मातीच्या साच्यात हे ओतकाम करण्यात आले.
是他在約旦平原,穌苛特與匝爾堂之間,用膠泥模鑄成的。
47 ४७ या सगळ्यासाठी किती पितळ लागले ते शलमोन राजाने बघितले नाही. वजन करायचे म्हटले तरी ते खूपच होते. त्यामुळे या सर्व वस्तूंचे नक्की वजन कधीच माहीत झाले नाही.
撒羅滿沒有秤量這一切器皿,因為銅太多,重量無法計算。
48 ४८ शलमोनाने परमेश्वराच्या मंदिरासाठी सोन्याच्याही कितीतरी वस्तू करवून घेतल्या. त्या अशा: सोन्याचे मेज (देवाची सोन्याची वेदी समर्पित भाकर ठेवण्यासाठी)
以後撒羅滿又製造了上主殿內的一切用具:就是金祭壇,供餅的金桌,
49 ४९ शुद्ध सोन्याच्या समया. (या परमपवित्र गाभाऱ्यासमोर उजवीडावीकडे पाच पाच लावलेल्या होत्या) सोन्याची फुले, दिवे आणि चिमटे ही सोन्याची करवली होती.
內殿前的燈臺,五個在右邊,五個在左邊,都是純金的;還有花蕊、燈盞、燭剪,也是金的。
50 ५० पेले, कातरी, कटोरे, चमचे व धूपदाने ही शुद्ध सोन्याची करवली होती; तसेच मंदिराचा आतील भाग म्हणजे परमपवित्रस्थान यांचे दरवाजे व पवित्रस्थानाच्या दाराच्या बिजागऱ्या सोन्याच्या बनवल्या होत्या.
又有盆、刀、碗、杯、火盤,都是純金的;還有內殿既至聖所,和正殿的門樞,都是金的。
51 ५१ परमेश्वराच्या मंदिराचे हे काम शलमोन राजाने स्वत: च्या हाती घेतले ते संपवले. मग आपले वडिल दावीद यांनी समर्पिलेले सोने, चांदी व पात्रे ही शलमोनाने आत आणून परमेश्वराच्या मंदिराच्या भांडारात ठेवली.
撒羅滿就這樣完成了為上主的殿所作的一切工作。撒羅滿將他父親達味所奉獻的銀子、金子和器皿運了來,存放在上主殿宇的府庫內。