< 1 राजे 22 >
1 १ पुढील तीन वर्षे इस्राएल आणि अराम यांच्यामध्ये शांततेची गेली.
[南北兩國戰阿蘭]阿蘭與以色列之間連續三年沒有戰爭。
2 २ तिसऱ्या वर्षी, यहूदाचा राजा यहोशाफाट इस्राएलाचा राजा याला भेटायला गेला.
第三年上,猶大王約沙法特下去見以色列王。
3 ३ यावेळी इस्राएलाच्या राजाने आपल्या अधिकाऱ्यांना विचारले, “अरामाच्या राजाने रामोथ-गिलाद आपल्याकडून घेतले होते ते आठवते ना? ते परत मिळवण्यासाठी आपण काहीच का केले नाही? रामोथ आपले असायला हवे.”
以色列王對自己的臣僕說:「你們知道辣摩特基肋阿得原屬於我們,而我們一直沒有設法從阿蘭王的手中奪回來。」
4 ४ आणि इस्राएल राजा यहोशाफाटाला म्हणाला, “तुम्ही आमच्या बाजूने रामोथ-गिलाद येथे अरामी सैन्याशी लढाल का?” यहोशाफाट म्हणाला, “अवश्य माझे सैन्य आणि घोडे तुमचेच आहेत.”
然後對約沙法特說:「你願意同我一起去攻取辣摩特基肋阿得嗎﹖」約沙法特回答以色列王說:「你怎樣,我也怎樣;我的人民就如同是你的人民,我的馬就如同是你的馬。」假先知預言戰勝
5 ५ यहोशाफाटाने इस्राएलाच्या राजास म्हटले, “प्रथम आपण परमेश्वराचा सल्ला घेतला पाहिजे.”
以後,約沙法特對以色列王說:「請你先求問上主說什麼﹖」
6 ६ तेव्हा इस्राएलाच्या राजाने संदेष्ट्यांची एक सभा घेतली. तेव्हा तिथे चारशे संदेष्टे हजर होते. राजाने त्यांना विचारले, “आपण आत्ताच रामोथ-गिलाद येथे अरामी फौजेवर चालून जावे का?” की काही काळ थांबावे? संदेष्टे म्हणाले, “तुम्ही खुशाल आत्ताच हल्ला करा. परमेश्वर तुम्हास जय मिळवून देईल.”
以色列王於是召集了眾先知,人數約有四百,問他們說:「我上去進攻辣摩特基肋阿得,還是不去呢﹖」他們回答說:「上去,上主必將那地交於大王手中。」
7 ७ पण यहोशाफाटाने शंका काढली, “परमेश्वराचा आणखी कोणी संदेष्टा यांच्या खेरीज इथे आहे का? तसा असेल तर त्यालाही देवाचे मत विचारलेले बरे.”
但是,約沙法特說:「這裏就沒有一位上主的先知,我們可託他求問嗎﹖」
8 ८ इस्राएलाचा राजा म्हणाला, “ज्याच्या द्वारे परमेश्वराचा सल्ला घेता येईल तसा आणखी एक संदेष्टा आहे. इम्ला याचा पुत्र मीखाया.” पण मी त्याचा द्वेष करतो. कारण तो काही सांगतो तेव्हा माझ्याबद्दल कधीच चांगले भविष्यकथन करत नाही. त्याचे बोलणे मला अप्रिय वाटते. यहोशाफाट म्हणाला, “इस्राएलाच्या राजा, तुझे असे बोलणे बरोबर नव्हे.”
以色列王回答約沙法特說:「還有一個我們可以託他求問上主;不過我憎恨他,因為他對我說預言,總不說吉祥話,只說兇言;這人即是依默拉的兒子米加雅。」約沙法特對他說:「請大王別這樣說! 」
9 ९ तेव्हा इस्राएलाच्या राजाने आपल्या एका सेवकाला “इम्लाचा पुत्र मीखायाला घेऊन येण्यास सांगितले.”
以色列王於是召一個宦官來,吩咐他說:「快去將依默拉的兒子米加雅召來! 」
10 १० यावेळी इस्राएलाचा राजा व यहूदाचा राजा यहोशाफाट राजवस्त्रे घालून सिंहासनावर बसले होते. शोमरोनच्या वेशीजवळ न्यायदान चालते त्याठिकाणी ते होते. सर्व संदेष्टे त्यांच्या समोर उभे होते. त्यांचे भविष्यकथन चालेले होते.
當時以色列王和猶大王在撒瑪黎雅城門前的廣場上,各穿朝服,坐在寶座上;所有的先知在他們面前說預言。
11 ११ त्यांच्यापैकी एक कनानाचा पुत्र सिद्कीया हा होता. त्याने प्रचंड शक्तीचे प्रतीक अशी लोखंडाची शिंगे केली होती. तो अहाबाला म्हणाला, “परमेश्वराचे म्हणणे हे आहे की ही शिंगे तू अरामी सैन्याविरुध्द लढताना वापरावीस म्हणजे तू शत्रूचा पराभव करशील, त्याचा संहार करशील.”
革納阿納的兒子漆德克雅帶來了些自製的鐵角說:「上主這樣說:你要用這些鐵角殺盡阿蘭人。」
12 १२ मग ते सर्वच भविष्यवादी भविष्य सांगत होते. पुढे सिद्कीया म्हणाला, “आता तुझ्या सैन्याने चढाई करावी. रामोथ-गिलाद येथे अरामी सैन्यावर हल्ला करावा. विजय तुमचाच आहे. परमेश्वर ते राजाच्या हाती देईल.”
所有的先知也同樣預言說:「你上辣摩特基肋阿得去,必然順利,上主必將那地交於大王手中! 」米加雅預言戰敗
13 १३ हे चाललेले असतानाच एक सेवक मीखायाच्या शोधात गेला व त्यास भेटून म्हणाला, “राजा या युध्दात विजयी होईल असे सर्वच संदेष्ट्यांचे म्हणणे आहे. तेव्हा तूही तसेच म्हणणे श्रेयस्कर ठरेल व ते सुरक्षितपणाचे होईल.”
那去召米加雅的使者對米加雅說:「看,先知們都一口同聲對君王說吉祥話,希望你說話,也如同他們中的一個一樣,也說吉祥話。」
14 १४ पण मीखाया म्हणाला, “नाही, कदापि नाही. जे परमेश्वर माझ्याकडून वदवतो तेच मी सांगेन. माझी तशी प्रतिज्ञाच आहे.”
米加雅回答說:「我指著永生的上主起誓:上主吩咐我什麼,我就說什麼! 」
15 १५ मीखाया मग राजाकडे आला. राजाने त्यास विचारले, “मीखाया, मी आणि राजा यहोशाफाट हातमिळवणी करु ना? रामोथ-गिलाद अरामाच्या सैन्यावर आता चढाई करु का?” मीखाया म्हणाला, “हो तुम्ही आत्ताच ही लढाई करा. परमेश्वर तुम्हास यश देईल.”
米加雅來到君王那裏,君王問他說:「米加雅,我們應該上去進攻辣摩特基肋阿得,還是不去呢﹖」他回答說:「上去,必然順利! 上主必將那地交在大王手中! 」
16 १६ पण राजा त्यास म्हणाला, “तू हे परमेश्वराच्या शक्तीने सांगत नाहीस. आपल्या मनाचे सांगतो आहेस. तेव्हा खरे काय ते सांग परमेश्वराचे म्हणणे सांग. अशी शपथ कितीदा मी तुला देऊ?”
君王對他說:「我應該多少次叫你宣誓,你纔奉上主的名對我說實話呢﹖」
17 १७ तेव्हा मीखायाने सांगितले, “काय होणार ते मला दिसते आहे. इस्राएलाचे सैन्य डोंगरांवर इतस्तत: पसरेल. मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखी त्यांची अवस्था होईल. परमेश्वराचे म्हणणे असे आहे, ‘यांना कोणी नेता नाही. यांनी सुखरूप घरी जावे. लढाईच्या भानगडीत पडू नये.”
米加雅答說:「我看見全以色列人散在山上,好像沒有牧人的羊群。上主說:這些人既然沒有主人,就讓他們各自平安回家罷! 」
18 १८ मग इस्राएलाच्या राजा यहोशाफाटाला म्हणाला, “पाहा, हेच बोललो होतो ना मी! हा संदेष्टा कधीही माझ्याबद्दल चांगले भविष्यकथन करत नाही. हा नेहमी अप्रिय गोष्टीच मला ऐकवतो.”
以色列王對約沙法特說:「我不是告訴過你:他對我說預言總不說吉祥話,只說凶話﹖」
19 १९ इकडे परमेश्वराचे म्हणणे काय आहे ते मीखाया सांगतच होता. मीखाया म्हणाला, “ऐका परमेश्वर काय म्हणतो: ते पाहा परमेश्वर स्वर्गात सिंहासनावर बसलेला मी पाहिला. आकाशातले त्याचे सर्व सैन्य त्याच्या शेजारी उभे आहे.
米加亞答說:「為此,你且靜聽上主的話:我見上主坐在寶座上,天上的萬軍侍立在他左右。
20 २० परमेश्वराने म्हटले, ‘अहाब राजाची कोणी फसगत करेल का? त्याने रामोथ-गिलाद वर हल्ला करावा असे मला वाटते. त्यामध्ये त्यास मरण येईल.’ तेव्हा आता काय करावे याबद्दल देवदूतांमध्ये एकमत होईना.
上主問說:有誰能去唆使阿哈布,叫他上去進攻辣摩特基肋阿得,而死在那裏呢﹖那時有的說這樣,有的說那樣。
21 २१ मग त्यापैकी एकजण परमेश्वराकडे गेला आणि म्हणाला, ‘मी हे काम करीन.’
以後,有一個神出來,立在上主面前說:我能唆使他。上主問他說:用什麼方法﹖
22 २२ परमेश्वर त्यास म्हणाला, ‘तू अहाबाची फसगत कशी करशील?’ यावर तो देवदूत म्हणाला, ‘मी अहाबाच्या संदेष्ट्यांमध्ये गोंधळ माजवून देईन. त्यांना मी राजाशी खोटे बोलायला प्रवृत्त करीन संदेष्टे राजाला सांगतील ते खोटे असेल.’ यावर परमेश्वर म्हणाला, ‘हे चांगले झाले; जा आणि अहाब राजाला या मोहात पाड, तुला यश येईल.
那神回答說:我去,在他所有的先知口中做虛言的神。上主答說:你必能唆使他,也必會成功,你去照辦罷!
23 २३ मीखायाचे सांगून झाले. मग तो म्हणाला, तेव्हा खरी हकिकत अशी आहे. परमेश्वरानेच तुमच्या संदेष्ट्यांना खोटे बोलायला लावले आहे. तुमच्यावर मोठे संकट ओढवावे असे परमेश्वरास वाटते.”
現在上主將虛言的神,放入你這些先知口中,上主已注定你必遭殃。」
24 २४ मग कनानाचा पुत्र सिदकीया हा संदेष्टा मीखायाजवळ गेला. मीखायाच्या त्याने तोंडात मारले. सिद्कीया म्हणाला, “माझ्यातली परमेश्वराची शक्ती संपली आहे आणि तो आता तुझ्या मार्फतच बोलतो आहे अशी खरेच तुझी समजूत आहे?”
那時,革納阿納的兒子漆德克雅前來,打米加雅的臉說:「上主的神有何曾離開了我,而同你談話呢﹖」
25 २५ मीखाया म्हणाला, “लवकरच आपत्ती येणार आहे. तेव्हा तू एका लहानशा खोलीत दडून बसशील तेव्हा माझे म्हणणे खरे असल्याचे तुझ्या लक्षात येईल.”
米加雅答說:「在你進入最嚴密的室內隱藏的那一天,你就會知道了。」
26 २६ तेव्हा इस्राएलच्या राजाने आपल्या एका सेवकाला मीखायाला पकडायचा हुकूम केला. राजा म्हणाला, “याला धरा आणि नगराधिकारी आमोन व राजपुत्र योवाश यांच्याकडे घेऊन जा.
以色列王吩咐說:「將米加雅帶回去,交給阿孟市長及約阿士王子,
27 २७ आणि त्यांना जाऊन सांगा, राजा म्हणतो, या मनुष्यांस बंदीत टाका व मी सुखरूप परत येईपर्यंत त्यास फक्त भाकर आणि पाणी द्या. युध्दावरुन मी परत सुखरूप येईपर्यंत त्यास तिथेच राहू द्या.”
說君王這樣吩咐:將這人下在監裏,少給他吃的喝的,等我平安回來。」
28 २८ मीखाया मोठ्याने म्हणाला, “मी काय म्हणतो ते सर्व लोकहो ऐका. राजा, तू युध्दावरुन जिवंत परत आलास तर परमेश्वर माझ्या मार्फत बोलला नाही असे खुशाल समजा.”
米加雅說:「你如果能平安回來,那麼,上主就沒有藉我說過話。」後又說:「眾百姓! 你們要聽清楚啊! 」阿哈布陣亡
29 २९ नंतर इस्राएल राजा अहाब आणि यहूदाचा राजा यहोशाफाट रामोथ येथे अरामाच्या सैन्याशी लढायला गेले. रामोथ-गिलाद प्रांतात हे युध्द झाले.
以色列王遂與猶大王約沙法特上去,進攻辣摩特基肋阿得。
30 ३० अहाब यहोशाफाटाला म्हणाला, “आपण आता युध्दाचा व्यूह रचू. मला राजा म्हणून कोणी ओळखणार नाही असे कपडे मी घालीन. पण तू मात्र राजाला शोभेल असाच पोषाख कर.” अशाप्रकारे इस्राएलाच्या राजाने अगदी चारचौघांसारखे कपडे करून युध्दाला सुरुवात केली.
以色列王對約沙法特說:「我要改裝上陣,你可以仍穿朝服。」於是以色列王改裝上了陣。
31 ३१ अरामाच्या राजाकडे बत्तीस रथाधिपती होते. त्या राजाने या बत्तीस जणांना इस्राएलाच्या राजाचा शोध घ्यायला सांगितले. राजाला ठार करण्याबद्दल त्याने त्यांना बजावले.
阿蘭王曾吩咐自己的三十二個戰車隊長說:「你們不必與大小將士交戰,只攻打以色列王! 」
32 ३२ तेव्हा युध्द चालू असताना या रथाधिपतींनी राजा यहोशाफाटाला पाहिले. “तोच इस्राएलचा राजा असे त्यांना वाटले.” त्यामुळे त्याचा ते वध करायला निघाले. यहोशाफाट आरडाओरडा करु लागला.
戰車隊長一看見約沙法特,便說:「這必是以色列王! 」遂轉身向他進攻,約沙法特連聲叫苦;
33 ३३ हा इस्राएलचा अहाब राजा नव्हे हे त्या रथाधिपतीच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्यास मारले नाही.
戰車隊長見他不是以色列王,就不再追擊他。
34 ३४ तेव्हा एका सैनिकाने, कोणावर नेम धरुन नव्हे असा हवेतच एक बाण सोडला. हा बाण नक्की इस्राएलाचा राजा अहाब याला लागला. शरीराचा जो छोटा भाग चिलखताने झाकलेला नव्हता तिथे बाण लागला. तेव्हा राजा अहाब आपल्या सारथ्याला म्हणाला, “मला बाण लागला आहे. रथ येथून हलव. आपण या लढाईपासून दूर जाऊ.”
有人偶然一箭,射入以色列王的鎧甲與腰帶中間,君王對駕車的人說:「轉回! 載我離開陣地,我已受傷。」
35 ३५ युध्द मात्र चालूच राहिले. राजा अहाब आपल्या रथात बसून राहिला. रथात टेकून बसून तो अरामाच्या सैन्याकडे पाहत होता. त्यास एवढा रक्तस्राव झाला की रथाच्या बैठकीच्या भागात रक्ताचे थारोळे झाले. संध्याकाळच्या सुमारास राजाला मृत्यू आला.
但那天戰事越來越激烈,君王仍然立在車上,抵抗阿蘭人;晚上君王就死了;傷處的血直流到車底。
36 ३६ सूर्यास्ताच्या वेळी “इस्राएलाच्या सर्वसैन्याला आपापल्या प्रांतात घरोघरी जायचा आदेश मिळाला.”
約在日落的時候,營中傳出號令說:「各自回城,各自歸家,
37 ३७ राजा अहाबाला अशा तऱ्हेने मरण आले. काही जणांनी त्याचा देह शोमरोनाला आणला. त्यास त्यांनी तिथे पुरले.
君王已死! 」人們將君王送回撒瑪黎雅,在那裏埋葬了。
38 ३८ शोमरोनमधल्या तळ्यावर या लोकांनी अहाबाच्या रथ धुतला. रथातील रक्त कुत्र्यांनी चाटले आणि त्या तळ्यातील पाण्याने वेश्या स्नान करीत असत. परमेश्वराने जे जे होईल असे सांगितले होते तसेच नक्की घडले.
在撒瑪黎雅的池塘中,洗滌君王的車時,有狗來舔他的血,有妓女在那裏沐浴,正應驗上主所說的話。
39 ३९ इस्राएलाच्या राजांचा इतिहास या ग्रंथात राजा अहाबाच्या सर्व गोष्टींची नोंद केलेली आहे. आपला महाल सुशोभित करण्यासाठी त्याने हस्तिदंत कसे वापरले, त्याने नगरे उभारली याबद्दलही या ग्रंथात सांगितलेले आहे.
阿哈布其餘得事蹟,他的一切作為,所建造的象牙宮,以及修築的一切城市,都記載在以色列列王實錄上。
40 ४० अहाब मरण पावला व त्यास त्याच्या पूर्वजांशेजारी दफन करण्यात आले. त्याचा पुत्र अहज्या त्याच्या जागी राजा झाला.
阿哈布與祖先同眠,他的兒子阿哈齊雅繼位為王。約沙法特為猶大王
41 ४१ अहाब इस्राएलाचा राजा झाल्यावर चौथे वर्ष चालू असताना यहोशाफाट यहूदाचा राजा झाला. यहोशाफाट हा आसाचा पुत्र.
以色列王阿哈布四年,阿撒的兒子約沙法特登極作猶大王。
42 ४२ यहोशाफाट वयाच्या पस्तीसाव्या वर्षी राजा झाला आणि यरूशलेमामध्ये त्याने पंचवीस वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव अजूबा. ती शिल्हीची कन्या.
約沙法特登極時,年三十五歲;在耶路撒冷作王二十五年;他的母親名叫阿組巴,是史肋希的女兒。
43 ४३ यहोशाफाट चांगला राजा होता. हा आपले वडिल आसा ह्यांच्याप्रमाणेच वागला. परमेश्वराच्या दृष्टीने जे योग्य ते त्याने केले. पण यहोशाफाटाने उंचावरील पूजास्थळे काढली नाहीत. लोक त्याठिकाणी होम करणे, धूप जाळणे वगैरे करत राहिले.
約沙法特完全走了他父親阿撒的道路,不偏左右,行了上主視為正義的事; 只有丘壇,還沒有鏟除,人民仍在丘壇上焚香獻祭。
44 ४४ यहोशाफाट राजाने इस्राएलाच्या राजाशी शांततेचा करार केला.
約沙法特與以色列王相安無事。
45 ४५ राजा यहोशाफाट शूर होता. त्याने बऱ्याच लढाया केल्या. त्याने जे केले त्याची हकिकत यहूदाच्या राजांचा इतिहास या ग्रंथात आहे.
約沙法特其餘的事蹟,他所做的英雄事蹟,以及如何作戰,都記載在猶大列王實錄上。
46 ४६ त्याचे वडिल आसा राज्य करीत असताना जे पुरुषगमन करणारे राहून गेले होते त्यांना यहोशाफाटाने त्यांना हाकलून लावले.
約沙法特將他父親活著時,所留下的為神賣淫的男女,全從國內鏟除。
47 ४७ याच काळात अदोम प्रदेशाला राजा नव्हता. एक कारभारीच इथला कारभार पाहत असे. त्याची नेमणूक यहूदाचा राजा करी.
當時在厄東沒有君王,只有總督代理。
48 ४८ राजा यहोशाफाटाने तार्शीशी काही मालवाहू गलबते बांधली. त्यामध्ये त्याचा हेतू ओफिरहून सोने आणण्याचा होता. पण ती तेथपर्यंत कधी पोहोंचू शकली नाहीत कारण एसयोन-गेबेरच्या बंदरात त्यांची नासधूस करण्यात आली.
約沙法特建造了塔爾史士船隻,為到敖非爾去運輸黃金,然而沒有到達,船隻就在厄茲雍革貝爾破壞了。
49 ४९ इस्राएलाचा राजा अहाबाचा पुत्र अहज्या याने यहोशाफाटाला मदतीचा हात दिला. “त्याच्या मनुष्यांबरोबर आपले खलाशी देण्याची तयारी दर्शवली.” पण अहज्याची कुमक स्विकारण्यास यहोशाफाटाने नकार दिला.
那時阿哈布的兒子阿哈齊雅對約沙法特說:「讓我的僕人同你的僕人一起坐船去好了! 」但是,約沙法特沒有同意。
50 ५० यहोशाफाट मरण पावला त्यानंतर दावीद नगरात आपल्या पूर्वजांबरोबर त्याचे दफन करण्यात आले. त्याच्या जागी त्याचा पुत्र यहोराम राज्य करु लागला.
約沙法特與祖先同眠,與祖先一同葬在達味城;他的兒子約蘭繼位為王。阿哈齊雅為以色列王
51 ५१ अहज्या अहाबाचा पुत्र होता. यहोशाफाटाच्या यहूदावरील सत्तेच्या सतराव्या वर्षी अहज्या इस्राएलाचा राजा झाला. शोमरोन मध्ये त्याने दोन वर्षे राज्य केले.
猶大王約沙法特十七年,阿哈布的兒子阿哈齊雅,在撒瑪黎雅登極作以色列王;他作王統治以色列只有兩年,
52 ५२ अहज्याने परमेश्वराचे अनेक अपराध केले. आपले वडिल अहाब, आई ईजबेल आणि नबाटाचा पुत्र यराबाम या सगळ्यांनी जे केले तेच याने केले. या सर्व राज्यकर्त्यांनी इस्राएली लोकांस आणखी पापात लोटले.
行了上主視為惡的事,隨從了他父親和他母親以及乃巴特的兒子雅洛貝罕,使以色列陷於罪惡的道路,
53 ५३ आपल्या वडिलांप्रमाणेच अहज्यानेही बआल या अमंगळ दैवताची पूजा केली. त्यामुळे इस्राएलचा देव परमेश्वर याचा कोप ओढवला. परमेश्वर अहाबावर संतापला होता तसाच अहज्यावर संतापला.
服事敬拜了巴耳,激怒了上主,以色列的天主,全像他父親所作的一樣。