< 1 इतिहास 6 >

1 गेर्षोन, कहाथ आणि मरारी हे लेवीचे पुत्र.
LOS hijos de Leví: Gersón, Coath, y Merari.
2 अम्राम, इसहार, हेब्रोन आणि उज्जियेल हे कहाथाचे पुत्र.
Los hijos de Coath: Amram, Ishar, Hebrón y Uzziel.
3 अहरोन, मोशे, मिर्याम हे अम्रामचे पुत्र. नादाब, अबीहू, एलाजार व इथामार हे अहरोनाचे पुत्र.
Los hijos de Amram: Aarón, Moisés, y Mariam. Los hijos de Aarón: Nadab, Abiú, Eleazar, é Ithamar.
4 एलाजाराचा पुत्र फिनहास, फिनहासचा अबीशूवा.
Eleazar engendró á Phinees, y Phinees engendró á Abisua:
5 अबीशूवाचा पुत्र बुक्की. बुक्कीचा पुत्र उज्जी.
Y Abisua engendró á Bucci, y Bucci engendró á Uzzi;
6 उज्जीने जरह्या याला जन्म दिला आणि जरहयाने मरायोथला.
Y Uzzi engendró á Zeraías, y Zeraías engendró á Meraioth;
7 मरायोथ हा अमऱ्या याचा बाप. आणि अमऱ्या अहीटूबचा.
Y Meraioth engendró á Amarías, y Amarías engendró á Achîtob;
8 अहीटूबचा पुत्र सादोक. सादोकाचा पुत्र अहीमास.
Y Achîtob engendró á Sadoc, y Sadoc engendró á Achîmaas;
9 अहीमासचा पुत्र अजऱ्या. अजऱ्याचा पुत्र योहानान.
Y Achîmaas engendró á Azarías, y Azarías engendró á Johanan;
10 १० योहानानाचा, पुत्र अजऱ्या, शलमोनाने यरूशलेमामध्ये मंदिर बांधले तेव्हा हा अजऱ्याच याजक होता.
Y Johanan engendró á Azarías, el que tuvo el sacerdocio en la casa que Salomón edificó en Jerusalem;
11 ११ अजऱ्या याने अमऱ्या याला जन्म दिला. अमऱ्याने अहीटूबला.
Y Azarías engendró á Amarías, y Amarías engendró á Achîtob;
12 १२ अहीटूबचा पुत्र सादोकाचा पुत्र शल्लूम.
Y Achîtob engendró á Sadoc, y Sadoc engendró á Sallum;
13 १३ शल्लूमचा पुत्र हिल्कीया. हिल्कीयाचा पुत्र अजऱ्या.
Y Sallum engendró á Hilcías, é Hilcías engendró á Azarías;
14 १४ अजऱ्या म्हणजे सरायाचे पिता. सरायाने यहोसादाकला जन्म दिला.
Y Azarías engendró á Seraíah, y Seraíah engendró á Josadec.
15 १५ परमेश्वराने नबुखद्नेस्सराच्या हातून यहूदा आणि यरूशलेम यांचा पाडाव केला तेव्हा यहोसादाक युध्दकैदी झाला.
Y Josadec fué [cautivo] cuando Jehová trasportó á Judá y á Jerusalem por mano de Nabucodonosor.
16 १६ गर्षोम, कहाथ आणि मरारी हे लेवीचे पुत्र.
Los hijos de Leví: Gersón, Coath, y Merari.
17 १७ लिब्नी आणि शिमी हे गर्षोमचे पुत्र.
Y estos son los nombres de los hijos de Gersón: Libni, y Simi.
18 १८ अम्राम, इसहार, हेब्रोन, उज्जियेल हे कहाथाचे पुत्र.
Los hijos de Coath: Amram, Ishar, Hebrón, y Uzziel.
19 १९ महली आणि मूशी हे मरारीचे पुत्र. लेवी कुळातील घराण्यांची ही नावे. पित्याच्या घराण्याप्रमाणे त्यांची वंशावळ दिलेली आहे.
Los hijos de Merari: Mahali, y Musi. Estas son las familias de Leví, según sus descendencias.
20 २० गर्षोमचे वंशज असे, गर्षोमचा पुत्र लिब्नी. लिब्नीचा पुत्र यहथ. यहथया पुत्र जिम्मा.
Gersón: Libni su hijo, Joath su hijo, Zimma su hijo,
21 २१ जिम्माचा पुत्र यवाह. यवाहाचा इद्दो. इद्दोचा पुत्र जेरह. जेरहचा यात्राय.
Joab su hijo, Iddo su hijo, Zera su hijo, Jeothrai su hijo.
22 २२ कहाथाचे वंशज असे, कहाथचा पुत्र अम्मीनादाब. अम्मीनादाबचा कोरह. कोरहचा पुत्र अस्सीर.
Los hijos de Coath: Aminadab su hijo, Coré su hijo, Asir su hijo,
23 २३ अस्सीरचा पुत्र एलकाना आणि एलकानाचा पुत्र एब्यासाफ. एब्यासाफचा पुत्र अस्सीर.
Elcana su hijo, Abiasaph su hijo, Asir su hijo,
24 २४ अस्सीरचा पुत्र तहथ, तहथचा पुत्र उरीएल. उरीएलचा उज्जीया. उज्जीयाचा शौल.
Thahath su hijo, Uriel su hijo, Uzzia su hijo, y Saúl su hijo.
25 २५ अमासय आणि अहीमोथ हे एलकानाचे पुत्र.
Los hijos de Elcana: Amasai, Achîmoth, y Elcana.
26 २६ एलकानाचा पुत्र सोफय. सोफयचा पुत्र नहथ.
Los hijos de Elcana: Sophai su hijo, Nahath su hijo,
27 २७ नहथचा पुत्र अलीयाब. अलीयाबाचा यरोहाम. यरोहामाचा एलकाना. एलकानाचा पुत्र शमुवेल.
Eliab su hijo, Jeroham su hijo, Elcana su hijo.
28 २८ थोरला योएल आणि दुसरा अबीया हे शमुवेलाचे पुत्र.
Los hijos de Samuel: el primogénito Vasni, y Abías.
29 २९ मरारीचे पुत्र, मरारीचा पुत्र महली. महलीचा लिब्नी. लिब्नीचा पुत्र शिमी. शिमीचा उज्जा.
Los hijos de Merari: Mahali, Libni su hijo, Simi su hijo, Uzza su hijo,
30 ३० उज्जाचा पुत्र शिमा शिमाचा हग्गीया आणि त्याचा असाया.
Sima su hijo, Haggía su hijo, Assía su hijo.
31 ३१ कराराचा कोश तंबूत ठेवल्यावर दावीदाने परमेश्वराच्या घरात गायनासाठी काही जणांची नेमणूक केली.
Y estos son á los que David dió cargo de las cosas de la música de la casa de Jehová, después que el arca tuvo reposo:
32 ३२ यरूशलेमेत शलमोन परमेश्वराचे मंदिर बांधीपर्यंत ते दर्शनमंडपाच्या निवासमंडपासमोर गायनपूर्वक सेवा करीत व ते आपल्या कामावर क्रमानुसार हजर राहत.
Los cuales servían delante de la tienda del tabernáculo del testimonio en cantares, hasta que Salomón edificó la casa de Jehová en Jerusalem: después estuvieron en su ministerio según su costumbre.
33 ३३ गायनसेवा करणाऱ्यांची नावे, कहाथ घराण्यातील वंशज, हेमान हा गवई. हा योएलाचा पुत्र. योएल शमुवेलचा पुत्र.
Estos pues con sus hijos asistían: de los hijos de Coath, Hemán cantor, hijo de Joel, hijo de Samuel;
34 ३४ शमुवेल एलकानाचा पुत्र. एलकाना यरोहामाचा पुत्र. यरोहाम अलीएलचा पुत्र. अलीएल तोहाचा पुत्र.
Hijo de Elcana, hijo de Jeroham, hijo de Eliel, hijo de Thoa;
35 ३५ तोहा सूफाचा पुत्र. सूफ एलकानाचा पुत्र. एलकाना महथचा पुत्र. महथ अमासयाचा पुत्र.
Hijo de Suph, hijo de Elcana, hijo Mahath, hijo de Amasai;
36 ३६ अमासय एलकानाचा पुत्र. एलकाना योएलाचा पुत्र. योएल अजऱ्याचा पुत्र. अजऱ्या सफन्याचा पुत्र.
Hijo de Elcana, hijo de Joel, hijo de Azarías, hijo de Sophonías;
37 ३७ सफन्या तहथचा पुत्र. तहथ अस्सीरचा पुत्र. अस्सीर एब्यासाफचा पुत्र. एब्यासाफ कोरहचा पुत्र.
Hijo de Thahat, hijo de Asir, hijo de Abiasaph, hijo de Core;
38 ३८ कोरह इसहारचा पुत्र. इसहार कहाथचा पुत्र. कहाथ लेवीचा आणि लेवी इस्राएलाचा पुत्र.
Hijo de Ishar, hijo de Coath, hijo de Leví, hijo de Israel.
39 ३९ आसाफ हेमानाचा नातलग होता. हेमानच्या उजवीकडे आसाफ उभा राहून सेवा करीत असे. आसाफ हा बरेख्या याचा पुत्र. बरेख्या शिमाचा पुत्र.
Y su hermano Asaph, el cual estaba á su mano derecha: Asaph, hijo de Berachîas, hijo de Sima;
40 ४० शिमा मीखाएलचा पुत्र. मिखाएल बासेया याचा पुत्र. बासेया मल्कीया याचा पुत्र.
Hijo de Michâel, hijo de Baasías, hijo de Malchîas;
41 ४१ मल्कीया एथनीचा पुत्र, एथनी जेरहचा पुत्र जेरह हा अदाया याचा पुत्र.
Hijo de Athanai, hijo de Zera, hijo de Adaia;
42 ४२ अदाया एतानाचा पुत्र. एथाना हा जिम्मा याचा पुत्र. जिम्मा शिमीचा पुत्र.
Hijo de Ethán, hijo de Zimma, hijo de Simi;
43 ४३ शिमी यहथ याचा पुत्र. यहथ हा गर्षोम याचा पुत्र. गर्षोम लेवीचा पुत्र.
Hijo de Jahat, hijo de Gersón, hijo de Leví.
44 ४४ मरारीचे वंशज हेमान आणि आसाफ यांचे नातलग होते. गाताना त्यांचा गट हेमानच्या डावीकडे उभा राहत असे. एथान हा किशीचा पुत्र. किशी अब्दीचा पुत्र. अब्दी मल्लूखचा पुत्र.
Mas los hijos de Merari sus hermanos estaban á la mano siniestra, [es á saber], Ethán hijo de Chîsi, hijo de Abdi, hijo de Maluch;
45 ४५ मल्लूख हशब्याचा पुत्र. हशब्या अमस्याचा पुत्र. अमस्या हा हिल्कीया याचा पुत्र.
Hijo de Hasabías, hijo de Amasías, hijo de Hilcías;
46 ४६ हिल्कीया अमसीचा पुत्र. अमसी बानीचा पुत्र. बानी शेमर पुत्र.
Hijo de Amasai, hijo de Bani, hijo de Semer;
47 ४७ शेमेर महलीचा पुत्र. महली मूशीचा पुत्र, मूशी मरारीचा पुत्र मरारी हा लेवीचा पुत्र.
Hijo de Mahali, hijo de Musi, hijo de Merari, hijo de Leví.
48 ४८ आणि त्यांचे भाऊ लेवी देवाच्या घराच्या मंडपाच्या सर्व सेवेस नेमलेले होते.
Y sus hermanos los Levitas fueron puestos sobre todo el ministerio del tabernáculo de la casa de Dios.
49 ४९ अहरोन व त्याचे पुत्र हे होमवेदीवर आणि धूपवेदीवर अर्पणे करीत असत. देवाचा सेवक मोशे याने जे आज्ञापिले त्याप्रमाणे परमपवित्रस्थानाच्या सर्व कामासाठी व इस्राएल लोकांकरता प्रायश्चित्त करीत.
Mas Aarón y sus hijos ofrecían perfume sobre el altar del holocausto, y sobre el altar del perfume, en toda la obra del lugar santísimo, y para hacer las expiaciones sobre Israel, conforme á todo lo que Moisés siervo de Dios había mandado.
50 ५० अहरोनाचे वंशज असे मोजले, अहरोनाचा पुत्र एलाजार. एलाजाराचा पुत्र फिनहास. फिनहासचा पुत्र अबीशूवा.
Y los hijos de Aarón son estos: Eleazar su hijo, Phinees su hijo, Abisua su hijo;
51 ५१ अबीशूवाचा पुत्र बुक्की. बुक्कीचा पुत्र उज्जी. उज्जीचा पुत्र जरह्या.
Bucci su hijo, Uzzi su hijo, Zeraías su hijo;
52 ५२ जरह्याचा पुत्र मरायोथ. मरायोथचा पुत्र अमऱ्या. अमऱ्याचा पुत्र अहीटूब.
Meraioth su hijo, Amarías su hijo, Achîtob su hijo;
53 ५३ अहीटूबचा पुत्र सादोक आणि सादोकाचा पुत्र अहीमास.
Sadoc su hijo, Achîmaas su hijo.
54 ५४ अहरोनाच्या वंशाला नेमून दिलेले राहण्याचे स्थान खालीलप्रमाणे होते. कहाथ कुळाची पहिली चिठ्ठी निघाली.
Y estas son sus habitaciones, conforme á sus domicilios y sus términos, [las] de los hijos de Aarón por las familias de los Coathitas, porque de ellos fué la suerte:
55 ५५ यहूदा देशातील हेब्रोन नगर आणि त्याच्या आसपासची कुरणे त्यांना मिळाली.
Les dieron pues á Hebrón en tierra de Judá, y sus ejidos alrededor de ella.
56 ५६ त्यापुढची जागा आणि हेब्रोन नगराजवळची खेडी यफुन्नेचा पुत्र कालेब याला मिळाली.
Mas el territorio de la ciudad y sus aldeas se dieron á Caleb, hijo de Jephone.
57 ५७ अहरोनाच्या वंशजांना हेब्रोन हे नगर मिळाले. हेब्रोन हे आश्रयनगर होते. याखेरीज त्यांना लिब्ना, यत्तीर, एष्टमोवा,
Y á los hijos de Aarón dieron las ciudades de Judá de acogimiento, [es á saber], á Hebrón, y á Libna con sus ejidos;
58 ५८ हीलेन त्याच्या कुरणासह, दबीर त्याच्या कुरणासह.
A Jathir, y Esthemoa con sus ejidos, y á Hilem con sus ejidos, y á Debir con sus ejidos;
59 ५९ आशान, युत्ता, आणि बेथ-शेमेश ही नगरे त्यांच्या आसपासच्या कुरणासकट मिळाली.
A Asán con sus ejidos, y á Beth-semes con sus ejidos:
60 ६० बन्यामीनच्या वंशातील लोकांस गिबा, अल्लेमेथ, अनाथोथ ही नगरे त्यांच्या आसपासच्या कुरणासकट मिळाली. कहाथाच्या वंशजांना तेरा नगरे मिळाली.
Y de la tribu de Benjamín, á Geba con sus ejidos, y á Alemeth con sus ejidos, y á Anathoth con sus ejidos. Todas sus ciudades fueron trece ciudades, [repartidas] por sus linajes.
61 ६१ कहाथाच्या उरलेल्या काही वंशजांना चिठ्ठ्या टाकून मनश्शेच्या अर्ध्या वंशांतून दहा नगरे मिळाली.
A los hijos de Coath, que quedaron de su parentela, [dieron] diez ciudades de la media tribu de Manasés por suerte.
62 ६२ गर्षोमच्या वंशजातील कुळांना तेरा नगरे मिळाली. ही त्यांना इस्साखार, आशेर, नफताली आणि बाशान मधील काही मनश्शे या वंशांच्या घराण्यांकडून मिळाली.
Y á los hijos de Gersón, por sus linajes, [dieron] de la tribu de Issachâr, y de la tribu de Aser, y de la tribu de Nephtalí, y de la tribu de Manasés en Basán, trece ciudades.
63 ६३ मरारीच्या वंशजांतील कुळांना बारा नगरे मिळाली. रऊबेनी, गाद आणि जबुलून यांच्या घराण्यांतून, चिठ्ठ्या टाकून त्यांना ती मिळाली.
Y á los hijos de Merari, por sus linajes, de la tribu de Rubén, y de la tribu de Gad, y de la tribu de Zabulón, [se dieron] por suerte doce ciudades.
64 ६४ ही नगरे व भोवतालची जमीन इस्राएल लोकांनी मग लेवींना दिली.
Y dieron los hijos de Israel á los Levitas ciudades con sus ejidos.
65 ६५ यहूदा, शिमोन आणि बन्यामीन यांच्या घराण्यातून, चिठ्ठ्या टाकून, लेवी वंशजांना ती नगरे देण्यात आली.
Y dieron por suerte de la tribu de los hijos de Judá, y de la tribu de los hijos de Simeón, y de la tribu de los hijos de Benjamín, las ciudades que nombraron por sus nombres.
66 ६६ एफ्राईमाच्या वंशजांनी काही नगरे कहाथाच्या वंशजांना दिली. ती ही चिठ्ठ्या टाकून ठरवण्यात आली.
Y á los linajes de los hijos de Coath [dieron] ciudades con sus términos de la tribu de Ephraim.
67 ६७ एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातील आश्रयाची नगरे शखेम व त्याचे कुरण, तसेच गेजेर व त्याचे कुरण,
Y diéronles las ciudades de acogimiento, á Sichêm con sus ejidos en el monte de Ephraim, y á Gezer con sus ejidos,
68 ६८ यकमाम, बेथ-होरोन,
Y á Jocmeam con sus ejidos, y á Beth-oron con sus ejidos,
69 ६९ अयालोन आणि गथ-रिम्मोन ही नगरे कुरणाच्या जमिनीसकट त्यांना मिळाली.
Y á Ajalón con sus ejidos, y á Gath-rimmón con sus ejidos.
70 ७० मनश्शेच्या अर्ध्या वंशातून इस्राएलांनी आनेर आणि बिलाम ही गावे कुरणासह कहाथाच्या वंशाच्या लोकांस दिली.
De la media tribu de Manasés, á Aner con sus ejidos, y á Bilam con sus ejidos, para los del linaje de los hijos de Coath que habían quedado.
71 ७१ गर्षोमच्या वंशजांना बाशानातले गोलान आणि अष्टारोथ हे त्यांच्या भोवतालच्या कुरणासह, मनश्शेच्या अर्ध्या वंशाकडून मिळाले.
Y á los hijos de Gersón [dieron] de la familia de la media tribu de Manasés, á Golan en Basán con sus ejidos y á Astharoth con sus ejidos;
72 ७२ त्याखेरीज गर्षोमच्या वंशजांना केदेश, दाबरथ, रामोथ, आनेम ही नगरे भोवतालच्या कुरणासह इस्साखाराच्या वंशजांकडून मिळाली.
Y de la tribu de Issachâr, á Cedes con sus ejidos, á Dobrath con sus ejidos,
73 ७३ रामोथ त्याच्या कुरणासह आणि आनेम त्याच्या कुरणासह.
Y á Ramoth con sus ejidos, y á Anem con sus ejidos;
74 ७४ माशाल, अब्दोन, हूकोक, रहोब ही नगरे, कुरणासह, आशेर वंशातून गर्षोम कुटुंबांना मिळाली.
Y de la tribu de Aser, á Masal con sus ejidos, y á Abdón con sus ejidos,
75 ७५ हुकोक कुरणासह आणि रहोब कुरणासह दिली.
Y á Ucoc con sus ejidos, y á Rehob con sus ejidos;
76 ७६ गालीलमधले केदेश, हम्मोन, किर्याथाईम ही कुरणासह नगरे नफतालीच्या वंशातून गर्षोम वंशाला मिळाली.
Y de la tribu de Nephtalí, á Cedes en Galilea con sus ejidos, y á Ammón con sus ejidos, á Chîriath-jearim con sus ejidos.
77 ७७ आता उरलेले लेवी म्हणजे मरारी लोक त्यांना योकनीम, कर्ता, रिम्मोनो आणि ताबोर ही नगरे जबुलूनच्या वंशाकडून मिळाली. नगराभोवतीची जमिनही अर्थातच मिळाली.
Y á los hijos de Merari que habían quedado, [dieron] de la tribu de Zabulón á Rimmono con sus ejidos, y á Thabor con sus ejidos;
78 ७८ यार्देनेच्या पलीकडे यरीहोजवळ, यार्देन नदीच्या पूर्वेला रऊबेनी वंशाकडून बेसेर कुरणासकट, यहसा भोवतालच्या कुरणासकट,
Y de la otra parte del Jordán de Jericó, al oriente del Jordán, [dieron], de la tribu de Rubén, á Beser en el desierto con sus ejidos; y á Jasa con sus ejidos,
79 ७९ कदेमोथ कुरणासकट आणि मेफाथ कुरणासकट दिली.
Y á Chêdemoth con sus ejidos, y á Mephaath con sus ejidos;
80 ८० मरारी कुटुंबांना गाद वंशाकडून गिलाद येथील रामोथ, महनाईम कुरणासकट;
Y de la tribu de Gad, á Ramot en Galaad con sus ejidos, y á Mahanaim con sus ejidos,
81 ८१ हेशबोन, याजेर ही नगरे देखील आसपासच्या गायरानासकट मिळाली.
Y á Hesbón con sus ejidos, y á Jacer con sus ejidos.

< 1 इतिहास 6 >