< १ करि. 16 >

1 आता, पवित्र जनाकरीता वर्गणी गोळा करण्यविषयी, जसे मी गलतीयातील मंडळ्यांना आज्ञा केली त्याप्रमाणे तुम्हीही तसे करावे.
U pogledu sabiranja za svete, i vi činite kako odredih crkvama galacijskim.
2 तुमच्यामधील प्रत्येकाने, त्यास यश मिळेल त्या मानाने, प्रत्येक आठवड्याच्या पहिल्या दिवशी द्रव्य जमवून ठेवावे.
Svakoga prvog dana u tjednu neka svaki od vas kod sebe na stranu stavlja i skuplja što uzmogne da se ne sabire istom kada dođem.
3 आणि मी आल्यावर तुम्ही पत्रे देऊन, तुम्ही स्वीकृत केलेल्या लोकांस तुमची देणगी यरूशलेम शहरास घेऊन जायला पाठवीन;
A kada dođem, poslat ću s preporučnicom one koje odaberete da odnesu vašu ljubav u Jeruzalem.
4 आणि जर माझेसुद्धा जाणे योग्य असेल तर ते माझ्याबरोबर येतील.
Bude li vrijedno da i ja pođem, poći će sa mnom.
5 मी मासेदोनिया प्रांतातून जाईन तेव्हा तुमच्याकडे येईन कारण मासेदोनियातून जाण्याची माझी योजना आहे.
A k vama ću doći kad prođem Makedoniju; Makedonijom ću samo proći,
6 आणि शक्य झाल्यास मी तुमच्याबरोबर राहीन आणि हिवाळाही घालवीन, म्हणजे मी जाणार असेन तिकडे तुम्ही मला वाटेस लावावे.
a kod vas ću se možda zadržati ili čak zimovati da me otpratite kamo god pođem.
7 कारण आता थोड्या वेळेसाठी तुम्हास भेटण्याची माझी इच्छा नाही कारण जर प्रभूची इच्छा असेल तर तुमच्यासमवेत काही काळ घालवावा अशी आशा मी धरतो.
Ne bih vas doista htio tek na prolazu vidjeti jer se nadam neko vrijeme proboraviti kod vas, dopusti li Gospodin.
8 पन्नासाव्या दिवसाच्या सणापर्यंत मी इफिसात राहीन
U Efezu ću ostati do Pedesetnice
9 कारण माझ्यासाठी मोठे आणि परिणामकारक द्वार उघडले आहे आणि असे अनेक आहेत जे मला विरोध करतात.
jer vrata mi se otvoriše velika i uspješna, a protivnika mnogo.
10 १० जर तीमथ्य आला तर तो तुमच्याजवळ निर्भयपणे कसा राहील याकडे लक्ष द्या कारण तोसुध्दा माझ्यासारखेच प्रभूचे कार्य करीत आहे.
Ako dođe Timotej, gledajte da bude kod vas bez bojazni jer radi djelo Gospodnje kao i ja.
11 ११ यास्तव कोणीही त्यास तुच्छ मानू नये. तर मग त्याने माझ्याकडे यावे म्हणून त्यास शांतीने पाठवा कारण इतर बंधूंबरोबर त्याच्या येण्याची मी वाट पाहत आहे.
Neka ga dakle nitko ne prezre. A ispratite ga u miru da dođe k meni jer ga s braćom iščekujem.
12 १२ पण बंधू अपुल्लोविषयी असे आहे की, त्याने इतर बांधवांबरोबर तुमच्याकडे यावे, अशी मी त्यास फार विनंती केली पण त्याची आता येण्याची मुळीच इच्छा नव्हती पण त्यास सोयीची संधी मिळेल तेव्हा तो येईल.
A što se tiče brata Apolona: mnogo sam ga nagovarao da ode k vama s braćom. I nikako mu ne bijaše s voljom da sada dođe, no doći će kad mu bude zgodno.
13 १३ सावध असा, तुमच्या विश्वासात बळकट राहा. धैर्यशील व्हा. सशक्त व्हा.
Bdijte postojani u vjeri, muževni budite, čvrsti.
14 १४ प्रत्येक गोष्ट जी तुम्ही कराल ती प्रीतीत करा.
Sve vaše neka bude u ljubavi!
15 १५ आता बंधूंनो स्तेफनाच्या घराण्याविषयी तुम्हास चांगली माहिती आहे. ते अखया प्रांतातील प्रथमफळ आहे; आणि पवित्रजनांच्या सेवेसाठी त्यांनी स्वतःला वाहिले आहे. मी तुम्हास विनंती करतो की,
Zaklinjem vas, braćo - znate dom Stefanin, da je prvina Ahaje i da se posvetiše posluživanju svetih -
16 १६ प्रत्येकजण जो या कार्यात सामील होतो व प्रभूसाठी श्रम करतो अशा लोकांच्या तुम्हीसुद्धा अधीन व्हा.
da se i vi pokoravate takvima i svakomu tko surađuje i trudi se.
17 १७ स्तेफन, फर्तूनात आणि अखायिक हे आल्याने मला आनंद झाला कारण त्यांनी माझ्यासाठी जे केले ते तुम्ही करू शकला नसता.
Radujem se s dolaska Stefanina i Fortunatova i Ahajikova jer oni nadoknadiše vašu nenazočnost:
18 १८ कारण त्यांनी माझा व तुमचा आत्मा प्रफुल्लीत केला आहे. अशा लोकांस मान्यता द्या.
umiriše duh moj i vaš. Cijenite dakle takve.
19 १९ आशियातील मंडळ्या तुम्हास नमस्कार सांगतात. अक्विला, प्रिस्कील्ला व जी मंडळी त्यांच्या घरात जमते, ती प्रभूमध्ये तुम्हास नमस्कार सांगतात,
Pozdravljaju vas crkve azijske. Pozdravljaju vas mnogo u Gospodinu Akvila i Priska zajedno s Crkvom u njihovu domu.
20 २० सर्व बंधू तुम्हास नमस्कार सांगतात, पवित्र चुंबनाने एकमेकांना अभिवादन करा.
Pozdravljaju vas sva braća. Pozdravite jedni druge cjelovom svetim.
21 २१ मी, पौल स्वतः माझ्या स्वतःच्या हाताने हा सलाम लिहीत आहे.
Pozdrav mojom rukom, Pavlovom.
22 २२ जर कोणी प्रभूवर प्रीती करीत नाही, तर तो शापित होवो, “मारानाथा; हे प्रभू ये”
Ako tko ne ljubi Gospodina, neka bude proklet. Marana tha!
23 २३ प्रभू येशूची कृपा तुम्हाबरोबर असो!
Milost Gospodina Isusa s vama!
24 २४ ख्रिस्त येशूमध्ये माझी प्रीती तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.
Ljubav moja sa svima vama u Kristu Isusu!

< १ करि. 16 >