< १ करि. 3 >

1 बंधूंनो, आत्मिक लोकांशी बोलावे तसा मी तुमच्याशी बोलू शकलो नाही. पण त्याऐवजी मला तुमच्याशी दैहिक लोकांसारखे आणि ख्रिस्तामधील बालकांसारखे बोलावे लागले.
Alimwi andime, bakwesu, tendalikunowambula kulindinywe mbuli bantu basimuuya, pesi biyo mbuli kubantu banyama, mbuli kubana baniini muliKkilisito.
2 मी तुम्हास पिण्यासाठी दूध दिले, जड अन्न दिले नाही कारण तुम्ही जड अन्न खाऊ शकत नव्हता व आतासुद्धा तुम्ही खाऊ शकत नाही.
Ndakamusanina amakupa, pe pe chakulya chiyumu, nkambo temwalina libambila; nikuba lino tamuna kulibambila.
3 तुम्ही अजूनसुद्धा दैहिक आहात कारण तुमच्यात मत्सर व भांडणे चालू आहेत, तर तुम्ही दैहिक नाहीत काय व जगातील लोकांसारखे चालत नाही काय?
Nkaambo inywebo muchili munyama. Kaambo aali buzuba akukazyanya akati kanu, tamulikupona mbuli basinyama, tamulikwenda mbuli kupona kwamubuntu na?
4 कारण जेव्हा एक म्हणतो, “मी पौलाचा आहे,” आणि दुसरा म्हणतो, “मी अपुल्लोसाचा आहे,” तेव्हा तुम्ही साधारण मानवच आहात की नाही?
Nkaambo umwi waamba kuti, “Nditobela Pawulo,” alubo umwi waamba kuti, “Nditobela Apolosi,” tamuli zilengwa zyabuntu biyo na?
5 तर मग अपुल्लोस कोण आहे? आणि पौल कोण आहे? ज्यांच्याद्वारे तुम्ही विश्वास ठेवला असे ते सेवक आहेत, प्रत्येकाला प्रभूने जे काम नेमून दिले त्याप्रमाणे ते आहेत.
Ngwani mpo Apolosi? Ngwani Pawulo? Babelesi kwiinda mumulawu ngwakazumina, mbuli Mwaami mbakapa mulimu kuli umwi.”
6 मी बी लावले, अपुल्लोसाने त्यास पाणी घातले, पण देवाने त्याची वाढ केली.
Ndakabyala, alubo Apolosi wakatilila, pesi Leza nguupa kukomezya.
7 तर मग लावणारा काही नाही किंवा पाणी घालणाराही काही नाही, पण वाढविणारा देव हाच काय तो आहे.
Mpo lino, te ooyo uubyala na utilila uli mbabede. Pesi nguLeza uupa kukomena.
8 जे बी पेरतात व पाणी घालतात ते एक आहेत आणि प्रत्येकाला आपआपल्या श्रमाप्रमाणे आपआपली मजूरी मिळेल.
Lino ooyo uubyala alubo uutilila mbamwi, alubo umwi uyootambula chaabilo chakwe mbuli kumulimu wakwe.
9 कारण अपुल्लोस आणि मी देवाच्या सेवाकार्यात सहकर्मी आहोत. तुम्ही देवाचे शेत आहात व देवाची इमारत आहात.
Nkaambo tuli basimulimunyina aLeza. Mulimuunda waLeza, mayake aLeza.
10 १० देवाच्या कृपेद्वारे जे मला दिले आहे त्याप्रमाणे मी सूज्ञ, कुशल बांधणाऱ्यांप्रमाणे पाया घातला आणि दुसरा त्यावर बांधीत आहे तर त्यावरचे बांधकाम आपण कसे करीत आहोत, ह्याविषयी प्रत्येकाने काळजी घ्यावी.
Mbuli kuluzyalo lwaLeza lwakapegwa ndime mbuli muyaki ukonzesya, ndakabika intalisyo alubo umwi ulayaka alinjiyo. Pesi muleke umwi uyeyesya Mbayaka alinjiyo.
11 ११ येशू ख्रिस्त हा जो घातलेला पाया आहे, त्याच्यावाचून इतर कोणीही दुसरा पाया घालू शकत नाही.
Nkaambo takukwe uunga ulabamba ntalisyo imbi itali eeyo yakabikwa, kiili, Jesu Kkilisito.
12 १२ जर कोणी त्या पायावर सोने, चांदी, मौल्यवान दगड, लाकूड, गवत किंवा पेंढा यांनी बांधतो,
Lino na umwi ulayaka aatala antalisyo a ngolide, nsiliva, mabwe ayandika, zisamu, makuba, matete,
13 १३ तर बांधणाऱ्या प्रत्येकाचे काम उघड होईल कारण तो दिवस ते उघडकीस आणील, तो दिवस अग्नीने प्रकट होईल व तोच अग्नी प्रत्येकाचे काम कसे आहे याची परीक्षा करील.
mulimu wakwe ulakuyubununwa, nkaambo buzuba buyobuyubununa. Nkaambo uyooyubununwa mumulilo. Mulilo ulabweezya bube bwawumwi anzyakachita.
14 १४ ज्या कोणाचे त्या पायावर बांधलेले काम टिकेल, त्यास प्रतिफळ मिळेल.
Na mulimu wawumwi ukayimikile, ulakutambula chabilo;
15 १५ पण एखाद्याचे काम जळून जाईल व त्याचे नुकसान होईल तथापि तो स्वतः तारला जाईल परंतु जणू काय अग्नीतून बाहेर पडलेल्यासारखा तारला जाईल.
pesi na mulimu wawumwi wapya, ulakujana kuswekelwa, pesi we lwakwe uyofutulwa, mbuli ufutuka kwiinda mumulilo.
16 १६ तुम्ही देवाचे निवासस्थान आहात आणि देवाचा आत्मा तुमच्यामध्ये निवास करतो हे तुम्हास माहीत नाही काय?
Tamuzi na kuti muli tempele yaLeza akuti muuya waLeza ukkala muli ndinywe?
17 १७ जर कोणी देवाच्या निवासस्थानाचा नाश करतो तर देव त्या व्यक्तीचा नाश करील; कारण देवाचे निवास्थान पवित्र आहे आणि ते तुम्ही आहात.
Na umwi ulajaya tempele yaLeza, Leza ulamujaya muntu ooyo. Nkaambo tempele yaLeza ilasalala, alubo alwenu.
18 १८ कोणीही स्वतःला फसवू नये, जर कोणी स्वतःला या जगाच्या दृष्टीने ज्ञानी समजत असेल तर त्याने खरोखर ज्ञानी होण्यासाठी “मूर्ख” व्हावे. (aiōn g165)
Kutabi umwi uulyena. Na umwi wenu akati kenu uyeya kuti musongo muchiindi echino, mumuleke abe “mufubafuba” kuti abe musongo. (aiōn g165)
19 १९ कारण या जगाचे ज्ञान देवाच्या दृष्टीने मूर्खपणाचे आहे; कारण असे पवित्र शास्त्रात लिहिले आहे की, “देव ज्ञान्यांना त्यांच्याच धूर्तपणात धरतो.”
Kaambo busongo bwenyika iino mbufubafuba aLeza. Kaambo kulilembedwe, “Ulajata basongo mubuchenjezu bwabo.”
20 २० आणि पुन्हा “परमेश्वर जाणतो की, ज्ञान्यांचे विचार व्यर्थ आहेत.”
Alubo, “Mwaami ulizi kuti kuyeya kwabasongo nkwabuyo.”
21 २१ म्हणून मनुष्यांविषयी कोणीही फुशारकी मारू नये कारण सर्व गोष्टी तुमच्या आहेत.
Akaambo kacheechi kutabi umwi ulikankayizya mubantu. Zyoonse zintu nzizyenu,
22 २२ तर तो पौल किंवा अपुल्लोस किंवा केफा, जग, जीवन किंवा मरण असो, आताच्या गोष्टी असोत अथवा येणाऱ्या गोष्टी असोत, हे सर्व तुमचे आहे.
do Pawulo, na Apolosi, na Kefasi, na nyika, na buumi, na lufu, na zintu ziliko, na zintu zichiza. Zyoonse zintu nzizyenu,
23 २३ तुम्ही ख्रिस्ताचे आहात आणि ख्रिस्त देवाचा आहे.
alubo muli baKkilisito, alimwi Kkilisito ngu waLeza.

< १ करि. 3 >