< १ करि. 1 >

1 देवाच्या इच्छेप्रमाणे ख्रिस्त येशूचा प्रेषित होण्याकरता बोलावलेला, पौल आणि बंधू सोस्थनेस यांजकडून,
Paul, appelé par la volonté de Dieu à être apôtre de Jésus-Christ, et Sosthène, notre frère,
2 करिंथ शहरात असलेल्या देवाच्या मंडळीस, म्हणजे ख्रिस्त येशूमध्ये पवित्र केलेले आणि पवित्रजन होण्यास बोलावलेले आहेत त्यांना व आपला प्रभू येशू ख्रिस्त, म्हणजे त्यांचा व आमचाही प्रभू, याचे नाव सर्व ठिकाणी घेणाऱ्या सर्व लोकांस,
à l'Église de Dieu qui est à Corinthe, à ceux qui sont sanctifiés en Jésus-Christ, appelés à être saints, et à tous ceux qui invoquent, en quelque lieu que ce soit, le nom de notre Seigneur Jésus-Christ, leur Seigneur et le nôtre.
3 देव आपला पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त यापासून कृपा व शांती असो.
Que la grâce et la paix vous soient données de la part de Dieu, notre Père, et du Seigneur Jésus-Christ!
4 ख्रिस्त येशूमध्ये तुमच्यावर झालेल्या देवाच्या कृपेबद्दल मी सतत तुमच्यासाठी माझ्या देवाचे उपकार मानतो.
Je ne cesse de bénir mon Dieu à votre sujet, à cause de la, grâce qui vous a été accordée par lui, en Jésus-Christ;
5 त्याने तुम्हास प्रत्येक बाबतीत, सर्व बोलण्यात व सर्व ज्ञानात समृद्ध केले आहे.
car vous avez été enrichis de tous les dons, ceux de la parole et ceux de la connaissance,
6 जशी ख्रिस्ताविषयी साक्ष खरी असल्याची खात्री तुम्हामध्ये झाली तसल्याच प्रकारे त्याने तुम्हासही संपन्न केले आहे.
le témoignage du Christ ayant été fermement établi parmi vous.
7 म्हणून तुम्हांत कोणत्याही आत्मिक दानाची कमतरता नाही, तर तुम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याची वाट पाहता.
Aussi ne vous manque-t-il aucun don, à vous qui attendez le moment où apparaîtra notre Seigneur Jésus-Christ.
8 तोच तुम्हास शेवटपर्यंत दृढ देखील राखील, जेणेकरून आपल्या प्रभू येशूच्या ख्रिस्ताच्या दिवशी तुम्ही निर्दोष असावे.
C'est lui qui vous rendra fermes jusqu'à la fin, pour que vous soyez irréprochables au jour de notre Seigneur Jésus-Christ.
9 ज्याने आपला पुत्र येशू ख्रिस्त, आपला प्रभू याच्या सहभागितेत तुम्हास बोलावले होते, तो देव विश्वासू आहे.
Le Dieu par qui vous avez été appelés à la communion de son Fils Jésus-Christ, notre Seigneur, est un Dieu fidèle.
10 १० तर आता, बंधूनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी तुम्हास विनंती करतो की, तुम्ही सर्वांनी एकमेकांशी सारख्या मनाने एकत्र व्हावे आणि तुमच्यात मतभेद असू नयेत, तर तुम्ही एकाच हेतूने परिपूर्ण व्हावे.
Je vous exhorte, frères, au nom de notre Seigneur Jésus-Christ, à tenir tous le même langage et à n'avoir point de divisions parmi vous, mais à être bien unis dans une même pensée et dans un même sentiment.
11 ११ कारण माझ्या बंधूनो ख्लोवेच्या मनुष्यांकडून मला असे कळविण्यात आले की, तुमच्यात भांडणे आहेत.
En effet, mes frères, j'ai été informé, par les gens de la maison de Chloé, qu'il y a des disputes parmi vous.
12 १२ माझे म्हणणे असे आहे की तुमच्यातील प्रत्येकजण म्हणतो, “मी पौलाचा आहे.” “मी अपुल्लोचा आहे,” “मी केफाचा आहे,” “मी ख्रिस्ताचा आहे.”
Voici ce que je veux dire: c'est que, parmi vous, chacun parle ainsi: Moi, je suis disciple de Paul; — et moi, d'Apollos; — et moi, de Céphas; — et moi, de Christ. —
13 १३ ख्रिस्त विभागला गेला आहे का? पौल वधस्तंभावर तुमच्यासाठी खिळला गेला होता का? पौलाच्या नावाने तुमचा बाप्तिस्मा झाला का?
Christ est-il divisé? Paul a-t-il été crucifié pour vous, ou avez-vous été baptisés au nom de Paul?
14 १४ मी देवाचे आभार मानतो की, क्रिस्प व गायस यांच्याशिवाय मी कोणाचाही बाप्तिस्मा केला नाही.
Je rends grâces de ce que je n'ai baptisé aucun de vous, — sinon Crispus et Gaius —,
15 १५ यासाठी की, माझ्या नावात तुमचा बाप्तिस्मा करण्यात आला, असे कोणीही म्हणू नये.
afin que personne ne puisse dire que vous avez été baptisés en mon nom.
16 १६ स्तेफनाच्या घरच्यांचा सुद्धा मी बाप्तिस्मा केला, याव्यतिरीक्त, तर इतर कोणाचाही बाप्तिस्मा केल्याचे मला आठवत नाही.
J'ai baptisé aussi la famille de Stéphanas; à part ceux-là, je ne sache pas que j'aie baptisé quelqu'un d'autre.
17 १७ कारण ख्रिस्ताने मला बाप्तिस्मा करण्यासाठी नाही तर शुभवर्तमान सांगण्यासाठी पाठवले, ते देखील मानवी ज्ञानाने नव्हे, यासाठी की, ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील मृत्यूचे सामर्थ्य व्यर्थ होऊ नये.
En effet, ce n'est pas pour baptiser que Christ m'a envoyé, mais c'est pour annoncer l'Évangile, et cela sans recourir à la sagesse des discours, afin que la croix du Christ ne soit pas rendue vaine.
18 १८ कारण ज्यांचा नाश होत आहे अशांसाठी वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे, परंतु ज्यांचे तारण होत आहे, अशांसाठी तो देवाचे सामर्थ्य आहे.
Car la prédication de la croix est une folie pour ceux qui périssent; mais, pour nous qui sommes sauvés, elle est la puissance de Dieu.
19 १९ कारण असे नियमशास्त्रात लिहिले आहे, “शहाण्यांचे शहाणपण मी नष्ट करीन आणि बुद्धिवंताची बुद्धि मी व्यर्थ करीन.”
Aussi est-il écrit: «Je détruirai la sagesse des sages, et j'anéantirai l'intelligence des intelligents.»
20 २० ज्ञानी मनुष्य कोठे आहे? विद्वान कोठे आहे? या जगातील वाद घालणारा कोठे आहे? देवाने जगाचे ज्ञान मूर्खपणाचे ठरवले नाही का? (aiōn g165)
Où est le sage? Où est le scribe? Où est le disputeur de ce siècle? Dieu n'a-t-il pas convaincu de folie la sagesse du monde? (aiōn g165)
21 २१ म्हणून, देवाचे ज्ञान असतानाही, या जगाला स्वतःच्या ज्ञानाने देवाला ओळखता आले नाही, तेव्हा आम्ही जो “मूर्खपणाचा” संदेश गाजवितो त्यामुळे जे विश्वास ठेवणारे आहेत त्यांचे तारण करण्याचे देवाला बरे वाटले.
Car, puisque le monde, avec sa sagesse, n'a pas connu Dieu dans la sagesse de Dieu, il a plu à Dieu de sauver ceux qui croient, par la folie de notre prédication.
22 २२ कारण अनेक यहूदी लोक चमत्काराची चिन्हे विचारतात आणि ग्रीक लोक ज्ञानाचा शोध घेतात,
En effet, tandis que les Juifs demandent des miracles et que les Grecs cherchent la sagesse,
23 २३ परंतु आम्ही वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवितो. हा संदेश यहूदी लोकांसाठी अडखळण आणि ग्रीकांसाठी मूर्खपणा असा आहे.
nous, nous prêchons Christ crucifié, scandale pour les Juifs, folie pour les Païens;
24 २४ परंतु ज्यांना बोलावलेले आहे, अशा यहूदी व ग्रीक दोघांसही ख्रिस्त हा संदेश आहे तो देवाचे सामर्थ्य व देवाचे ज्ञान असाही आहे.
mais, pour ceux qui sont appelés, Juifs comme Grecs, Christ est la puissance de Dieu, la sagesse de Dieu!
25 २५ तथापि ज्यांस तुम्ही देवाचा “मूर्खपणा” म्हणता ते मानव प्राण्याच्या शहाणपणापेक्षा अधिक शहाणपणाचे आहे आणि ज्यांस तुम्ही देवाचा “दुर्बळपणा” समजता ते मानव प्राण्याच्या सशक्तपणाहून अधिक शक्तीशाली आहे.
Car la folie de Dieu est plus sage que les hommes, et la faiblesse de Dieu plus forte que les hommes.
26 २६ तर आता बंधूनो, देवाने तुम्हास केलेल्या पाचारणाबद्दल विचार करा. मानवी दृष्टिकोनातून तुमच्यातील पुष्कळसे शहाणे, सामर्थ्यशाली, उच्च कुळातले नव्हते,
Considérez, frères, que, parmi vous qui avez été appelés, il n'y a ni beaucoup de sages selon la chair, ni beaucoup de puissants, ni beaucoup de nobles.
27 २७ त्याऐवजी जगातले जे मूर्ख त्यांना देवाने निवडले, यासाठी की, शहाण्या मनुष्यास फजित करावे.
Mais Dieu a choisi les choses folles du monde pour confondre les sages; Dieu a choisi les choses faibles du monde pour confondre les fortes;
28 २८ कारण जगातील देवाने दीन, तुच्छ मानलेले, जे “नगण्य” त्यांना निवडले. यासाठी की जे “काहीतरी” आहेत त्यांना नगण्य करावे.
Dieu a choisi les choses viles du monde et les plus méprisées, celles qui ne sont point, pour réduire à néant celles qui sont,
29 २९ यासाठी की कोणाही मनुष्याने देवासमोर बढाई मारू नये.
afin que personne ne se glorifie devant Dieu.
30 ३० कारण तो ख्रिस्त येशूमध्ये तुमच्या जीवनाचा उगम आहे व तो देवाची देणगी म्हणून आपले ज्ञान, आपले नीतिमत्त्व, आपले पवित्रीकरण आणि आपली मुक्ती असा झाला आहे.
Or, c'est grâce à lui que vous appartenez à Jésus-Christ qui a été fait pour nous, de la part de Dieu, sagesse, et justice, et sanctification, et rédemption,
31 ३१ यासाठी की नियमशास्त्रात असे लिहिले आहे, “जो अभिमान बाळगतो त्याने परमेश्वराविषयी बाळगावा.”
— afin, comme le dit l'Écriture, «que celui qui se glorifie, se glorifie dans le Seigneur.»

< १ करि. 1 >