< १ करि. 3 >
1 १ बंधूंनो, आत्मिक लोकांशी बोलावे तसा मी तुमच्याशी बोलू शकलो नाही. पण त्याऐवजी मला तुमच्याशी दैहिक लोकांसारखे आणि ख्रिस्तामधील बालकांसारखे बोलावे लागले.
Frères, je n'ai pas pu vous parler comme à des spirituels, mais comme à des charnels, comme à des enfants en Christ.
2 २ मी तुम्हास पिण्यासाठी दूध दिले, जड अन्न दिले नाही कारण तुम्ही जड अन्न खाऊ शकत नव्हता व आतासुद्धा तुम्ही खाऊ शकत नाही.
Je vous ai nourris de lait, non de nourriture solide, car vous n'étiez pas encore prêts. Et maintenant encore, vous n'êtes pas prêts,
3 ३ तुम्ही अजूनसुद्धा दैहिक आहात कारण तुमच्यात मत्सर व भांडणे चालू आहेत, तर तुम्ही दैहिक नाहीत काय व जगातील लोकांसारखे चालत नाही काय?
car vous êtes encore charnels. En effet, s'il y a parmi vous de la jalousie, des querelles et des divisions, n'êtes-vous pas charnels, et ne marchez-vous pas selon les voies des hommes?
4 ४ कारण जेव्हा एक म्हणतो, “मी पौलाचा आहे,” आणि दुसरा म्हणतो, “मी अपुल्लोसाचा आहे,” तेव्हा तुम्ही साधारण मानवच आहात की नाही?
Car si l'un dit: « Je suis Paul », et l'autre: « Je suis Apollos », n'êtes-vous pas charnels?
5 ५ तर मग अपुल्लोस कोण आहे? आणि पौल कोण आहे? ज्यांच्याद्वारे तुम्ही विश्वास ठेवला असे ते सेवक आहेत, प्रत्येकाला प्रभूने जे काम नेमून दिले त्याप्रमाणे ते आहेत.
Qui donc est Apollos, et qui est Paul, sinon des serviteurs par qui vous avez cru, et chacun selon ce que le Seigneur lui a donné?
6 ६ मी बी लावले, अपुल्लोसाने त्यास पाणी घातले, पण देवाने त्याची वाढ केली.
J'ai planté. Apollos a arrosé. Mais c'est Dieu qui a donné l'accroissement.
7 ७ तर मग लावणारा काही नाही किंवा पाणी घालणाराही काही नाही, पण वाढविणारा देव हाच काय तो आहे.
Ainsi donc, ni celui qui plante n'est rien, ni celui qui arrose, mais Dieu qui fait croître.
8 ८ जे बी पेरतात व पाणी घालतात ते एक आहेत आणि प्रत्येकाला आपआपल्या श्रमाप्रमाणे आपआपली मजूरी मिळेल.
Or, celui qui plante et celui qui arrose sont pareils, mais chacun recevra sa propre récompense selon son propre travail.
9 ९ कारण अपुल्लोस आणि मी देवाच्या सेवाकार्यात सहकर्मी आहोत. तुम्ही देवाचे शेत आहात व देवाची इमारत आहात.
Car nous sommes les compagnons de travail de Dieu. Vous êtes l'agriculture de Dieu, la construction de Dieu.
10 १० देवाच्या कृपेद्वारे जे मला दिले आहे त्याप्रमाणे मी सूज्ञ, कुशल बांधणाऱ्यांप्रमाणे पाया घातला आणि दुसरा त्यावर बांधीत आहे तर त्यावरचे बांधकाम आपण कसे करीत आहोत, ह्याविषयी प्रत्येकाने काळजी घ्यावी.
Selon la grâce de Dieu qui m'a été donnée, j'ai posé, comme un sage maître d'œuvre, un fondement, et un autre bâtit dessus. Mais que chacun prenne garde à la manière dont il bâtit dessus.
11 ११ येशू ख्रिस्त हा जो घातलेला पाया आहे, त्याच्यावाचून इतर कोणीही दुसरा पाया घालू शकत नाही.
Car personne ne peut poser un autre fondement que celui qui a été posé, c'est-à-dire Jésus-Christ.
12 १२ जर कोणी त्या पायावर सोने, चांदी, मौल्यवान दगड, लाकूड, गवत किंवा पेंढा यांनी बांधतो,
Mais si quelqu'un bâtit sur le fondement avec de l'or, de l'argent, des pierres précieuses, du bois, du foin ou de la paille,
13 १३ तर बांधणाऱ्या प्रत्येकाचे काम उघड होईल कारण तो दिवस ते उघडकीस आणील, तो दिवस अग्नीने प्रकट होईल व तोच अग्नी प्रत्येकाचे काम कसे आहे याची परीक्षा करील.
l'œuvre de chacun sera dévoilée. Car le Jour le fera connaître, parce qu'il se révèle dans le feu; et le feu lui-même éprouvera quelle est l'œuvre de chacun.
14 १४ ज्या कोणाचे त्या पायावर बांधलेले काम टिकेल, त्यास प्रतिफळ मिळेल.
S'il reste de l'œuvre de quelqu'un ce qu'il a construit dessus, il recevra une récompense.
15 १५ पण एखाद्याचे काम जळून जाईल व त्याचे नुकसान होईल तथापि तो स्वतः तारला जाईल परंतु जणू काय अग्नीतून बाहेर पडलेल्यासारखा तारला जाईल.
Si l'œuvre de quelqu'un est brûlée, il subira une perte, mais il sera sauvé lui-même, mais comme par le feu.
16 १६ तुम्ही देवाचे निवासस्थान आहात आणि देवाचा आत्मा तुमच्यामध्ये निवास करतो हे तुम्हास माहीत नाही काय?
Ne savez-vous pas que vous êtes le temple de Dieu et que l'Esprit de Dieu habite en vous?
17 १७ जर कोणी देवाच्या निवासस्थानाचा नाश करतो तर देव त्या व्यक्तीचा नाश करील; कारण देवाचे निवास्थान पवित्र आहे आणि ते तुम्ही आहात.
Si quelqu'un détruit le temple de Dieu, Dieu le détruira, car le temple de Dieu est saint, ce que vous êtes.
18 १८ कोणीही स्वतःला फसवू नये, जर कोणी स्वतःला या जगाच्या दृष्टीने ज्ञानी समजत असेल तर त्याने खरोखर ज्ञानी होण्यासाठी “मूर्ख” व्हावे. (aiōn )
Que personne ne se trompe lui-même. Si quelqu'un pense être sage parmi vous dans ce monde, qu'il devienne fou pour devenir sage. (aiōn )
19 १९ कारण या जगाचे ज्ञान देवाच्या दृष्टीने मूर्खपणाचे आहे; कारण असे पवित्र शास्त्रात लिहिले आहे की, “देव ज्ञान्यांना त्यांच्याच धूर्तपणात धरतो.”
Car la sagesse de ce monde est folie devant Dieu. Car il est écrit: « Il a pris les sages dans leur ruse. »
20 २० आणि पुन्हा “परमेश्वर जाणतो की, ज्ञान्यांचे विचार व्यर्थ आहेत.”
Et encore: « Le Seigneur connaît les raisonnements des sages: ils sont sans valeur. »
21 २१ म्हणून मनुष्यांविषयी कोणीही फुशारकी मारू नये कारण सर्व गोष्टी तुमच्या आहेत.
Que personne ne se glorifie donc dans les hommes. Car toutes choses sont à vous,
22 २२ तर तो पौल किंवा अपुल्लोस किंवा केफा, जग, जीवन किंवा मरण असो, आताच्या गोष्टी असोत अथवा येणाऱ्या गोष्टी असोत, हे सर्व तुमचे आहे.
soit Paul, soit Apollos, soit Céphas, soit le monde, soit la vie, soit la mort, soit les choses présentes, soit les choses à venir. Tout est à vous,
23 २३ तुम्ही ख्रिस्ताचे आहात आणि ख्रिस्त देवाचा आहे.
et vous êtes à Christ, et Christ est à Dieu.