< १ करि. 8 >

1 आता तुम्ही मला लिहिलेल्या गोष्टींविषयी मी लिहित आहे; मूर्तींना वाहिलेल्या गोष्टींविषयी आपल्या सर्वांना ज्ञान आहे, हे आपण जाणतो. ज्ञान फुगवते, पण प्रीती उभारणी करते.
ועל דבר זבחי האלילים ידענו שיש דעה לכלנו הדעת תגביה לב והאהבה היא הבונה׃
2 आपण एखादी गोष्ट जाणतो असे कोणाला वाटत असेल, तर ती जशी समजली पाहिजे तशी अजून तो जाणत नाही.
החשב כי הוא ידע דבר מה עוד לא ידע מאומה כאשר עליו לדעת אתו׃
3 पण कोणी देवावर प्रीती करीत असेल तर त्या मनुष्यास देव ओळखतो.
אבל אם יאהב איש את האלהים האלהים ידעו׃
4 म्हणून आता, मूर्तींना वाहिलेल्या पदार्थांच्या सेवनाविषयी आपण जाणतो की, जगात मूर्ती ही काहीच नाही आणि एकाशिवाय दुसरा देव नाही,
ועל דבר אכילת זבחי האלילים הנה ידענו כי האליל אין בעולם ואין אלהים בלתי אחד׃
5 कारण स्वर्गात आणि पृथ्वीवर देव म्हणलेले पुष्कळ असले, कारण तसे पुष्कळ दैवत आणि पुष्कळ प्रभू असतील,
ואף כי יש הנקראים אלהים אם בשמים אם בארץ באשר יש אלהים רבים ואדנים רבים׃
6 परंतु आमच्यासाठी फक्त एकच देव जो पिता तो आहे. ज्याच्यासाठी आपण जगतो आणि ज्याच्यापासून सर्वकाही निर्माण झाले आणि फक्त एकच प्रभू येशू ख्रिस्त आहे. ज्याच्या द्वारे सर्व गोष्टी अस्तित्वात येतात व ज्याच्या द्वारे आपण जगतो.
אמנם לנו אך לא אחד האב אשר הכל ממנו ואנחנו אליו ואדון אחד ישוע המשיח אשר הכל על ידו ונחנו על ידו׃
7 पण हे ज्ञान प्रत्येक मनुष्यास असणार नाही कारण मूर्तींविषयी जे विवेक बाळगतात असे कित्येकजण, या घटकेपर्यंत, ते मूर्तीला वाहिलेले नैवेद्य खात आहेत; आणि त्यांचा विवेक दुर्बळ असल्यामुळे अशुद्ध होतो.
אך לא בכלם הדעת כי יש אשר בזכרם עוד את האליל אכלים כזבח האליל ובכן לבם החלוש יתגאל׃
8 पण अन्नामुळे देवापुढे आपली योग्यता ठरत नाही, आपण न खाण्याने कमी ठरत नाही किंवा खाण्याने अधिक ठरत नाही.
המאכל לא יקרב אתכם לאלהים כי אם נאכל אין לנו יתרון ואם לא נאכל לא נגרע׃
9 पण तुमचे हे स्वातंत्र्य दुर्बळ असलेल्यास, कोणत्याही प्रकारे, अडखळण होऊ नये म्हणून काळजी घ्या.
אבל הזהרו פן יהיה אתו הרשיון שלכם למכשל החלשים׃
10 १० कारण ज्ञान असलेल्या तुला जर मूर्तीच्या असलेल्या ठिकाणी भोजनास बसलेले कोणी बघितले, तर तो दुर्बळ असल्यास त्याचा विवेक मूर्तींना वाहिलेले पदार्थ खाण्यास तयार होईल ना?
כי האיש הראה אתך אשר לך הדעת מסב בבית אלילים הלא יעז ברוחו החלוש לאכל מזבחי אלילים׃
11 ११ आणि ज्याच्यासाठी ख्रिस्त मरण पावला अशा दुर्बळ असलेल्या तुझ्या बंधूचा तुझ्या या ज्ञानामुळे नाश होतो.
ויאבד על ידי דעתך אחיך החלש אשר למענו מת המשיח׃
12 १२ पण तुम्ही जेव्हा अशाप्रकारे बंधूच्या विरूद्ध पाप करून त्यांचा दुर्बळ असलेला विवेक तुम्ही दुखावता, तेव्हा तुम्ही ख्रिस्ताविरुद्ध पाप करता.
ואם ככה תחטאו לאחיכם ותכאיבו את רוחם החלוש למשיח אתם חטאים׃
13 १३ म्हणून, जर माझ्या बंधूला अन्नाने अडखळण होत असेल तर माझ्या बंधूंना अडथळा होण्यास मी कारणीभूत होऊ नये म्हणून मी कधीही मांस खाणार नाही. (aiōn g165)
על כן אם מאכלי מכשיל את אחי לא אכל בשר לעולם למען לא אכשיל את אחי׃ (aiōn g165)

< १ करि. 8 >