< १ करि. 10 >
1 १ बंधूनो, तुम्हास हे माहीत असावे असे मला वाटते की, आपले सर्व पूर्वज मेघाखाली होते. ते सर्व तांबड्या समुद्रातून सुखरुप पार गेले.
Nolo enim vos ignorare fratres quoniam patres nostri omnes sub nube fuerunt, et omnes mare transierunt,
2 २ मोशेचे अनुयायी म्हणून त्या सर्वाचा मेघात व समुद्रात बाप्तिस्मा झाला.
et omnes in Moyse baptizati sunt in nube, et in mari:
3 ३ त्यांनी एकच आत्मिक अन्न खाल्ले.
et omnes eandem escam spiritalem manducaverunt,
4 ४ व ते एकच आत्मिक पेय प्याले कारण ते त्यांच्यामागून चालणाऱ्या खडकातून पीत होते आणि तो खडक ख्रिस्त होता.
et omnes eundem potum spiritalem biberunt: bibebant autem de spiritali, consequente eos, petra: petra autem erat Christus.
5 ५ परंतु देव त्यांच्यातील पुष्कळ लोकांविषयी आनंदी नव्हता आणि त्यांची प्रेते अरण्यात पसरली होती.
Sed non in pluribus eorum beneplacitum est Deo: nam prostrati sunt in deserto.
6 ६ आणि या गोष्टी आमच्यासाठी उदाहरण म्हणून घडल्या, कारण ज्याप्रमाणे त्यांनी वाईट गोष्टींची अपेक्षा केली, त्याप्रमाणे आपण वाईटाची इच्छा धरणारे लोक होऊ नये.
Hæc autem in figura facta sunt nostri, ut non simus concupiscentes malorum, sicut et illi concupierunt.
7 ७ त्यांच्यापैकी काहीजण मूर्तीपुजक होते तसे होऊ नका. पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे, “लोक खाण्यापिण्यास खाली बसले आणि ते मूर्तीसमोर शरीरासंबंधाच्या हेतूने नाच करण्यासाठी उठले.”
Neque idololatræ efficiamini, sicut quidam ex ipsis: quemadmodum scriptum est: Sedit populus manducare, et bibere, et surrexerunt ludere.
8 ८ ज्याप्रमाणे त्यांच्यातील काहीजणांनी केले तसे व्यभिचार आपण करू नये. त्याचा परिणाम असा झाला की, एका दिवसात तेवीस हजार लोक मरण पावले.
Neque fornicemur, sicut quidam ex ipsis fornicati sunt, et ceciderunt una die viginti tria millia.
9 ९ आणि त्यांच्यातील काहीजणांनी पाहिली तशी आपण ख्रिस्ताची परीक्षा पाहू नये. याचा परिणाम असा झाला की, ते सापांकडून मारले गेले.
Neque tentemus Christum: sicut quidam eorum tentaverunt, et a serpentibus perierunt.
10 १० कुरकुर करू नका, ज्याप्रमाणे त्यांच्यातील काहीजणांनी केली, याचा परिणाम असा झाला की, ते मृत्युदूताकडून मारले गेले.
Neque murmuraveritis, sicut quidam eorum murmuraverunt, et perierunt ab exterminatore.
11 ११ या गोष्टी त्यांच्याबाबतीत उदाहरणार्थ होत्या म्हणून घडल्या व त्या गोष्टी लिहिल्या गेल्या यासाठी की आम्ही ज्यांच्यावर युगाचा शेवट आला आहे अशा आपणासाठी त्या इशारा अशा व्हाव्यात (aiōn )
Hæc autem omnia in figura contingebant illis: scripta sunt autem ad correptionem nostram, in quos fines sæculorum devenerunt. (aiōn )
12 १२ म्हणून मी खंबीरपणे उभा आहे असा जो विचार करतो त्याने आपण पडू नये म्हणून जपावे.
Itaque qui se existimat stare, videat ne cadat.
13 १३ जे मनुष्यास सामान्य नाही अशा कोणत्याही परीक्षेने तुम्हास घेरले नाही. परंतु देव विश्वसनीय आहे. तुम्हास सहन करता येते त्यापलीकडे तो तुमची परीक्षा घेणार नाही. परंतु त्या परीक्षेबरोबर, त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही तयार करील. म्हणजे तुम्हास सहन करणे शक्य होईल.
Tentatio vos non apprehendat nisi humana: fidelis autem Deus est, qui non patietur vos tentari supra id, quod potestis, sed faciet etiam cum tentatione proventum ut possitis sustinere.
14 १४ तेव्हा, माझ्या प्रियांनो, मूर्तीपूजा टाळा.
Propter quod charissimi mihi, fugite ab idolorum cultura:
15 १५ मी तुमच्याशी बुद्धीमान लोक समजून बोलत आहे. मी काय बोलत आहे याचा तुम्हीच न्याय करा.
Ut prudentibus loquor, vos ipsi iudicate quod dico.
16 १६ जो “आशीर्वादाचा प्याला” आम्ही आशीर्वादित करण्यास सांगतो, तो ख्रिस्ताच्या रक्ताच्या सहभागीतेचा प्याला आहे की नाही? जी भाकर आपण मोडतो ती ख्रिस्ताच्या शरीराच्या सहभागितेची भाकर आहे की नाही?
Calix benedictionis, cui benedicimus, nonne communicatio sanguinis Christi est? Et panis, quem frangimus, nonne participatio corporis Domini est?
17 १७ आपण पुष्कळजण असून एक भाकर, एक शरीर असे आहोत, कारण आपण सर्व त्या एका भाकरीचे भागीदार आहोत.
Quoniam unus panis, unum corpus multi sumus, omnes, qui de uno pane participamus.
18 १८ देहासंबंधाने इस्राएल राष्ट्राकडे पाहा. जे अर्पण केलेले खातात ते वेदीचे भागीदार आहेत नाही का?
Videte Israel secundum carnem: nonne qui edunt hostias, participes sunt altaris?
19 १९ तर मी काय म्हणतो? माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे का की मूर्तीला वाहिलेले अन्न काहीतरी आहे किंवा ती मूर्ती काहीतरी आहे?
Quid ergo? Dico quod idolis immolatum sit aliquid? Aut quod idolum, sit aliquid?
20 २० नाही, परंतु उलट माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की, जे अर्पण देवरहित परराष्ट्रीय लोक करतात ते अर्पण भूतांना करतात, देवाला करीत नाहीत आणि तुम्ही भूताचे भागीदार व्हावे असे मला वाटत नाही.
Sed quæ immolant Gentes, dæmoniis immolant, et non Deo. Nolo autem vos socios fieri dæmoniorum:
21 २१ तुम्ही देवाचा आणि भूतांचाही असे दोन्ही प्याले पिऊ शकत नाही. तुम्ही प्रभूच्या मेजाचे आणि भुताच्या मेजाचे भागीदार होऊ शकत नाही.
non potestis calicem Domini bibere, et calicem dæmoniorum: non potestis mensæ Domini participes esse, et mensæ dæmoniorum.
22 २२ आपण प्रभूला ईर्षेस पेटविण्याचा प्रयत्न करीत आहोत का? कारण तो जितका सामर्थ्यशाली आहे तितके आम्ही नाही. तुमचे स्वातंत्र्य देवाच्या गौरवासाठी उपयोगात आणा.
An æmulamur Dominum? Numquid fortiores illo sumus? Omnia mihi licent, sed non omnia expediunt.
23 २३ “काहीही करण्यास आम्ही मुक्त आहोत.” पण सर्वच हितकारक नाही. “आम्ही काहीही करण्यास मुक्त आहोत.” परंतु सर्व गोष्टी लोकांस सामर्थ्ययुक्त होण्यास मदत करीत नाहीत.
Omnia mihi licent, sed non omnia ædificat.
24 २४ कोणीही स्वतःचेच हित पाहू नये तर दुसऱ्यांचेही पाहावे.
Nemo quod suum est quærat, sed quod alterius.
25 २५ मांसाच्या बाजारात जे मांस विकले जाते ते कोणतेही मांस खा. विवेकभावाला त्या मांसाविषयीचे कोणतेही प्रश्न न विचारता खा.
Omne, quod in macello vænit, manducate, nihil interrogantes propter conscientiam.
26 २६ कारण ज्याप्रमाणे पवित्र शास्त्र म्हणते, “पृथ्वी व तिच्यावरील सर्वकाही प्रभूचे आहे.”
Domini est terra, et plenitudo eius.
27 २७ विश्वास न ठेवणाऱ्यांपैकी जर कोणी तुम्हास जेवावयास बोलावले आणि तुम्हास जावेसे वाटले तर विवेकभावाने कोणतेही प्रश्न न विचारता तुमच्यापुढे वाढलेले सर्व खा.
Si quis vocat vos infidelium, et vultis ire: omne, quod vobis apponitur, manducate, nihil interrogantes propter conscientiam.
28 २८ परंतु जर कोणी तुम्हास सांगितले की, “हे मांस यज्ञात देवाला अर्पिलेले होते,” तर विवेकभावासाठी किंवा ज्या मनुष्याने सांगितले त्याच्यासाठी खाऊ नका.
Si quis autem dixerit: Hoc immolatum est idolis: nolite manducare propter illum, qui indicavit, et propter conscientiam:
29 २९ आणि जेव्हा मी “विवेक” म्हणतो तो स्वतःचा असे मी म्हणत नाही तर इतरांचा आणि हेच फक्त एक कारण आहे कारण माझ्या स्वातंत्र्याचा इतरांच्या सद्सदविवेकबुद्धीने न्याय का व्हावा?
conscientiam autem dico non tuam, sed alterius. Ut quid enim libertas mea iudicatur ab aliena conscientia?
30 ३० जर मी आभारपूर्वक अन्न खातो तर माझी निंदा होऊ नये कारण या गोष्टींबद्दल देवाला मी धन्यवाद देतो.
Si ego cum gratia participo, quid blasphemor pro eo quod gratias ago?
31 ३१ म्हणून खाताना, पिताना किंवा काहीही करताना सर्वकाही देवाच्या गौरवासाठी करा.
Sive ergo manducatis, sive bibitis, sive aliud quid facitis: omnia in gloriam Dei facite.
32 ३२ यहूदी लोक, ग्रीक लोक किंवा देवाच्या मंडळीला अडखळण होऊ नका.
Sine offensione estote Iudæis, et Gentibus, et Ecclesiæ Dei:
33 ३३ जसा मी प्रत्येक बाबतीत सर्वांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतो आणि माझ्यासाठी काय हितकारक आहे हे न पाहता इतर प्रत्येकासाठी काय हितकारक आहे ते पाहतो यासाठी की त्यांचे तारण व्हावे.
sicut et ego per omnia omnibus placeo, non quærens quod mihi utile est, sed quod multis: ut salvi fiant.