< 1 राजे 12 >
1 १ रहबाम शखेम येथे गेला कारण त्यास राजा करण्यास सर्व इस्राएल लोक तेथे गेले होते.
爰にレハベアム、シケムに往り其はイスラエル皆彼を王と爲んとてシケムに至りたればなり
2 २ शलमोन राजाकडून पळाल्यावर नबाटाचा पुत्र यराबाम मिसरमध्ये जाऊन राहीला होता, त्याने हे ऐकले,
ネバテの子ヤラベアム尚エジブトに在て聞りヤラベアムはソロモン王の面をさけて逃さりエジプトに住居たるなり
3 ३ लोकांनी त्यास बोलावून आणले, तेव्हा यराबाम व सर्व इस्राएल लोक रहबामाकडे येऊन त्यास म्हणाले,
時に人衆人を遣はして彼を招けり斯てヤラベアムとイスラエルの會衆皆來りてレハベアムに告て言けるは
4 ४ “तुझ्या वडिलांनी कामाच्या ओझ्याखाली आम्हास भरडून काढले. आता आमचे ओझे थोडे हलके कर. आमच्यावर लादलेले मेहनतीचे जू काढ म्हणजे आम्ही तुझी सेवा करु.”
汝の父我儕の軛を難くせり然ども爾今爾の父の難き役と爾の父の我儕に蒙らせたる重き軛を軽くせよ然ば我儕爾に事へん
5 ५ रहबाम म्हणाला, “तीन दिवसानंतर मला भेटा. तेव्हा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देईन.” मग लोक निघून गेले.
レハベアム彼等に言けるは去て三日を經て再び我に來れと民乃ち去り
6 ६ शलमोन ज्यांच्याशी सल्लामसलत करत असे अशी काही वृध्द मंडळी होती. त्यांनाच राजा रहबामाने याबाबतीत सल्ला विचारला. तो म्हणाला, “या लोकांस मी काय सांगू?”
レハベアム王其父ソロモンの生る間其前に立たる老人等と計りていひけるは爾等如何に敎へて此民に答へしむるや
7 ७ यावर ही वयोवृध्द मंडळी म्हणाली, “तू आज यांचा सेवक बनलास तर तेही तुझी सेवा करतील. त्यांच्याशी प्रेमाने, समजुतीने बोललास तर तेही आयुष्यभर तुझे काम करतील.”
彼等レハベアムに告て言けるは爾若今日此民の僕となり之に事へて之に答へ善き言を之に語らば彼等永く爾の僕となるべしと
8 ८ पण रहबामाने हा सल्ला मानला नाही. आपल्या समवयस्क मित्रांना त्यांचे मत विचारले.
然に彼老人の敎へし敎を棄て自己と倶に生長て己のまへに立つ少年等と計れり
9 ९ रहबाम त्यांना म्हणाला, माझ्या वडिलांच्या कारकिर्दीतल्यापेक्षा “या लोकांस कामाचे जू हलके करून हवे आहे. त्यांना आता मी काय सांगू, त्यांच्याशी काय बोलू?”
即ち彼等に言けるは爾等何を敎へて我儕をして此我に告て爾の父の我儕に蒙むらせし軛を軽くせよと言ふ民に答へしむるやと
10 १० तेव्हा ते तरुण मित्र म्हणाले, “ते लोक येऊन असे म्हणत आहेत, ‘तुझ्या वडिलांनी आमच्याकडून बेदम कष्ट करवून घेतले, तर आता आमचे जू हलके करा.’ तर तू त्यांना बढाई मारुन सांग, ‘माझ्या वडिलांच्या कंबरेपेक्षा ही माझी करंगळी जास्त मोठी आहे.
彼と偕に生長たる少年彼に告ていひけるは爾に告て爾の父我儕の軛を重くしたれど爾これを我儕のために軽くせよと言たる此民に爾斯言ベし我が小指はわが父の腰よりも太し
11 ११ माझ्या वडिलांनी तुम्हावर भारी जू लादले. मी ते काम आणखी वाढवीन. त्यांनी तुम्हास चाबकाचे फटकारे मारले असतील तर मी तर तुम्हास विंचवानी शिक्षा करीन.”
またわが父爾等に重き軛を負せたりしが我は更に爾等の軛を重くせん我父は鞭にて爾等を懲したれども我は蠍をもて爾等を懲んと爾斯彼等に告べしと
12 १२ रहबाम राजाने त्या लोकांस “तीन दिवसानी यायला” सांगितले होते. त्याप्रमाणे यराबाम व सर्व इस्राएल लोक तीन दिवसानी रहबामाकडे आले.
ヤラベアムと民皆王の告て第三日に再び我に來れと言しごとく第三日にレハベアムに詣りしに
13 १३ त्यावेळी राजा रहबाम त्यांच्याशी अतिशय कठोरपणे बोलला. वडिलधाऱ्यांच्या सल्ल्याकडे त्याने दुर्लक्ष केले.
王荒々しく民に答へ老人の敎へし敎を棄て
14 १४ मित्रांच्या सल्ल्याप्रमाणे तो बोलला. तो म्हणाला, “माझ्या वडिलांनी तुमच्यावर कष्टाचे जू लादले. मी तर तुम्हास आणखीच कामाला लावीन. त्यांनी तुमच्यावर आसूड उगवले, पण ती तर तुम्हास विंचवानी शिक्षा करील.”
少年の敎の如く彼等に告て言けるは我父は爾等の軛を重くしたりしが我は更に爾等の軛を重くせん我父は鞭を以て爾等を懲したれども我は蠍をもて爾等を懲さんと
15 १५ या प्रकारे राजाने इस्राएल लोकांचे ऐकले नव्हते. परमेश्वरानेच हे घडवून आणले होते. नबाटाचा पुत्र यराबाम याला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी परमेश्वराने हे केले. शिलो येथील संदेष्टा अहीया याच्यामार्फत परमेश्वराने हे वचन दिले.
王斯民に聽ざりき此事はヱホバより出たる者なり是はヱホバその甞てシロ人アヒヤに由てネバテの子ヤラベアムに告し言をおこなはんとて爲たまへるなり
16 १६ नवा राजा आपले म्हणणे मानत नाही, हे इस्राएली लोकांच्या लक्षात आले. तेव्हा ते राजाला म्हणाले, “आम्ही दाविदाच्या घराण्यातील थोडेच आहोत. काय? नाही! इशायच्या जमिनीत आम्हास थोडाच वाटा मिळणार आहे काय? नाही! तेव्हा इस्राएलींनो, जा आपापल्या घरी तंबूकडे जा, या दाविदाच्या मुलाला आपल्या घराण्यापुरतेच राज्य करू दे.” एवढे बोलून ते निघून गेले.
かくイスラエル皆王の己に聽ざるを見たり是において民王に答へて言けるは我儕ダビデの中に何の分あらんやヱサイの子の中に產業なしイスラエルよ爾等の天幕に歸れダビデよ今爾の家を視よと而してイスラエルは其天幕に去りゆけり
17 १७ तरीही यहूदा नगरांमध्ये राहणाऱ्या इस्राएल लोकांवर रहबामाची सत्ता होतीच.
然どもユダの諸邑に住るイスラエルの子孫の上にはレハベアム其王となれり
18 १८ अदोराम नावाचा एक मनुष्य सर्व कामगारांवर देखरेख करत असे. तेव्हा राजा रहबामाने त्यास लोकांशी बोलणी करायला पाठवले. पण इस्राएल लोकांनी त्याच्यावर इतकी दगडफेक केली की तो प्राणाला मुकला. तेव्हा राजाने आपल्या रथात बसून पळ काढला आणि तो यरूशलेम येथे आला.
レハベアム王徴募頭なるアドラムを遣はしけるにイスラエル皆石にて彼を撃て死しめたればレハベアム王急ぎて其車に登りエルサレムに逃たり
19 १९ इस्राएल लोकांनी दाविदाच्या घराण्याविरुध्द बंड पुकारले. आजही त्या घराण्याशी त्यांचे वैर आहे.
斯イスラエル、ダビデの家に背きて今日にいたる
20 २० यराबाम परत आला आहे असे इस्राएल लोकांस कळले. तेव्हा त्यांनी सगळ्यांची सभा भरवून त्यास सर्व इस्राएलचा राजा म्हणून घोषित केले. फक्त एका यहूदाच्या घराण्याने तेवढा दाविदाच्या घराण्याला आपला पठिंबा दिला.
爰にイスラエル皆ヤラベアムの歸りしを聞て人を遣して彼を集會に招き彼をイスラエルの全家の上に王と爲りユダの支派の外はダビデの家に從ふ者なし
21 २१ रहबाम यरूशलेमेला परतला. यहूदा आणि बन्यामीन यांच्या वंशातील सर्वांना त्याने एकत्र केले. एकंदर एक लक्ष ऐंशी हजाराचे सैन्य जमले. इस्राएल लोकांशी लढून शलमोनाचे राज्य परत मिळवायचा रहबामाचा विचार होता.
ソロモンの子レハベアム、エルサレムに至りてユダの全家とベニヤミンの支派の者即ち壯年の武夫十八萬を集む斯してレハベアム國を己に皈さんがためにイスラエルの家と戰はんとせしが
22 २२ शमाया नामक देवाच्या मनुष्याशी या सुमारास परमेश्वर बोलला. तो म्हणाला,
神の言神の人シマヤに臨みて曰く
23 २३ “शलमोनाचा पुत्र आणि यहूदाचा राजा रहबाम, तसेच यहूदा आणि बन्यामीन लोक यांना जाऊन सांग,
ソロモンの子ユダの王レハベアムおよびユダとベニヤミンの全家並に其餘の民に告て言べし
24 २४ इस्राएलांनी आपल्या बांधवांशी तुम्ही लढू नये अशी परमेश्वराची इच्छा आहे.” प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी परत जा. या सगळ्यांचा करता करविता मीच होतो. या आदेशानुसार रहबामाचे सैन्य माघारी गेले.
ヱホバ斯言ふ爾等上るべからず爾等の兄弟なるイスラエルの子孫と戰ふべからず各人其家に歸れ此事は我より出たるなりと彼等ヱホバの言を聽きヱホバの言に循ひて轉り去りぬ
25 २५ शखेम हे एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशातील नगर होते. ते चांगले मजबूत आणि सुरक्षित करून यराबाम तेथे राहिला. पुढे त्याने पनुएल नगराची उभारणी केली.
ヤラベアムはエフライムの山地にシケムを建て其處に住み又其所より出てペヌエルを建たり
26 २६ यराबाम मनाशीच म्हणाला, “हे राज्य दाविदाच्या घराण्याकडे जाण्याचा संभव आहे.
爰にヤラベアム其心に謂けるは國は今ダビデの家に歸らん
27 २७ लोक यरूशलेमेस परमेश्वराच्या घराकडे यज्ञ करावयास गेले तर यहूदाचा राजा रहबाम याच्याच मागे ते जातील मग ते माझा वध करतील व पुन्हा यहूदाचा राजा रहबाम याचे पुन्हा: होतील.”
若此民エルサレムにあるヱホバの家に禮物を献げんとて上らば此民の心ユダの王なる其主レハベアムに歸りて我を殺しユダの王レハベアムに歸らんと
28 २८ त्याने मग आपल्या सल्लागाराबरोबर विचार विनिमय केला. “त्यांनी त्यास एक तोड सुचवली. त्यानुसार राजा यराबामाने सोन्याची दोन वासरे करवून घेतली. मग तो लोकांस म्हणाला, तुम्हास यरूशलेमेला उपासनेसाठी जायची गरज नाही. हे इस्राएला तुम्हास मिसर देशाबाहेर ज्यांनी काढले तेच हे देव.”
是に於て王計議て二の金の犢を造り人々に言けるは爾らのエルサレムに上ること旣に足りイスラエルよ爾をエジブトの地より導き上りし汝の神を視よと
29 २९ राजाने मग एक सोन्याचे वासरु बेथेल येथे आणि दुसरे दान या शहरात बसवले.
而して彼一をベテルに安ゑ一をダンに置り
30 ३० पण त्याने हे मोठे पाप केले होते. इसाएलाचे लोक बेथेल आणि दान येथे वासरांच्या पूजेसाठी जाऊ लागले. पण हेही मोठेच पाप होते.
此事罪となれりそは民ダンに迄往て其一の前に詣たればなり
31 ३१ उंचवट्याच्या ठिकाणीही यराबामाने देऊळे बांधली. त्यासाठी याजकही त्याने फक्त लेवी वंशातले न निवडता इस्राएलाच्या वेगवेगळ्या वंशांमधून निवडले.
彼又崇邱の家を建てレビの子孫にあらざる凡民を祭司となせり
32 ३२ याखेरीज त्याने एक नवा सणही सुरु केला. यहूदामधील वल्हांडणाच्या सणासारखाच हा होता. पण पहिल्या महिन्याच्या पंधराव्या दिवसाऐवजी हा आठव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी यराबामाने ठेवला. या दिवशी हा राजा बेथेल नगरातील वेदीवर यज्ञ करत असे. तसेच त्याने केलेल्या वासरांना बली अर्पण करत असे. त्याने उंच ठिकाणी बांधलेल्या देवाळांसाठी बेथेल मधले याजकही नेमले.
ヤラベアム八月に節期を定めたり即ち其月の十五日なりユダにある節期に等し而して壇の上に上りたりベテルにて彼斯爲し其作りたる犢に禮物を献げたり又彼其造りたる崇邱の祭司をベテルに立たり
33 ३३ अशाप्रकारे यराबामाने इस्राएल लोकांसाठी आठव्या महिन्याचा पंधरावा दिवस सण म्हणून ठरवला. त्यादिवशी बेथेलच्या वेदीवर तो यज्ञ करत असे आणि धूप जाळत असे.
かく彼其ベテルに造れる壇の上に八月の十五日に上れり是は彼が己の心より造り出したる月なり而してイスラエルの人々のために節期を定め壇の上にのぼりて香を焚り