< 1 राजे 16 >
1 १ यानंतर परमेश्वर हनानीचा पुत्र येहू याच्याशी बोलला. हे बोलणे राजा बाशा याच्याविरुध्द होते.
Men til Jehu, Hananis Søn, kom HERRENS Ord mod Ba'sja saaledes:
2 २ “तुला मी मोठे केले. माझ्या इस्राएली लोकांचा नायक म्हणून तुला मी नेमले. पण तू यराबामाच्या वाटेनेच गेलास व इस्राएलींच्या पापाला कारणीभूत झालास. त्यांच्या पातकांनी माझा क्रोध जागा झाला आहे.
»Jeg ophøjede dig af Støvet og gjorde dig til Fyrste over mit Folk Israel, dog har du vandret i Jeroboams Spor og forledt mit Folk Israel til Synd, saa de krænker mig ved deres Synder;
3 ३ तेव्हा बाशा, मी तुझा आणि तुझ्या कुटुंबाचा नाश करणार आहे. नबाटाचा पुत्र यराबाम याच्या घराण्याचे केले तसेच मी तुझ्या बाबतीत करीन.
se, derfor vil jeg nu feje Ba'sja og hans Hus bort og gøre det samme ved dit Hus, som jeg gjorde ved Jeroboams, Nebats Søns, Hus;
4 ४ बाशाच्या कुटुंबातील लोक नगरातल्या रस्त्यावर मरतील व कुत्री त्यांची प्रेते खातील. जे रानावनात मरतील ते पक्ष्यांचे भक्ष्य होतील.”
den af Ba'sjas Slægt, som dør i Byen, skal Hundene æde, og den, som dør paa Marken, skal Himmelens Fugle æde!«
5 ५ इस्राएलाच्या राजांच्या इतिहास या ग्रंथात बाशाच्या इतर पराक्रमांची हकिकत लिहीली आहे.
Hvad der ellers er at fortælle om Ba'sja, hvad han gjorde, og hans Heltegerninger, staar jo optegnet i Israels Kongers Krønike.
6 ६ बाशाच्या मृत्यूनंतर तिरसा येथे त्याचे दफन झाले. त्याचा पुत्र एला हा त्यानंतर राज्य करु लागला.
Saa lagde Ba'sja sig til Hvile hos sine Fædre og blev jordet i Tirza; og hans Søn Ela blev Konge i hans Sted.
7 ७ तेव्हा परमेश्वराने हनानीचा पुत्र येहू या संदेष्ट्याला संदेश दिला. हा संदेश बाशा आणि त्याचे कुटुंबीय यांच्या विरुध्द होता. बाशाने परमेश्वराविरुध्द बरीच पापे केली होती. त्याचा परमेश्वरास फार संताप आला होता. आधी यराबामाच्या कुटुंबाने केले तेच बाशाने केले. बाशाने यराबामाच्या कुळाचा संहार केला म्हणून परमेश्वराचा कोप झाला होता.
Desuden kom HERRENS Ord ved Profeten Jehu, Hananis Søn, mod Ba'sja og hans Hus baade paa Grund af alt det, han havde gjort, som var ondt i HERRENS Øjne, idet han krænkede ham ved sine Hænders Værk og efterlignede Jeroboams Hus, og tillige fordi han lod dette nedhugge.
8 ८ यहूदाचा राजा म्हणून आसाचे सव्वीसावे वर्ष चालू असताना, एला हा राजा झाला. एला हा बाशाचा पुत्र तिरसामध्ये इस्राएलावर याने दोन वर्षे राज्य केले.
I Kong Asa af Judas seks og tyvende Regeringsaar blev Ela, Ba'sjas Søn, Konge over Israel, og han herskede to Aar i Tirza.
9 ९ जिम्री हा एला राजाचा अधिकारी होता. एलाच्या एकूण रथापैकी अर्धे जिम्रीच्या ताब्यात होते. तरीही त्याने एलाविरुध्द कट केला. एला राजा तिरसा येथे अरसाच्या घरी मद्याच्या धुंदीत होता. अरसा हा तिरसा येथील महालावरचा मुख्य अधिकारी होता.
Saa stiftede en af hans Mænd, Zimri, der var Fører for den ene Halvdel af Stridsvognene, en Sammensværgelse imod ham; og engang, da han i Tirza var beruset ved et Drikkelag i sin Paladsøverste Arzas Hus,
10 १० जिम्रीने सरळ घरात घुसून एला राजाला ठार केले. आसाचे हे यहूदाचा राजा म्हणून सत्ताविसावे वर्ष होते. एलानंतर हा जिम्री इस्राएलाचा राजा झाला.
trængte Zimri ind og slog ham ihjel — i Kong Asa af Judas syv og tyvende Regeringsaar — og blev Konge i hans Sted.
11 ११ जिम्रीने राज्यावर आल्याबरोबर बाशाच्या घरातील सर्वांची सूड ऊगवला. कोणालाही जिवंत ठेवले नाही. बाशाच्या मित्रांनाही त्याने ठार केले.
Da han var blevet Konge og havde besteget Tronen, lod han hele Ba'sjas Hus dræbe uden at levne et mandligt Væsen og tillige hans nærmeste Slægtninge og Venner;
12 १२ बाशाबद्दल येहू या संदेष्ट्यामार्फत परमेश्वराने जी भविष्यवाणी उच्चारली त्याप्रमाणेच जिम्रीने बाशाच्या घराण्याचा नाश केला
saaledes udryddede Zimri hele Ba'sjas Hus efter det Ord, HERREN havde talet til Ba'sja ved Profeten Jehu,
13 १३ बाशा आणि त्याचा पुत्र एला यांच्या पापांमुळे हे झाले. त्यांनी स्वत: पापे केली आणि लोकांच्या पापांनाही ते कारण झाले. त्यांनी अनेक मूर्ती केल्यामुळे इस्राएलावर परमेश्वराचा क्रोध झाला.
for alle de Synders Skyld, som Ba'sja og hans Søn Ela havde begaaet og forledt Israel til, saa at de krænkede HERREN, Israels Gud, ved deres Afguder.
14 १४ इस्राएलाच्या राजांचा इतिहास या ग्रंथात एलाच्या बाकीच्या गोष्टी आलेल्या आहेत.
Hvad der ellers er af fortælle om Ela, alt, hvad han gjorde, staar jo optegnet i Israels Kongers Krønike.
15 १५ आसाचे यहूदाचा राजा म्हणून सत्ताविसावे वर्ष असताना जिम्री इस्राएलाचा राजा झाला. जिम्रीने तिरसा येथे सात दिवस राज्य केले. त्याचे असे झाले, इस्राएलाच्या सैन्याने पलिष्ट्यांच्या गिब्बथोन येथे तळ दिला होता. ते चढाई करण्याच्या तयारीत होते.
I Kong Asa af Judas syv og tyvende Regeringsaar blev Zimri Konge, og han herskede syv Dage i Tirza. Hæren var paa det Tidspunkt ved at belejre Gibbeton, som tilhørte Filisterne;
16 १६ जिम्रीने राजाविरुध्द केलेल्या कारस्थानाची माहिती छावणीतल्या लोकांनी ऐकली. त्याने राजाचा वध केल्याचे त्यांना कळले. तेव्हा सर्व इस्राएलांनी अम्री याला तिथल्या तिथे राजा केले. अम्री सेनापती होता.
og da nu Hæren under Belejringen hørte, at Zimri havde stiftet en Sammensværgelse mod Kongen og endda dræbt ham, udraabte hele Israel samme Dag i Lejren Omri, Israels Hærfører, til Konge.
17 १७ तेव्हा अम्री आणि सर्व इस्राएली यांनी गिब्बथोन सोडून तिरसावर हल्ला केला.
Derpaa brød Omri op med hele Israel fra Gibbeton og begyndte at belejre Tirza;
18 १८ नगर कब्जात घेतलेले जिम्रीने पाहिले. तेव्हा तो महालात घुसला आणि त्याने राजमहालाला आग लावली. महाल आणि तो, दोघही आगीत भस्मसात झाले.
og da Zimri saa at Byen var taget, begav han sig ind i Kongens Palads og stak det i Brand over sig; saaledes døde han
19 १९ आपल्या पापांमुळेच तो मेला. परमेश्वराच्या दृष्टीने जे गैर ते त्याने केले. याने यराबामाप्रमाणेच दुष्कृत्ये केली. इस्राएलाच्या लोकांच्या पापांनाही यराबाम कारणीभूत झाला.
for de Synders Skyld, han havde begaaet, idet han gjorde, hvad der var ondt i HERRENS Øjne, og vandrede i Jeroboams Spor og i de Synder, han havde begaaet, da han forledte Israel til at synde.
20 २० इस्राएलाच्या राजांचा इतिहास या ग्रंथात जिम्रीच्या कारस्थानांची आणि बाकीच्या गोष्टींची माहिती आहे. एला राजाविरुध्द तो बंड करून उठला तेव्हाची हकिकतही या पुस्तकात आहे.
Hvad der ellers er at fortælle om Zimri og den Sammensværgelse, han stiftede, staar jo optegnet i Israels Kongers Krønike.
21 २१ इस्राएलाच्या लोकांमध्ये दोन गट पडलेले होते. अर्धे लोक गिनथाचा पुत्र तिब्नी याच्या बाजूचे असून, त्यास राजा करावे अशा मताचे होते. उरलेले अम्रीचे चाहते होते.
Ved den Tid delte Israels Folk sig, idet den ene Halvdel sluttede sig til Tibni, Ginats Søn, og udraabte ham til Konge, medens den anden sluttede sig til Omri.
22 २२ तिब्नीच्या बाजूला असलेल्या गटापेक्षा अम्रीला पाठिंबा देणाऱ्यांचा गट वरचढ होता. त्यामुळे तिब्नी मारला गेला आणि अम्री राजा झाला.
Men den Del af Folket, der sluttede sig til Omri, fik Overtaget over dem, der sluttede sig til Tibni, Ginats Søn, og da Tibni døde ved den Tid, blev Omri Konge.
23 २३ यहूदाचा राजा आसा याला सत्तेवर आल्यावर एकतिसावे वर्ष चालू असताना, अम्री इस्राएलाचा राजा झाला. अम्रीने इस्राएलावर बारा वर्षे राज्य केले. त्यापैकी सहा वर्षे तो तिरसामध्ये होता.
I Kong Asa af Judas een og tredivte Regeringsaar blev Omri Konge over Israel, og han herskede tolv Aar. Først herskede han seks Aar i Tirza;
24 २४ त्याने शोमरोन टेकडी शेमर याच्याकडून सुमारे दोन किक्कार रूपे देऊन विकत घेतली. या टेकडीवर त्याने नगर बांधले. शेमर या नावावरुनच त्याने नगरचे नाव शोमरोन ठेवले.
men siden købte han Samarias Bjerg af Semer for to Talenter Sølv og byggede paa Bjerget en By, som han efter Semer, Bjergets Ejer, kaldte Samaria.
25 २५ अम्रीच्या हातूनही परमेश्वराच्या दृष्टीने वाईट, त्या गोष्टी घडल्या. आपल्या आधीच्या सर्व राजांपेक्षा हा वाईट होता.
Omri gjorde, hvad der var ondt i HERRENS Øjne, og handlede endnu værre end alle hans Forgængere;
26 २६ नबाटाचा पुत्र यराबाम याने जी पापे केली तीच याने केली. यराबामाने इस्राएल लोकांसही पापे करायला लावली. त्यामुळे इस्राएलावर परमेश्वर देवाचा कोप ओढवला. व्यर्थ दैवतांची त्याने पूजा केली म्हणून परमेश्वर संतापला.
han vandrede helt i Jeroboams, Nebats Søns, Spor og i de Synder, han havde forledt Israel til, saa at de krænkede HERREN, Israels Gud, ved deres Afguder.
27 २७ अम्रीच्या इतर गोष्टी आणि त्याचे पराक्रम याची हकिकत इस्राएलाच्या राजांचा इतिहास या ग्रंथात लिहिलेली आहे.
Hvad der ellers er at fortælle om Omri, alt, hvad han gjorde, og de Heltegerninger, han udførte, staar jo optegnet i Israels Kongers Krønike.
28 २८ अम्री मरण पावल्यावर त्याचे शोमरोन येथे दफन झाले. त्यानंतर त्याचा पुत्र अहाब हा राज्य करु लागला.
Saa lagde Omri sig til Hvile hos sine Fædre og blev jordet i Samaria; og hans Søn Akab blev Konge i hans Sted.
29 २९ यहूदाचा राजा आसा याच्या काराकिर्दींच्या अडतिसाव्या वर्षी अम्रीचा पुत्र अहाब इस्राएलचा राजा झाला. शोमरोन या नगरातून त्याने इस्राएलवर बावीस वर्षे राज्य केले.
Akab, Omris Søn, blev Konge over Israel i Kong Asa af Judas otte og tredivte Regeringsaar, og Akab, Omris Søn, herskede to og tyve Aar over Israel i Samaria.
30 ३० परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते सर्व अम्रीचा मुलगा अहाबाने केले. आपल्या आधीच्या राजांपेक्षाही हा दुर्वर्तनी होता.
Akab, Omris Søn, gjorde, hvad der var ondt i HERRENS Øjne, i højere Grad end alle hans Forgængere.
31 ३१ नबाटाचा पुत्र यराबाम याने केले ते तर त्यास शुल्लक वाटले म्हणून की काय त्याने आणखी दुष्कृत्ये केली. एथबाल याची कन्या ईजबेल हिच्याशी त्याने लग्र केले. एथबाल हा सीदोन्यांचा राजा होता. त्यानंतर अहाब बआल या दैवतांच्या भजनी लागला.
Og som om det ikke var nok med, at han vandrede i Jeroboams, Nebats Søns, Synder, ægtede han oven i Købet Jesabel, en Datter af Zidoniernes Konge Etba'al, og gik hen og dyrkede Ba'al og tilbad ham.
32 ३२ शोमरोन येथे त्याने बआलाच्या पूजेसाठी देऊळ बांधले. वेदीही बांधली.
Han rejste Ba'al et Alter i Ba'alstemplet, som han lod bygge i Samaria.
33 ३३ अशेराच्या पूजेसाठी अहाबाने स्तंभ उभारला. आपल्या आधीच्या राजापेक्षा याच्यावर इस्राएलाच्या परमेश्वर देवाचा कोप जास्त झाला.
Og Akab lavede Asjerastøtten og gjorde endnu flere Ting, hvorved han krænkede HERREN, Israels Gud, værre end de Konger, der havde hersket før ham i Israel.
34 ३४ याच काळात बेथेलच्या हिएलने यरीहो नगर पुन्हा बांधले. हे काम त्याने सुरु केले तेव्हा त्याचा मोठा पुत्र अबीराम वारला. आणि नगराचे दरवाजे बांधून होत आले तेव्हा त्याचा सर्वात धाकटा पुत्र सगूब हा वारला. नूनचा पुत्र यहोशवा याच्यामार्फत परमेश्वराने जे भाकित केले त्यानुसार हे घडले.
I hans Dage genopbyggede Beteliten Hiel Jeriko; efter det Ord, HERREN havde talet ved Josua, Nuns Søn, kostede det ham hans førstefødte Abiram at lægge Grunden og hans yngste Søn Segub at sætte dens Portfløje ind.