< 1 राजे 19 >

1 अहाब राजाने घडलेली सर्व हकिकत ईजबेलला सांगितली. सर्व संदेष्ट्यांना एलीयाने कसे तलवारीने कापून काढले तेही सांगितले.
Ja Ahab ilmoitti Isebelille kaikki mitä Elia tehnyt oli, ja kuinka hän oli tappanut prophetat miekalla.
2 तेव्हा ईजबेलने एलीयाला दूताकरवी निरोप पाठवला. तो असा, “तू त्या संदेष्ट्यांना मारलेस तसे मी तुला उद्या या वेळेपर्यंत मारणार. यामध्ये मला यश आले नाहीतर देव माझे तसेच व त्याहूनही अधीक करो.”
Niin lähetti Isebel sanansaattajat Elialle, sanoen: jumalat minun niin ja niin tehköön, jollen minä huomenna tällä aikaa tee sinun sielulles, niinkuin yhdelle näiden sielulle.
3 एलीया हे ऐकून घाबरला. आपला जीव वाचवायला त्याने पळ काढला. बरोबर त्याने आपल्या नोकराला घेतले होते. यहूदामधील बैर-शेबा येथे ते गेले. आपल्या नोकराला तिथेच सोडून
Kuin hän sen näki, nousi hän ja meni kuhunka hän tahtoi, ja tuli Bersebaan, joka oli Juudassa, ja jätti sinne palveliansa.
4 तो पुढे दिवसभर वाळवंट तुडवत गेला. एका झाडाखाली तो बसला. आता मरण यावे असे त्यास वाटले. एलीया म्हणाला, “आता हे पुरे झाले, परमेश्वरा! मला आता मरु दे माझ्या पूर्वजांपेक्षा माझ्यात काय बरे आहे?”
Mutta itse hän meni korpeen päiväkunnan matkan; ja kuin hän tuli sinne, istui hän katavan alla, rukoillen sieluansa kuolemaan, ja sanoi: jo kyllä on, Herra, ota nyt sieluni; sillä en minä ole parempi isiäni.
5 एका झाडाखाली तो आडवा झाला आणि त्यास झोप लागली. तेव्हा एक देवदूत तिथे आला एलीयाला स्पर्श करून म्हणाला, “उठ हे खा.”
Ja hän pani maata ja nukkui katavan alle; ja katso, enkeli tarttui häneen ja sanoi hänelle: nouse ja syö!
6 एलीया उठून पाहतो तर निखाऱ्यावर भाजलेली एक भाकर आणि पाण्याचे मडके शेजारी ठेवलेले होते. एलीयाने ते खाल्ले, पाणी प्याला आणि तो पुन्हा झोपी गेला.
Mutta kuin hän katsahti ympärillensä, katso, niin oli hänen päänsä takana hiilillä kypsytetty leipä ja astia vettä; ja koska hän syönyt ja juonut oli, niin hän pani maata jälleen ja nukkui.
7 आणखी काही वेळाने तो परमेश्वराचे देवदूत दुसऱ्यांदा पुन्हा त्याच्याजवळ आला त्याने त्यास स्पर्श केला आणि त्यास म्हणाला, “ऊठ आणि थोडे खाऊन घे, नाहीतर पुढचा मोठा प्रवास करायला तुला शक्ती राहणार नाही.”
Ja Herran enkeli palasi hänen tykönsä toisen kerran, tarttui häneen ja sanoi: nouse ja syö! sillä sinulla on pitkä matka.
8 तेव्हा एलीया उठला त्याने खाल्ले आणि पाणी प्याला. त्या अन्नाच्या बळावर पुढे तो चाळीस दिवस आणि रात्री चालत राहिला. देवाचा डोंगर होरेब येथपर्यंत तो चालला.
Ja hän nousi, söi ja joi, ja matkusti sen ruan voimalla neljäkymmentä päivää ja neljäkymmentä yötä Herran vuoreen Horebiin asti,
9 तिथे एका गुहेत शिरुन त्याने रात्र काढली. तेव्हा परमेश्वर एलीयाशी बोलला. तो म्हणाला, “एलीया, तू येथे का आला आहेस?”
Ja tuli siellä luolaan, ja oleskeli siellä yötä; ja katso, Herran sana sanoi hänelle: mitäs tässä Elia teet?
10 १० एलीया म्हणाला, “सर्वशक्तिमान परमेश्वर देवा, मी आतापर्यंत तुझीच सेवा करत आलेलो आहे. माझ्याकडून होईल तितके मी केले पण इस्राएलाच्या लोकांनी तुझ्याशी केलेल्या कराराचा भंग केलेला आहे. त्यांनी तुझ्या वेदीचा विध्वंस केला. तुझ्या संदेष्ट्यांना तलवारीने मारले. मीच एकटा काय तो अजून जिवंत आहे. पण आता ते माझ्याही जिवावर उठले आहेत.”
Hän vastasi: minä olen kiivauksella kiivannut Herran Jumalan Zebaotin tähden; sillä Israelin lapset ovat hyljänneet sinun liittos, ja sinun alttaris kukistaneet ja tappaneet sinun prophetas miekalla, ja minä yksinäni jäin, ja he etsivät minun henkeäni, ottaaksensa sitä pois.
11 ११ यावर परमेश्वर एलीयाला म्हणाला, “जा, या डोंगरावर माझ्यासमोर उभा राहा. मी तुझ्या जवळून जातो” मग जोराचा वारा सुटला. त्या सोसाट्याच्या वाऱ्याने डोंगरालाही तडे जाऊन मोठेमोठे खडक परमेश्वरासमोर पडले. पण त्या वाऱ्यात परमेश्वर नव्हता. त्यानंतर धरणीकंप झाला, पण तेथेही परमेश्वर नव्हता.
Hän sanoi: mene tästä ulos ja astu vuorelle Herran eteen. Ja katso, Herra meni ohitse, ja suuri ja väkevä tuuli kävi, joka vuoret halkasi ja mäet särki Herran edellä; mutta ei Herra ollut tuulessa; ja tuulen perästä tuli maanjäristys, ja ei Herra ollut maanjäristyksessä;
12 १२ धरणीकंपानंतर अग्नी प्रकटला. पण तेथेही परमेश्वर नव्हता. अग्नी शमल्यावर मात्र शांत, मंजुळ स्वर ऐकू आला.
Ja maanjäristyksen perästä tuli tulta, ja ei Herra ollut tulessa; tulen perästä tuli hieno tuulen hyminä.
13 १३ एलीयाने हा ध्वनी ऐकला तेव्हा अंगरख्याने चेहरा झाकून घेऊन तो गुहेच्या दाराशी जाऊन उभा राहिला. “एलीया, तू इथे का आला आहेस?” अशी वाणी त्यास ऐकू आली.
Kuin Elia sen kuuli peitti hän kasvonsa hameellansa, ja meni ulos ja seisoi luolan ovella, ja katso, ääni sanoi hänelle: mitä sinulla tässä on (tekemistä), Elia?
14 १४ एलीया म्हणाला, “सर्वशक्तिमान परमेश्वर देवा, आतापर्यंत मी तुझ्याच सेवेत आयुष्य घालवले आहे. पण इस्राएल लोकांनी आपला करार मोडला आहे. त्यांनी तुझ्या वेदींचा विध्वंस केला. तुझ्या संदेष्ट्यांना ठार केले. मीच काय तो अजून जिवंत आहे. आणि आता ते माझ्या जिवावर उठलेत.”
Hän vastasi: minä olen kiivauksella kiivannut Herran Jumalan Zebaotin tähden; sillä Israelin lapset ovat hyljänneet sinun liittos, kukistaneet sinun alttaris ja tappaneet sinun prophetas miekalla, ja minä ainoasti jäin, ja he etsivät minun henkeäni, ottaaksensa sitä pois.
15 १५ तेव्हा परमेश्वर त्यास म्हणाला, “आता मागे जा आणि वाळवंटातून जाणाऱ्या रस्त्याने दिमिष्काला पोहोंचेपर्यंत चालत जा. दिमिष्कामध्ये जा आणि अरामाचा राजा म्हणून हजाएलला अभिषेक कर.
Mutta Herra sanoi hänelle: palaja tietäs myöten Damaskun korpeen: mene ja voitele Hasael Syrian kuninkaaksi.
16 १६ निमशीचा पुत्र येहू याला इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक कर. आणि आबेल-महोला इथला शाफाटाचा पुत्र अलीशा याला पुढे तुझी जागा घेणारा संदेष्टा म्हणून अभिषेक कर.
Ja voitele Jehu Nimsin poika Israelin kuninkaaksi; ja Elisa Saphatin poika, AbelMeholasta, voitele prophetaksi sinun siaas.
17 १७ हजाएल अनेक पापी मनुष्यांना ठार करेल. त्याच्या तलवारीतून जे सुटतील त्यांना येहू मारील. आणि यातूनही कोणी निसटले तर त्यास अलीशा मारील.
Ja tapahtuu, että joka välttää Hasaelin miekan, se tapetaan Jehulta, ja joka välttää Jehun miekan, se tapetaan Elisalta.
18 १८ एलीया, इस्राएलमध्ये बआलापुढे कधी वाकले नाहीत असे सात हजार लोक अजूनही आहेत. यांना मी जगू देईल. त्यांनी आयुष्यात कधी बालमूर्तीचे चुंबन घेतलेले नाही.”
Mutta minä jätän seitsemäntuhatta Israeliin: kaikki polvet, jotka ei kumartaneet Baalia, ja kaikki suut, jotka ei hänen suuta antaneet.
19 १९ तेव्हा एलीया तिथून निघाला आणि शाफाटाचा मुलगा अलीशा याच्या शोधात निघाला. अलीशा तेव्हा आपली बैलाची बारा जोते चालवून शेतजमीन नांगरत होता. एलीया आला तेव्हा अलीशा स्वत: हा बाराव्या जोतावर होता. एलीया अलीशाजवळ आला. एलीयाने मग आपला संदेष्ट्याचा खास अंगरखा अलीशावर पांघरला.
Ja hän läksi sieltä ja kohtasi Elisan Saphatin pojan, joka kynti kahdellatoistakymmenellä parilla härkiä, ja hän itse oli niiden kahdentoistakymmenen seassa; ja Elia meni hänen tykönsä ja heitti hameensa hänen päällensä.
20 २० अलीशाने लगेच बैल सोडून दिले आणि तो एलीयाच्या मागे धावत गेला. अलीशा त्यास म्हणाला, “मला माझ्या आईवडीलांचा निरोप घेऊ दे.” मग मी तुझ्याबरोबर येतो. एलीया म्हणाला, “ठीक आहे, जा पण मी तुला काय केले ते लक्षात ठेव.”
Ja hän jätti härjät ja juoksi Elian perässä, ja sanoi: anna minun suuta antaa minun isälleni ja äidilleni, niin minä seuraan sinua; hän sanoi hänelle: mene ja tule jälleen; sillä mitä minä sinulle tein?
21 २१ अलीशाने मग आपल्या आईवडीलांसमवेत सणासुदीसारखे जेवण घेतले. त्याने आपली बैलांची जोडी कापली. त्यांच्या मानेवरचे जू सरपण म्हणून वापरले त्यावर बैलांचे मांस शिजवले. सर्व लोकांस जेवायला बोलावले. मग अलीशा एलीयाच्या पाठोपाठ गेला. एलीयाचा तो मदतनीस झाला.
Ja hän palasi hänen tykönsä, ja otti parin härkiä ja uhrasi sen, ja keitti lihan härkäin kaluilla, ja antoi kansalle syödä; ja hän nousi ja seurasi Eliaa, ja palveli häntä.

< 1 राजे 19 >