< 1 राजे 2 >
1 १ दाविदाचा मरणकाळ जवळ येऊन ठेपला होता. तेव्हा त्याने शलमोनाला आज्ञा देऊन सांगितले,
And the days of David drew nigh that he should die, and he charged his son Solomon, saying:
2 २ “आता मी जगाच्या रीतीप्रमाणे जाणार आहे. तर तू हिमंत धर, खंबीर, जबाबदार पुरुष हो.
I am going the way of all flesh: take thou courage, and shew thyself a man.
3 ३ आता परमेश्वर देवाच्या सर्व आज्ञांचे काळजीपूर्वक पालन कर त्याच्या मार्गाने जा, परमेश्वराच्या सर्व आज्ञा, नियम, कराराचे आदेश, व निर्णय काटेकोरपणे मोशेच्या नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे पाळ. त्यामुळे तू जिथे जाशील तिथे, व जे कार्य हातात घेशील त्यामध्ये यशस्वी होशील.
And keep the charge of the Lord thy God, to walk in his ways, and observe his ceremonies, and his precepts, and judgments, and testimonies, as it is written in the law of Moses: that thou mayest understand all thou dost, and whithersoever thou shalt turn thyself:
4 ४ तू परमेश्वराचे म्हणणे ऐकल्याने तो ही मला दिलेली वचने पाळील, जर मी सांगितलेल्या मार्गाने मनापासून आणि प्रामाणिकपणाने, तुझे पुत्र चालले, तर इस्राएलाच्या राजासनावरून तुझ्या वंशातला पुरुष खुंटणार नाही.
That the Lord may confirm his words, which he hath spoken of me, saying: If thy children shall take heed to their ways, and shall walk before me in truth, with all their heart, and with all their soul, there shall not be taken away from thee a man on the throne of Israel.
5 ५ सरुवेचा पुत्र यवाब याने माझ्याशी काय केले ते लक्षात आहे ना? त्याने इस्राएल सैन्याच्या दोन सेनापतींना, नेराचा पुत्र अबनेर आणि येथेरचा पुत्र अमासा यांना ठार केले आणि मुख्य म्हणजे, शांततेच्या काळात त्याने हा रक्तपात केला आहे व त्याची तलवार खोचायचा कमरबंद आणि त्याच्या पायातले सैनिकी जोडे त्यांच्या रक्ताने रक्ताळलेले आहेत.
Thou knowest also what Joab the son of Sarvia hath done to me, what he did to the two captains of the army of Israel, to Abner the son of Ner, and to Amasa the son of Jether: whom he slew, and shed the blood of war in peace, and put the blood of war on his girdle that was about his loins, and in his shoes that were on his feet.
6 ६ तुझ्याजवळ असलेल्या ज्ञानाने यवाबाबरोबर, जसे तुला योग्य वाटेल तसा तू वाग व त्याचे पिकलेले केस शांतीने कबरेत उतरू देऊ नको. (Sheol )
Do therefore according to thy wisdom, and let not his hoary head go down to hell in peace. (Sheol )
7 ७ गिलादाच्या बर्जिल्ल्य याच्या मुलांवर दया असू दे. त्यांच्याशी सख्य ठेव आणि तुझ्या पंगतीला त्यांना बसू दे. तुझा भाऊ अबशालोम याच्यापासून मी पळ काढला तेव्हा त्यांनीच मला मदत केली.
But shew kindness to the sons of Berzellai the Galaadite, and let them eat at thy table: for they met me when I fled from the face of Absalom thy brother.
8 ८ गेराचा पुत्र शिमी तुझ्याजवळ आहे हे लक्षात ठेव, तो बहूरीम मधला बन्यामिनी आहे. मी महनाईमासला पळ काढला तेव्हा त्याने माझ्याविषयी फार वाईट शापाचे उद्गगार काढले. पुढे तो मला यार्देन नदीजवळ भेटायला आला. त्यास मी परमेश्वरासमक्ष वचन दिले की, मी तुला तलवारीने ठार करणार नाही.
Thou hast also with thee Semei the son of Gera the son of Jemini of Bahurim, who cursed me with a grievous curse, when I went to the camp: but because he came down to meet me when I passed over the Jordan, and I swore to him by the Lord, saying: I will not kill thee with a sword:
9 ९ पण आता त्यास तू निर्दोष समजू नकोस. तू सुज्ञ मनुष्य आहेस, त्यास काय करायचे ते तुला समजते. त्या पिकलेल्या केसाच्या म्हाताऱ्याला रक्ताचे स्नान घालून कबरेत पाठव.” (Sheol )
Do not thou hold him guiltless. But thou art a wise man, and knowest what to do with him, and thou shalt bring down his grey hairs with blood to hell. (Sheol )
10 १० मग दावीद मरण पावला. त्याच्या पुर्वजांसारखे दावीद नगरात त्याचे दफन झाले.
So David slept with his fathers, and was buried in the city of David.
11 ११ हेब्रोनवर सात वर्ष आणि यरूशलेम येथे तेहतीस वर्ष असे एकंदर चाळीस वर्षे दाविदाने इस्राएलावर राज्य केले.
And the days that David reigned in Israel, were forty years: in Hebron he reigned seven years, in Jerusalem thirty-three.
12 १२ आता शलमोन आपल्या वडिलांच्या दाविदाच्या राजासनावर बसला. व त्याची सत्ता बळकटीने स्थापन झाली.
And Solomon sat upon the throne of his father David, and his kingdom was strengthened exceedingly.
13 १३ यानंतर हग्गीथेचा पुत्र अदोनीया शलमोनाची आई बथशेबा हिच्याकडे गेला. बथशेबाने त्यास विचारले, “तू शांतीने आला आहेस ना?” अदोनीया म्हणाला, हो, “ही शांतता भेट आहे.”
And Adonias the son of Haggith came to Bethsabee the mother of Solomon. And she said to him: Is thy coming peaceable? he answered: Peaceable.
14 १४ “मला तुमच्याशी काही बोलायचे आहे.” बथशेबा म्हणाली, “मग बोल.”
And he added: I have a word to speak with thee. She said to him: Speak. And he said:
15 १५ अदोनीया म्हणाला, “एक काळ असा होता की, हे राज्य माझे होते. तुम्हास हे माहीत आहे. मी राजा आहे अशीच इस्राएलाच्या सर्व लोकांची भावना होती. पण पुढे सगळे बदलले. आता माझा भाऊ गादीवर आहे. परमेश्वरानेच त्याची निवड केली आहे.
Thou knowest that the kingdom was nine, and all Israel had preferred me to be their king: but the kingdom is transferred, and is become my brother’s: for it was appointed him by the Lord.
16 १६ आता माझे एक मागणे आहे. कृपाकरून नाही म्हणू नकोस” बथशेबाने “तुला काय हवे?” असे विचारले.
Now therefore I ask one petition of thee: turn not away my face. And she said to him: Say on.
17 १७ अदोनीया म्हणाला, “राजा शलमोन तुला नाही म्हणणार नाही, तू सांगशील ते काहीही करील तेव्हा शुनेममधल्या त्या अबीशग नावाच्या तरुणीशी मला लग्र करायची संमती हवी आहे.”
And he said: I pray thee speak to king Solomon (for he cannot deny thee any thing) to give me Abisag the Sunamitess to wife.
18 १८ बथशेबा म्हणाली, “ठीक आहे, मी राजाशी बोलते.”
And Bethsabee said: Well, I will speak for thee to the king.
19 १९ मग बथशेबा राजा शलमोनाकडे अदोनीयाच्या वतीने बोलण्यास गेली. तिला पाहिल्यावर तो उठून उभा राहिला. मग तिला वंदन करून तो राजासनावर बसला. सेवकांना सांगून त्याने आईसाठी दुसरे राजासन आणवले. ती त्याच्या उजव्या हाताला बसली.
Then Bethsabee came to king Solomon, to speak to him for Adonias: and the king arose to meet her, and bowed to her, and sat down upon his throne: and a throne was set for the king’s mother, and she sat on his right hand.
20 २० नंतर बथशेबा त्यास म्हणाली, “मला एक छोटीशी विनंती तुझ्याजवळ करायची आहे. कृपाकरून नाही म्हणून नकोस” राजा म्हणाला, “आई, तुला काय हवे ते माग मी नकार देणार नाही.”
And she said to him: I desire one small petition of thee, do not put me to confusion. And the king said to her: My mother, ask: for I must not turn away thy face.
21 २१ ती म्हणाली, “तुझा भाऊ अदोनीया याला शुनेमच्या अबीशगेशी लग्न करु दे.”
And she said: Let Abisag the Sunamitess be given to Adonias thy brother to wife.
22 २२ राजा शलमोन आपल्या आईला म्हणाला, “अदोनीयासाठी केवळ शुनेमकरीण अबीशगेची मागणी कशाला करतेस? त्याच्यासाठी राज्यदेखील का मागत नाहीस, तो माझा मोठा भाऊ आहे म्हणून आणि याजक अब्याथार आणि यवाब, सरुवेचा यांच्यासाठी देखील राज्य माग.”
And king Solomon answered, and said to his mother: Why dost thou ask Abisag the Sunamitess for Adonias? ask for him also the kingdom: for he is my elder brother, and hath Abiathar the priest, and Joab the son of Sarvia.
23 २३ मग परमेश्वराची शपथ घेऊन शलमोन राजा म्हणाला, “अदोनीयाने ही मागणी करून आपल्या जीवावर संकट आणले आहे; तसे न घडले तर परमेश्वर तसेच त्यापेक्षा अधिक माझे करो.
Then king Solomon swore by the Lord, saying: So and so may God do to me, and add more, if Adonias hath not spoken this word against his own life.
24 २४ इस्राएलचा राजा म्हणून परमेश्वराने माझी निवड केली आहे. माझे वडिल दावीद यांच्या गादीवर त्याने मला बसवले आहे. आपण दिलेला शब्द पाळून राज्याची सत्ता परमेश्वराने आमच्या घराण्यात ठेवली आहे. तेव्हा आता त्याची शपथ घेऊन सांगतो की अदोनीयाला आज मृत्युदंड होईल.”
And now as the Lord liveth, who hath established me, and placed me upon the throne of David my father, and who hath made me a house, as he promised, Adonias shall be put to death this day.
25 २५ राजा शलमोनाने यहोयादाचा पुत्र बनायाला आज्ञा दिली; आणि बनायाने बाहेर जाऊन अदोनीयाला ठार केले.
And king Solomon sent by the hand of Banaias the son of Joiada, who slew him, and he died.
26 २६ मग राजा शलमोन अब्याथार याजकाला म्हणाला, “तुलाही मी मारायला हवे पण अनाथोथ येथल्या आपल्या घरी मी तुला जाऊ देतो. माझ्या वडिल दावीदाबरोबर मार्गक्रमण करतांना परमेश्वराचा पवित्र कराराचा कोश उचलून न्यायला तू मदत केलीस म्हणून तुला मी यावेळी जिवे मारत नाही. शिवाय त्यांच्या कठीण काळातही तू दाविदाला साथ दिली आहेस”
And the king said also to Abiathar the priest: Go to Anathoth to thy lands, for indeed thou art worthy of death: but I will not at this time put thee to death, because thou didst carry the ark of the Lord God before David my father, and hast endured trouble in all the troubles my father endured.
27 २७ शिलो येथील याजक एली आणि त्याचे कुटुंब यांच्याविषयी देवाने असेच सांगितले होते परमेश्वर जे बोलला ते पूर्ण व्हावे म्हणून, परमेश्वराच्या याजक पदावरून शलमोनाने अब्याथार याजकाला काढून टाकले.
So Solomon cast out Abiathar, from being the priest of the Lord, that the word of the Lord might be fulfilled, which he spoke concerning the house of Deli in Silo.
28 २८ ही बातमी यवाबाच्या कानावर गेल्यावर तो भयभीत झाला. त्याने अबशालोमला न देता अदोनीयाला पठिंबा दिला होता. म्हणून तो त्वरीत परमेश्वराच्या पवित्र मंडपात गेला आणि वेदीची शिंगे घट्ट धरुन बसला.
And the news came to Joab, because Joab had turned after Adonias, and had not turned after Solomon: and Joab fled into the tabernacle of the Lord and laid hold on the horn of the altar.
29 २९ “कोणीतरी यवाब हा परमेश्वराच्या मंडपात वेदीपाशी आहे” हे राजा शलमोनाला सांगितले. तेव्हा शलमोनाने यहोयादाचा पुत्र, बनाया यास पाठवले, तो त्यास म्हणाला, “जा, त्याच्यावर हल्ला कर.”
And it was told king Solomon, that Joab was fled into the tabernacle of the Lord, and was by the altar: and Solomon sent Banaias the son of Joiada, saying: Go, kill him.
30 ३० बनाया परमेश्वराच्या पवित्र मंडपात जाऊन यवाबाला म्हणाला, “तेथून बाहेर पड ही राजाची आज्ञा आहे.” पण यवाब म्हणाला “मी येथेच मरेन.” तेव्हा बनायाने राजाकडे जाऊन त्यास हे सांगितले यवाब म्हणतो मी वेदीपाशीच मरेन.
And Banaias came to the tabernacle of the Lord, and said to him: Thus saith the king: Come forth. And he said: I will not come forth, but here I will die. Banaias brought word back to the king, saying: Thus saith Joab, and thus he answered me.
31 ३१ तेव्हा राजाने बनायाला हुकुम केला, “तो म्हणतो तसे कर त्यास तिथेच ठार कर, मग त्याचे दफन कर. म्हणजे मग आमच्या घराण्यावरचा यवाबाचा कलंक पुसला जाईल. यवाबाने निरपराधांची हत्या केली तो हा कलंक होय.
And the king said to him: Do as he hath said: and kill him, and bury him, and thou shalt remove the innocent blood which hath been shed by Joab, from me, and from the house of my father.
32 ३२ त्याने केलेला रक्तपात परमेश्वर त्याच्याच शिरी उलटवील, माझे वडिल दावीद यास नकळत नेराचा पुत्र अबनेर आणि येथेरचा पुत्र अमासा या आपल्यापेक्षा न्यायी व चांगल्या अशा दोन मनुष्यांना त्याने तलवारीने मारले होते. अबनेर इस्राएल सैन्याचा सेनापती तर अमासा यहूदा सैन्याचा सेनापती होता.
And the Lord shall return his blood upon his own head, because he murdered two men, just and better than himself: and slew them with the sword, my father David not knowing it, Abner the son of Ner, general of the army of Israel, and Amasa the son of Jether, general of the army of Juda.
33 ३३ त्यांचा रक्तपात यवाबाच्या शिरी त्याच्या संततीच्या शिरी उलटवून सर्वदा राहील. पण दावीद, त्यांचे वंशज, त्याच्या घराण्यातील राजे आणि त्याचे राज्य यांना परमेश्वराच्या कृपेने निरंतर शांतता लाभेल.”
And their blood shall return the head of Joab, and upon the head of his seed for ever. But to David and his seed and his house, and to his throne be peace for ever from the Lord.
34 ३४ तेव्हा यहोयादाचा पुत्र बनाया याने यवाबाला ठार केले व वाळवंटातील त्याच्या घराजवळ त्याचे दफन करण्यात आले.
So Banaias the son of Joiada went up, and setting upon him slew him, and he was buried in his house in the desert.
35 ३५ यवाबाच्या जागी राजा शलमोनाने यहोयादाचा पुत्र बनायाची सेनापती म्हणून नेमणूक केली आणि अब्याथाराच्या जागी मुख्य याजक म्हणून सादोकाची केली.
And the king appointed Banaias the son of Joiada in his room over the army, and Sadoc the priest he put in the place of Abiathar.
36 ३६ मग राजाने शिमीला बोलावणे पाठवले. त्यास सांगितले, “इथे यरूशलेमामध्ये स्वत: साठी घर बांधून राहा. हे नगर सोडू नको.
The king also sent, and called for Semei, and said to him: Build thee a house in Jerusalem, and dwell there: and go not out from thence any whither.
37 ३७ हे नगर सोडून किद्रोन झऱ्यापलीकडे गेलास तर त्या गुन्ह्याबद्दल तुला जीव गमवावा लागेल. व तुझे रक्त तुझ्या माथी असेल.”
For on what day soever thou shalt go out, and shalt pass over the brook Cedron, know that thou shalt be put to death: thy blood shall be upon thy own head:
38 ३८ तेव्हा शिमी राजाला म्हणाला, “ठीक आहे, महाराज मी तुमचा दास तुमच्या सागंण्याप्रमाणे करील,” मग शिमी यरूशलेमेमध्येच पुष्कळ दिवस राहिला.
And Semei said to the king: The saying is good: as my lord the king hath said, so will thy servant do. And Semei dwelt in Jerusalem, many days.
39 ३९ पण तीन वर्षांनंतर शिमीचे दोन नोकर पळून गेले. “गथचा राजा आणि माकाचा, पुत्र आखीश याच्याकडे ते गेले, आपले चाकर गथ येथे असल्याचे शिमीला कोणीतरी कळवले.”
And it came to pass after three years, that the servants of Semei ran away to Achis the son of Maacha the king of Geth: and it was told Semei that his servants were gone to Geth.
40 ४० तेव्हा शिमीने आपल्या गाढवावर खोगीर चढवले आणि तो गथ येथे आखीश राजाकडे आपले नोकर शोधायला निघाला. तिथे ते मिळाल्यावर त्यांना त्याने परत घरी आणले.
And Semei arose, and saddled his ass, and went to Achis to Geth to seek his servants, and he brought them out of Geth.
41 ४१ शिमी यरूशलेमेहून गथला जाऊन आल्याचे कोणीतरी शलमोनाला सांगितले.
And it was told Solomon that Semei had gone from Jerusalem to Geth, and was come back.
42 ४२ तेव्हा राजाने शिमीला बोलावून घेतले. शलमोन त्यास म्हणाला, “यरूशलेम सोडलेस तर तुझा वध होईल हे मी तुला परमेश्वराची शपथ घेऊन सांगितले होते ना? तू हे गाव सोडून इतरत्र गेलास तर तुझ्या मृत्यूला तूच जबाबदार राहशील? आणि तू त्यास कबूल झाला होतास. तू म्हणतोस ते मान्य आहे.
And sending he called for him, and said to him: Did I not protest to thee by the Lord, and tell thee before: On what day soever thou shalt go out and walk abroad any whither, know that thou shalt die? And thou answeredst me: The word that I have heard is good.
43 ४३ परमेश्वराची शपथ व मी तुला दिलेली आज्ञा तू का मानली नाहीस?”
Why then hast thou not kept the oath of the Lord, and the commandment that I laid upon thee?
44 ४४ मग राजा शिमीस म्हणाला, “माझे वडिल दावीद यांचे तू बरेच अपराध केले आहेस ते तुला माहीती आहेत तर परमेश्वर तुझ्या दुष्टाईचे फळ तुझ्या माथी आनील.
And the king said to Semei: Thou knowest all the evil, of which thy heart is conscious, which thou didst to David my father: the Lord hath returned thy wickedness upon thy own head:
45 ४५ पण शलमोन राजाला परमेश्वराचे आशीर्वाद राहतील. दाविदाचे राज्य तो सदासर्वकाळ सुरक्षित ठेवील.”
And king Solomon shall be blessed, and the throne of David shall be established before the Lord for ever.
46 ४६ मग राजाने यहोयादाचा पुत्र बनायाला शिमीचा वध करायची आज्ञा दिली आणि बनायाने ती अंमलात आणली. आता शलमोनाची आपल्या राज्यावर पूर्ण पकड बसली.
So the king commanded Banaias the son of Joiada: and he went out and struck him, and he died.