< 1 राजे 15 >
1 १ नबाटाचा पुत्र यराबाम इस्राएलवर राज्य करत होता. त्याच्या राजेपणाच्या कारकिर्दीचे अठरावे वर्ष चालू असताना, रहबामाचा पुत्र अबीयाम यहूदाचा पुढचा राजा झाला.
Now in the eighteenth year of King Jeroboam the son of Nebat, Abijam began to reign over Judah.
2 २ अबीयाने तीन वर्षे यरूशलेमेत राज्य केले. याच्या आईचे नाव माका ही अबीशालोमाची कन्या.
He reigned three years in Jerusalem. His mother’s name was Maacah the daughter of Abishalom.
3 ३ आपल्या वडिलांच्याच पापांची उजळणी याने केली. आपले आजोबा दावीद यांच्याप्रमाणे तो परमेश्वर देवाशी एकनिष्ठ नव्हता.
He walked in all the sins of his father, which he had done before him; and his heart was not perfect with the LORD his God, as the heart of David his father.
4 ४ दाविदावर परमेश्वराचे प्रेम होते. त्याच्याखातर त्याने त्याचा दीप यरूशलेमेत कायम राहू दिला. त्यानंतर त्याच्या पुत्राला उभारले, व यरूशलेम सुरक्षित ठेवले.
Nevertheless for David’s sake, the LORD his God gave him a lamp in Jerusalem, to set up his son after him and to establish Jerusalem;
5 ५ दाविदाचे वर्तन परमेश्वराच्या इच्छेनुसार, योग्य असेच होते. त्याने परमेश्वराच्या आज्ञांचे नेहमीच पालन केले. उरीया हित्तीबद्दल घडलेले चुकीचे वर्तन एवढाच काय तो अपवाद.
because David did that which was right in the LORD’s eyes, and didn’t turn away from anything that he commanded him all the days of his life, except only in the matter of Uriah the Hittite.
6 ६ रहबाम आणि यराबाम नेहमीच एकमेकांविरुध्द लढत असत.
Now there was war between Rehoboam and Jeroboam all the days of his life.
7 ७ अबीयामाने आणखी जे काही केले त्याची नोंद, यहूदाच्या राजांचा इतिहास या पुस्तकात आहे. अहीयाच्या संपूर्ण कारकिर्दींत अहीया आणि यराबाम यांच्यात लढाई चालू असे.
The rest of the acts of Abijam, and all that he did, aren’t they written in the book of the chronicles of the kings of Judah? There was war between Abijam and Jeroboam.
8 ८ अबीयामाला त्याच्या मृत्यूनंतर दावीद नगरात पुरले. त्याचा पुत्र आसा राज्य करु लागला.
Abijam slept with his fathers, and they buried him in David’s city; and Asa his son reigned in his place.
9 ९ यराबामाच्या इस्राएलवरील राज्याच्या विसाव्या वर्षी आसा यहूदाचा राजा झाला,
In the twentieth year of Jeroboam king of Israel, Asa began to reign over Judah.
10 १० आसाने यरूशलेमेवर एक्केचाळीस वर्षे राज्य केले. त्याच्या आजीचे नाव माका. ती अबीशालोमाची कन्या.
He reigned forty-one years in Jerusalem. His mother’s name was Maacah the daughter of Abishalom.
11 ११ आपला पूर्वज दावीद याच्या प्रमाणेच परमेश्वराच्या मते जे योग्य तेच आसाने केले.
Asa did that which was right in the LORD’s eyes, as David his father did.
12 १२ त्याकाळी दैवतांच्या नावाखाली शरीरविक्रय करणारे पुरुष वेश्या होते. आसाने त्यांना देशत्याग करायला लावले. तसेच त्याने आपल्या वाडवडिलांनी केलेल्या मूर्ती पूर्णपणे हलवल्या.
He put away the sodomites out of the land, and removed all the idols that his fathers had made.
13 १३ आपली आजी माका हिला आसाने राणीच्या पदावरून दूर केले. अंमगळ दैवत अशेरा हिची एक मूर्ती या आजीनेही केली होती. आसाने त्या मूर्तीची मोडतोड केली. किद्रोन खोऱ्यात ती जाळून टाकली.
He also removed Maacah his mother from being queen, because she had made an abominable image for an Asherah. Asa cut down her image and burnt it at the brook Kidron.
14 १४ त्याने उच्च स्थानाची नासधूस केली नाही, मात्र आसा आयुष्यभर परमेश्वराशी एकनिष्ठ राहिला.
But the high places were not taken away. Nevertheless the heart of Asa was perfect with the LORD all his days.
15 १५ आसा आणि त्याचे वडिल यांनी परमेश्वरासाठी काही वस्तू करून घेतल्या होत्या. सोन्याचांदीच्या वस्तू आणि आणखी काही गोष्टी त्यामध्ये होत्या. त्या सर्व त्याने व्यवस्थित मंदिरात जमा केल्या.
He brought into the LORD’s house the things that his father had dedicated, and the things that he himself had dedicated: silver, gold, and utensils.
16 १६ आसा यहूदावर राज्य करीत असेपर्यंत इस्राएलचा राजा बाशा याच्याशी त्याच्या लढाया चालत.
There was war between Asa and Baasha king of Israel all their days.
17 १७ इस्राएलचा राजा बाशाने यहूदावर चढाया केल्या. आसाच्या प्रदेशातील लोकांचे येणे जाणे त्यास थांबवायचे होते. त्यामुळे रामा नगर त्याने चांगले मजबूत केले.
Baasha king of Israel went up against Judah, and built Ramah, that he might not allow anyone to go out or come in to Asa king of Judah.
18 १८ आसाने मग परमेश्वराच्या मंदिराच्या खजिन्यातले आणि महालातले सोनेनाणे काढून घेतले. आपल्या सेवकांच्या हाती ते सोपवून त्यांना त्याने अरामाचा राजा बेन हदाद यांच्याकडे पाठवले. बेन-हदाद हा टब्रिम्मोनचा पुत्र आणि टब्रिम्मोन हेज्योनचा. बेनहदादची राजधानी दिमिष्क होती.
Then Asa took all the silver and the gold that was left in the treasures of the LORD’s house, and the treasures of the king’s house, and delivered it into the hand of his servants. Then King Asa sent them to Ben Hadad, the son of Tabrimmon, the son of Hezion, king of Syria, who lived at Damascus, saying,
19 १९ आसाने आपल्या संदेशात म्हटले होते, “माझे वडिल आणि तुझे वडिल यांच्यात शांततेचा करार झाला होता. आता मला तुझ्याशी करार करायचा आहे. तुला मी हा सोन्यारुप्याचा नजराणा पाठवत आहे. इस्राएलचा राजा बाशा याच्याशी झालेल्या कराराचा तू भंग कर म्हणजे तो माझ्या प्रदेशातून निघून जाईल.”
“Let there be a treaty between me and you, like that between my father and your father. Behold, I have sent to you a present of silver and gold. Go, break your treaty with Baasha king of Israel, that he may depart from me.”
20 २० राजा बेन-हदाद याने आसाशी करार केला आणि इयोन, दान, आबेल-बेथ-माका, गालिल सरोवरालगतची गावे, किन्नेरोथ आणि नफतालीचा प्रांत यांच्यावर चढाई करायला आपले सैन्य इस्राएलावर पाठवले.
Ben Hadad listened to King Asa, and sent the captains of his armies against the cities of Israel, and struck Ijon, and Dan, and Abel Beth Maacah, and all Chinneroth, with all the land of Naphtali.
21 २१ या हल्ल्याची बातमी बाशाच्या कानावर गेली. तेव्हा त्याने रामा नगराच्या मजबूतीचे काम सोडले, ते गाव सोडले आणि तिरसा या ठिकाणी तो परतला.
When Baasha heard of it, he stopped building Ramah, and lived in Tirzah.
22 २२ मग आसा राजाने यहूदातील सर्व प्रजेला मदतीसाठी पाचारण केले. एकही जण त्यातून सुटला नाही. ते सर्व रामा येथे गेले. तिथून त्यांनी बाशाची दगड, लाकूड वगैरे सर्व बांधकामसामग्री आणली. बन्यामीनमधील गिबा आणि मिस्पा येथे या सर्व वस्तू त्यांनी वाहून नेल्या. आसाने ही नगरे चांगली भक्कम केली.
Then King Asa made a proclamation to all Judah. No one was exempted. They carried away the stones of Ramah, and its timber, with which Baasha had built; and King Asa used it to build Geba of Benjamin, and Mizpah.
23 २३ आसाबद्दलच्या इतर गोष्टी, त्याचे पराक्रम, त्याने बांधलेली नगरे या सगळ्यांची माहिती यहूदाच्या राजांच्या इतिहास या पुस्तकात लिहिलेली आहे. म्हातारपणी आसा पायाच्या दुखण्याने बेजार झाला.
Now the rest of all the acts of Asa, and all his might, and all that he did, and the cities which he built, aren’t they written in the book of the chronicles of the kings of Judah? But in the time of his old age he was diseased in his feet.
24 २४ आसाचे निधन झाल्यावर त्याच्या पूर्वजांच्या दावीद याच्या नगरात त्याचे दफन झाले. त्यानंतर त्याचा पुत्र यहोशाफाट राज्य करु लागला.
Asa slept with his fathers, and was buried with his fathers in his father David’s city; and Jehoshaphat his son reigned in his place.
25 २५ यहूदाचा राजा म्हणून आसाचे दुसरे वर्ष चालू असताना यराबामाचा पुत्र नादाब इस्राएलचा राजा झाला. त्याने इस्राएलवर दोन वर्षे राज्य केले.
Nadab the son of Jeroboam began to reign over Israel in the second year of Asa king of Judah; and he reigned over Israel two years.
26 २६ नादाबने परमेश्वरविरोधी कृत्ये केली. आपले वडिल यराबाम यांच्यासारखीच दुष्कृत्ये केली यराबामाने इस्राएल लोकांसही पाप करायला लावले होते.
He did that which was evil in the LORD’s sight, and walked in the way of his father, and in his sin with which he made Israel to sin.
27 २७ बाशा हा अहीयाचा पुत्र. हे इस्साखाराच्या वंशातले. बाशाने नादाब राजाला मारायचा कट केला. नादाब आणि इस्राएल लोक गिब्बथोन या पलिष्ट्यांच्या नगराला वेढा घालत होते तेव्हाची ही गोष्ट आहे. बाशाने या ठिकाणी नादाबला ठार केले.
Baasha the son of Ahijah, of the house of Issachar, conspired against him; and Baasha struck him at Gibbethon, which belonged to the Philistines; for Nadab and all Israel were besieging Gibbethon.
28 २८ आसाचे हे यहूदाचा राजा म्हणून तिसरे वर्ष होते. मग बाशा इस्राएलचा राजा झाला.
Even in the third year of Asa king of Judah, Baasha killed him and reigned in his place.
29 २९ बाशा राजा झाल्यावर त्याने यराबामाच्या कुळातील सर्वांना ठार केले. कोणाचीही त्याने गय केली नाही. शिलोचा संदेष्टा अहीया यांच्यामार्फत परमेश्वराने जी भविष्यवाणी केली होती तसेच हे झाले.
As soon as he was king, he struck all the house of Jeroboam. He didn’t leave to Jeroboam any who breathed, until he had destroyed him, according to the saying of the LORD, which he spoke by his servant Ahijah the Shilonite;
30 ३० राजा यराबामाने बरीच पापे केली होती, तसेच इस्राएल लोकांसही ती करायला लावली म्हणून हे घडले. इस्राएलचा परमेश्वर देव याचा यराबामावर कोप झाला
for the sins of Jeroboam which he sinned, and with which he made Israel to sin, because of his provocation with which he provoked the LORD, the God of Israel, to anger.
31 ३१ इस्राएलाच्या राजांचा इतिहास या पुस्तकात नादाबचे इतर पराक्रम नोंदलेले आहेत.
Now the rest of the acts of Nadab, and all that he did, aren’t they written in the book of the chronicles of the kings of Israel?
32 ३२ बाशा इस्राएलवर राज्य करत असताना यहूदाचा राजा आसा याच्याशी त्याचे सर्वकाळ युध्द चालले होते.
There was war between Asa and Baasha king of Israel all their days.
33 ३३ यहूदाचा राजा आसाच्या कारकिर्दीच्या तिसऱ्या वर्षी अहीयाचा पुत्र बाशा हा इस्राएलचा राजा झाला. तिरसामध्ये राहून त्याने चोवीस वर्षे राज्य केले.
In the third year of Asa king of Judah, Baasha the son of Ahijah began to reign over all Israel in Tirzah for twenty-four years.
34 ३४ पण परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले. आपले वडिल यराबाम यांनी केली तीच पातके बाशानेही केली. यराबामाने इस्राएल लोकांसही पापे करायला लावली होती.
He did that which was evil in the LORD’s sight, and walked in the way of Jeroboam, and in his sin with which he made Israel to sin.