< १ योहा. 2 >

1 माझ्या प्रिय मुलांनो, तुम्ही पाप करू नये यासाठी मी तुम्हास या गोष्टी लिहीत आहे, पण जर तुम्हांपैकी एखादा पाप करतो तर त्याच्यासाठी पित्याजवळ आपला कैवारी येशू ख्रिस्त जो नीतिमान तो आहे.
Gyermekeim, ezeket azért írom nektek, hogy ne vétkezzetek. És ha valaki vétkezik, van szószólónk az Atyánál: az igaz Jézus Krisztus.
2 तो केवळ आमच्याच पापासाठी नव्हे तर सगळ्या जगाच्याही पापांबद्दल प्रायश्चित्त झाला आहे.
Ő engesztelő áldozat a mi vétkeinkért, de nemcsak a miénkért, hanem az egész világ bűneiért is.
3 जर आम्ही त्याच्या आज्ञा पाळतो तर आम्ही त्यास खऱ्या अर्थाने ओळखले आहे.
Abból tudjuk meg, hogy ismerjük őt, ha az ő parancsolatait megtartjuk.
4 जो कोणी असे म्हणतो, “मी देवाला ओळखतो!” परंतु त्याच्या आज्ञा पाळत नाही तर तो खोटे बोलत आहे; आणि त्याच्याठायी सत्य नाही.
Aki ezt mondja: ismerem őt, és az ő parancsolatait nem tartja meg, hazug az, és nincs meg abban az igazság.
5 पण जर कोणी त्याच्या वचनाप्रमाणे चालतो, तर त्यांच्यामध्ये देवाची प्रीती पूर्णत्वास गेली आहे. ह्यावरून आपल्याला कळून येते की, आपण त्याच्याठायी आहोत.
Aki pedig megtartja az ő beszédét, abban valósággal teljessé lett Isten szeretete. Ebből tudjuk meg, hogy őbenne vagyunk.
6 मी देवामध्ये राहतो असे म्हणणाऱ्याने, जसा येशू ख्रिस्त चालला तसे चालले पाहिजे.
Aki azt mondja, hogy őbenne van, annak úgy kell élnie, ahogy ő élt.
7 प्रियांनो, मी तुम्हास नवी आज्ञा लिहीत नाही, परंतु जी आज्ञा तुम्हास आरंभापासून देण्यात आली आहे तीच जुनी आज्ञा लिहितो; जे वचन तुम्ही ऐकले ते ती जुनी आज्ञा होय.
Atyámfiai, nem új parancsolatot írok nektek, hanem a régi parancsolatot, amely kezdettől fogva nálatok volt. A régi parancsolat az az ige, amelyet hallottatok.
8 तरीही मी एकप्रकारे नवी आज्ञा लिहीत आहे. ती ख्रिस्तात आणि तुमच्यात सत्य आहे कारण अंधार नाहीसा होत आहे व खरा प्रकाश अगोदरपासूनच प्रकाशत आहे.
Viszont új parancsolatot írok nektek, azt, ami igaz őbenne és tibennetek, hogy a sötétség szűnni kezd és az igaz világosság már fénylik.
9 मी प्रकाशात आहे असे म्हणून जो आपल्या भावांचा द्वेष करतो तो अजून अंधारांतच आहे.
Aki azt mondja, hogy világosságban van és gyűlöli atyjafiát, az még mindig a sötétségben van.
10 १० जो आपल्या भावावर प्रेम करतो तो प्रकाशात राहतो आणि त्याच्यामध्ये अडखळण्याचे कारण नसते.
Aki szereti atyjafiát, az a világosságban marad és nincs benne megbotránkozni való.
11 ११ पण जो आपल्या भावाचा द्वेष करतो तो अंधारात आहे. तो अंधारात जगत आहे व तो कोठे जात आहे हे त्यास कळत नाही कारण अंधाराने त्याचे डोळे आंधळे केलेले आहेत.
Aki pedig gyűlöli atyjafiát, az sötétségben van, és sötétségben jár, és nem tudja hova megy, mert a sötétség megvakította szemét.
12 १२ प्रिय मुलांनो, मी तुम्हास लिहीत आहे कारण ख्रिस्ताच्या नावामुळे तुमच्या पापांची तुम्हास क्षमा झालेली आहे.
Írok nektek, gyermekek, mert bűneitek megbocsáttattak az ő nevéért.
13 १३ वडिलांनो, मी तुम्हास लिहितो कारण जो सुरुवातीपासून अस्तित्वात आहे, त्यास तुम्ही ओळखता. तरुणांनो, मी तुम्हास लिहीत आहे कारण दुष्टावर तुम्ही विजय मिळवला आहे. लहान मुलांनो, मी तुम्हास लिहीले आहे, कारण तुम्ही पित्याला ओळखता.
Írok nektek, atyák, mert megismertétek azt, aki kezdettől fogva van. Írok nektek, ifjak, mert meggyőztétek a gonoszt. Írok nektek, gyermekek, mert megismertétek az Atyát.
14 १४ वडिलांनो, मी तुम्हास लिहीत आहे कारण तुम्हास पिता माहीत आहे. वडिलांनो, मी तुम्हास लिहिले कारण जो सुरुवातीपासून अस्तित्वात आहे त्याची तुम्हास ओळख झाली आहे. तरुणांनो, मी तुम्हास लिहिले कारण तुम्ही बळकट आहात; देवाचे वचन तुमच्यामध्ये राहते कारण तुम्ही दुष्टावर मात केली आहे.
Írtam nektek, atyák, mert megismertétek azt, aki kezdettől fogva van. Írtam nektek, ifjak, mert erősek vagytok, és Isten igéje megmarad bennetek, és meggyőztétek a gonoszt.
15 १५ जगावर किंवा जगातील गोष्टींवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करीत असेल तर त्याच्याठायी पित्याची प्रीती नाही.
Ne szeressétek a világot, se azokat, amik a világban vannak. Ha valaki a világot szereti, nincs meg abban az Atya szeretete.
16 १६ कारण जगात जे सर्व आहे ते, म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयीची फुशारकी ही पित्यापासून नाहीत, तर जगापासून आहेत.
Mert mindaz, ami a világban van a test kívánsága, a szem kívánsága és a kérkedő életmód, nem az Atyától, hanem a világtól való.
17 १७ जग व जगातील वासना नाहीशा होत आहेत. पण जो देवाच्या इच्छेप्रमाणे करतो तो सर्वकाळपर्यंत जगेल. (aiōn g165)
A világ pedig elmúlik és annak kívánsága is, de aki Isten akaratát cselekszi, az megmarad örökké. (aiōn g165)
18 १८ मुलांनो, शेवट जवळ आला आहे व तुम्ही ऐकल्याप्रमाणे ख्रिस्तविरोधी येत आहेत आणि आताच पुष्कळ ख्रिस्तविरोधक उठले आहेत; ह्यावरून आपल्याला दिसून येते की, ही शेवटली घटका आहे.
Gyermekeim, itt az utolsó óra. Amint hallottátok, eljön az antikrisztus. Most sok antikrisztus jelent meg. Ebből tudjuk, hogy itt az utolsó óra.
19 १९ आपल्यातूनच ते निघाले तरी ते आपले नव्हते; ते आपले असते तर आपल्याबरोबर राहिले असते; त्यांच्यातील कोणीही आपला नाही हे प्रकट व्हावे म्हणून ते निघाले.
Közülünk váltak ki, de nem voltak közülünk valók, mert ha közülünk valók lettek volna, velünk maradtak volna. De nyilvánvalóvá kellett lennie, hogy nem mindannyian közülünk valók.
20 २० पण जो पवित्र त्याच्यापासून तुमचा आत्म्याने अभिषेक केला आहे म्हणून तुम्हा सर्वांना सत्य माहीत आहे.
De tiétek a Szentlélek kenete, és így mindent tudtok.
21 २१ तुम्हास सत्य कळत नाही म्हणून मी तुम्हास लिहीले आहे असे नाही, तुम्हास ते कळते म्हणून आणि कोणतीही लबाडी सत्यापासून नाही, म्हणून लिहिले आहे.
Nem azért írtam nektek, mintha nem ismernétek az igazságot, hanem mivel ismeritek azt, tudjátok, hogy semmiféle hazugság nem származhat az igazságból.
22 २२ येशू हा ख्रिस्त आहे असे नाकारणारा लबाड नाही काय? जो पित्याला आणि पुत्राला नाकारतो तोच ख्रिस्तविरोधी आहे.
Ki a hazug, ha nem az, aki tagadja, hogy Jézus a Krisztus? Ez az antikrisztus, aki tagadja az Atyát és a Fiút.
23 २३ जो कोणी पुत्राला नाकारतो त्यास पिता लाभत नाही पण जो पुत्राला स्वीकारतो त्यास पिता लाभला आहे.
Aki tagadja a Fiút, azé nem lehet az Atya sem. Aki vallást tesz a Fiúról, azé az Atya is.
24 २४ तुमच्याविषयी जे म्हणावयाचे तर, जे तुम्ही आरंभापासून ऐकले ते तुम्हामध्ये राहो. जे तुम्ही आरंभापासून ऐकले ते जर तुम्हामध्ये राहिले, तर तुम्हीही पुत्रामध्ये व पित्यामध्ये रहाल.
Amit tehát kezdettől fogva hallottatok, az maradjon meg bennetek! Ha megmarad bennetek, amit kezdettől fogva hallottatok, akkor ti is megmaradtok az Atyában és a Fiúban.
25 २५ आणि देवाने आम्हास जे देण्याचे अभिवचन दिले आहे ते म्हणजे सार्वकालिक जीवन होय. (aiōnios g166)
Az ígéret pedig, amit ő maga ígért nekünk: az örök élet. (aiōnios g166)
26 २६ जे तुम्हास फसविण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांच्याविषयी मी तुम्हास या गोष्टी लिहीत आहे.
Ezeket azokról írtam nektek, akik elhitetnek titeket.
27 २७ पण तुम्हाविषयी म्हणावयाचे तर, त्याच्याकडून तुमचा अभिषेक झाला तो तुम्हामध्ये राहतो, तेव्हा तुम्हास कोणी शिकविण्याची गरज नाही, त्याचा अभिषेक तो सत्य आहे, खोटा नाही तुम्हास सर्व गोष्टींविषयी शिकवितो त्याप्रमाणे व त्याने तुम्हास शिकविल्याप्रमाणे तुम्ही त्यांच्यामध्ये राहा.
De az a kenet, amit Tőle kaptatok, bennetek marad, és így nincs szükségetek arra, hogy valaki tanítson titeket, hanem az a kenet megtanít titeket mindenre, ami igaz és nem hazugság. Ahogyan megtanított titeket, úgy maradjatok meg őbenne.
28 २८ म्हणून आता, प्रिय मुलांनो, ख्रिस्तामध्ये राहा, यासाठी की, जेव्हा ख्रिस्त प्रकट होइल, तेव्हा आम्हास धैर्य मिळेल व जेव्हा तो परत येतो तेव्हा त्याच्याद्वारे आम्ही लज्जित केले जाणार नाही.
És most, gyermekeim, maradjatok meg őbenne, hogy amikor megjelenik, bizodalmunk legyen, és ne szégyenüljünk meg eljövetelekor.
29 २९ जर तुम्हास माहीत आहे की, ख्रिस्त नीतिमान आहे तर जे लोक चांगले काम करतात ते देवाचे पुत्र आहेत हे देखील तुम्हास कळेल.
Ha tudjátok, hogy ő igaz, tudjátok azt is, hogy aki az igazságot cselekszi, az mind Tőle született.

< १ योहा. 2 >