< १ योहा. 5 >

1 येशू हा ख्रिस्त आहे, असा जो कोणी विश्वास धरतो तो देवापासून जन्मलेला आहे आणि जो कोणी जन्म देणाऱ्यावर प्रीती करतो. तो त्याच्यापासून जन्मलेल्यावरही प्रीती करतो.
Todos os que creem que Jesus é o Messias são filhos de Deus, e quem ama o Pai também ama o seu Filho.
2 देवावर प्रीती करण्याने व त्याच्या आज्ञा पाळण्याने आम्ही ओळखतो की आम्ही देवाच्या मुलांवर प्रीती करतो.
E como sabemos que amamos os filhos de Deus? Sabemos quando amamos a Deus e seguimos os seus mandamentos.
3 देवावर प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञापालन करणे आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत.
Amar a Deus significa que cumprimos os seus mandamentos, e seus mandamentos não são difíceis de serem obedecidos.
4 कारण प्रत्येकजण जो देवापासून जन्मला आहे तो जगावर विजय मिळवतो आणि ज्याने जगावर जय मिळवला तो म्हणजे आपला विश्वास.
Todos os que são filhos de Deus podem vencer o mundo. A vitória sobre o mundo nós a conseguimos por causa da nossa fé em Deus.
5 येशू हा देवाचा पुत्र आहे असा विश्वास धरणाऱ्याशिवाय जगावर विजय मिळविणारा कोण आहे?
E quem pode vencer o mundo? Apenas aqueles que têm fé em Jesus, crendo que ele é o Filho de Deus.
6 जो आमच्याकडे पाणी व रक्त यांच्यासह आला तो हाच म्हणजे येशू ख्रिस्त; केवळ पाण्याद्वारेच नाही तर पाणी आणि रक्ताद्वारे आला.
Jesus Cristo é aquele que veio por meio da água e do sangue. Ele não veio apenas por meio da água, mas por meio da água e do sangue. O Espírito dá provas que confirmam isso, pois o Espírito é a verdade.
7 आत्मा हा साक्ष देणारा आहे कारण आत्मा सत्य आहे.
Assim, há três testemunhas:
8 साक्ष देणारे तीन साक्षीदार आहेत. आत्मा, पाणी आणि रक्त, या तिघांची एकच साक्ष आहे.
o Espírito, a água e o sangue, e todos os três concordam entre si.
9 जर आम्ही मनुष्यांनी दिलेली साक्ष स्वीकारतो, तर देवाने दिलेली साक्ष त्यांच्या साक्षीहून अधिक महान आहे. देवाने आपणास दिलेली साक्ष ही त्याच्या पुत्राविषयीची आहे.
Se aceitamos a prova que testemunhas humanas fornecem, então, a prova que Deus nos dá é muito mais importante. A prova que vem de Deus é o seu testemunho sobre o seu Filho.
10 १० जो कोणी देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याच्या स्वतःमध्ये ही साक्ष आहे. जो देवाच्या साक्षीवर विश्वास ठेवत नाही, त्याने देवाला लबाड ठरवले आहे कारण देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राबाबत दिलेल्या साक्षीवर त्याने विश्वास ठेवला नाही.
Aqueles que creem no Filho de Deus aceitaram essa prova e se apegaram a ela. Mas aqueles que não creem em Deus fazem dele um mentiroso, pois eles não acreditam na prova que Deus nos deu sobre o seu Filho.
11 ११ आणि देवाची जी साक्ष आहे तीही आहे की, देवाने आपल्याला सार्वकालिक जीवन दिले आहे आणि हे जीवन त्याच्या पुत्राच्या ठायी आहे. (aiōnios g166)
A prova é esta: Deus nos deu a vida eterna e temos essa vida por meio do seu Filho. (aiōnios g166)
12 १२ ज्याच्याजवळ पुत्र आहे त्यास जीवन आहे पण ज्याच्याजवळ पुत्र नाही त्यास जीवन नाही.
Quem tem o Filho tem a vida. Quem não tem o Filho de Deus não tem a vida.
13 १३ जे देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवतात त्यांना मी या गोष्टी लिहीत आहे, यासाठी की, तुम्हास सार्वकालिक जीवन लाभले आहे, याविषयी तुम्हास कळावे. (aiōnios g166)
Eu estou escrevendo para garantir aos que creem no nome do Filho de Deus que vocês terão a vida eterna. (aiōnios g166)
14 १४ आणि आम्हास देवामध्ये धैर्य आहे की, आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकेल.
Nós podemos confiar que ele nos escutará, desde que façamos os nossos pedidos de acordo com a sua vontade.
15 १५ आणि आपण जे काही मागतो ते तो ऐकतो, हे आपल्याला ठाऊक आहे म्हणून ज्या मागण्या आपण त्याच्याजवळ केल्या आहेत त्या आपल्याला मिळाल्या आहेत हेही आपल्याला ठाऊक आहे.
E sabendo que ele ouve os nossos pedidos, podemos ter certeza de que receberemos o que lhe pedirmos.
16 १६ जर एखाद्याला त्याचा बंधू पापात पडलेला दिसला आणि त्याचा परिणाम मरण नसेल तर त्याने त्याच्याकरता प्रार्थना करावी आणि देव त्यास जीवन देईल. ज्याचा परिणाम मरण नाही असे पाप करणार्‍यास ते देईल. ज्याचा परिणाम मरण आहे असेही पाप आहे आणि त्यासाठी त्याने विनंती करावी असे मी म्हणत नाही.
Se vocês virem um irmão ou uma irmã cristãos cometendo um pecado que não traz a morte, vocês devem orar e Deus dará a vida para aquele que pecou. A não ser que seja pecado que traga a morte. Há pecado que traz morte, e eu não estou dizendo que as pessoas deveriam orar por esse pecado.
17 १७ सर्व अनीती हे पाप आहे, पण असेही पाप आहे ज्याचा परिणाम मरण नाही.
Sim, tudo o que não é justo é pecado, mas há pecados que não trazem a morte.
18 १८ आम्ही जाणतो की, जो कोणी देवाचे मूल झाला आहे तो पाप करीत राहत नाही. जो देवापासून जन्मला आहे. देव स्वतः त्याचे संरक्षण करतो आणि सैतान त्यास हात लावू शकत नाही.
Nós sabemos que aqueles que nasceram de Deus não vivem pecando; pois o Filho de Deus os protege e o diabo não pode lhes fazer mal.
19 १९ आम्हास माहीत आहे की आम्ही देवाचे आहोत आणि संपूर्ण जग हे त्या वाईटाच्या नियंत्रणाखाली आहे.
Nós sabemos que pertencemos a Deus e que o mundo está sob o domínio do maligno.
20 २० पण आम्हास माहीत आहे की देवाचा पुत्र आला आहे व त्याने आम्हास समजबुद्धी दिलेली आहे, यासाठी की, जो खरा आहे त्यास आम्ही ओळखावे आणि जो खरा आहे त्याच्याठायी म्हणजे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याठायी, आपण आहोत. हाच खरा देव आहे आणि तो सार्वकालिक जीवन आहे. (aiōnios g166)
Também sabemos que o Filho de Deus veio e nos deu entendimento para que possamos reconhecer aquele que é verdadeiro. Nós vivemos unidos ao Deus verdadeiro e unidos também ao seu Filho Jesus Cristo. Ele é o Deus verdadeiro e a vida eterna. (aiōnios g166)
21 २१ माझ्या मुलांनो, स्वतःला मूर्तीपूजेपासून दूर राखा.
Meus filhinhos, afastem-se da adoração aos ídolos!

< १ योहा. 5 >