< 1 राजे 21 >

1 नंतर असे झाले की, अहाब राजाचा राजवाडा शोमरोनात होता. त्याच्या महालाशेजारी इज्रेल येथे एक द्राक्षाचा मळा होता. तो नाबोथ इज्रेलकर नावाच्या मनुष्याचा होता.
Sometime later this happened: There was a man named Naboth from Jezreel, who owned a vineyard in Jezreel close to King Ahab's palace in Samaria.
2 एकदा अहाब नाबोथला म्हणाला, “तुझा मळा मला दे. तिथे मला भाजीचा मळा करायचा आहे. तुझा मळा माझ्या महालाला लागूनच आहे. त्याच्या ऐवजी मी तुला आणखी चांगला द्राक्षमळा देईन. किंवा तुला हवे असेल तर याचा मोबदला मी पैशात देईन.”
Ahab went to Naboth and said, “Give me your vineyard so I can turn it into a vegetable garden, because it's close to my palace. In return I'll give you a better vineyard, or if you want I'll pay you for it in cash.”
3 नाबोथ अहाबाला म्हणाला, “माझ्या वाडवडिलांचे वतन मी आपणास द्यावे असे परमेश्वर माझ्या हातून न घडवो.”
But Naboth replied, “The Lord curse me if I should give you my forefathers' inheritance.”
4 तेव्हा अहाब घरी परतला. पण तो नाबोथावर रागावलेला होता. इज्रेलचा हा मनुष्य जे बोलला ते त्यास आवडले नाही. (नाबोथ म्हणाला होता, “माझ्या कुटुंबाची जमिन मी तुम्हास देणार नाही)” अहाब अंथरुणावर पडला त्याने तोंड फिरवून घेतले आणि अन्नपाणी नाकारले.
Ahab went home sulking and infuriated because Naboth from Jezreel had said, “I will not give you my forefathers' inheritance.” He went to bed, wouldn't look at anyone, and refused to eat.
5 अहाबाची पत्नी ईजबेल त्याच्याजवळ गेली. त्यास म्हणाली, “तुम्ही असे खिन्न का? तुम्ही जेवत का नाही?”
His wife Jezebel came in and asked him, “Why are you so upset about? That you don't want to eat?”
6 अहाब म्हणाला, “इज्रेल येथल्या नाबोथाला मी त्याचा मळा मला द्यायला सांगितला ‘त्याची पूर्ण किंमत मी मोजायला तयार आहे किंवा हवे तर दुसरी जमीन द्यायला तयार आहे हे ही मी त्यास सांगितले. पण नाबोथ त्याचा मळा द्यायला कबूल होत नाही.”
Ahab replied, “It's because I talked with Naboth from Jezreel and I asked him, ‘Give me your vineyard for cash, or if you want, I'll give you another vineyard instead.’ But he said, ‘I will not give you my vineyard.’”
7 ईजबेल त्यास म्हणाली, “पण तुम्ही तर इस्राएलाचे राजे आहात. उठा, काहीतरी खा म्हणजे तुम्हास बरे वाटेल. नाबोथ इज्रेलकरचा मळा मी आपल्याला मिळवून देईन.”
“Aren't you the king of Israel?” his wife Jezebel replied. “Get up, have something to eat, and cheer up. I'll get you the vineyard of Naboth from Jezreel.”
8 ईजबेलने मग काही पत्रे लिहिली. पत्रांवर तिने अहाबाची सही केली. अहाबाच्या शिक्का वापरुन पत्रांवर तो शिक्का उमटवला. मग तिने ही पत्रे नाबोथाच्या गावच्या वडिलधाऱ्या मंडळींना आणि थोरामोठ्यांना पाठवली.
So she wrote some letters in Ahab's name and sealed them with his seal. She sent the letters to the elders and leaders in the town where Naboth lived.
9 पत्रातला मजकूर असा होता: “एक दिवस उपवासाची घोषणा करा. मग गावातल्या लोकांस एकत्र बोलवा. तिथे नाबोथविषयी बोलणे होईल.
In the letters she wrote to tell them, “Announce a religious fast, and give Naboth a seat of honor.
10 १० नाबोथाबद्दल खोट्या गोष्टी सांगणारी काही अधम माणसे जमवा. नाबोथ राजाविरुध्द आणि देवाविरुध्द बोलला, हे आम्ही ऐकले, असे त्या मनुष्यांनी म्हणावे. एवढे झाल्यावर नाबोथला गावाबाहेर घालवून दगडांचा वर्षाव करून मारा.”
But seat two bad men opposite him and have them accuse him, saying, ‘You have cursed God and the king!’ Then take him out and stone him to death.”
11 ११ ईजबेलीच्या पत्रातील आज्ञेप्रमाणे इज्रेलमधल्या गावातील वयाने आणि मानाने वडिलधाऱ्या (पुढ्याऱ्यांनी) मंडळींनी ही आज्ञा मानली.
So the elders and leaders who lived in Naboth's town did as Jezebel had said in the letters she had written and sent to them.
12 १२ त्यांनी उपवासाचा म्हणून एक दिवस घोषित केला. त्यादिवशी सर्व लोकांस सभेत बोलावले. नाबोथला सर्वांसमोर खास आसनावर बसवले.
They announced a religious fast, and gave Naboth a seat of honor.
13 १३ मग, “नाबोथ देवाविरुध्द आणि राजाविरुध्द बोलल्याचे आपण ऐकले आहे” असे दोन अधम मनुष्यांनी साक्ष सांगितली. तेव्हा लोकांनी नाबोथला गावाबाहेर घालवले आणि तो मरेपर्यंत त्याच्यावर दगडांचा वर्षाव केला.
Two bad men came and sat opposite him, and accused him in front of the people, saying, “Naboth has cursed God and the king.” So they took him outside the town and stoned him to death.
14 १४ मग त्या प्रतिष्ठित मनुष्यांनी ईजबेलकडे निरोप पाठवला. “नाबोथचा वध झाला आहे.” असा तो निरोप होता.
Then they sent a message to Jezebel, saying, “Naboth has been stoned. He's dead.”
15 १५ ईजबेलने हे ऐकले तेव्हा ती अहाबाला म्हणाली, “नाबोथ मेला. आता तुम्हास नाबोथ इज्रेलकरचा हवा होता तो मळा तुम्ही जाऊन ताब्यात घेऊ शकता” जो तो पैसे घेऊनही ताब्यात द्यायला तयार नव्हता नाबोथ आता जिवंत नाही मेला आहे.
As soon as Jezebel heard that Naboth had been stoned and he was dead, Jezebel told Ahab, “Get up, go and claim ownership of the vineyard of Naboth from Jezreel, which he refused to sell you, for Naboth is no longer alive, but dead.”
16 १६ यावर इज्रेलकर नाबोथ आता मरण पावला आहे हे अहाबाने ऐकले तेव्हा त्याने तो द्राक्षमळा आपल्या ताब्यात घेतला.
When Ahab heard that Naboth was dead, he got up and went to claim ownership of Naboth's vineyard.
17 १७ यावेळी परमेश्वर एलीया तिश्बीशी बोलला,
Then the Lord sent a message to Elijah the Tishbite:
18 १८ “ऊठ शोमरोनमधल्या इस्राएलचा राजा अहाबाकडे जा तो नाबोथाच्या द्राक्षमळ्यात असेल. तो मळा वतन करून घ्यायला तिथे गेला आहे.
“Go and meet Ahab, king of Israel, in Samaria. He is right now in Naboth's vineyard, where he has gone to claim ownership of it.
19 १९ अहाबाला जाऊन सांग की परमेश्वर म्हणतो, ‘अहाब, नाबोथला तू मारलेस. आता त्याचा मळा वतन करून घ्यायला निघालास तेव्हा आता मी सांगतो ते ऐक. नाबोथ मेला त्याच जागी तू सुध्दा मरशील ज्या कुत्र्यांनी नाबोथाचे रक्त चाटले तीच कुत्री त्याच ठिकाणी तुझे रक्त चाटतील.”
Tell him: This is what the Lord says: Have you murdered a man and robbed him? Then tell him: This is what the Lord says: In the very spot where dogs licked up Naboth's blood, dogs will lick up your own blood.”
20 २० तेव्हा एलीया अहाबाकडे गेला. अहाबाने एलीयाला पाहिले आणि तो म्हणाला, तुला मी पुन्हा सापडलो. “तू नेहमीच माझ्याविरुध्द आहेस” एलीया म्हणाला, हो, “तुला मी पुन्हा शोधून काढले आहे. तुझे आयुष्य तू परमेश्वराचे अपराध करण्यातच घालवलेस.
“So have you come to find me, my enemy?” Ahab asked Elijah. “I have found you, because you have sold yourself to do what is evil in the Lord sight,” Elijah replied.
21 २१ तेव्हा परमेश्वर तुला काय सांगतो ते ऐक, मी तुझा नाश करीन. मी तुला आणि तुझ्या कुटुंबातील सर्व पुरुषांना तो इस्राएलात कोंडलेला असो किंवा मोकळा असो त्यास मी ठार करीन.
He says, “Watch out! I'm going to bring disaster on you and destroy your descendants. I will kill from every male of Ahab's line, both slave and free, in the whole of Israel.
22 २२ नबाटाचा पुत्र यराबाम याच्या कुटुंबासारखीच तुझ्या घराचीही वाताहत होईल. अहीयाचा पुत्र बाशाच्या कुटुंबासारखीच तुझी दशा होईल. या दोन्ही घराण्यांचा समूळ नाश झाला. तू माझा क्रोध जागा केलास. इस्राएल लोकांसही पाप करायला लावलेस.”
I will make your house like that of Jeroboam, son of Nebat, and like that of Baasha, son of Ahijah, because you have angered me and made Israel sin.
23 २३ शिवाय परमेश्वर असे म्हणतो, “तुझी पत्नी ईजबेल हिच्या शरीरावर इज्रेलमध्ये कुत्री तुटून पडतील.
And as far as Jezebel is concerned, the Lord says, ‘Dogs will eat Jezebel by the wall of Jezreel.’
24 २४ अहाबाच्या घरातल्या ज्याला कुणाला गावात मरण येईल त्यास कुत्री खातील आणि जो कोणी शेतात मरेल तो पक्ष्यांचे भक्ष्य होईल”
Those of Ahab's family who die in the town will be eaten by dogs, and those who die in the countryside will be eaten by birds.”
25 २५ अहाबाने जितकी पापे केली, जितके अपराध केले तेवढे कोणीच केले नाहीत. त्याची पत्नी ईजबेल हिने त्यास भर दिल्यामुळे त्याने परमेश्वराच्या दृष्टीने हे सर्व करायला लावले.
(No one else was so bad as Ahab, who sold himself to do what is evil in the Lord's sight, because his wife Jezebel encouraged him.
26 २६ अहाबाने आणखी एक पातक केले ते म्हणजे अमंगळ मूर्तींची पूजा केली. अमोरी लोकांनीही हेच केले तेव्हा परमेश्वराने त्यांच्याकडून हा प्रदेश काढून घेऊन इस्राएल लोकांस दिला.
He did the most despicable things, worshiping idols like the Amorites the Lord had driven out before Israel.)
27 २७ एलीयाचे बोलून झाल्यावर अहाबाला फार दु: ख झाले. दु: खाने त्याने अंगावरचे कपडे फाडले. मग विशेष शोकवस्त्रे परिधान केली. त्याने अन्नत्याग केला. त्याच कपड्यात तो झोपला. तो अतिशय दु: खी आणि खिन्न झाला होता.
As soon as Ahab heard this message, he tore his clothes, put on sackcloth, and fasted. He even went to bed in sackcloth, and walked around repentantly.
28 २८ परमेश्वर एलीया तिश्बी संदेष्ट्याला म्हणाला,
Then the Lord sent a message to Elijah the Tishbite:
29 २९ “अहाब माझ्यापुढे नतमस्तक झाला आहे असे दिसते. तेव्हा तो जिवंत असेपर्यंत मी त्यास संकटात लोटणार नाही. त्याचा पुत्र राज्यावर येईपर्यंत मी थांबेन. मग त्याच्या घराला मी उपद्रव देईन.”
“Have you seen how Ahab has humbled himself before me? Because he has humbled himself before me, I will not bring the disaster during his lifetime, but I will bring down disaster on his family in the lifetime of his son.”

< 1 राजे 21 >