< 1 राजे 15 >

1 नबाटाचा पुत्र यराबाम इस्राएलवर राज्य करत होता. त्याच्या राजेपणाच्या कारकिर्दीचे अठरावे वर्ष चालू असताना, रहबामाचा पुत्र अबीयाम यहूदाचा पुढचा राजा झाला.
尼八的儿子耶罗波安王十八年,亚比央登基作犹大王,
2 अबीयाने तीन वर्षे यरूशलेमेत राज्य केले. याच्या आईचे नाव माका ही अबीशालोमाची कन्या.
在耶路撒冷作王三年。他母亲名叫玛迦,是押沙龙的女儿。
3 आपल्या वडिलांच्याच पापांची उजळणी याने केली. आपले आजोबा दावीद यांच्याप्रमाणे तो परमेश्वर देवाशी एकनिष्ठ नव्हता.
亚比央行他父亲在他以前所行的一切恶,他的心不像他祖大卫的心,诚诚实实地顺服耶和华—他的 神。
4 दाविदावर परमेश्वराचे प्रेम होते. त्याच्याखातर त्याने त्याचा दीप यरूशलेमेत कायम राहू दिला. त्यानंतर त्याच्या पुत्राला उभारले, व यरूशलेम सुरक्षित ठेवले.
然而耶和华—他的 神因大卫的缘故,仍使他在耶路撒冷有灯光,叫他儿子接续他作王,坚立耶路撒冷。
5 दाविदाचे वर्तन परमेश्वराच्या इच्छेनुसार, योग्य असेच होते. त्याने परमेश्वराच्या आज्ञांचे नेहमीच पालन केले. उरीया हित्तीबद्दल घडलेले चुकीचे वर्तन एवढाच काय तो अपवाद.
因为大卫除 了赫人乌利亚那件事,都是行耶和 华眼中看为正的事,一生没有违背 耶和华一切所吩咐的。
6 रहबाम आणि यराबाम नेहमीच एकमेकांविरुध्द लढत असत.
罗波安在 世的日子常与耶罗波安争战。
7 अबीयामाने आणखी जे काही केले त्याची नोंद, यहूदाच्या राजांचा इतिहास या पुस्तकात आहे. अहीयाच्या संपूर्ण कारकिर्दींत अहीया आणि यराबाम यांच्यात लढाई चालू असे.
亚 比央其余的事,凡他所行的,都写在犹大列王记上。亚比央常与耶罗波安争战。
8 अबीयामाला त्याच्या मृत्यूनंतर दावीद नगरात पुरले. त्याचा पुत्र आसा राज्य करु लागला.
亚比央与他列祖同睡, 葬在大卫的城里。他儿子亚撒接续他作王。
9 यराबामाच्या इस्राएलवरील राज्याच्या विसाव्या वर्षी आसा यहूदाचा राजा झाला,
以色列王耶罗波安二十年,亚撒登基作犹大王,
10 १० आसाने यरूशलेमेवर एक्केचाळीस वर्षे राज्य केले. त्याच्या आजीचे नाव माका. ती अबीशालोमाची कन्या.
在耶路撒冷作王四十一年。他祖母名叫玛迦,是押沙龙的女儿。
11 ११ आपला पूर्वज दावीद याच्या प्रमाणेच परमेश्वराच्या मते जे योग्य तेच आसाने केले.
亚撒效法他祖大卫行耶和华眼中看为正的事,
12 १२ त्याकाळी दैवतांच्या नावाखाली शरीरविक्रय करणारे पुरुष वेश्या होते. आसाने त्यांना देशत्याग करायला लावले. तसेच त्याने आपल्या वाडवडिलांनी केलेल्या मूर्ती पूर्णपणे हलवल्या.
从国中除去娈童,又除掉他列祖所造的一切偶像;
13 १३ आपली आजी माका हिला आसाने राणीच्या पदावरून दूर केले. अंमगळ दैवत अशेरा हिची एक मूर्ती या आजीनेही केली होती. आसाने त्या मूर्तीची मोडतोड केली. किद्रोन खोऱ्यात ती जाळून टाकली.
并且贬了他祖母玛迦太后的位,因她造了可憎的偶像亚舍拉。亚撒砍下她的偶像,烧在汲沦溪边,
14 १४ त्याने उच्च स्थानाची नासधूस केली नाही, मात्र आसा आयुष्यभर परमेश्वराशी एकनिष्ठ राहिला.
只是邱坛还没有废去。亚撒一生却向耶和华存诚实的心。
15 १५ आसा आणि त्याचे वडिल यांनी परमेश्वरासाठी काही वस्तू करून घेतल्या होत्या. सोन्याचांदीच्या वस्तू आणि आणखी काही गोष्टी त्यामध्ये होत्या. त्या सर्व त्याने व्यवस्थित मंदिरात जमा केल्या.
亚撒将他父亲所分别为圣与自己所分别为圣的金银和器皿都奉到耶和华的殿里。
16 १६ आसा यहूदावर राज्य करीत असेपर्यंत इस्राएलचा राजा बाशा याच्याशी त्याच्या लढाया चालत.
亚撒和以色列王巴沙在世的日子常常争战。
17 १७ इस्राएलचा राजा बाशाने यहूदावर चढाया केल्या. आसाच्या प्रदेशातील लोकांचे येणे जाणे त्यास थांबवायचे होते. त्यामुळे रामा नगर त्याने चांगले मजबूत केले.
以色列王巴沙上来要攻击犹大,修筑拉玛,不许人从犹大王亚撒那里出入。
18 १८ आसाने मग परमेश्वराच्या मंदिराच्या खजिन्यातले आणि महालातले सोनेनाणे काढून घेतले. आपल्या सेवकांच्या हाती ते सोपवून त्यांना त्याने अरामाचा राजा बेन हदाद यांच्याकडे पाठवले. बेन-हदाद हा टब्रिम्मोनचा पुत्र आणि टब्रिम्मोन हेज्योनचा. बेनहदादची राजधानी दिमिष्क होती.
于是亚撒将耶和华殿和王宫府库里所剩下的金银都交在他臣仆手中,打发他们往住大马士革的亚兰王—希旬的孙子、他伯利们的儿子便·哈达那里去,
19 १९ आसाने आपल्या संदेशात म्हटले होते, “माझे वडिल आणि तुझे वडिल यांच्यात शांततेचा करार झाला होता. आता मला तुझ्याशी करार करायचा आहे. तुला मी हा सोन्यारुप्याचा नजराणा पाठवत आहे. इस्राएलचा राजा बाशा याच्याशी झालेल्या कराराचा तू भंग कर म्हणजे तो माझ्या प्रदेशातून निघून जाईल.”
说:“你父曾与我父立约,我与你也要立约。现在我将金银送你为礼物,求你废掉你与以色列王巴沙所立的约,使他离开我。”
20 २० राजा बेन-हदाद याने आसाशी करार केला आणि इयोन, दान, आबेल-बेथ-माका, गालिल सरोवरालगतची गावे, किन्नेरोथ आणि नफतालीचा प्रांत यांच्यावर चढाई करायला आपले सैन्य इस्राएलावर पाठवले.
便·哈达听从亚撒王的话,派军长去攻击以色列的城邑;他们就攻破以云、但、亚伯·伯·玛迦、基尼烈全境、拿弗他利全境。
21 २१ या हल्ल्याची बातमी बाशाच्या कानावर गेली. तेव्हा त्याने रामा नगराच्या मजबूतीचे काम सोडले, ते गाव सोडले आणि तिरसा या ठिकाणी तो परतला.
巴沙听见,就停工不修筑拉玛了,仍住在得撒。
22 २२ मग आसा राजाने यहूदातील सर्व प्रजेला मदतीसाठी पाचारण केले. एकही जण त्यातून सुटला नाही. ते सर्व रामा येथे गेले. तिथून त्यांनी बाशाची दगड, लाकूड वगैरे सर्व बांधकामसामग्री आणली. बन्यामीनमधील गिबा आणि मिस्पा येथे या सर्व वस्तू त्यांनी वाहून नेल्या. आसाने ही नगरे चांगली भक्कम केली.
于是亚撒王宣告犹大众人,不准一个推辞,吩咐他们将巴沙修筑拉玛所用的石头、木头都运去,用以修筑便雅悯的迦巴和米斯巴。
23 २३ आसाबद्दलच्या इतर गोष्टी, त्याचे पराक्रम, त्याने बांधलेली नगरे या सगळ्यांची माहिती यहूदाच्या राजांच्या इतिहास या पुस्तकात लिहिलेली आहे. म्हातारपणी आसा पायाच्या दुखण्याने बेजार झाला.
亚撒其余的事,凡他所行的,并他的勇力与他所建筑的城邑,都写在犹大列王记上。亚撒年老的时候,脚上有病。
24 २४ आसाचे निधन झाल्यावर त्याच्या पूर्वजांच्या दावीद याच्या नगरात त्याचे दफन झाले. त्यानंतर त्याचा पुत्र यहोशाफाट राज्य करु लागला.
亚撒与他列祖同睡,葬在他祖大卫城他列祖的坟地里。他儿子约沙法接续他作王。
25 २५ यहूदाचा राजा म्हणून आसाचे दुसरे वर्ष चालू असताना यराबामाचा पुत्र नादाब इस्राएलचा राजा झाला. त्याने इस्राएलवर दोन वर्षे राज्य केले.
犹大王亚撒第二年,耶罗波安的儿子拿答登基作以色列王共二年,
26 २६ नादाबने परमेश्वरविरोधी कृत्ये केली. आपले वडिल यराबाम यांच्यासारखीच दुष्कृत्ये केली यराबामाने इस्राएल लोकांसही पाप करायला लावले होते.
拿答行耶和华眼中看为恶的事,行他父亲所行的,犯他父亲使以色列人陷在罪里的那罪。
27 २७ बाशा हा अहीयाचा पुत्र. हे इस्साखाराच्या वंशातले. बाशाने नादाब राजाला मारायचा कट केला. नादाब आणि इस्राएल लोक गिब्बथोन या पलिष्ट्यांच्या नगराला वेढा घालत होते तेव्हाची ही गोष्ट आहे. बाशाने या ठिकाणी नादाबला ठार केले.
以萨迦人亚希雅的儿子巴沙背叛拿答,在非利士的基比顿杀了他。那时拿答和以色列众人正围困基比顿。
28 २८ आसाचे हे यहूदाचा राजा म्हणून तिसरे वर्ष होते. मग बाशा इस्राएलचा राजा झाला.
在犹大王亚撒第三年巴沙杀了他,篡了他的位。
29 २९ बाशा राजा झाल्यावर त्याने यराबामाच्या कुळातील सर्वांना ठार केले. कोणाचीही त्याने गय केली नाही. शिलोचा संदेष्टा अहीया यांच्यामार्फत परमेश्वराने जी भविष्यवाणी केली होती तसेच हे झाले.
巴沙一作王就杀了耶罗波安的全家,凡有气息的没有留下一个,都灭尽了,正应验耶和华借他仆人示罗人亚希雅所说的话。
30 ३० राजा यराबामाने बरीच पापे केली होती, तसेच इस्राएल लोकांसही ती करायला लावली म्हणून हे घडले. इस्राएलचा परमेश्वर देव याचा यराबामावर कोप झाला
这是因为耶罗波安所犯的罪使以色列人陷在罪里,惹动耶和华—以色列 神的怒气。
31 ३१ इस्राएलाच्या राजांचा इतिहास या पुस्तकात नादाबचे इतर पराक्रम नोंदलेले आहेत.
拿答其余的事,凡他所行的,都写在以色列诸王记上。
32 ३२ बाशा इस्राएलवर राज्य करत असताना यहूदाचा राजा आसा याच्याशी त्याचे सर्वकाळ युध्द चालले होते.
亚撒和以色列王巴沙在世的日子常常争战。
33 ३३ यहूदाचा राजा आसाच्या कारकिर्दीच्या तिसऱ्या वर्षी अहीयाचा पुत्र बाशा हा इस्राएलचा राजा झाला. तिरसामध्ये राहून त्याने चोवीस वर्षे राज्य केले.
犹大王亚撒第三年,亚希雅的儿子巴沙在得撒登基作以色列众人的王共二十四年。
34 ३४ पण परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले. आपले वडिल यराबाम यांनी केली तीच पातके बाशानेही केली. यराबामाने इस्राएल लोकांसही पापे करायला लावली होती.
他行耶和华眼中看为恶的事,行耶罗波安所行的道,犯他使以色列人陷在罪里的那罪。

< 1 राजे 15 >