< १ करि. 4 >

1 आम्ही ख्रिस्ताचे सेवक व देवाच्या रहस्याचे कारभारी आहोत असे प्रत्येकाने मानावे.
Так нас нехай вважає чоловік, яко слуг Христових, і доморядників тайн Божих.
2 या दृष्टीकोणातून हे गरजेचे आहे की जबाबदारी असलेल्या कारभाऱ्याने विश्वासू असले पाहिजे.
Ще ж до того від доморядників вимагають, щоб кожного знайдено вірним.
3 पण तुम्हाकडून किंवा कोणा मानवी न्यायाधीशाकडून माझा न्याय व्हावा ही मला लहान गोष्ट वाटत आहे, मी माझा स्वतःचा देखील न्याय करीत नाही.
Та се в мене найменша річ, щоб мене судили ви або людський суд; ні, я й сам себе не суджу.
4 कारण जरी माझा विवेक मला दोष देत नाही तरी त्यामुळे मी निर्दोष ठरतो असे नाही. प्रभू हाच माझा न्यायनिवाडा करणारा आहे.
Бо нічого на себе не знаю, та сим я не оправдуюсь; суддя ж мій Бог.
5 म्हणून योग्य समय येईपर्यंत म्हणजे प्रभू येईपर्यंत न्यायनिवाडा करुच नका. तो अंधारामध्ये दडलेल्या गोष्टींवर प्रकाश टाकील व अंतःकरणातील हेतू उघडकीस आणील, त्यावेळी देवाकडून प्रत्येकाची प्रशंसा होईल.
Тимже ні про що перше часу не судіть, доки прийде Господь, котрий висьвітить сховане в темряві і виявить думки сердець; а тоді похвала, буде кожному від Бога,
6 आता, बंधूनो, तुमच्यासाठी मी या गोष्टी माझ्याकरिता व अपुल्लोसाकरीता उदाहरणाने लागू केल्या आहेत. यासाठी की, शास्त्रलेखापलीकडे कोणी स्वतःला न मानावे हा धडा तुम्ही आम्हापासून शिकावे म्हणजे तुम्हापैकी कोणीही गर्वाने फुगून जाऊ नये म्हणजे एखाद्याला चांगली वागणूक देऊन दुसऱ्याला विरोध करू नये.
Се ж, браттє, приложив я до себе та Аполоса задля вас, щоб ви з нас навчились не думати більш того, шо написано, щоб один перед одним не неслись гордо проти другого.
7 कारण तुझ्यात व दुसऱ्यात फरक पाहतो तो कोण आहे? आणि तुला मिळाले नाही असे तुझ्याजवळ काय आहे? ज्याअर्थी तुला सर्व मिळाले आहे, तर तुला मिळाले नाही अशी बढाई का मारतोस?
Хто бо тебе одрізняє? що ж маєш, чого не прийняв (од Бога)? а коли прийняв, то чого величаєш ся, мов би не прийнявши?
8 तुम्हास ज्याची गरज आहे ते सर्व आधीच तुमच्याकडे आहे. तुम्ही अगोदरच श्रीमंत झाला आहात, तृप्त झाला आहात, तुम्हास असे वाटते की आमच्याशिवाय तुम्ही राजे झाला आहात आणि तुम्ही राजे बनलाच असता तर ठीक झाले असते, कारण आम्ही सुद्धा तुमच्याबरोबर राजे बनलो असतो.
Ви вже ситі, вже забагатіли, без нас зацарювали. О, щоб ви зацарювали, щоб і ми з вами царювали!
9 कारण मला वाटते की देवाने आम्हास मरण्यासाठी शिक्षा दिलेल्या अशा लोकांसारखे शेवटचे प्रेषित केले कारण आम्ही जगाला, देवदूतांना तसेच मनुष्यांना जणू तमाशा असे झालो आहोत.
Та я думаю, що Бог нас, апостолів, яко останніх поставив, мов на смерть призначених; бо видовищем зробились ми сьвітові, і ангелам, і людям.
10 १० आम्ही ख्रिस्तासाठी मूर्ख, तर तुम्ही ख्रिस्तामध्ये शहाणे आहात! आम्ही अशक्त आहोत, पण तुम्ही बलवान आहात! तुम्ही आदरणीय आहात, पण आम्ही तुच्छ आहोत!
Ми дурні задля Христа, ви ж мудрі в Христї; ми немічні, ви ж кріпкі; ви славні, ми ж безчесні.
11 ११ अगदी या क्षणापर्यंत आम्ही भुकेले आणि तहानलेले, उघडे आहोत, अमानुषपणे मारलेले, आम्ही बेघर असे आहोत.
Ще ж і до сієї години й голодуємо й жаждуемо, й наготїєм і биті в лице, і тиняємось,
12 १२ आणि आम्ही श्रम करतो, आम्ही स्वतःच्या हातांनी काम करतो, आमची निंदा होत असता आम्ही आशीर्वाद देतो.
і трудимось, працюючи своїми руками; нас лають, а ми благословляємо; нас гонять, ми терпимо;
13 १३ जेव्हा आमची निंदा होते, तेव्हा आम्ही आशीर्वाद देतो. जेव्हा आमचा छळ होतो तेव्हा आम्ही सहन करतो. जेव्हा आमची निंदा होते, आम्ही दयाळूपणे त्यांच्याशी बोलतो, या क्षणापर्यंत आम्ही जगासाठी गाळ आणि कचरा असे झालो आहोत.
нас хулять, ми молимось; мов сьміттє сьвіту стали ся ми, ометиця всім аж досі.
14 १४ मी तुम्हास हे लाजविण्यासाठी लिहित नाही, तर उलट मी तुम्हास माझ्या प्रिय लेकरांप्रमाणे चांगल्या गोष्टींची जाणीव करून देत आहे.
Не на сором вам се пишу, а яко дітей моїх любих остерегаю.
15 १५ कारण जरी तुम्हास ख्रिस्तामध्ये दहा हजार गुरू असले तरी पुष्कळ वडील नाहीत कारण ख्रिस्त येशूमध्ये शुभवर्तमानाच्या योगे मी तुम्हास जन्म दिला आहे.
Бо, коли б ви мали й тисячі наставників у Христї, та батьків небагато; бо в Христї Ісусї благовістєм я вас появив (зродив).
16 १६ यास्तव मी तुम्हास बोध करतो की माझे अनुकरण करा.
Благаю ж оце вас, будьте послїдувателями моїми.
17 १७ यासाठीच तीमथ्याला तुमच्याकडे पाठवले आहे. प्रभूमध्ये तो माझा प्रिय व विश्वासू पुत्र आहे. ज्याप्रमाणे मी सगळीकडे प्रत्येक मंडळीमध्ये शिकवतो, तसेच तो ख्रिस्तामधील माझ्या शिकवणुकीची आठवण करून देईल.
Про се післав я до вас Тимотея, мою любу дитину і вірного в Господі, котрий вам нагадає про дороги мої в Христї, яко ж усюди у всякій церкві я навчаю.
18 १८ पण जणू काय मी तुमच्याकडे येणार नाही, म्हणून काहीजण गर्वाने फुगले आहेत.
Мов би не мав я до вас прийти, так розгордїли деякі.
19 १९ तरीही जर प्रभूची इच्छा असेल तर मी लवकरच तुमच्याकडे येईन आणि मग मला समजेल की, जे गर्वाने फुगून गेले ते किती चांगले आहेत हे पाहण्यासाठी नव्हे, तर ते किती सामर्थ्यशाली आहेत हे मी पाहीन.
Я ж прийду скоро до вас, коли Господь схоче, і розвідаю не слово розгордївших, а силу.
20 २० कारण देवाचे राज्य बोलण्यावर अवलंबून नसते तर सामर्थ्यावर असते.
Не в слові бо царство Боже, а в силї.
21 २१ तुम्हास काय पाहिजे? मी तुमच्याकडे तुम्हास शिक्षा करण्यासाठी काठी घेऊन यावे, की प्रीतीने व सौम्यतेच्या आत्म्याने यावे?
Чого хочете? чи з лозиною прийти менї до вас, чи з любовю і духом лагідности?

< १ करि. 4 >