< १ करि. 11 >
1 १ मी जसे ख्रिस्ताचे अनुकरण करतो तसे माझे अनुकरण करणारे व्हा.
Bądźcie moimi naśladowcami, jak i ja [jestem naśladowcą] Chrystusa.
2 २ मी तुमची प्रशंसा करतो कारण तुम्ही माझी नेहमी आठवण करता आणि मी तुम्हास नेमून दिलेले विधी, काटेकोरपणे पाळता.
A chwalę was, bracia, [za to], że we wszystkim o mnie pamiętacie i zachowujecie nauki tak, jak [je] wam przekazałem.
3 ३ परंतु तुम्हास हे माहीत व्हावे असे मला वाटते की, ख्रिस्त हा प्रत्येक पुरुषाचे मस्तक आहे आणि प्रत्येक पुरूष हा स्त्रीचे मस्तक आहे आणि देव ख्रिस्ताचे मस्तक आहे
Lecz chcę, żebyście wiedzieli, że głową każdego mężczyzny jest Chrystus, a głową kobiety mężczyzna, a głową Chrystusa Bóg.
4 ४ प्रत्येक पुरुष जो प्रार्थना करताना किंवा संदेश देताना आपले मस्तक आच्छादितो तो आपल्या मस्तकाचा अपमान करतो.
Każdy mężczyzna, gdy się modli albo prorokuje z nakrytą głową, hańbi swoją głowę.
5 ५ परंतु प्रत्येक स्त्री जी आपले मस्तक न झाकता प्रार्थना करते आणि लोकांमध्ये देवाचा संदेश सांगते ती मस्तकाचा अपमान करते कारण ती स्त्री मुंडलेल्या स्त्री सारखीच आहे.
I każda kobieta, gdy się modli albo prorokuje z nienakrytą głową, hańbi swoją głowę. Bo to jest jedno i to samo, jakby była ogolona.
6 ६ जर स्त्री आपले मस्तक आच्छादित नाही तर तिने आपले केस कापून घ्यावेत परंतु केस कापणे किंवा मुंडण करणे स्त्रीस लज्जास्पद आहे. तर तिने आपले मस्तक झाकावे.
Jeśli więc kobieta nie nakrywa [głowy], niech się też strzyże. A jeśli hańbiące jest dla kobiety być ostrzyżoną lub ogoloną, niech nakrywa [głowę].
7 ७ ज्याअर्थी मनुष्य देवाची प्रतिमा आणि वैभव प्रतिबिंबित करतो त्याअर्थी त्याने मस्तक झाकणे योग्य नाही. परंतु स्त्री पुरुषाचे वैभव आहे.
Mężczyzna zaś nie powinien nakrywać głowy, gdyż jest obrazem i chwałą Boga. Kobieta zaś jest chwałą mężczyzny.
8 ८ पुरूष स्त्रीपासून नाही परंतु स्त्री पुरुषापासून आली आहे.
Bo mężczyzna nie jest z kobiety, lecz kobieta z mężczyzny.
9 ९ आणि पुरूष स्त्रीकरिता निर्माण केला गेला नाही, तर स्त्री पुरुषासाठी निर्माण केली गेली.
Mężczyzna bowiem nie został stworzony dla kobiety, ale kobieta dla mężczyzny.
10 १० ह्याकारणामुळे देवदूतांकरिता स्त्रीने आपल्यावर असलेल्या अधिकाराचे चिन्ह मस्तकावर धारण करावे हे योग्य आहे.
Dlatego kobieta powinna mieć na głowie [znak] władzy, ze względu na aniołów.
11 ११ तरीही प्रभूमध्ये स्त्री पुरुषापासून स्वतंत्र नाही व पुरूष स्त्रीपासून स्वतंत्र नाही.
A jednak w Panu ani mężczyzna nie [jest] bez kobiety, ani kobieta nie jest bez mężczyzny.
12 १२ कारण स्त्री जशी पुरुषापासून आहे, तसा पुरुषही स्त्रीपासून जन्माला येतो. परंतु सर्व गोष्टी देवापासून आहेत.
Jak bowiem kobieta jest z mężczyzny, tak też mężczyzna przez kobietę, lecz wszystko jest z Boga.
13 १३ हे तुम्हीच ठरवा की, मस्तक न आच्छादिता देवाची प्रार्थना करणे स्त्रीसाठी योग्य आहे का?
Osądźcie sami: Czy wypada kobiecie modlić się do Boga bez nakrycia [głowy]?
14 १४ पुरुषांनी लांब केस वाढविणे हे त्याच्यासाठी लज्जास्पद आहे. असे निसर्गसुद्धा तुम्हास शिकवीत नाही काय?
Czyż sama natura nie uczy was, że gdy mężczyzna nosi długie włosy, przynosi mu to wstyd?
15 १५ परंतु स्त्रीने लांब केस राखणे हे तिला गौरव आहे कारण तिला तिचे केस आच्छादनासाठी दिले आहेत.
Ale jeśli kobieta nosi długie włosy, przynosi jej to chwałę, gdyż włosy zostały jej dane za okrycie.
16 १६ जर कोणाला वाद घालायचा असेल तर मला दाखवून द्या की, आमची अशी रीत नाही व देवाच्या मंडळ्यांचीही नाही.
A jeśli ktoś wydaje się być kłótliwy, my takiego zwyczaju nie mamy, ani kościoły Boże.
17 १७ पण आताही पुढची आज्ञा देत असताना मी तुमची प्रशंसा मंडळी म्हणून करीत नाही कारण तुमच्या एकत्र येण्याने तुमचे चांगले न होता तुमचे वाईट होते.
Mówiąc to, nie chwalę [was], że się zbieracie nie ku lepszemu, ale ku gorszemu.
18 १८ प्रथम, मी ऐकतो की, जेव्हा मंडळीमध्ये तुम्ही एकत्र जमता, तेथे तुमच्यामध्ये फुटी असतात आणि काही प्रमाणात त्यावर विश्वास ठेवतो.
Najpierw bowiem słyszę, że gdy się zbieracie jako kościół, są wśród was podziały, i po części [temu] wierzę.
19 १९ यासाठी की, जे तुमच्यामध्ये स्वीकृत आहेत ते प्रकट व्हावे म्हणून तुम्हामध्ये पक्षभेद असलेच पाहिजे.
Bo muszą być między wami herezje, aby się okazało, którzy są wypróbowani wśród was.
20 २० म्हणून जेव्हा तुम्ही एकत्र येता तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने प्रभूभोजन घेत नाही.
Gdy więc się zbieracie, nie jest to spożywanie wieczerzy Pańskiej.
21 २१ कारण तुम्ही भोजन करता तेव्हा तुम्हातील प्रत्येकजण अगोदरच आपले स्वतःचे भोजन करतो. एक भुकेला राहतो तर दुसरा अतीतृप्त झालेला असतो.
Każdy bowiem najpierw je własną wieczerzę i jeden jest głodny, a drugi pijany.
22 २२ खाण्यापिण्यासाठी तुम्हास घरे नाहीत का? का तुम्ही देवाच्या मंडळीला तुच्छ मानता आणि जे गरीब आहेत त्यांना खिजवता? मी तुम्हास काय म्हणू? मी तुमची प्रशंसा करू काय? याबाबतीत मी तुमची प्रशंसा करत नाही.
Czyż nie macie domów, aby jeść i pić? Albo czy gardzicie kościołem Bożym i zawstydzacie tych, którzy [nic] nie mają? Co mam wam powiedzieć? Czy mam was pochwalić? Za to [was] nie chwalę.
23 २३ कारण प्रभूपासून जे मला मिळाले तेच मी तुम्हास दिले. प्रभू येशूचा, ज्या रात्री विश्वासघात करण्यात आला. त्याने भाकर घेतली,
Ja bowiem otrzymałem od Pana to, co wam przekazałem, że Pan Jezus tej nocy, której został wydany, wziął chleb;
24 २४ आणि उपकार मानल्यावर ती मोडली आणि म्हणाला, “हे माझे शरीर आहे, जे मी तुमच्यासाठी देत आहे. माझी आठवण करण्यासाठी हे करा.”
A gdy złożył dziękczynienie, połamał i powiedział: Bierzcie i jedzcie, to jest moje ciało, które za was jest łamane. Czyńcie to na moją pamiątkę.
25 २५ त्याचप्रमाणे त्यांनी भोजन केल्यावर त्याने प्याला घेतला आणि म्हणाला, “हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवीन करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझी आठवण करण्यासाठी हे करा.”
Podobnie po wieczerzy [wziął] też kielich, mówiąc: Ten kielich to nowy testament w mojej krwi. Czyńcie to, ilekroć będziecie pić, na moją pamiątkę.
26 २६ कारण जितक्यांदा तुम्हीही भाकर खाता व हा प्याला पिता, तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करीता.
Ilekroć bowiem będziecie jedli ten chleb i pili ten kielich, śmierć Pana zwiastujecie, aż przyjdzie.
27 २७ म्हणून जो कोणी अयोग्य रीतीने प्रभूची भाकर खाईल किंवा प्याला पिईल तो प्रभूच्या शरीराविषयी आणि रक्ताविषयी दोषी ठरेल.
Dlatego też kto je ten chleb albo pije ten kielich Pański niegodnie, będzie winny ciała i krwi Pana.
28 २८ म्हणून मनुष्याने स्वतःची परीक्षा करावी आणि नंतर त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातून प्यावे.
Niech więc człowiek bada samego siebie i tak niech je z [tego] chleba, i niech pije z tego kielicha.
29 २९ कारण जर तो प्रभूच्या शरीराचा अर्थ न जाणता ती भाकर खातो व पितो तर तो खाण्याने आणि पिण्याने स्वतःवर दंड ओढवून घेतो.
Kto bowiem je i pije niegodnie, sąd własny je i pije, nie rozróżniając ciała Pańskiego.
30 ३० याच कारणामुळे तुम्हातील अनेक जण आजारी आहेत आणि काहीजण मरण पावले आहेत.
Dlatego jest wśród was wielu słabych i chorych, a niemało też zasnęło.
31 ३१ परंतु जर आम्ही आमची परीक्षा करू तर आमच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही.
Bo gdybyśmy sami siebie sądzili, nie bylibyśmy sądzeni.
32 ३२ परंतु प्रभूकडून आमचा न्याय केला जातो तेव्हा आम्हास शिस्त लावण्यात येते, यासाठी की, जगातील इतर लोकांबरोबर आम्हासही शिक्षा होऊ नये.
Lecz gdy jesteśmy sądzeni, przez Pana jesteśmy karceni, abyśmy nie byli potępieni [wraz] ze światem.
33 ३३ म्हणून माझ्या बंधूनो व बहिणींनो जेव्हा तुम्ही भोजनास एकत्र येता, तेव्हा एकमेकांसाठी थांबा.
Tak więc, moi bracia, gdy się zbieracie, aby jeść, czekajcie jedni na drugich.
34 ३४ जर कोणी खरोखरच भुकेला असेल तर त्याने घरी खावे यासाठी की तुम्ही दंड मिळण्यासाठी एकत्र जमू नये. मी येईन तेव्हा इतर गोष्टी सुरळीत करून देईन.
A jeśli ktoś jest głodny, niech zje w domu, żebyście się nie zbierali ku sądowi. Co do pozostałych [spraw], zarządzę, gdy przyjdę.