< 1 राजे 13 >
1 १ परमेश्वराने आपल्या एका संदेष्ट्याला (देवाच्या मनुष्यास) यहूदाहून बेथेल नगरीला पाठवले. तो तेथे पोहोंचला तेव्हा राजा यराबाम वेदी पुढे धूप जाळत होता.
那时,有一个神人奉耶和华的命从犹大来到伯特利。耶罗波安正站在坛旁要烧香;
2 २ परमेश्वराने या संदेष्ट्याला वेदीविरुध्द बोलायची आज्ञा केली होती. त्याप्रमाणे तो म्हणाला, “हे वेदी, परमेश्वराचे म्हणणे असे आहे दाविदाच्या कुळात योशीया नावाचा पुत्र जन्माला येईल. हे याजक सध्या उंचवट्यावरील ठिकाणी पूजा करत आहेत. पण हे वेदी, योशीया त्यांचेच देह तुला अर्पण करील. योशीया त्या याजकांचा वध करील. आता ते तुझ्यावर धूप जाळत आहेत खरे पण योशीया, मानवी अस्थी तुझ्यावर जाळील. मग तू निरुपयोगी ठरशील.”
神人奉耶和华的命向坛呼叫,说:“坛哪,坛哪!耶和华如此说:大卫家里必生一个儿子,名叫约西亚,他必将邱坛的祭司,就是在你上面烧香的,杀在你上面,人的骨头也必烧在你上面。”
3 ३ हे निश्चित घडेल, अशी संदेष्ट्याने लोकांस खूण दिली. तो म्हणाला, “परमेश्वराने सांगितले त्याची ही साक्ष ही वेदी तडकेल आणि तिच्यावरची राख खाली ओघळेल, असे परमेश्वराने सांगितले आहे.”
当日,神人设个预兆,说:“这坛必破裂,坛上的灰必倾撒,这是耶和华说的预兆。”
4 ४ राजाने जेव्हा देवाच्या मनुष्याचे हे वेदीबद्दलचे बोलणे बेथेल येथे ऐकले. तेव्हा यराबामाने वेदीवरील आपला हात उचलून त्या मनुष्याकडे निर्देश करत म्हटले, “पकडा त्याला” मग ज्या हाताने त्याने त्या मनुष्याकडे निर्देश केला होता तो हे बोलत असताना लुळा पडला. त्यास तो हलवता येईना
耶罗波安王听见神人向伯特利的坛所呼叫的话,就从坛上伸手,说:“拿住他吧!”王向神人所伸的手就枯干了,不能弯回;
5 ५ तसेच, वेदी भंग पावली. त्यावरील राख जमिनीवर पडली. देवाच्या मनुष्याच्या तोंडून परमेश्वराचे वचन निघत होते याची ती खूण होती.
坛也破裂了,坛上的灰倾撒了,正如神人奉耶和华的命所设的预兆。
6 ६ तेव्हा राजा यराबाम त्या संदेष्ट्याला म्हणाला, “माझा हात बरा व्हावा म्हणून तू कृपया तुझ्या परमेश्वर देवाची प्रार्थना कर.” तेव्हा त्याने देवाजवळ तशी विनंती केली आणि राजाचा हात बरा झाला. राजाचा हात मग पूर्ववत झाला.
王对神人说:“请你为我祷告,求耶和华—你 神的恩典使我的手复原。”于是神人祈祷耶和华,王的手就复了原,仍如寻常一样。
7 ७ राजा त्या देवाच्या मनुष्यास म्हणाला, “माझ्याबरोबर घरी चल, काहीतरी खा मग मी तुला इनाम देईन.”
王对神人说:“请你同我回去吃饭,加添心力,我也必给你赏赐。”
8 ८ पण हा देवाचा मनुष्य म्हणाला, “अर्धे राज्य मला देऊ केलेस तरी मी तुझ्याबरोबर घरी येणार नाही. इथे मी अन्नपाणी घेणार नाही.
神人对王说:“你就是把你的宫一半给我,我也不同你进去,也不在这地方吃饭喝水;
9 ९ काहीही न खाण्यापिण्याबद्दल परमेश्वराने मला बजावले आहे. तसेच, येताना ज्या रस्त्याने आलो त्याने परत जायचे नाही, अशीही त्याची आज्ञा आहे.”
因为有耶和华的话嘱咐我,说不可在伯特利吃饭喝水,也不可从你去的原路回来。”
10 १० त्याप्रमाणे तो वेगळ्या रस्त्याला लागला. बेथेलला येताना, ज्या रस्त्याने आला त्याने तो गेला नाही.
于是神人从别的路回去,不从伯特利来的原路回去。
11 ११ बेथेल नगरात एक वृध्द देवाचा मनुष्य राहत होता. त्याच्या मुलांनी त्यास या संदेष्ट्याने बेथेल मध्ये काय केले ते येऊन सांगितले. राजाला तो संदेष्टा काय म्हणाला तेही त्यांनी सांगितले.
有一个老先知住在伯特利,他儿子们来,将神人当日在伯特利所行的一切事和向王所说的话都告诉了父亲。
12 १२ तेव्हा देवाचा मनुष्य म्हणाला, “कोणत्या रस्त्याने तो परतला?” तेव्हा मुलांनी आपल्या वडिलांना यहूदाच्या संदेष्ट्याचा मार्ग दाखवला.
父亲问他们说:“神人从哪条路去了呢?”儿子们就告诉他;原来他们看见那从犹大来的神人所去的路。
13 १३ त्या वृध्द संदेष्ट्याने “मुलांना गाढवावर खोगीर चढवायला सांगितले.” त्याप्रमाणे त्यांनी केल्यावर संदेष्टा गाढवावरुन निघाला.
老先知就吩咐他儿子们说:“你们为我备驴。”他们备好了驴,他就骑上,
14 १४ हा वृध्द संदेष्टा त्या देवाच्या माणासाच्या मागावर निघाला. तेव्हा तो एला वृक्षाखाली बसलेला आढळला. वृध्द संदेष्ट्याने त्यास विचारले, “तूच का तो यहूदाहून आलेला देवाचा मनुष्य?” संदेष्ट्याने यावर होकार दिला.
去追赶神人,遇见他坐在橡树底下,就问他说:“你是从犹大来的神人不是?”他说:“是。”
15 १५ तेव्हा वृध्द संदेष्टा म्हणाला, “माझ्याबरोबर घरी चल आमच्याकडे जेव.”
老先知对他说:“请你同我回家吃饭。”
16 १६ पण हा देवाचा मनुष्य म्हणाला, “तुझ्याबरोबर मी येऊ शकणार नाही. तसेच तेथे खाऊपिऊ शकणार नाही.
神人说:“我不可同你回去进你的家,也不可在这里同你吃饭喝水;
17 १७ तेथे काही खायचे प्यायचे नाही आणि गेलास त्या रस्त्याने परतायचे नाही असे परमेश्वराने मला सांगितले आहे.”
因为有耶和华的话嘱咐我说:‘你在那里不可吃饭喝水,也不可从你去的原路回来。’”
18 १८ यावर तो वृध्द संदेष्टा म्हणाला, “मीही तुझ्याप्रमाणेच एक संदेष्टा आहे.” आणि पुढे त्याने खोटे सांगितले, “मला नुकतेच परमेश्वराच्या दूताचे दर्शन झाले. त्याने तुला माझ्या घरी घेऊन यायला आणि खाऊपिऊ घालायला मला सांगितले आहे.”
老先知对他说:“我也是先知,和你一样。有天使奉耶和华的命对我说:‘你去把他带回你的家,叫他吃饭喝水。’”这都是老先知诓哄他。
19 १९ तेव्हा तो देवाचा मनुष्य वृध्द संदेष्ट्याच्या घरी गेला आणि तेथे त्याने जेवणखाण केले.
于是神人同老先知回去,在他家里吃饭喝水。
20 २० ते मेजावर बसलेले त्यास परत आणणाऱ्या संदेष्ट्याशी परमेश्वर बोलला.
二人坐席的时候,耶和华的话临到那带神人回来的先知,
21 २१ वृध्द संदेष्टा या यहूदातील देवाच्या मनुष्यास म्हणाला, “तू परमेश्वराच्या आज्ञेचे उल्लंघन केले आहेस, असे परमेश्वर म्हणाला, तू त्याच्या आज्ञेप्रमाणे वागला नाहीस.
他就对那从犹大来的神人说:“耶和华如此说:你既违背耶和华的话,不遵守耶和华—你 神的命令,
22 २२ येथे काहीही खायला प्यायला परमेश्वराने तुला सक्त, मनाई केली होती. तरी तू इथे आलास आणि जेवलास. तेव्हा तुझे आता तुझ्या कुटुंबियाबरोबर दफन होणार नाही.”
反倒回来,在耶和华禁止你吃饭喝水的地方吃了喝了,因此你的尸身不得入你列祖的坟墓。”
23 २३ या देवाच्या माणासाचे खाणेपिणे झाल्यावर वृध्द संदेष्ट्याने त्याच्या गाढवावर खोगीर घातले आणि हा यहूदाचा संदेष्टा (देवाचा मनुष्य) निघाला.
吃喝完了,老先知为所带回来的先知备驴。
24 २४ परतीच्या वाटेवर एका सिंहाने त्याच्यावर हल्ला चढवला आणि त्यास मारुन टाकले. देवाच्या मनुष्याचा मृतदेह रस्त्यातच पडला होता. गाढव आणि सिंह त्याच्या प्रेताशेजारीच होते.
他就去了,在路上有个狮子遇见他,将他咬死,尸身倒在路上,驴站在尸身旁边,狮子也站在尸身旁边。
25 २५ इतर वाटसंरुनी ते प्रेत आणि जवळ उभा राहिलेला सिंह हे पाहिले. तेव्हा ती माणसे गावात आली आणि त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलेली ही घटना वृध्द संदेष्ट्याला सांगितली.
有人从那里经过,看见尸身倒在路上,狮子站在尸身旁边,就来到老先知所住的城里述说这事。
26 २६ वृध्द संदेष्ट्याने या देवाच्या मनुष्यास फसवून आणले होते. तेव्हा हे सर्व ऐकून तो म्हणाला, “असा हा देवाचा मनुष्य. त्याने परमेश्वराचे म्हणणे अवमानले नाही. तेव्हा परमेश्वरानेच त्यास मारायला सिंहाच्या स्वाधीन केले असावे. असे होणार हे परमेश्वराने सांगितले होते.”
那带神人回来的先知听见这事,就说:“这是那违背了耶和华命令的神人,所以耶和华把他交给狮子;狮子抓伤他,咬死他,是应验耶和华对他说的话。”
27 २७ मग हा संदेष्टा आपल्या मुलांना म्हणाला, “माझ्या गाढवावर खोगीर घाला.” मुलांनी त्याचे ऐकले.
老先知就吩咐他儿子们说:“你们为我备驴。”他们就备了驴。
28 २८ तेव्हा तो निघाला आणि वाटेवरच्या मृतदेहापाशी आला. सिंह आणि गाढव अजूनही तिथेच होते. सिंहाने आपल्या भक्ष्याला तोंड लावले नव्हते की गाढवाला इजा केली नव्हती.
他去了,看见神人的尸身倒在路上,驴和狮子站在尸身旁边,狮子却没有吃尸身,也没有抓伤驴。
29 २९ वृध्द देवाच्या संदेष्ट्याने तो मृतदेह गाढवावर ठेवला आणि मृत्यूबद्दल शोक करायला आणि देहाचे दफन करायला तो गावात आणला.
老先知就把神人的尸身驮在驴上,带回自己的城里,要哀哭他,葬埋他;
30 ३० त्याने तो आपल्याच घराण्याच्या दफनभूमीत पुरला. त्याच्यासाठी शोक प्रकट केला. तो म्हणाला, “माझ्या भावासारखाच तू मला होतास. मला फार वाईट वाटते.”
就把他的尸身葬在自己的坟墓里,哀哭他,说:“哀哉!我兄啊。”
31 ३१ मग त्याने त्याचे दफन केले. आपल्या मुलांना तो म्हणाला, “मी मरण पावल्यावर माझेही याच ठिकाणी दफन करा. माझ्या अस्थी देवाच्या मनुष्या शेजारीच विसावू द्या.
安葬之后,老先知对他儿子们说:“我死了,你们要葬我在神人的坟墓里,使我的尸骨靠近他的尸骨,
32 ३२ परमेश्वराने त्याच्या तोंडून वदवलेले सर्व प्रत्यक्षात येईल. बेथेलची वेदी आणि शोमरोनच्या नगरातील उंच देवळांबद्दल त्याने सांगितलेले खरे होईल.”
因为他奉耶和华的命指着伯特利的坛和撒马利亚各城有邱坛之殿所说的话必定应验。”
33 ३३ राजा यराबामामध्ये काहीही फरक पडला नाही. तो दुष्कृत्ये करतच राहिला. वेगवेगळ्या कुळांमधल्या मनुष्यांची तो याजक म्हणून निवड करत राहिला. हे पूरोहित उंच देवळांमध्ये पूजा करत. ज्याला हवे त्यास याजक बनता येई.
这事以后,耶罗波安仍不离开他的恶道,将凡民立为邱坛的祭司;凡愿意的,他都分别为圣,立为邱坛的祭司。
34 ३४ या गोष्टीने यराबामाच्या घराण्यास पाप लागले व त्यामुळे त्यांचा सर्वनाश झाला. आणि भूतलावरून ते नष्ट झाले.
这事叫耶罗波安的家陷在罪里,甚至他的家从地上除灭了。