< १ करि. 6 >
1 १ जेव्हा तुमच्यापैकी एखाद्याचा दुसऱ्याबरोबर वाद असेल, तर तो वाद पवित्र जनांपुढे जाण्याऐवजी ती व्यक्ती तो वाद न्यायालयात अनीतिमान लोकांसमोर नेण्याचे धाडस का करतो?
Ja kam no jums kāda sūdzība ir pret citu kādu, kā tas gan drīkst tiesāties priekš tiem netaisniem un ne priekš tiem svētiem?
2 २ पवित्रजन जगाचा न्याय करतील हे तुम्हास माहित नाही काय? आणि जर तुमच्याकडून जगाचा न्याय होणार आहे, तर क्षुल्लक बाबींचा निर्णय करण्यास तुम्ही योग्य नाही काय?
Vai jūs nezināt, ka tie svētie pasauli tiesās; un ja caur jums pasaule kļūst tiesāta, vai tad jūs esat necienīgi, tās mazākās lietas tiesāt?
3 ३ आपण देवदूतांचा न्याय करणार आहोत, हे तुम्हास माहित नाही काय? तर या जीवनासंबंधीचा न्याय किती विशेषेकरून आम्ही करू शकणार नाही?
Vai nezināt, ka mēs tiesāsim eņģeļus? Kā ne jo vairāk laicīgas lietas?
4 ४ म्हणून जर दररोजच्या जीवनासंबंधीची प्रकरणे तुम्हास निकालात काढायची असतील, तर ज्यांची मंडळीत काही गणती नाही, अशा मनुष्यांना न्याय ठरविण्यास का बसवता?
Kad nu jums par laicīgām lietām jātiesājas; kas draudzē necienīti, tādus jūs ieceļat.
5 ५ तुम्हास लाज वाटावी म्हणून मी असे म्हणतो, ज्याला भावाभावांचा न्यायनिवाडा करता येईल, असा एकही शहाणा मनुष्य तुमच्यात नाही काय?
Es to saku jums par kaunu. Vai tad jūsu starpā nav neviena gudra, neviena, kas varētu tiesu spriest starp saviem brāļiem?
6 ६ पण या ऐवजी, भाऊ भावावर फिर्याद करतो आणि तीहि अविश्वासणाऱ्या पुढे करतो हे कसे?
Bet brālis iet ar brāli tiesāties, un tad vēl pie neticīgiem!
7 ७ तुम्ही एकमेकांवर खटले भरता ह्यात सर्व प्रकारे तुमचीच हानी आहे, त्यापेक्षा तुम्ही अन्याय का सहन करीत नाही? त्यापेक्षा तुम्ही आपली फसवणूक का होऊ देत नाही?
Jo tā jau ir vaina pie jums, ka jūs pavisam(vispār) savā starpā tiesājaties; kādēļ jūs labāk neciešat netaisnību? Kādēļ jūs labāk neciešat pārestību?
8 ८ उलट तुम्ही दुसऱ्यावर आणि स्वतःच्या भावावर अन्याय करता आणि फसवता.
Bet jūs dariet netaisnību un dariet pāri, un to vēl brāļiem.
9 ९ अनीतिमानास देवाचे राज्य वतन मिळणार नाही, हे तुम्ही जाणत नाही काय? फसू नका; कोणीही व्यभिचारी, मूर्तीपुजक किंवा व्यभिचारी, विपरीत संभोग करू देणारे किंवा विपरीत संभोग करणारे,
Vai nezināt, ka netaisnie Dieva valstību neiemantos? Nepieviļaties! Ne maucinieki, ne elkadievīgie, ne laulības pārkāpēji, ne malaki, ne tie, kas pie vīriem guļ,
10 १० चोर, लोभी, दारूबाज, निंदा करणारे किंवा लुबाडणारे ह्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही.
Ne zagļi, ne plēsēji, ne dzērāji, ne zaimotāji, ne laupītāji Dieva valstību neiemantos.
11 ११ आणि तुम्ही कित्येकजण तसे होता; पण तुम्ही धुतले गेला आहा, तुम्ही पवित्र केले गेला आहात आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने व आपल्या देवाच्या आत्म्याकडून तुम्ही नीतिमान ठरवले गेला आहात.
Un kādi no jums bija tādi; bet jūs esat nomazgāti, bet jūs esat svēti darīti, bet jūs esat taisnoti iekš Tā Kunga Jēzus vārda un iekš mūsu Dieva Gara.
12 १२ “सर्व गोष्टी मला कायदेशीर आहेत,” पण सर्व गोष्टी माझ्या हिताच्या नसतात, “सर्व गोष्टी मला कायदेशीर आहेत,” पण मी त्यातील कोणत्याच गोष्टींच्या अधीन होणार नाही.
Viss man ir brīv, bet ne viss der. Viss man ir brīv, bet nekam es nepadošos.
13 १३ अन्न पोटासाठी आहे आणि पोट अन्नासाठी आहे पण देव त्या दोघांचाही नाश करील. पण व्यभिचारासाठी शरीर नाही, तर शरीर प्रभूसाठी आहे आणि शरीरासाठी प्रभू आहे.
Barība vēderam, un vēders barībai, bet Dievs iznīcinās gan šo, gan to; bet miesa nav maucībai, bet Tam Kungam, un Tas Kungs miesai.
14 १४ आणि देवाने प्रभूला उठवले आणि तो त्याच्या सामर्थ्याने आपल्यालासुद्धा उठवील.
Bet Dievs ir To Kungu uzmodinājis un arī mūs uzmodinās caur Savu spēku.
15 १५ तुमची शरीरे ख्रिस्ताचे अवयव आहेत, हे तुम्हास माहित नाही काय? मग मी ख्रिस्ताचे अवयव घेऊन ते वेश्येचे अवयव करू काय? तसे न होवो.
Vai nezināt, ka jūsu miesas ir Kristus locekļi? Vai tad es ņemtu Kristus locekļus un darītu par maukas locekļiem? Nemūžam.
16 १६ तुम्ही हे जाणत नाही का की, जो वेश्येशी जोडला जातो तो तिच्याशी शरीराने एक होतो? कारण तो म्हणतो की, ती दोघे एकदेह होतील.
Jeb vai nezināt, ka tas, kas maukai pieķeras, ir viena miesa ar to? Jo viņš saka: tie divi būs viena miesa.
17 १७ पण जो प्रभूशी जोडला जातो तो त्याच्याशी आत्म्याने एकरूप होतो.
Bet kas Tam Kungam pieķeras, tas ir viens gars ar To.
18 १८ व्यभिचारापासून दूर पळा. जे दुसरे कोणतेही पाप मनुष्य करतो ते त्याच्या शरीराबाहेर होते पण व्यभिचार करणारा आपल्या स्वतःच्या शरीराविरुद्ध पाप करतो.
Bēgat no maucības! Visi grēki, ko cilvēks dara, ir ārpus miesas; bet kas maucību dara, tas grēko pie savas paša miesas.
19 १९ किंवा तुम्ही हे जाणत नाही का की, तुमचे शरीर हे देवाकडून मिळालेल्या व तुमच्यात असलेल्या पवित्र आत्म्याचे निवासस्थान आहे? आणि तुम्ही आपले स्वतःचे नाही?
Jeb vai nezināt, ka jūsu miesa ir Tā Svētā Gara dzīvoklis, kas ir iekš jums, ko jūs no Dieva esat dabūjuši, un jūs nepiederat sev pašiem?
20 २० कारण तुम्हास मोल देऊन विकत घेतले आहे; म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा.
Jo jūs esat dārgi atpirkti. Tad nu godiniet Dievu savā miesā un savā garā, kas pieder Dievam.