< १ योहा. 3 >
1 १ आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले ह्यात देव पित्याने आपल्याला केवढे प्रीतीदान दिले आहे पाहा आणि आपण तसे आहोत ह्यामुळे जग आपल्याला ओळखीत नाही कारण त्यांनी त्यास ओळखले नाही.
Consider how great a love the Father has bestowed on us that we should be called children of God! The world does not acknowledge us for this reason: it did not acknowledge Him.
2 २ प्रियांनो, आता आम्ही देवाची मुले आहोत आणि भविष्यकाळात आम्ही कसे असू हे आम्हास माहीत नाही. तरीही आम्हास माहीत आहे की, जेव्हा ख्रिस्त पुन्हा येईल, तेव्हा आम्ही त्याच्यासारखे असू, कारण तो जसा आहे तसे आम्ही त्यास पाहू.
Dear ones, right now we are children of God and it has not yet been revealed what we shall be, but we know that when He is revealed we will be like Him, because we will see Him just as He is
3 ३ आणि ज्या प्रत्येकाने ही आशा ख्रिस्तावर ठेवली आहे, जसा ख्रिस्त शुद्ध आहे, तसा तो आपणाला शुद्ध करतो.
—everyone who has this hope upon him purifies himself, even as He is pure.
4 ४ प्रत्येकजण जो पाप करतो तो नियमशास्त्राचे उल्लंघन करतो कारण पाप हे नियमशास्त्राचे उल्लंघन आहे.
Everyone who commits sin commits lawlessness as well; yes, sin is lawlessness.
5 ५ तुम्हास माहीत आहे की, पापे हरण करण्यासाठी तो प्रकट झाला; त्याच्याठायी पाप नाही.
And you know that He was revealed in order to remove our sins—in Him there is no sin.
6 ६ जो कोणी त्याच्याठायी राहतो तो पाप करीत नाही. जो कोणी पाप करीतो त्याने त्यास पाहिले नाही आणि त्यास ओळखलेही नाही.
Whoever is abiding in Him does not sin; indeed, whoever is sinning has neither seen Him nor known Him.
7 ७ प्रिय मुलांनो, तुम्हास कोणी फसवू नये. तो जसा नीतिमान आहे तसा ख्रिस्त नीतीने चालणाराही न्यायसंपन्न आहे.
Dear children, let no one mislead you; he who keeps doing righteousness is righteous, just as He is righteous.
8 ८ जो पाप करतो तो सैतानाचा आहे कारण सैतान आरंभापासून पाप करीत आहे आणि सैतानाची कामे नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रकट झाला.
He who keeps doing sin is of the devil, because the devil has been sinning from the beginning. The Son of God was manifested for this purpose: to undo the devil's works.
9 ९ जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करीत नाही कारण त्याचे बीज त्यांच्यामध्ये राहते. त्यामुळे तो पापात राहू शकत नाही कारण तो देवापासून जन्मला आहे.
Whoever has been begotten by God does not commit sin, because His seed remains in him; actually, he is not able to sin, because he has been begotten by God.
10 १० ह्यावरून देवाची मुले व जी सैतानाची मुले उघड दिसून येतात. जो कोणी नीतिमत्त्वाने वागत नाही तो देवाचा नाही व जो आपल्या भावावर प्रीती करीत नाही तोही नाही.
In this the children of God and the children of the devil are distinguished: whoever is not doing righteousness is not of God, also whoever is not loving his brother.
11 ११ आपण एकमेकांवर प्रीती करावी, हा संदेश आपण आरंभापासून ऐकला तो हाच आहे.
Because this is the message that you heard from the beginning, that we should love one another
12 १२ काईन त्या दुष्टाचा होता व त्याने आपल्या भावाचा वध केला त्याच्यासारखे आपण नसावे. त्याने त्याचा वध कशासाठी केला? कारण काइनाची कृत्ये दुष्ट होती आणि तर त्याच्या भावाची कृत्ये न्यायी होती.
—not like Cain, who was of the evil one and murdered his brother. And why did he murder him? Because his own works were evil, while those of his brother were righteous.
13 १३ बंधूनो, जर जग तुमचा द्वेष करते तर त्याचे आश्चर्य मानू नका.
My brothers, do not be surprised if the world hates you.
14 १४ आपल्याला माहीत आहे की, आपण मरणातून जीवनात गेलो आहोत कारण आपण आपल्या बंधूवर प्रीती करतो. जो प्रीती करत नाही तो मरणात राहतो.
We know that we have transferred out of the death into the life because we love our brothers; he who does not love his brother remains in the death.
15 १५ जो कोणी आपल्या भावाचा द्वेष करतो, तो खुनी आहे आणि तुम्हास माहीत आहे की, खुनी मनुष्याच्या ठायी सार्वकालिक जीवन राहत नाही. (aiōnios )
Whoever is hating his brother is a murderer, and you know that no murderer has eternal life abiding within himself. (aiōnios )
16 १६ ख्रिस्ताने आपल्यासाठी स्वतःचा जीव दिला. यामुळे प्रीती काय आहे ते आपल्याला समजते. म्हणून आपणदेखील आपल्या भावासाठी जीव दिला पाहिजे.
We know the Love by this: He laid down His life in our behalf; we also are obligated to lay down our lives in behalf of our brothers.
17 १७ जर कोणाजवळ जगिक संपत्ती आहे आणि त्याचा भाऊ गरजवंत आहे हे पाहूनही त्याच्यावर दया करीत नाही तर त्याच्यामध्ये देवाची प्रीती राहते कसे म्हणू शकतो?
Now whoever has this world's goods and sees his brother in need, yet closes his heart toward him—how does the love of God abide in him?
18 १८ प्रिय मुलांनो, आपण शब्दाने किंवा जीभेने नव्हे, तर कृतीने व खरेपणाने प्रीती करावी.
My dear children, let us not love in word or with the tongue only, but in deed and truth
19 १९ यावरुन आपण ओळखू की आपण सत्याचे आहोत व त्याच्यासमोर आपल्या अंतःकरणाला धैर्य देऊ,
—yes, by this we know that we are of the Truth and may put our hearts at ease in His presence,
20 २० कारण जर आपले अंतःकरण आपल्याला दोषी ठरवते, तर आपल्या अंतःकरणापेक्षा देव थोर आहे आणि तो सर्वकाही जाणतो.
and that, if our heart should condemn us, God is greater than our heart and knows all.
21 २१ प्रिय मित्रांनो, वाईट करण्याबद्दल जर आमची अंतःकरणे आम्हास दोष देत नाहीत तर देवाकडे जाण्यासाठी आम्हास धैर्य आहे.
Dear ones, if our heart does not condemn us, we have confidence toward God,
22 २२ आणि आपण जे काही मागतो ते त्याच्यापासून आपल्याला मिळते कारण आपण त्याच्या आज्ञा पाळतो आणि त्यास जे आवडते ते करतो.
and whatever we may ask we receive from Him, because we keep His commandments and do the things that are pleasing in His sight.
23 २३ तो आम्हास अशी आज्ञा आहे की, त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्या नावावर आम्ही विश्वास ठेवावा आणि त्याने आपल्याला आज्ञा दिल्याप्रमाणे एकमेकांवर प्रीती करावी.
Now this is His commandment, that we believe in the name of His Son, Jesus Christ, and love one another, just as He commanded.
24 २४ जो देवाची आज्ञा पाळतो तो त्याच्यामध्ये राहतो आणि देव त्याच्यात राहतो आणि त्याने जो पवित्र आत्मा आपल्याला दिला, त्यावरून आपल्याला कळून येते की, तो आपल्याठायी राहतो.
He who keeps His commandments abides in Him, and He in him. This is how we know that He remains in us: by the Spirit whom He gave us.