< 1 राजे 19 >
1 १ अहाब राजाने घडलेली सर्व हकिकत ईजबेलला सांगितली. सर्व संदेष्ट्यांना एलीयाने कसे तलवारीने कापून काढले तेही सांगितले.
Tsono Ahabu anawuza Yezebeli zonse zimene anachita Eliya ndi momwe anaphera aneneri onse ndi lupanga.
2 २ तेव्हा ईजबेलने एलीयाला दूताकरवी निरोप पाठवला. तो असा, “तू त्या संदेष्ट्यांना मारलेस तसे मी तुला उद्या या वेळेपर्यंत मारणार. यामध्ये मला यश आले नाहीतर देव माझे तसेच व त्याहूनही अधीक करो.”
Choncho Yezebeli anatuma mthenga kwa Eliya kuti akamuwuze kuti, “Milungu indilange, ndipo indilange koopsa, ngati mawa nthawi ngati yomwe ino sindidzakupha iwe monga unaphera aneneriwo.”
3 ३ एलीया हे ऐकून घाबरला. आपला जीव वाचवायला त्याने पळ काढला. बरोबर त्याने आपल्या नोकराला घेतले होते. यहूदामधील बैर-शेबा येथे ते गेले. आपल्या नोकराला तिथेच सोडून
Eliya ataona zimenezi, ananyamuka nathawa kupulumutsa moyo wake. Atafika ku Beeriseba ku Yuda, anasiya mtumiki wake kumeneko,
4 ४ तो पुढे दिवसभर वाळवंट तुडवत गेला. एका झाडाखाली तो बसला. आता मरण यावे असे त्यास वाटले. एलीया म्हणाला, “आता हे पुरे झाले, परमेश्वरा! मला आता मरु दे माझ्या पूर्वजांपेक्षा माझ्यात काय बरे आहे?”
ndipo Eliyayo anayenda ulendo wa tsiku limodzi mʼchipululu. Anafika pa kamtengo ka tsache, nakhala pansi pa tsinde lake napemphera kuti afe. Iye anati, “Yehova, ine ndatopa nazo. Chotsani moyo wanga. Ineyo sindine wopambana makolo anga.”
5 ५ एका झाडाखाली तो आडवा झाला आणि त्यास झोप लागली. तेव्हा एक देवदूत तिथे आला एलीयाला स्पर्श करून म्हणाला, “उठ हे खा.”
Ndipo Eliya anagona tulo tofa nato pa tsinde pa kamtengoko. Ndipo taonani, mngelo anamukhudza, namuwuza kuti, “Dzuka udye.”
6 ६ एलीया उठून पाहतो तर निखाऱ्यावर भाजलेली एक भाकर आणि पाण्याचे मडके शेजारी ठेवलेले होते. एलीयाने ते खाल्ले, पाणी प्याला आणि तो पुन्हा झोपी गेला.
Eliya anayangʼana, ndipo taonani kumutu kwake kunali buledi wootcha pa makala ndi botolo la madzi. Iye anadya ndi kumwa, nʼkugonanso.
7 ७ आणखी काही वेळाने तो परमेश्वराचे देवदूत दुसऱ्यांदा पुन्हा त्याच्याजवळ आला त्याने त्यास स्पर्श केला आणि त्यास म्हणाला, “ऊठ आणि थोडे खाऊन घे, नाहीतर पुढचा मोठा प्रवास करायला तुला शक्ती राहणार नाही.”
Mngelo wa Yehova anabweranso kachiwiri, anamukhudza, namuwuza kuti, “Dzuka udye, popeza ulendowu ndi wautali.”
8 ८ तेव्हा एलीया उठला त्याने खाल्ले आणि पाणी प्याला. त्या अन्नाच्या बळावर पुढे तो चाळीस दिवस आणि रात्री चालत राहिला. देवाचा डोंगर होरेब येथपर्यंत तो चालला.
Tsono Eliya anadzuka nadya ndi kumwa. Atapeza mphamvu chifukwa cha chakudyacho, anayenda masiku 40, usana ndi usiku mpaka anafika ku Horebu, phiri la Mulungu.
9 ९ तिथे एका गुहेत शिरुन त्याने रात्र काढली. तेव्हा परमेश्वर एलीयाशी बोलला. तो म्हणाला, “एलीया, तू येथे का आला आहेस?”
Kumeneko analowa mʼphanga, nakhala komweko. Ndipo taonani, Yehova anayankhula naye kuti, “Eliya, ukuchita chiyani kuno?”
10 १० एलीया म्हणाला, “सर्वशक्तिमान परमेश्वर देवा, मी आतापर्यंत तुझीच सेवा करत आलेलो आहे. माझ्याकडून होईल तितके मी केले पण इस्राएलाच्या लोकांनी तुझ्याशी केलेल्या कराराचा भंग केलेला आहे. त्यांनी तुझ्या वेदीचा विध्वंस केला. तुझ्या संदेष्ट्यांना तलवारीने मारले. मीच एकटा काय तो अजून जिवंत आहे. पण आता ते माझ्याही जिवावर उठले आहेत.”
Iye anayankha kuti, “Ndakhala wodzipereka kwambiri kwa Yehova Mulungu Wamphamvuzonse. Aisraeli asiya pangano lanu, agwetsa maguwa anu ansembe, ndipo apha aneneri anu ndi lupanga. Ndatsala ine ndekha ndipo tsopano akufuna kundipha.”
11 ११ यावर परमेश्वर एलीयाला म्हणाला, “जा, या डोंगरावर माझ्यासमोर उभा राहा. मी तुझ्या जवळून जातो” मग जोराचा वारा सुटला. त्या सोसाट्याच्या वाऱ्याने डोंगरालाही तडे जाऊन मोठेमोठे खडक परमेश्वरासमोर पडले. पण त्या वाऱ्यात परमेश्वर नव्हता. त्यानंतर धरणीकंप झाला, पण तेथेही परमेश्वर नव्हता.
Yehova anati, “Tuluka ndipo ukayime pa phiri pamaso pa Yehova, pakuti Yehova ali pafupi kudutsa pamenepo.” Tsono mphepo yayikulu ndi yamphamvu inawomba ningʼamba mapiri ndi kuswa matanthwe pamaso pa Yehova, koma Yehova sanali mʼmphepomo. Itapita mphepoyo panachita chivomerezi, koma Yehova sanali mʼchivomerezicho.
12 १२ धरणीकंपानंतर अग्नी प्रकटला. पण तेथेही परमेश्वर नव्हता. अग्नी शमल्यावर मात्र शांत, मंजुळ स्वर ऐकू आला.
Chitapita chivomerezicho, panafika moto, koma Yehova sanali mʼmotomo. Ndipo utapita motowo, panamveka kamphepo kayaziyazi.
13 १३ एलीयाने हा ध्वनी ऐकला तेव्हा अंगरख्याने चेहरा झाकून घेऊन तो गुहेच्या दाराशी जाऊन उभा राहिला. “एलीया, तू इथे का आला आहेस?” अशी वाणी त्यास ऐकू आली.
Eliya atamva kamphepoko, anakokera chovala chake naphimba kumutu. Anatuluka ndipo anayima pa khomo la phanga. Ndipo panamveka mawu akuti, “Eliya, ukuchita chiyani kuno?”
14 १४ एलीया म्हणाला, “सर्वशक्तिमान परमेश्वर देवा, आतापर्यंत मी तुझ्याच सेवेत आयुष्य घालवले आहे. पण इस्राएल लोकांनी आपला करार मोडला आहे. त्यांनी तुझ्या वेदींचा विध्वंस केला. तुझ्या संदेष्ट्यांना ठार केले. मीच काय तो अजून जिवंत आहे. आणि आता ते माझ्या जिवावर उठलेत.”
Iye anayankha kuti, “Ndakhala wodzipereka kwambiri kwa Yehova Mulungu Wamphamvuzonse. Aisraeli asiya pangano lanu, agwetsa maguwa anu ansembe, ndipo apha aneneri anu ndi lupanga. Ndatsala ine ndekha ndipo tsopano akufuna kundipha.”
15 १५ तेव्हा परमेश्वर त्यास म्हणाला, “आता मागे जा आणि वाळवंटातून जाणाऱ्या रस्त्याने दिमिष्काला पोहोंचेपर्यंत चालत जा. दिमिष्कामध्ये जा आणि अरामाचा राजा म्हणून हजाएलला अभिषेक कर.
Yehova anati kwa Eliyayo, “Bwerera njira imene unadzera, ndipo upite ku Chipululu cha ku Damasiko. Ukakafika kumeneko, ukadzoze Hazaeli kuti akhale mfumu ya ku Aramu.
16 १६ निमशीचा पुत्र येहू याला इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक कर. आणि आबेल-महोला इथला शाफाटाचा पुत्र अलीशा याला पुढे तुझी जागा घेणारा संदेष्टा म्हणून अभिषेक कर.
Ukadzozenso Yehu mwana wa Nimisi kuti akhale mfumu ya Israeli, ndiponso ukadzoze Elisa mwana wa Safati wa ku Abeli-Mehola kuti akhale mneneri wolowa mʼmalo mwako.
17 १७ हजाएल अनेक पापी मनुष्यांना ठार करेल. त्याच्या तलवारीतून जे सुटतील त्यांना येहू मारील. आणि यातूनही कोणी निसटले तर त्यास अलीशा मारील.
Yehu adzapha aliyense amene adzapulumuke ku lupanga la Hazaeli, ndipo Elisa adzapha aliyense amene adzapulumuke ku lupanga la Yehu.
18 १८ एलीया, इस्राएलमध्ये बआलापुढे कधी वाकले नाहीत असे सात हजार लोक अजूनही आहेत. यांना मी जगू देईल. त्यांनी आयुष्यात कधी बालमूर्तीचे चुंबन घेतलेले नाही.”
Komabe ndasunga anthu 7,000 ku Israeli, anthu onse amene mawondo awo sanagwadirepo Baala, onse amene pakamwa pawo sipanapsompsoneko fano lake.”
19 १९ तेव्हा एलीया तिथून निघाला आणि शाफाटाचा मुलगा अलीशा याच्या शोधात निघाला. अलीशा तेव्हा आपली बैलाची बारा जोते चालवून शेतजमीन नांगरत होता. एलीया आला तेव्हा अलीशा स्वत: हा बाराव्या जोतावर होता. एलीया अलीशाजवळ आला. एलीयाने मग आपला संदेष्ट्याचा खास अंगरखा अलीशावर पांघरला.
Kotero Eliya anachoka kumeneko, nakapeza Elisa mwana wa Safati. Iye ankatipula ndi mapulawo khumi ndi awiri okokedwa ndi ngʼombe ziwiriziwiri zapamagoli, ndipo iye mwini ankayendetsa goli la khumi ndi chiwiri. Eliya anapita kumene anali namuveka chofunda chake.
20 २० अलीशाने लगेच बैल सोडून दिले आणि तो एलीयाच्या मागे धावत गेला. अलीशा त्यास म्हणाला, “मला माझ्या आईवडीलांचा निरोप घेऊ दे.” मग मी तुझ्याबरोबर येतो. एलीया म्हणाला, “ठीक आहे, जा पण मी तुला काय केले ते लक्षात ठेव.”
Pomwepo Elisa anasiya ngʼombe zake nathamangira Eliya. Iye anati, “Mundilole kuti ndikatsanzike abambo ndi amayi anga, ndipo kenaka ndidzakutsatani.” Eliya anayankha kuti, “Bwerera. Ine ndachita chiyani kwa iwe?”
21 २१ अलीशाने मग आपल्या आईवडीलांसमवेत सणासुदीसारखे जेवण घेतले. त्याने आपली बैलांची जोडी कापली. त्यांच्या मानेवरचे जू सरपण म्हणून वापरले त्यावर बैलांचे मांस शिजवले. सर्व लोकांस जेवायला बोलावले. मग अलीशा एलीयाच्या पाठोपाठ गेला. एलीयाचा तो मदतनीस झाला.
Choncho Elisa anamusiya Eliyayo nabwerera kwawo. Anatenga ngʼombe zake ziwiri zapagoli nazipha. Anatenga magoli a mapulawo ake nasonkhera moto kuphikira nyamayo ndipo anayipereka kwa anthu kuti adye. Ndipo ananyamuka natsatira Eliya ndi kukhala mtumiki wake.