< १ करि. 9 >

1 मी स्वतंत्र नाही काय? मी प्रेषित नाही काय? मी आपल्या प्रभू येशूला पाहिले नाही काय? प्रभूच्या ठायी तुम्ही माझे काम आहात ना?
Хиба ж я не апостол? хиба ж я не вільний? хиба ж я Ісуса Христа, Господа нашого, не бачив? хиба не моє ви дїло в Господї?
2 जरी मी इतरांकरता प्रेषित नसलो, तरी निःसंशय मी तुमच्याकरता आहे कारण तुम्ही प्रभूमध्ये माझ्या प्रेषितपणाचा शिक्का आहात.
Коли иншим я не апостол, то все ж вам; ви бо печать апостолування мого в Господї.
3 माझी चौकशी करणार्‍यांना हे माझे प्रत्युत्तर आहे:
Оце моя відповідь тим, хто судить мене.
4 आम्हास खाण्यापिण्याचा अधिकार नाही काय?
Хиба ми не маємо власти їсти і пити?
5 इतर प्रेषित, प्रभूचे भाऊ किंवा केफा, हे करतात त्याप्रमाणे आम्हास कोणी विश्वासी बहीण पत्नी करून घेऊन, बरोबर नेण्याचा अधिकार नाही काय?
Хиба не маємо власти сестру-жінку водити, як инші апостоли, й брати Господнї, і Кифа?
6 किंवा केवळ मला आणि बर्णबाला काम न करण्याचा अधिकार नाही काय?
Або один я та Варнава не маємо власти, щоб не робити?
7 स्वतःच्या खर्चाने सैनिक म्हणून सेवा करणारा असा कोण आहे? कोण द्राक्षमळा लावतो आणि त्याचे फळ खात नाही? किंवा कोण कळप राखतो आणि कळपाच्या दुधातून पीत नाही?
Хто воїнствує коли своїми доходами? хто садить виноградник, та й овощу його не їсть? або хто пасе стадо, та й молока з стада не їсть?
8 मी या गोष्टी लोकरीतीस अनुसरून सांगतो काय? नियमशास्त्र हेच सांगत नाही काय?
Хиба се я глаголю яко чоловік? чи не говорить сього й закон?
9 कारण, मोशेच्या नियमशास्त्रात लिहिले आहे की, ‘मळणी करीत असलेल्या बैलाला मुसके घालू नको.’ देव केवळ बैलांची काळजी करतो काय?
Бо в Мойсейовім законї писано: Не завязуй рота волові, як молотить. Хиба про волів дбає Бог?
10 १० किंवा सर्वस्वी आपल्याकरता तो हे म्हणतो? हे निःसंशय आपल्याकरता लिहिले आहे म्हणजे जो नांगरतो त्याने आशेने नांगरावे आणि जो मळणी करतो त्याने आपण वाटेकरी होऊ या आशेने करावी.
чи задля нас як раз глаголе? Задля нас бо написано, що в надії мусить ратай орати, і хто молотить, (робить се) з надїєю, бути спільником свого вповання.
11 ११ आम्ही तुमच्यात जर आत्मिक गोष्टी पेरल्या आहेत, तर आम्ही तुमच्या दैहिक गोष्टींची कापणी केल्यास त्यामध्ये मोठे काय आहे?
Коли ми духовне сїяли вам, то чи велика річ, коли ми тілесне ваше жати мем?
12 १२ जर दुसरे तुमच्यावरील या अधिकाराचे वाटेकरी होतात, तर आम्ही विशेषेकरून का होऊ नये? आणि तरी आम्ही या अधिकाराचा उपयोग केला नाही, पण ख्रिस्ताच्या शुभवर्तमानाला आम्ही अडखळण करू नये म्हणून, आम्ही सर्व गोष्टी सहन करतो.
коли инші бувають спільниками (сієї) власти над вами, то чи не більше ми? Та не користувались ми властю сією, а все терпимо, щоб не з'упинити як не будь благовістя Христового.
13 १३ जे निवास्थानाचा भवनातील पवित्र वस्तूंची सेवा करतात ते भवनातील अन्न खातात आणि जे वेदीपुढे उभे राहतात ते वेदीचे भागीदार होतात, हे तुम्ही जाणत नाही काय?
Чи то ж не знаєте, що хто коло сьвятого служить, ті з сьвятого їдять? і хто коло жертівнї пильнує, ті від жертівнї частину приймають.
14 १४ प्रभूने त्याचप्रमाणे आज्ञा दिली आहे की, जे शुभवर्तमानाची घोषणा करतात त्यांचा शुभवर्तमानावर निर्वाह व्हावा,
Так і Господь повелів тим, хто проповідує благовісте, з благовістя жити.
15 १५ पण ह्यातील कोणत्याच गोष्टीचा मी कधी उपयोग केला नाही किंवा माझ्यासाठी तसे करावे म्हणून मी या गोष्टी लिहिल्या नाहीत कारण हे माझे अभिमान मिरवणे कोणी निरर्थक करण्यापेक्षा मला मरणे बरे वाटेल.
Я ж нічим з сього не користувавсь, і не (для того) се написав, щоб так роблено для мене; бо лучче мені вмерти, нїж щоб хто славу мою знівечив.
16 १६ कारण जरी मी शुभवर्तमान सांगतो, तरी अभिमान मिरवण्यास मला कारण नाही कारण मला हे करणे भाग आहे; मी शुभवर्तमान सांगणार नाही, तर मला हाय.
Коли бо благовіствую, нема мені слави, примус бо на менї лежить, і горе мені, коли не благовіствую!
17 १७ कारण, मी हे स्वेच्छेने केले, तर मला वेतन मिळेल, पण माझ्या इच्छेविरुद्ध असेल, तर माझ्यावर हा कारभार सोपविला गेला आहे.
Коли бо роблю се охотою, маю нагороду; коли ж проти волї, то роблю службу, звірену менї.
18 १८ तर मग माझे वेतन काय? एवढेच की, मी शुभवर्तमान सांगताना, ते फुकट सांगावे आणि शुभवर्तमानाविषयीच्या माझ्या अधिकाराचा मी दुरुपयोग करू नये.
За що ж мені нагорода? (За те, ) що благовіствуючи без користї, подаю благовісте Христове, так щоб не надуживати моєї властїв благовістю.
19 १९ कारण मी सर्वांपासून स्वतंत्र असलो तरी अधिक लोक मिळवावेत म्हणून मी सर्वाचा दास झालो.
Бувши бо вільний від усїх (не підневолений нїкому), зробив я себе усїм слугою, щоб більш придбати:
20 २० मी यहूद्यांना मिळविण्यास, यहूद्यांना यहुद्यांसारखा झालो; मी नियमशास्त्राधीन नसलो तरी मी नियमशास्त्राधीन असलेले मिळविण्यास, नियमशास्त्राधीन असल्यासारखा झालो.
Я став ся Жидам, як Жидовин, щоб Жидів придбати; тим, що під законом, був я як під законом, щоб тих, що під законом, придбати;
21 २१ (मी देवाच्या नियमाबाहेर नाही, पण ख्रिस्ताच्या नियमाखाली असल्यामुळे) मी नियमशास्त्राधीन नसलेले मिळविण्यास, नियमशास्त्राधीन नसलेल्यांना नियमशास्त्राधीन नसल्यासारखा झालो.
беззаконним - як беззаконний (не бувши беззаконним Богу, а законним Христу), щоб придбати беззаконних;
22 २२ आणि मी दुर्बळ असलेले मिळविण्यास, दुर्बळांना दुर्बळासारखा झालो. मी सर्वांना सर्व झालो आहे, म्हणजे सर्वकाही करून मी कित्येकांचे तारण करावे.
недужим я був недужий, щоб недужих придбати. Усїм був я все, щоб конче деяких спасти.
23 २३ आणि मी हे सर्वकाही शुभवर्तमानाकरीता करतो, म्हणजे मीही तिच्यात सहभागी व्हावे.
Се ж роблю задля благовістя, щоб бути спільником у йому.
24 २४ शर्यतीत धावणारे सगळेच धावतात पण एकालाच बक्षीस मिळते, हे तुम्ही जाणत नाही काय? म्हणून असे धावा की, ते तुम्ही मिळवाल.
Хиба не знаєте, що ті, що на гонах біжять, усї біжять, а один приймає нагороду? Так біжіть і ви, щоб осягли.
25 २५ स्पर्धेसाठी मेहनत करणारा प्रत्येक मनुष्य प्रत्येक गोष्टीत संयमन करतो. ते नाशवंत मुकुट मिळविण्यासाठी करतात, पण आपण अविनाशी मुकुट मिळवण्यासाठी करतो.
Кожен же, хто бореть ся, від усього вдержуєть ся. Ті ж, щоб тлїнний вінець прийняти, а ми нетлїнний.
26 २६ म्हणून तसा मी धावतो, निरर्थक नाही, मी तसे मुष्टिप्रहार करतो, हवेवर प्रहार करणार्‍यासारखे नाही.
Оце ж я так біжу, не якби на непевне; подвизаюсь так, не якби повіттє бючи.
27 २७ पण मी माझे शरीर दाबाखाली दास्यात ठेवतो; नाही तर, दुसर्‍यांना घोषणा केल्यावर मी स्वतः, काही कारणाने, कसोटीस न उतरलेला होईन.
А морю тіло мов і підневолюю, щоб, иншим проповідуючи, самому инодї не бути нікчемним.

< १ करि. 9 >