< 1 राजे 20 >
1 १ बेन-हदाद अरामाचा राजा होता. त्याने आपल्या सर्व सैन्याची जमवाजमव केली. त्याच्या बाजूला बत्तीस राजे होते. त्यांच्याकडे घोडे आणि रथ होते. त्यांनी शोमरोनला वेढा घातला आणि युध्द पुकारले.
Wtedy Ben-Hadad, król Syrii, zebrał całe swoje wojsko, a było z nim trzydzieści dwóch królów, konie i rydwany. Wyruszył, obległ Samarię i walczył przeciwko niej.
2 २ इस्राएलचा राजा अहाब याच्याकडे नगरात बेनहदादने दूतांकरवी निरोप पाठवला
I wyprawił posłańców do Achaba, króla Izraela, do miasta, i powiedział mu: Tak mówi Ben-Hadad:
3 ३ संदेश असा होता, “बेन-हदादचे म्हणणे आहे, तुमच्याकडील सोने रुपे तुम्ही मला द्यावे. तसेच तुझ्या स्त्रिया आणि पुत्रेही माझ्या हवाली करावी.”
Twoje srebro i złoto są moje; także twoje żony i twoi najpiękniejsi synowie są moi.
4 ४ यावर इस्राएलाच्या राजाचे उत्तर असे होते, “महाराज मी तर आता तुमच्याच ताब्यात आहे, हे मला मान्य आहे. त्यामुळे जे माझे ते सर्व तुमचेच आहे.”
Król Izraela odpowiedział: Według twego słowa, królu, mój panie – twój jestem ja i wszystko, co mam.
5 ५ अहाबाकडे हे दूत पुन्हा एकदा आले आणि म्हणाले, “बेन-हदादचे म्हणणे असे आहे, ‘तुझ्याजवळचा सोन्याचांदीचा ऐवज तसेच बायकामुले तू माझ्या स्वाधीन केली पाहिजेस.
Potem posłańcy wrócili [do niego] i powiedzieli: Tak powiedział Ben-Hadad: Wprawdzie posłałem do ciebie [ludzi], aby ci powiedzieli: Oddasz swoje srebro i złoto, swoje żony i swoich synów oddasz mi.
6 ६ उद्याच मी माझ्या मनुष्यांचे एक शोधपथक तिकडे पाठवणार आहे. ते तुझ्या तसेच तुझ्या कारभाऱ्यांच्या घराची झडती घेतील. त्यांच्या डोळ्यांना जे आवडेल ते स्वत: च्या हाताने घेतील. ती माणसे त्या वस्तू मला आणून देतील.”
Jednak jutro o tej porze poślę swoje sługi do ciebie. Oni przeszukują twój dom i domy twoich sług, a wszystko, co jest cenne w twoich oczach, wezmą w ręce i zabiorą.
7 ७ तेव्हा इस्राएलचा राजा अहाबाने आपल्या देशातील सर्व वडिलधाऱ्या मनुष्यांची सभा घेतली. अहाब त्यांना म्हणाला, “हे पाहा, हा मनुष्य माझे कसे अनिष्ट करू पाहत आहे. आधी त्याने माझ्या जवळचे सोनेचांदी तसेच माझी स्त्रिया पुत्रे मागितली. त्यास मी कबूल झालो. आणि आता त्यास सर्वच हवे आहे.”
Król Izraela zwołał więc wszystkich starszych ziemi i powiedział [im]: Rozważcie, proszę, i zobaczcie, że ten [człowiek] szuka nieszczęścia. Posłał bowiem do mnie po moje żony i moich synów, po moje srebro i złoto, a nie odmówiłem mu.
8 ८ यावर ती वडिलधारी मंडळी आणि इतर लोक अहाबाला म्हणाले, “त्याच्या म्हणण्याला मान झुकवू नको. तो म्हणतो तसे करु नको.”
Wszyscy starsi i cały lud odpowiedzieli: Nie słuchaj [go] i nie gódź się.
9 ९ मग राजा अहाबाने बेन-हदादकडे निरोप्याला सांगितले की “माझा स्वामी अहाब राजास सांग” तुझी पहिली मागणी मला मान्य आहे. पण तुझ्या दुसऱ्या आज्ञेचे मी पालन करु शकत नाही. बेन-हदादला त्याच्या दूतांनी हा निरोप सांगितला.
Odpowiedział więc posłom Ben-Hadada: Powiedzcie królowi, memu panu: Wszystko, czego na początku żądałeś od swego sługi, uczynię. Lecz tej rzeczy nie mogę uczynić. Posłańcy odeszli i zanieśli mu odpowiedź.
10 १० तेव्हा बेन-हदादकडून अहाबाला दुसरा निरोप आला. त्या निरोपात म्हटले होते, “शोमरोनचा मी पूर्ण विध्वंस करीन. तिथे काहीही शिल्लक उरणार नाही. आठवणी दाखल काही घेऊन यावे असेही माझ्या मनुष्यांना काही राहणार नाही. असे झाले नाहीतर देव माझे तसे करो व त्यापेक्षा अधिक करो.”
Ben-Hadad znowu posłał do niego [sługi] i powiedział: Niech mi to uczynią bogowie i tamto dorzucą, jeśli starczy prochu Samarii po pełnej garści dla każdego spośród całego ludu, który idzie za mną.
11 ११ इस्राएलच्या राजाचे त्यास उत्तर गेले. त्यामध्ये म्हटले होते. “बेन-हदादला जाऊन सांगा की, जो चिलखत चढवतो त्याने, जो ते उतरवण्याइतक्या दीर्घ काळापर्यंत जगतो त्याने इतकी फुशारकी मारू नये.”
Król Izraela odpowiedział: Powiedzcie [mu]: Niech się nie chlubi ten, kto zapina [pas], jak ten, kto go odpina.
12 १२ राजा बेन-हदाद इतर राजांच्या बरोबर आपल्या तंबूत मद्यपान करत बसला होता. त्यावेळी हे दूत आले आणि राजाला हा संदेश दिला. त्याबरोबर बेनहदादने आपल्या मनुष्यांना नगरापुढे चढाईचा व्यूह रचायला सांगितले. “त्याप्रमाणे लोकांनी आपापल्या जागा घेतल्या.”
A gdy [Ben]-[Hadad] usłyszał to słowo – a właśnie pił z królami w namiotach – powiedział do swoich sług: Ruszajcie. I ruszyli na miasto.
13 १३ तेव्हा इकडे एक संदेष्टा इस्राएलाचा अहाब राजांकडे आला. राजाला तो म्हणाला, “अहाब राजा, परमेश्वराचे तुला सांगणे आहे की, ‘एवढी मोठी सेना बघितलीस? मी, प्रत्यक्ष परमेश्वर, तुझ्या हस्ते या सैन्याचा पराभव करवीन. म्हणजे मग मीच परमेश्वर असल्याबद्दल तुझी खात्री पटेल.”
A oto pewien prorok przyszedł do Achaba, króla Izraela, i powiedział: Tak mówi PAN: Czy widzisz cały ten wielki tłum? Oto wydam go dziś w twoje ręce, abyś wiedział, że ja jestem PANEM.
14 १४ अहाबाने विचारले. “या पराभवासाठी तू कोणाला हाताशी धरशील?” तेव्हा तो संदेष्टा म्हणाला, “प्रांत अधिकाऱ्यांच्या हाताखालच्या तरुणांची परमेश्वर मदत घेईल” यावर राजाने विचारले, “या सैन्याचे नेतृत्व कोण करील?” “तूच ते करशील” असे संदेष्ट्याने सांगितले.
Wtedy Achab zapytał: Przez kogo? Odpowiedział: Tak mówi PAN: Przez sługi książąt prowincji. Zapytał dalej: Kto rozpocznie bitwę? Odpowiedział mu: Ty.
15 १५ तेव्हा अहाब राजाने अधिकाऱ्यांच्या हाताखालच्या तरुणांची कुमक गोळा केली. त्या तरुणांची संख्या दोनशे बत्तीस भरली. मग राजाने इस्राएलाच्या सर्व फौजेला एकत्र बोलावले. तेव्हा ते एकंदर सात हजार होते.
Dokonał więc przeglądu sług książąt prowincji i [było] ich dwustu trzydziestu dwóch. A po nich policzył cały lud, wszystkich synów Izraela, i było ich siedem tysięcy.
16 १६ राजा बेन-हदाद आणि त्याच्या बाजूचे बत्तीस राजे दुपारी आपापल्या तंबूमध्ये मद्यपान करण्यात आणि नशेत गुंग होते. त्यावेळी अहाबाने हल्ला चढवला.
I wyruszyli w południe. A Ben-Hadad oddawał się pijaństwu w namiotach, a z nim trzydziestu dwóch królów, którzy go wspierali.
17 १७ तरुण मदतनीस आधी चालून गेले. तेव्हा “शोमरोनमधून सैन्य बाहेर आल्याचे राजा बेन-हदादच्या मनुष्यांनी त्यास सांगितले.”
Wyszli więc jako pierwsi słudzy książąt prowincji. Gdy Ben-Hadad posłał [sługę], powiedziano mu: Ludzie wyszli z Samarii.
18 १८ तेव्हा बेन-हदाद म्हणाला, “ते हल्ला करायला आले असतील किंवा सलोख्याची किनंती करायला आले असतील. त्यांना जिवंत पकडा.”
Polecił: Jeśli wyszli [prosić] o pokój, pojmijcie ich żywych, również jeśli wyszli walczyć, pojmijcie ich żywych.
19 १९ राजा अहाबाच्या तरुणांची तुकडी नगरातून बाहेर पडली आणि इस्राएलचे सैन्य मागोमाग येत होते.
Wyszli więc z miasta słudzy książąt prowincji oraz wojsko razem z nimi.
20 २० प्रत्येक इस्राएलीने समोरुन येणाऱ्याला ठार केले. त्याबरोबर अरामामधली माणसे पळ काढू लागली. इस्राएलाच्या सैन्याने त्यांचा पाठलाग केला. राजा बेन-हदाद तर एका रथाच्या घोड्यावर बसून पळाला.
A każdy pokonał swego przeciwnika, tak że Syryjczycy uciekli, a Izrael ich ścigał. Ben-Hadad, król Syrii, również uciekł na koniu i z jeźdźcami.
21 २१ इस्राएल राजाने सेनेचे नेतृत्व करून अरामाच्या फौजेतील सर्व घोडे आणि रथ पळवले. अरामाची मोठी कत्तल उडवली.
Potem król Izraela wyruszył i pobił konie i rydwany, a zadał Syryjczykom wielką klęskę.
22 २२ यानंतर तो संदेष्टा इस्राएल राजा अहाबाकडे गेला आणि म्हणाला, “अरामाचा राजा बेन-हदाद पुढच्या वसंत ऋतुत पुन्हा तुझ्यावर चालून येईल. तेव्हा तू आता परत जा आणि आपल्या सैन्याची ताकद आणखी वाढव. काळजीपूर्वक आपल्या बचावाचे डावपेच आख.”
Prorok znowu przyszedł do króla Izraela i powiedział mu: Idź, wzmocnij się, rozważ i zastanów się, co masz czynić. Po roku bowiem król Syrii nadciągnie przeciwko tobie.
23 २३ अरामाच्या राजाचे अधिकारी त्यास म्हणाले, “इस्राएलाचा देव हा पहाडावरील देव आहे. आपण डोंगराळ भागात लढलो. म्हणून इस्राएलांचा जय झाला. तेव्हा आता आपण सपाटीवर लढू म्हणजे जिंकू.
Wtedy słudzy króla Syrii powiedzieli do niego: Ich bogowie są bogami gór, dlatego nas pokonali. Walczmy jednak z nimi na równinie i na pewno ich pokonamy.
24 २४ आता तुम्ही असे करायला हवे त्या राजांकडे सैन्याचे नेतृत्व न देता त्यांच्या जागी सेनापती नेमा.
Tak więc uczyń: Usuń każdego z królów z jego stanowiska, a na ich miejsce ustanów dowódców.
25 २५ जेवढ्या सेनेचा संहार झाला तेवढी पुन्हा उभी करा. घोडे आणि रथ मागवा. मग आपण सपाटीवर इस्राएली लोकांचा सामना करु म्हणजे जय आपलाच.” बेनहदादने हा सल्ला मानला आणि सर्व तजवीज केली.
Następnie odlicz sobie wojska takiego jak [to] wojsko, które ci poległo, koni jak tamte konie i rydwanów jak tamte rydwany. Wtedy stoczymy z nimi bitwę na równinie i na pewno ich pokonamy. I posłuchał ich głosu, i tak uczynił.
26 २६ वसंत ऋतुत बेन-हदादने अराममधील लोकांस एकत्र आणले आणि तो इस्राएलवरील हल्ल्यासाठी अफेक येथे आला.
A gdy upłynął rok, Ben-Hadad dokonał przeglądu Syryjczyków i nadciągnął do Afek, aby walczyć z Izraelem.
27 २७ इस्राएलही युध्दाला सज्ज झाले. अरामी सैन्याविरुध्द लढायला गेले. अराम्यांच्या समोरच त्यांनी आपला तळ दिला. शत्रूसैन्याशी तुलना करता, इस्राएल म्हणजे शेरडांच्या दोन लहान कळपांसारखे दिसत होते. अरामी फौजेने सगळा प्रदेश व्यापला होता.
Również u synów Izraela dokonano przeglądu, a gdy się zebrali, wyruszyli przeciwko nim. I synowie Izraela rozbili obóz przed nimi jak dwa małe stadka kóz. Syryjczycy zaś napełnili ziemię.
28 २८ एक देवाचा मनुष्य (संदेष्टा) इस्राएलाच्या राजाकडे एक निरोप घेऊन आला. निरोप असा होता. “परमेश्वर म्हणतो, ‘मी डोंगराळ भागातला देव आहे असे या अरामी लोकांचे म्हणणे आहे. सपाटीवरचा मी देव नव्हे असे त्यांना वाटते. तेव्हा या मोठ्या सेनेचा मी तुमच्या हातून पराभव करणार आहे. म्हणजे संपूर्ण प्रदेशाचा मी परमेश्वर आहे हे तुम्ही जाणाल.”
Wtedy przyszedł mąż Boży i mówił do króla Izraela: Tak mówi PAN: Ponieważ Syryjczycy powiedzieli: PAN jest Bogiem gór, a nie jest Bogiem równin, wydam cały ten wielki tłum w twoje ręce, abyście wiedzieli, że ja jestem PANEM.
29 २९ दोन्ही सेना सात दिवस समोरासमोर तळ देऊन बसल्या होत्या. सातव्या दिवशी लढाईला सुरुवात झाली. इस्राएल लोकांनी अरामाचे एक लक्ष सैनिक एका दिवसात ठार केले.
Obozowali jedni naprzeciw drugich przez siedem dni. A siódmego dnia stoczyli bitwę i synowie Izraela pobili w jednym dniu sto tysięcy pieszych spośród Syryjczyków.
30 ३० जे बचावले ते अफेक येथे पळून गेले. यातील सत्तावीस हजार सैनिकांवर शहराची भिंत कोसळून पडली. बेन-हदादनेही या शहरात पळ काढला होता. तो एका आतल्या खोलीत लपला होता.
Pozostali zaś uciekli do Afek, do miasta, i runął mur na dwadzieścia siedem tysięcy pozostałych mężczyzn. Ben-Hadad uciekł i wszedł do miasta, gdzie [ukrył się] w wewnętrznej komnacie.
31 ३१ त्याचे सेवक त्यास म्हणाले, “इस्राएलाचे राजे दयाळू आहेत असे आम्ही ऐकून आहो. आपण कबंरेस गोणताट नेसून आणि डोक्याभोवती दोरखंड आवळून इस्राएलाच्या राजाकडे जाऊ कदाचित् तो आपल्याला जीवदान देईल.”
Wtedy jego słudzy powiedzieli mu: Oto słyszeliśmy, że królowie domu Izraela są królami miłosiernymi. Pozwól, proszę, że włożymy wory na nasze biodra, powrozy na nasze głowy i wyjdziemy do króla Izraela, może zostawi nas przy życiu.
32 ३२ त्या सर्वांनी मग गोणताट घातले. डोक्याभोवती दोरी बांधली आणि ते इस्राएलाच्या राजाकडे आले. त्यास म्हणाले, “तुमचा दास बेन-हदाद तुमच्याकडे जीवदान मागत आहे.” अहाब म्हणाला, “म्हणजे तो अजून जिवंत आहे? तो माझा बंधूच आहे.”
Opasali więc worami swoje biodra, [włożyli] powrozy na swoje głowy, przyszli do króla Izraela i powiedzieli: Ben-Hadad, twój sługa, mówi: Proszę, zachowaj moją duszę przy życiu. Zapytał: Czy jeszcze żyje? To jest mój brat.
33 ३३ बेन-हदादला अहाब ठार करणार नाही अशा अर्थाचे त्याने काहीतरी आश्वासक बोलावे अशी बेनहदादच्या बरोबरच्या लोकांची इच्छा होती. तेव्हा अहाबाने बेन-हदादला भाऊ म्हटल्यावर ते ताबडतोब, “हो, बेन-हदाद तुमचा भाऊ जिवंत आहे” अहाब म्हणाल, “जा आणि त्यास आणा” त्याप्रमाणे तो आला. मग राजा अहाबाने त्यास आपल्याबरोबर रथात बसायला सांगितले.
Ci ludzie wzięli to za dobry znak i szybko podchwycili [to słowo] od niego, i powiedzieli: Twój brat Ben-Hadad. On zaś powiedział: Idźcie i przyprowadźcie go. Ben-Hadad wyszedł więc do niego i kazał mu wsiąść na rydwan.
34 ३४ बेन-हदाद अहाबाला म्हणाला, “माझ्या वडिलांनी तुझ्या वडिलांकडून जी गावे घेतली ती मी तुला परत करीन. मग, माझ्या वडिलांनी शोमरोनात जशा बाजारपेठा वसवल्या तशा तुला दिमिष्कात करता येतील” अहाब त्यावर म्हणाला, “या करारावर ती तुला मुक्त करायला तयार आहे.” तेव्हा या दोन राजांनी आपसात शांतीचा करार केला. मग राजा अहाबाने राजा बेन-हदादला मुक्त केले.
[Ben]-[Hadad] powiedział do niego: Miasta, które mój ojciec zabrał twemu ojcu, zwrócę, a ty uczynisz sobie ulice w Damaszku, jak uczynił mój ojciec w Samarii. [I odpowiedział]: Puszczę cię wolno na podstawie tego przymierza. Tak więc zawarł z nim przymierze i puścił go wolno.
35 ३५ त्यानंतर संदेष्टयांच्या शिष्यापैकी एका संदेष्ट्याने दुसऱ्या संदेष्ट्याला म्हटले, “मला एक फटका मार.” परमेश्वराचीच तशी आज्ञा होती म्हणून तो असे म्हणाला, पण दुसऱ्या संदेष्ट्यांने तसे करायचे नाकारले.
Wtedy pewien mąż spośród synów proroków powiedział do swego bliźniego na słowo PANA: Uderz mnie, proszę. Ale ten człowiek nie chciał go uderzyć.
36 ३६ तेव्हा पहिला संदेष्टा म्हणाला, “तू परमेश्वराची आज्ञा पाळली नाहीस. तेव्हा तू इथून बाहेर पडशील तेव्हा सिंह तुझा जीव घेईल” तो दुसरा संदेष्टा तेथून निघाला तेव्हा खरोखरच सिंहाने त्यास ठार मारले.
I powiedział mu: Ponieważ nie posłuchałeś głosu PANA, oto gdy tylko odejdziesz ode mnie, zabije cię lew. A gdy odszedł od niego, spotkał go lew i zabił go.
37 ३७ मग हा पहिला संदेष्टा एका मनुष्याकडे गेला. त्यास त्याने स्वत: ला “फटका मारायला” सांगितले. त्या मनुष्याने तसे केले आणि संदेष्ट्याला घायाळ केले.
Potem spotkał drugiego mężczyznę i powiedział mu: Uderz mnie, proszę. Człowiek ten tak go uderzył, że go zranił.
38 ३८ त्या संदेष्ट्याने मग स्वत: च्या तोंडाभोवती एक फडके गुंडाळून घेतले. त्यामुळे तो कोण हे कोणालाही ओळखू येऊ शकत नव्हते. हा संदेष्टा मग वाटेवर राजाची वाट पाहत बसला.
Prorok poszedł więc i czekał na króla na drodze, i zmienił swój wygląd dzięki zasłonie na twarzy.
39 ३९ राजा तिथून जात होता. तेव्हा संदेष्टा त्यास म्हणाला, “मी लढाईवर गेलो होतो. आपल्यापैकी एकाने एका शत्रू सैनिकाला माझ्यापुढे आणले आणि मला सांगितले, ‘याच्यावर नजर ठेव. हा पळाला तर याच्या जागी तुला आपला जीव द्यावा लागेल किंवा शंभर रत्तल चांदीचा दंड भरावा लागेल.’
A gdy król przejeżdżał, zawołał do króla: Twój sługa wszedł w sam środek bitwy, a oto podszedł pewien mężczyzna i przyprowadził do mnie człowieka, i powiedział: Pilnuj tego człowieka. Jeśli ci się wymknie, zapłacisz swoim życiem za jego życie albo zapłacisz talent srebra.
40 ४० पण मी इतर कामात गुंतलो होतो. तेव्हा तो मनुष्य पळून गेला यावर इस्राएलाचा राजा म्हणाला, त्या सैनिकाला तू निसटू दिलेस हा तुझा गुन्हा तुला मान्य आहे.” तेव्हा निकाल उघडच आहे. “तो मनुष्य म्हणाला ते तू केले पाहिजेस.”
A gdy twój sługa zajął się tym i owym, on zniknął. Król Izraela powiedział do niego: Taki [jest] twój wyrok, ty sam rozstrzygnąłeś [tę sprawę].
41 ४१ आता त्या संदेष्ट्याने तोंडावरचे फडके काढले. इस्राएली राजाने त्यास पाहिले आणि तो संदेष्टा असल्याचे त्याने ओळखले.
Wtedy on szybko zdjął zasłonę z twarzy i król Izraela rozpoznał, że jest on jednym z proroków.
42 ४२ मग तो संदेष्टा राजाला म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, मी ज्याचा वध करावा म्हणून सांगितले. त्यास तू मोकळे सोडलेस. तेव्हा आता त्याच्या जागी तू आहेस. तू मरशील. तुझ्या शत्रूच्या ठिकाणी तुझे लोक असतील तेही जिवाला मुकतील.”
I powiedział do niego: Tak mówi PAN: Ponieważ wypuściłeś ze swojej ręki człowieka przeznaczonego na śmierć, swoim życiem zapłacisz za jego życie i swoim ludem za jego lud.
43 ४३ यानंतर इस्राएलचा राजा शोमरोनाला आपल्या घरी परतला. तो अतिशय संतापला होता आणि चितांग्रस्त झाला होता.
Król Izraela odszedł więc do swego domu smutny i rozgniewany i przybył do Samarii.