< 1 इतिहास 5 >
1 १ रऊबेन इस्राएलाचा थोरला पुत्र होता. पण त्याने आपल्या पित्यांचे अंथरूण अशुद्ध केले म्हणून त्याच्या जेष्ठपणाचे अधिकार योसेफाच्या पुत्रांना दिले. म्हणून थोरला पुत्र म्हणून त्याची नोंद नाही.
以色列的长子原是吕便;因他污秽了父亲的床,他长子的名分就归了约瑟。只是按家谱他不算长子。
2 २ यहूदा आपल्या भावांपेक्षा पराक्रमी होता आणि पुढारीपण त्याच्यापासून आले. पण ज्येष्ठपणाचे अधिकार योसेफाला मिळाले होते.
犹大胜过一切弟兄,君王也是从他而出;长子的名分却归约瑟。
3 ३ इस्राएलाचा थोरला पुत्र रऊबेन याचे पुत्र हनोख, पल्लू, हेस्रोन आणि कर्मी.
以色列长子吕便的儿子是哈诺、法路、希斯伦、迦米。
4 ४ योएलाचे वंशज हे होते: योएलाचा पुत्र शमाया होता. शमायाचा पुत्र गोग होता. गोगचा पुत्र शिमी होता.
约珥的儿子是示玛雅;示玛雅的儿子是歌革;歌革的儿子是示每;
5 ५ शिमीचा पुत्र मीखा होता. मीखाचा पुत्र राया होता. रायाचा पुत्र बाल होता.
示每的儿子是米迦;米迦的儿子是利亚雅;利亚雅的儿子是巴力;
6 ६ बालाचा पुत्र बैरा होता. अश्शूरचा राजा तिल्गथ-पिल्नेसर याने कैद केले. बैरा रऊबेन वंशाचा नेता होता.
巴力的儿子是备拉。这备拉作吕便支派的首领,被亚述王提革拉·毗列色掳去。
7 ७ योएलाचे भाऊ आणि त्यांची घराणी यांची नोंद वंशावळींच्या नोंदीवरुनच येथे केली आहे. ईयेल मुख्य, जखऱ्या,
他的弟兄照着宗族,按着家谱作族长的是耶利、撒迦利雅、比拉。
8 ८ योएलाचा पुत्र शमा याचा पुत्र आजाज याचा पुत्र बेला. नबो आणि बाल-मौन पासून ते अरोएर पर्यंत राहत होते.
比拉是亚撒的儿子;亚撒是示玛的儿子;示玛是约珥的儿子;约珥所住的地方是从亚罗珥直到尼波和巴力·免,
9 ९ फरात नदीच्या जवळ अगदी पूर्वेला वाळवंटाच्या कडेपर्यंत त्यांनी वस्ती केली होती. कारण गिलाद प्रांतात त्यांच्या गुरेढोरांची फार वाढ झाली होती.
又向东延到幼发拉底河这边的旷野,因为他们在基列地牲畜增多。
10 १० शौलाच्या कारकीर्दीत बेलाच्या लोकांनी हगारी लोकांशी लढाई करून त्यांचा पराभव केला. ते गिलादाच्या पूर्वेकडील सर्व देशात त्यांच्याच तंबूत राहिले.
扫罗年间,他们与夏甲人争战,夏甲人倒在他们手下,他们就在基列东边的全地,住在夏甲人的帐棚里。
11 ११ त्यांच्या जवळच गाद घराण्यातील लोक बाशान प्रांतात सलेखा येथपर्यंत राहत होते.
迦得的子孙在吕便对面,住在巴珊地,延到撒迦。
12 १२ योएल हा बाशानाला मुख्यनायक होता. दुसरा शाफाम. मग यानय व शाफाट.
他们中间有作族长的约珥,有作副族长的沙番,还有雅乃和住在巴珊的沙法。
13 १३ त्यांच्या पित्याच्या घराण्यातले त्यांचे नातलग मीखाएल, मशुल्लाम, शबा, योरय, याकान, जीया आणि एबर हे सात.
他们族弟兄是米迦勒、米书兰、示巴、约赖、雅干、细亚、希伯,共七人。
14 १४ हे अबीहाईलचे वंशज. अबीहाईल हूरीचा पुत्र. हूरी यारोहाचा पुत्र आणि यारोहा गिलादाचा. गिलाद मीखाएलचा. मीखाएल यशीशा याचा पुत्र. यशीशाया यहदोचा पुत्र. यहदो बूजाचा पुत्र.
这都是亚比孩的儿子。亚比孩是户利的儿子;户利是耶罗亚的儿子;耶罗亚是基列的儿子;基列是米迦勒的儿子;米迦勒是耶示筛的儿子;耶示筛是耶哈多的儿子;耶哈多是布斯的儿子。
15 १५ अही हा अब्दीएलचा पुत्र. अब्दीएल गूनीचा पुत्र. अही हा त्या घराण्याचा प्रमुख.
还有古尼的孙子、押比叠的儿子亚希。这都是作族长的。
16 १६ ते गिलादात व बाशानाच्या गावात, शारोनच्या गायरानात आपल्या सीमात राहत होते.
他们住在基列与巴珊和巴珊的乡村,并沙 的郊野,直到四围的交界。
17 १७ यहूदाचा राजा योथाम याच्या दिवसात आणि इस्राएलाचा राजा यराबाम यांच्या दिवसात या सर्वांची मोजणी वंशावळ्यांवरून झाली होती.
这些人在犹大王约坦并在以色列王耶罗波安年间,都载入家谱。
18 १८ मनश्शेच्या वंशातील अर्धे लोक आणि रऊबेनी व गादी लोकांमधून ढाली, तलवारी, धनुष्यबाण चव्वेचाळीस हजार सातशे साठ सैनिक युध्द शिक्षण घेतलेले होते.
吕便人、迦得人,和玛拿西半支派的人,能拿盾牌和刀剑、拉弓射箭、出征善战的勇士共有四万四千七百六十名。
19 १९ हगारी, यतूर, नापीश, नोदाब या लोकांशी त्यांनी लढाया केल्या.
他们与夏甲人、伊突人、拿非施人、挪答人争战。
20 २० आणि ते त्यांच्याशी लढत असता त्यांना साहाय्य मिळाले तेव्हा हगारी व त्यांच्याबरोबरच्या सर्व लोकांचाही त्यांनी पराभव केला. कारण त्यांनी लढाईच्या वेळी देवाला हाक मारली व त्यांनी त्याच्यावर भरवंसा ठेवला होता म्हणून त्याने त्यांना प्रतिसाद दिला.
他们得了 神的帮助,夏甲人和跟随夏甲的人都交在他们手中;因为他们在阵上呼求 神,倚赖 神, 神就应允他们。
21 २१ त्यांनी त्यांची जनावरे यासह, पन्नास हजार उंट, दोन लाख पन्नास हजार मेंढरे, दोन हजार गाढवे आणि एक लाख माणसे मिळवले.
他们掳掠了夏甲人的牲畜,有骆驼五万,羊二十五万,驴二千;又有人十万。
22 २२ पुष्कळ शत्रू मारले गेले कारण देव त्यांच्यासाठी लढला. त्यांना कैद करून नेईपर्यंत ते तिथेच राहिले.
敌人被杀仆倒的甚多,因为这争战是出乎 神。他们就住在敌人的地上,直到被掳的时候。
23 २३ बाशानापासून बाल-हर्मोन, सनीर आणि हर्मोन डोंगर येथपर्यंत मनश्शेच्या अर्ध्या वंशातील लोकांनी वस्ती केली. तेथे त्यांची संख्या बरीच वाढली.
玛拿西半支派的人住在那地。从巴珊延到巴力·黑们、示尼珥与黑门山。
24 २४ मनश्शेच्या घराण्याचे प्रमुख, एफेर, इशी, अलीएल, अज्रीएल, यिर्मया, होदव्या, यहदीएल, हे सर्व बलवान, धैर्यवान आणि प्रसिध्द पुरुष, आपापल्या घराण्यांचे ते पुढारी होते.
他们的族长是以弗、以示、以列、亚斯列、耶利米、何达威雅、雅叠,都是大能的勇士,是有名的人,也是作族长的。
25 २५ पण ते आपल्या पूर्वजांच्या देवाविरुध्द अविश्वासू राहिले. देवाने त्यांच्यासमोरून ज्यांना नष्ट केले होते त्या देशाच्या लोकांच्या देवामागे लागून त्यांनी व्यभिचार केला.
他们得罪了他们列祖的 神,随从那地之民的神行邪淫;这民就是 神在他们面前所除灭的。
26 २६ इस्राएलाच्या देवाने अश्शूरचा राजा पूल व तिल्गथ-पिल्नेसर याना इर्षेला पेटवले. त्याने मनश्शेचा अर्धा वंश, रऊबेन आणि गाद घराण्यातील लोकांस कैद केले. त्यांना हलह, हाबोर, हारा आणि गोजान नदीजवळ आणले. तेव्हापासून आजपर्यंत ते तेथे राहत आहेत.
故此,以色列的 神激动亚述王普勒和亚述王提革拉·毗列色的心,他们就把吕便人、迦得人、玛拿西半支派的人掳到哈腊、哈博、哈拉与歌散河边,直到今日还在那里。