< १ करि. 14 >

1 प्रीती हे तुमचे ध्येय असू द्या आणि आत्मिक दानांची विशेषतः तुम्हास संदेश देता यावा याची मनापासून इच्छा बाळगा.
Landelani uthando; lifise kakhulu izipho zomoya, kodwa ikakhulu ukuthi liprofethe.
2 ज्याला इतर भाषांमध्ये बोलण्याचे दान आहे तो खरे पाहता मनुष्यांबरोबर बोलत नाही तर देवाबरोबर बोलतो कारण तो काय बोलतो हे कोणालाही कळत नाही. पवित्र आत्म्याच्याद्वारे तो गुढ गोष्टी बोलतो.
Ngoba okhuluma ngendimi kakhulumi ebantwini, kodwa kuNkulunkulu; ngoba kakho ozwayo, kanti ukhuluma izimfihlo ngomoya.
3 परंतु जो संदेश देतो तो लोकांशी बोध, उन्नती व सांत्वन याविषयी बोलतो,
Kodwa oprofethayo ukhuluma ebantwini ukwakha lenkuthazo lenduduzo.
4 ज्याला दुसऱ्या भाषेत बोलण्याचे दान आहे, तो स्वतःचीच आध्यात्मिकदृष्ट्या उन्नती करून घेतो, पण ज्याला संदेश देण्याचे दान आहे तो संपूर्ण मंडळीची उन्नती करतो.
Okhuluma ngendimi uyazakha yena, kodwa oprofethayo wakha ibandla.
5 तुम्ही सर्वांनी अन्य भाषेत बोलावे, पण विशेषतः तुम्ही संदेश द्यावेत अशी माझी इच्छा आहे कारण जो कोणी अन्य भाषांत बोलतो, त्याच्यापेक्षा जो संदेश देतो तो मोठा आहे. यासाठी की, मंडळीची उन्नती व्हावी.
Njalo ngiyathanda ukuthi lonke likhulume ngendimi, kodwa kakhulu ukuthi liprofethe; ngoba oprofethayo mkhulu kulokhuluma ngendimi, ngaphandle kokuthi atolike, ukuze ibandla lemukele ukwakhiwa.
6 आता, बंधूनो, जर मी तुमच्याकडे अन्य भाषा बोलण्यासाठी आलो तर तुमचा कसा फायदा होईल? तुमचा फायदा होण्यासाठी मी तुमच्याकडे प्रकटीकरण, दैवी ज्ञान, देवाकडून संदेश किंवा शिकवणूक आणायला नको का?
Khathesi-ke, bazalwane, uba ngifika kini ngikhuluma ngendimi, ngizalisiza ngani, nxa ngingakhulumi kini kumbe ekwembulelweni, loba ekwazini, loba kusiprofetho, kumbe emfundisweni?
7 हे निर्जीव वस्तू उदा. बासरी, वीणा यासारखे आवाज काढण्यासारखे आहे जर ते वाद्य ते निर्माण करीत असलेल्या वेगवेगळ्या आवाजातील फरक स्पष्ट करीत नाही, तर एखाद्याला बासरीवर किंवा वीणेवर कोणते संगीत वाजवले जात आहे ते कसे कळेल?
Ngokunjalo izinto ezingelampilo ezikhalayo, loba umhlanga, loba ichacho, uba zinganiki umehluko ngokukhala, kuzakwaziwa njani okuvuthelwayo ngomhlanga kumbe okutshaywayo ngomqangala?
8 आणि जर कर्णा अस्पष्ट आवाज काढील तर लढाईसाठी कोण तयार होईल?
Ngoba-ke nxa uphondo lunika ukukhala okungaqondakaliyo, ngubani ozazilungisela impi?
9 त्याचप्रमाणे सहज समजेल अशा भाषेतून बोलल्याशिवाय तुम्ही काय बोलला हे कोणाला कसे समजेल? कारण तुम्ही हवेत बोलल्यासारखे होईल.
Kunjalo lani, uba linganiki inkulumo ecacileyo ngolimi, kuzakwaziwa njani okukhulunywayo? Ngoba lizakuba likhuluma emoyeni.
10 १० निःसंशय, जगात पुष्कळ प्रकारच्या भाषा आहेत व कोणतीही अर्थविरहीत नाही.
Kukhona, nxa kungenzakala, imihlobo eminengi kangaka yemisindo emhlabeni kodwa kawukho ongatsho lutho;
11 ११ म्हणून जर मला भाषेचा अर्थ समजला नाही तर जो बोलत आहे त्याच्यासाठी मी विदेशी ठरेन व जो बोलणारा आहे तो माझ्यासाठी विदेशी होईल.
ngakho uba ngingawazi umqondo welizwi, ngizakuba ngowezizweni kulowo okhulumayo, lalowo okhulumayo uzakuba ngowezizweni kimi.
12 १२ नक्की तेच तुम्हासही लागू पडते जर तुम्ही आध्यात्मिक दाने मिळवता म्हणून उत्सुक आहात तर मंडळीच्या उन्नतीसाठी, मंडळीला आध्यात्मिक मजबूती येण्यासाठी जोरदार प्रयत्न करा.
Kunjalo lani, lokhu litshisekela izipho zomoya, dingani ukuthi livame ekwakhiweni kwebandla.
13 १३ म्हणून, जो अन्य भाषेत बोलतो त्याने तो जे बोलला आहे त्याचा अर्थ सांगता यावा म्हणून प्रार्थना करावी.
Ngakho-ke okhulumayo ngendimi kakhuleke ukuthi atolike.
14 १४ कारण जर मी अन्य भाषेतून प्रार्थना केली तर माझा आत्माही प्रार्थना करतो पण माझी बुद्धी निष्फळ राहते.
Ngoba uba ngikhuleka ngendimi, umoya wami uyakhuleka, kodwa ingqondo yami kayilasithelo.
15 १५ मग काय केले पाहिजे? मी माझ्या आत्म्याने प्रार्थना करीन पण त्याचप्रमाणे मी माझ्या बुद्धीनेही प्रार्थना करीन.
Ngakho kuyini? Ngizakhuleka ngomoya, njalo ngizakhuleka langengqondo; ngizahlabelela indumiso ngomoya, njalo ngizahlabelela indumiso langengqondo.
16 १६ कारण जर तू तुझ्या आत्म्याने देवाचे धन्यवाद करशील तर जो ऐकणारा सामान्य व्यक्ती तेथे बसला असेल तर तो तुझ्या उपकारस्तुतीच्या प्रार्थनेत “आमेन” कसे म्हणेल? कारण तू काय म्हणतोस ते त्यास कळत नाही.
Uba kungenjalo, nxa ubonga ngomoya, lowo ogcwalisa indawo yongafundanga uzamutsho njani uAmeni ekubongeni kwakho, lokhu engakwazi okutshoyo?
17 १७ कारण तू उपकारस्ती चांगली करतोस, खरे हे चांगले आहे तरी त्याने दुसर्‍याची उन्नती होत नाही.
Ngoba isibili wena ubonga kuhle, kodwa omunye kakhiwa.
18 १८ मी देवाचे उपकार मानतो, कारण मी तुम्हा सर्वांपेक्षा अधिक भाषा बोलतो.
Ngiyambonga uNkulunkulu wami ukuthi ngikhuluma ngendimi kakhulu kulani lonke;
19 १९ पण मी मंडळीत अन्य भाषेत दहा हजार शब्द बोलण्यापेक्षा, दुसर्‍यांनाही शिकवावे म्हणून, मी माझ्या बुद्धीने पाच शब्द बोलावे हे मला बरे वाटते.
kodwa ebandleni ngithanda ukukhuluma amazwi amahlanu ngengqondo yami, ukuze ngifundise labanye, kulamazwi ayizinkulungwane ezilitshumi ngendimi.
20 २० बंधूनो, तुम्ही विचार करण्यात मुलासारखे असू नका. त्याऐवजी दुष्टतेच्या बाबतीत लहान बाळासारखे निरागस परंतु आपल्या विचारात प्रौढ व्हा.
Bazalwane, lingabi ngabantwana engqondweni; kodwa ebubini banini zingane, lekunakaneni libe ngabakhulileyo.
21 २१ नियमशास्त्र म्हणते, “इतर भाषा बोलणाऱ्याचा उपयोग करून व अन्य भाषेने मी या लोकांशी बोलेन तरीसुद्धा ते माझे ऐकणार नाहीत.” हे असे प्रभू म्हणतो.
Emlayweni kulotshiwe ukuthi: Ngezinye indimi langezinye indebe ngizakhuluma lalesisizwe, langokunjalo labo kabayikungizwa, itsho iNkosi.
22 २२ म्हणून इतर भाषांमध्ये बोलण्याचे दान हे विश्वास ठेवणाऱ्यांसाठी नसून अविश्वासणाऱ्यांसाठी चिन्हादाखल आहे.
Ngakho indimi zingezesibonakaliso, kungeyisikho kwabakholwayo, kodwa kwabangakholwayo; kanti isiprofetho, kungayisiso sabangakholwayo, kodwa sabakholwayo.
23 २३ म्हणून जर संपूर्ण मंडळी एकत्र येते व प्रत्येकजण दुसऱ्या भाषेत बोलत असेल आणि जर एखादा बाहेरचा किंवा अविश्वासणारा आत आला, तर तुम्ही वेडे आहात असे ते तुम्हास म्हणणार नाही का?
Ngakho uba ibandla lonke libuthene ndawonye, labo bonke bakhulume ngendimi, besekungena abangafundanga loba abangakholwayo, kabazukuthi liyahlanya yini?
24 २४ परंतु जर प्रत्येकजण संदेश देऊ लागला आणि जर अविश्वासणारा किंवा बाहेरचा आत आला, तर सर्वजण जे बोलत असतील त्यामुळे त्या ऐकणाऱ्याला त्याच्या पापाची जाणीव होते, ते सर्व त्याचा न्याय करतात;
Kodwa uba bonke beprofetha, njalo kungene othile ongakholwayo loba ongafundanga, uyakhuzwa yibo bonke, ahlolwe yibo bonke,
25 २५ त्याच्या अंतःकरणातील गुपिते माहीत होतात आणि मग तो पालथा पडतो आणि देवाची उपासना करतो व म्हणतो “खरोखर देव तुमच्यामध्ये आहे” तुमच्या भेटींनी मंडळीला मदत व्हावी.
langokunjalo izinto ezifihliweyo zenhliziyo yakhe ziyadalulwa; ngokunjalo uzakuwa ngobuso akhonze uNkulunkulu, ebika ukuthi uNkulunkulu ngoqotho uphakathi kwenu.
26 २६ बंधूंनो मग काय? तुम्ही एकत्र जमता तेव्हा तुमच्यापैकी प्रत्येकजण कोणी स्तोत्र गाण्यास, कोणी शिक्षण देण्यास, कोणी प्रकटीकरण सांगण्यास, कोणी अन्य भाषेतून बोलण्यास, तर कोणी अर्थ सांगण्यास तयार असतो. सर्वकाही मंडळीच्या उन्नतीसाठी असावे.
Ngakho kuyini, bazalwane? Loba nini libuthana, ngulowo lalowo wenu elesihlabelelo, elemfundiso, elolimi, elesambulelo, elokutolika. Konke kakwenzelwe ekwakheni.
27 २७ जर कोणी अन्य भाषेत बोलणार असेल तर दोघांनी किंवा जास्तीत जास्त तिघांनी बोलावे, एकावेळी एकानेच बोलावे आणि एका व्यक्तीने त्या बोलण्याचा अर्थ सांगावा.
Uba umuntu ekhuluma ngendimi, kakube ngababili, kumbe bangadluli kwabathathu, njalo badedelane, lomunye katolike;
28 २८ जर मंडळीत अर्थ सांगणारा कोणी नसेल तर अन्य भाषा बोलणाऱ्याने सभेत गप्प बसावे, स्वतःशी व देवाशी बोलावे.
kodwa uba kungekho umtoliki, kumele athule ebandleni; akhulume kuye ngokwakhe lakuNkulunkulu.
29 २९ दोघा किंवा तिघांनी संदेश द्यावा व इतरांनीही ते काय बोलतात याची परीक्षा करावी.
Abaprofethi-ke ababili loba abathathu kabakhulume, labanye kabahlolisise.
30 ३० बसलेल्यांपैकी एखाद्या व्यक्तीला जर काही प्रकट झाले तर पहिल्या संदेश देणाऱ्याने गप्प बसावे.
Kodwa uba kusembulwa komunye ohleziyo, kathule owokuqala.
31 ३१ जर तुम्हा सर्वांना संदेश देता येत असेल, तर एकावेळी एकानेच बोलावे, यासाठी की सर्वजण शिकतील, सर्वांना बोधपर मार्गदर्शन मिळेल.
Ngoba lonke lingaprofetha munye ngamunye, ukuze bonke bafunde, njalo bonke bakhuthazwe;
32 ३२ जे आत्मे संदेष्ट्यांना प्रेरणा देतात, ते त्या संदेष्ट्यांच्या स्वाधीन असतात.
lemimoya yabaprofethi iyathotshiselwa abaprofethi.
33 ३३ कारण देव हा बेशिस्तपणा आणणारा नसून, शांती आणणारा देव आहे. जशा सर्व मंडळ्या देवाच्या पवित्र लोकांच्या बनलेल्या असतात.
Ngoba uNkulunkulu kayisuye owesiphithiphithi, kodwa ngowokuthula, njengemabandleni wonke abangcwele.
34 ३४ स्त्रियांनी मंडळीत शांत रहावे, कारण त्यांना मंडळीत बोलण्याची परवानगी देण्यात आलेली नाही, कारण नियमशास्त्रसुद्धा असेच म्हणते.
Abesifazana benu kabathule emabandleni; ngoba kabavunyelwa ukukhuluma, kodwa ukuzithoba, njengoba lawo umlayo usitsho.
35 ३५ त्यांना जर काही शिकायचे असेल तर त्यांनी स्वतःच्या पतीला घरी विचारावे कारण स्त्रीने मंडळीत बोलणे हे तिला लज्जास्पद आहे.
Uba-ke bethanda ukufunda ulutho, kababuze kubomkabo ekhaya; ngoba kulihlazo kowesifazana ukukhuluma ebandleni.
36 ३६ देवाचे वचन तुम्हांपासून निघाले आहे काय? किंवा ते फक्त तुमच्यापर्यंतच आले आहे काय?
Kumbe ilizwi likaNkulunkulu laphuma kini? Kumbe lafika kini lodwa yini?
37 ३७ एखादा जर स्वतःला संदेष्टा समजत असेल किंवा जर तो आत्मिक मनुष्य असेल तर त्याने हे ओळखले पाहिजे की, जे मी तुम्हास लिहित आहे ती परमेश्वराकडून देण्यात आलेली आज्ञा आहे.
Uba umuntu ecabanga ukuthi ungumprofethi loba ungowomoya, umele ukwemukela izinto engilibhalela zona, ukuthi ziyimilayo yeNkosi;
38 ३८ परंतु जर कोणी हे मानत नसेल, तर न मानो.
uba umuntu engazi, kumele engazi.
39 ३९ म्हणून माझ्या बंधूनो संदेश देण्यासाठी उत्सुक असा, अन्य भाषेत बोलणाऱ्याला मना करू नका.
Ngakho, bazalwane, tshisekelani ukuprofetha, njalo lingakuvimbeli ukukhuluma ngendimi;
40 ४० तर सर्व गोष्टी योग्य रीतीने आणि व्यवस्थित असाव्यात.
konke kakwenziwe ngemfanelo langokulandelana.

< १ करि. 14 >