< 1 इतिहास 4 >
1 १ यहूदाच्या मुलांची नावे पेरेस, हेस्रोन, कर्मी, हूर आणि शोबाल.
Uzao wa Yuda ulikuwa Peresi, Hesroni, Karmi, Huri, na Shobali.
2 २ शोबालचा पुत्र राया त्याचा पुत्र यहथ. यहथाचे पुत्र अहूमय आणि लहद. सराथी लोक म्हणजे या दोघांचे वंशज होत.
Shobali alikuwa baba wa Reaya. Reaya alikuwa baba wa Yahathi. Yahathi alikuwa baba wa Ahumai na Lahadi. Hawa walikuwa mababu wa koo za Wasorathi.
3 ३ इज्रेल, इश्मा व इद्बाश ही एटामाची पुत्र. त्यांच्या बहिणीचे नाव हस्सलेलपोनी होते.
Hawa walikuwa mababu wa ukoo katika mji wa Etamu: Yezreeli, Ishma, na Idbashi. Babu yao alikuwa Haselelponi.
4 ४ पनुएलाचा पुत्र गदोर आणि एजेरचा पुत्र हूशा ही हूरची पुत्र. हूर हा एफ्राथाचा प्रथम जन्मलेला पुत्र आणि बेथलेहेमाचा बाप होता.
Penueli alikuwa babu wa koo katika mji wa Gedori. Ezeri alikuwa muanzilishi wa koo katika Husha. Hawa walikuwa uzao wa Huri, mzaliwa wa kwanza wa Efrathi na muanzilishi wa Bethelehemu.
5 ५ अश्शूरचा पुत्र तकोवा. तकोवाला दोन स्त्रिया होत्या. हेला आणि नारा.
Ashuri baba wa Tekoa alikuwa na wake wawili, Hela na Naara.
6 ६ नाराला अहुज्जाम, हेफेर, तेमनी आणि अहष्टारी हे पुत्र झाले.
Naara alimzalia Ahuzamu, Heferi, Temeni na Ahashtari. Hawa walikua wana wa Naara.
7 ७ सेरथ, इसहार, एथ्रान हे हेलाचे पुत्र.
Wana wa Hela walikua Serethi, Ishari, Ethnani,
8 ८ हक्कोसाने आनूब आणि सोबेबा यांना जन्म दिला. हारुमचा पुत्र अहरहेल याच्या घराण्यांचे कुळही कोसच होते.
na Kozi, alikua baba wa Anubu na Sobeba, na koo zilizotoka kwa Aharheli mwana wa Harumu.
9 ९ याबेस आपल्या भावांपेक्षा फार आदरणीय होता. त्याच्या आईने त्याचे नाव याबेस ठेवले. ती म्हणाली, “कारण याच्यावेळी मला असह्य प्रसववेदना झाल्या.”
Yabesi aliheshimika zaidi ya kaka zake. Mama yake alimuita Yabesi. Alisema, “Kwasababu nimemzaa katika huzuni.”
10 १० याबेसाने इस्राएलाच्या देवाची प्रार्थना केली. याबेस म्हणाला, “तू खरोखर मला आशीर्वाद देशील. माझ्या प्रदेशाच्या सीमा वाढविशील. माझ्यावर संकट येऊन मी दुःखीत होऊ नये म्हणून तुझा हात माझ्यावर राहील तर किती चांगले होईल.” आणि देवाने त्याची विनंती मान्य केली.
Yabesi akamuita Mungu wa Israeli na kusema, “Kama tu utanibariki mimi, ongeza mipaka yangu, na mkono wako ukuwa juu yangu. Ukifanya hivi utaninusuru na mabaya, ili kwamba niwe huru na huzuni!” Kwa hivyo Mungu akamjalia maombi yake.
11 ११ शूहाचा भाऊ कलूब. कलूबचा पुत्र महीर. महीरचा पुत्र एष्टोन.
Kelubu kaka wa Shuha akawa baba wa Mehiri, aliyekuwa baba wa Eshtoni.
12 १२ बेथ-राफा, पासेहा आणि तहिन्ना ही एष्टोनचे पुत्र. तहिन्नाचा पुत्र ईर-नाहाश. हे रेखा येथील लोक होत.
Eshtoni akawa baba wa Beth-Rafa, Pasea, na Tehina, ambaye alianzisha mji wa Nahashi. Hawa ni wanaume walioishi Reka.
13 १३ अथनिएल आणि सराया हे कनाजचे पुत्र. हथथ आणि म्योनोथाय हे अथनिएलाचा पुत्र.
Wana wa Kenazi walikua Othinieli na Seraia. Wana wa Othinieli walikuwa Hathathi na Meonothai.
14 १४ म्योनोथायने अफ्राला जन्म दिला आणि सरायाने यवाबला जन्म दिला. यवाब हा गे-हराशीम जे कुशल कारागीराचे मूळपुरुष होय. तेथील लोक कुशल कारागीर असल्यामुळे त्यांनी हे नाव घेतले.
Meonothai akawa baba wa Ofara, na Seraia akawa baba wa Yohabu, mwanzilishi wa Ge Harashimu, ambao watu wake walikua wahunzi.
15 १५ यफुन्ने याचा पुत्र कालेब. कालेबचे पुत्र म्हणजे इरु, एला आणि नाम. एलाचा पुत्र कनाज.
Wana wa Kalebu mwana wa Yefune walikua Iru, Ele na Namu. Wana wa Ela alikua Kenazi.
16 १६ जीफ, जीफा, तीऱ्या आणि असरेल हे यहल्ललेलाचे पुत्र.
Wana wa Yehaleli walikua Zifi, Zifa, Tiriya, na Azareli.
17 १७ एज्राचे पुत्र येथेर व मरद, येफेर व यालोन. मेरेदाची मिसरी पत्नीने मिर्याम, शम्माय आणि एष्टमोवाचा पिता इश्बह यांना जन्म दिला.
Wana wa Ezra walikua Yetheri, Meredi, Eferi, na Yaloni.
18 १८ त्याच्या यहूदी पत्नीला गदोराचा पिता येरेद, सोखोचा पिता हेबेर आणि जानोहाचा पिता यकूथीएल हे झाले. हे बिथ्याचे पुत्र होते, फारोची मुलगी बिथ्या जिच्याशी मेरेदाने लग्न केले होते.
Mke wake Meredi wa Kimisri alimzalia Miriamu, Shamai, na Ishibahi, aliyekua baba wa Eshitemoa. Hawa walikua wana wa Bithia, binti wa Farao, ambaye Meredi alimuoa. Mke wa Kiyahudi wa Meredi alimzalia Yeredi, ambaye alikua baba wa Gedore; Heberi, aliyekua baba wa Soko; na Yekuthieli aliyekua baba wa Zanoa.
19 १९ होदीयाची पत्नी ही नहमाची बहीण होती. हिचे पुत्र गार्मी कईला आणि माकाथी एष्टमोवा यांचे पिता होते.
Kati ya watoto wawili wa mke wa Hodia, dada wa Nahamu, mmoja wao kawa baba wa Keila Mgarimite. Mwingine alikua Eshitemoa Mmakathite.
20 २० अम्नोन, रिन्ना, बेन-हानान, तिलोन हे शिमोनाचे पुत्र. इशीचे पुत्र जोहेथ आणि बेन-जोहेथ.
Wana wa Shimoni walikua Amnoni, Rina, Beni Hanani, na Tilon. Wana wa Ishi walikua Zohethi na Beni Zoheti.
21 २१ यहूदाचा पुत्र शेला याच्यापासून लेखाचा पिता एर, मारेशाचा पिता लादा, आणि तलम कापडाचे कसबाचे काम करणारे अश्बेच्या घराण्यातली ही कुळे झाली.
Uzao wa Shela mwana wa Yuda, Ulikua ni Eri baba wa Leka, Laada baba wa Maresha na koo za wafanyakazi wa kushona kule Beth Ashbea,
22 २२ तसेच त्याच्यापासून योकीम, कोजेबा येथील लोक योवाश आणि मवाबीवर अधिकार चालवणारे साराफ व याशूबी-लेहेम हे जन्मले. फार जुन्या बातमीतून ही नोंद घेतली आहे.
Yoakimu, Wanaume wa Kozeba, na Yoashi na Sarafi, waliokua na mali huko Moabu, lakini walirudi Bethlehemu. ( Maelezo haya yametoka kwenye nakala za zamani.)
23 २३ शेलाचे वंशज हे कुंभार असून ते नेताईम आणि गदेरा येथे राजाच्या चाकरीत होते.
Baadhi ya watu hawa walikuwa ni wafinyanzi walioishi Netaimu na Gedera na wakawa wafanyakazi wa Mfalme.
24 २४ नमुवेल, यामीन, यरिब, जेरह, शौल हे शिमोनाचे पुत्र.
Uzao wa Simeoni ulikua Jamini, Jaribu, Zera, na Shauli.
25 २५ शौलाचा पुत्र शल्लूम. शल्लूमचा पुत्र मिबसाम. मिबसामचा पुत्र मिश्मा.
Shalumu alikua mwana wa Shauli, Mibisamu mwana wa Shalumu, na Mishima mwana wa Mibisamu.
26 २६ मिश्माचा पुत्र हम्मूएल. हम्मूएलचा पुत्र जक्कूर. जक्कूरचा पुत्र शिमी.
Ukoo wa Mishima ulikua Hamueli mwana wake, Zakuri mjukuu wake, na Shimei kitukuu chake.
27 २७ शिमीला सोळा मुले आणि सहा मुली होत्या. पण शिमीच्या भावांना फारशी पुत्र बाळे झाली नाहीत. यहूदातील घराण्यांप्रमाणे त्यांचे घराणे वाढले नाही.
Shimei alikua na wana kumi na sita na mabinti sita. Kaka yake hakua na watoto wengi, Hivyo koo zao hazikuongezeka kwa idadi kubwa kama wato wa Yuda walivyoongezeka.
28 २८ शिमीच्या वंशजातील लोक बैर-शेबा, मोलादा व हसर-शुवाल.
Waliishi Beasheba, Molada, na Hazari Shuali.
29 २९ बिल्हा, असेम, तोलाद,
Pia waliishi Bilha, Ezemu, Toladi,
30 ३० बथुवेल, हर्मा सिकलाग,
Bethueli, Horma, Zikilagi,
31 ३१ बेथ-मर्का-बोथ, हसर-सुसीम, बेथ-बिरी व शाराइम येथे राहत होते. दावीदाच्या कारकीर्दीपर्यंत ही त्यांची नगरे होती.
Bethi Markabothi, Hazari Susimi, Bethi Biri, na Shaaraimu. Hii ilikua miji yao mpaka utawala wa Daudi.
32 ३२ त्यांचे गांव एटाम, अईन, रिम्मोन, तोखेन आणि आशान अशी या पाच नगरांची नावे.
Vijiji vyao vitano vilikua Etamu, Aini, Tocheni, na Ashani,
33 ३३ बालापर्यंत त्याच नगरांच्या आसपासच्या खेड्यापाड्यांमधूनही ते राहत होते. आपल्या वंशावळींची नोंदही त्यांनीच ठेवली.
pamoja na mipaka ya vijiji kwa umbali wa Baali. Haya yalikua makazi yao, na walitunza kumbukumbu za uzao wao.
34 ३४ त्यांच्या घराण्यातील वडिलाची नांवे मेशोबाब, यम्लेक, अमस्याचा पुत्र योशा,
Viongozi wa ukoo walikua Meshobabu, Yamileki, Yoshahi mwana wa Amazia,
35 ३५ योएल, येहू हा योशिब्याचा पुत्र, सरायाचा पुत्र योशिब्या, असिएलचा पुत्र सराया,
Yoeli, Yehu mwana wa Yoshibia mwana wa Seraia mwana wa Asieli,
36 ३६ एल्योवेनाय, याकोबा, यशोहाया, असाया, अदीएल, यशीमिएल, बनाया,
Elioenai, Yaakoba, Yeshohaia, Asaia, Adieli, Yesimieli, Benaia,
37 ३७ जीजा हा शिफीचा पुत्र. शिफी हा अल्लोनचा पुत्र, अल्लोन यदायाचा पुत्र, यदाया शिम्रीचा पुत्र, आणि शिम्री शमायाचा पुत्र.
na Ziza mwana wa Shifi mwana wa Aloni mwana wa Yedaia mwana wa Shimiri mwana wa Shemaia.
38 ३८ ज्यांची नावे येथे दाखल केली आहेत ते सर्व आपआपल्या कुळांचे प्रमुख होते. त्यांच्या घराण्याची झपाटयाने वाढ झाली.
Hawa walio orodheshwa kwa majina walikua viongozi wa koo zao, na koo zao ziliongezeka sana.
39 ३९ ते खोऱ्याच्या पूर्वेला गदोरच्या सीमेबाहेरही जाऊन पोहोंचले. आपल्या कळपांना चरायला गायराने हवे म्हणून जमिनीच्या शोधात ते गेले.
Walienda karibu na Gedori, mashariki mwa bonde, kutafuta malisho ya mifugo yao.
40 ४० त्यांना विपुल व चांगली गायराने मिळाली. तो देश मोठा असून शांत व स्वस्थ होता. हामाचे वंशज पूर्वी या भागात राहत असत.
Walipata malisho mengi na mazuri. Nchi ilikua tambarare, tulivu na ya amani. Wahamu waliishi hapo awali.
41 ४१ हिज्कीया यहूदाचा राजा होता त्यावेळची ते लोक गदोरपर्यंत आले आणि हामच्या लोकांशी त्यांनी लढाई केली. हामच्या लोकांच्या राहुट्या त्यांनी उद्ध्वस्त केल्या. तेथे राहणाऱ्या मूनी लोकांसही त्यांनी ठार केले. आजही या भागात मूनी नावाचे लोक आढळत नाहीत. तेव्हा या लोकांनी तेथे वस्ती केली. मेंढरांसाठी गायराने असल्याने ते तेथे राहिले.
Hao walio orodheshwa hapo kwa majina walikuja katika siku za Hezekia mfalme wa Yuda, na wakashambulia makazi ya Wahamu na Wameuni, ambao pia walikua hapo. Waliwaangamiza kabisa na kuishi hapo sababu walipata malisho kwa ajili ya mifugo yao.
42 ४२ शिमोनाच्या घराण्यातील पाचशे माणसे सेईर डोंगरावर त्याच्या नेत्याबरोबर गेली. इशीचे पुत्र पलट्या, निरह्या, रफाया आणि उज्जियेल हे होते.
Wanaume mia tano wa kabila la Simeoni walienda katika mlima Seiri, na viongozi wao Pelatia, Nearia, Refaia, na Uzieli, wana wa Ishi.
43 ४३ काही अमालेकी लोकांचा त्यातूनही निभाव लागला ते तेवढे अजून आहेत. त्यांना शिमोन्यांनी ठार केले. तेव्हापासून सेईरमध्ये अजूनही शिमोनी लोक राहत आहेत.
Waliwashinda wakimbizi wa Waamaleki waliobakia, na wakaishi hapo hadi siku hii.