< 1 इतिहास 26 >

1 द्वारपालांचे गट: हे पहारेकरी कोरहाच्या वंशजातील होते. त्यांची नावे अशी: आसाफाच्या वंशातील कोरहाचा पुत्र मेशेलेम्या.
門を守る者の組は次のとおりである。すなわちコラびとのうちでは、アサフの子孫のうちのコレの子メシレミヤ。
2 मेशेलेम्या याला पुत्र होते. जखऱ्या हा त्यातला मोठा. यदीएल दुसरा, जबद्या तिसरा, यथनिएल चौथा
メシレミヤの子たちは、長子はゼカリヤ、次はエデアエル、第三はゼバデヤ、第四はヤテニエル、
3 एलाम पाचवा, यहोहानान सहावा, एल्योवेनय सातवा.
第五はエラム、第六はヨハナン、第七はエリヨエナイである。
4 ओबेद-अदोम, याची अपत्ये. शमाया थोरला, यहोजाबाद दुसरा, यवाह तिसरा, साखार चौथा, नथनेल पाचवा,
オベデ・エドムの子たちは、長子はシマヤ、次はヨザバデ、第三はヨア、第四はサカル、第五はネタネル、
5 अम्मीएल सहावा, इस्साखार सातवा, पउलथय आठवा. देवाची ओबेद-अदोमावर खरोखच कृपादृष्टी होती.
第六はアンミエル、第七はイッサカル、第八はピウレタイである。神が彼を祝福されたからである。
6 शमाया हा ओबेद-अदोमाचा पुत्र. त्यालाही पुत्र संतती होती. हे पुत्र सामर्थ्यवान असल्यामुळे त्यांची आपल्या घराण्यावर सत्ता होती.
彼の子シマヤにも数人の子が生れ、有能な人々であったので、その父の家を治める者となった。
7 अथनी, रफाएल, ओबेद एलजाबाद, अलीहू आणि समख्या हे शमायाचे पुत्र. एलजाबादचे भाउबंद सर्व प्रकारच्या कामात कुशल होते.
すなわちシマヤの子たちはオテニ、レパエル、オベデ、エルザバデで、エルザバデの兄弟エリウとセマキヤは力ある人々であった。
8 हे सर्व ओबेद-अदोमाचे वंशज त्याची अपत्ये, पुरुष नातेवाईक असे सर्वच निवासमंडपाच्या सेवेत बलवान व पराक्रमी होते. ओबेद-अदोमाचे एकंदर बासष्ट वंशज होते.
これらは皆オベデ・エドムの子孫である。彼らはその子たちおよびその兄弟たちと共にその勤めに適した力ある人々で、合わせて六十二人、みなオベデ・エドムに属する者である。
9 मेशेलेम्याचे पुत्र आणि भाऊबंद मिळून अठराजण होते. ते सर्व पराक्रमी होते.
メシレミヤにも子たちと兄弟たち合わせて十八人あって、皆力ある人々であった。
10 १० मरारीच्या वंशातला होसा. शिम्रीला ज्येष्ठपद दिले होते. हा जन्माने ज्येष्ठ नव्हता, पण त्याच्या पित्याने त्यास मुख्य केले होते.
メラリの子孫ホサにも子たちがあった。そのかしらはシムリ、これは長子ではなかったが、父はこれをかしらにしたのであった。
11 ११ हिल्कीया दुसरा. टबल्या तिसरा. जखऱ्या चौथा. होसास पुत्र आणि भाऊबंद मिळून तेराजण होते.
次はヒルキヤ、第三はテバリヤ、第四はゼカリヤである。ホサの子たちと兄弟たちは合わせて十三人である。
12 १२ यांना द्वारपालांच्या गटांवर प्रमुख नेमलेले होते. आपल्या इतर भाऊबंदाप्रमाणेच द्वारपालांनाही परमेश्वराच्या मंदिरातील सेवेचे काम नेमून दिलेले होते.
これらは門を守る者の組の長たる人々であって、その兄弟たちと同様に務をなして、主の宮に仕えた。
13 १३ एकेका दरवाजाच्या रक्षणाची जबाबदारी एकेका घराण्याकडे दिलेली होती. एकेका दारासाठी चिठ्ठी टाकून हे काम सोपवले गेले. त्यामध्ये वयाने लहान मोठा असा भेदभाव नव्हता.
彼らはそれぞれ門のために小なる者も、大なる者も等しく、その氏族にしたがってくじを引いた。
14 १४ शेलेम्याच्या वाटणीला पूर्वेकडचे दार आले. त्याचा पुत्र जखऱ्या याच्यासाठी नंतर चिठ्ठी टाकण्यात आली. हा समजदार मंत्री होता. उत्तरेच्या द्वारासाठी त्याची निवड झाली.
東の門のくじはシレミヤに当った。また彼の子で思慮深い議士ゼカリヤのためにくじを引いたが、北の門のくじがこれに当った。
15 १५ ओबेद-अदोमाच्या वाटणीला दक्षिण दरवाजा आला. मौल्यवान चीजवस्तू ठेवलेल्या भांडाराचे रक्षण करण्याचे काम ओबेद-अदोमाच्या मुलांकडे आले.
オベデ・エドムには南の門のくじ、その子たちには倉のくじ、
16 १६ शुप्पीम आणि होसा यांची निवड पश्चिम दरवाजासाठी आणि शल्लेकेथाची चढणीच्या वाटेवरील दरवाजासाठी झाली. प्रत्येक घराण्यासाठी पहारेकरी स्थापित केले होते.
シュパムとホサには西の門のくじが当った。これは坂の大路にあるシャレケテの門のかたわらにあった。守る者と守る者とが相対していた。
17 १७ पूर्वेला सहा लेवी, उत्तरेला प्रतिदिनी चार, दक्षिणेला प्रतिदिनी चार आणि भांडाराच्या रक्षणासाठी दोन जोड्या होत्या.
東の方には毎日六人、北の方には毎日四人、南の方には毎日四人、倉には二人と二人、
18 १८ पश्चिमेकडील शिवारावर चारजण पहारा देत, चारजण त्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर आणि दोन शिवारात असत.
西の方パルバルには大路に四人、パルバルに二人。
19 १९ हे व्दारपालांचे वर्ग होते. कोरहाचे वंशज आणि मरारीरीचे वंशज यांनी ते भरले होते.
門を守る者の組は以上のとおりで、コラの子孫とメラリの子孫であった。
20 २० देवाच्या मंदिरातील भांडारावर आणि समर्पित वस्तूंच्या भांडारावर लेव्यातला अहीया हा प्रमुख होता.
レビびとのうちアヒヤは神の宮の倉および聖なる物の倉をつかさどった。
21 २१ लादान हा गेर्षोनाच्या वंशातील. यहीएली हा लादानच्या घराण्यातील प्रमुखांपैकी एक होता.
ラダンの子孫すなわちラダンから出たゲルションびとの子孫で、ゲルションびとの氏族の長はエヒエリである。
22 २२ जेथाम आणि त्याचा भाऊ योएल हे यहीएलीचे पुत्र होते. परमेश्वराच्या मंदिरातील भांडारावर देखरेख ठेवणारे होते.
エヒエリ、ゼタムおよびその兄弟ヨエルの子たちは主の宮の倉をつかさどった。
23 २३ अम्रामी, इसहारी, हेब्रोनी आणि उज्जियेली यांच्या कुळांतूनसुध्दा आणखी काही प्रमुखांची नेमणूक करण्यात आली.
アムラムびと、イヅハルびと、ヘブロンびと、ウジエルびとのうちでは次のとおりであった。
24 २४ मोशेचा पुत्र गेर्षोम, याचा पुत्र शबुएल हा भांडारावर देखरेख करणारा नायक होता.
すなわちモーセの子ゲルショムの子シブエルは倉のつかさであった。
25 २५ अलियेजराकडून त्याचे भाऊबंद: अलियेजाराचा पुत्र हा रहब्या होता. रहब्याचा पुत्र यशया. यशयाचा पुत्र योराम. योरामाचा पुत्र जिख्री. आणि जिख्रीचा पुत्र शलोमोथ.
その兄弟でエリエゼルから出た者は、その子はレハビヤ、その子はエサヤ、その子はヨラム、その子はジクリ、その子はシロミテである。
26 २६ दावीद राजा व पित्याच्या प्रमुखांनी व हजारांचे व शंभरांचे सेनापती आणि सैन्याचे सरदार यांनी मंदिरासाठी समर्पित केलेल्या वस्तूच्या भांडारावर शलोमोथ आणि त्याचे भाऊबंद देखरेख करत होते.
このシロミテとその兄弟たちはすべての聖なる物の倉をつかさどった。これはダビデ王と、氏族の長と、千人の長と、百人の長と、軍の長たちのささげたものである。
27 २७ युध्दात मिळालेल्या काही लूटीपैकी त्यांनी परमेश्वराच्या मंदिराच्या दुरुस्तीसाठी समर्पित केली.
すなわち彼らが戦いで獲たぶんどり物のうちから主の宮の修繕のためにささげたものである。
28 २८ शमुवेल संदेष्टा, कीशचा पुत्र शौल आणि नेरचा पुत्र अबनेर, सरुवेचा पुत्र यवाब यांनी परमेश्वरास समर्पित केलेल्या प्रत्येक पवित्र वस्तूंचे रक्षणही शलोमोथ आणि त्याचे भाऊबंद करत असत.
またすべて先見者サムエル、キシの子サウル、ネルの子アブネル、ゼルヤの子ヨアブなどがささげた物。すべてこれらのささげ物はシロミテとその兄弟たちが管理した。
29 २९ इसहाराच्या वंशजापैकी कनन्या व त्याची अपत्ये इस्राएलांच्या सुरक्षा व्यवस्थेचे प्रमुख होते. ते अधिकारी व न्यायधीश होते.
イヅハルびとのうちでは、ケナニヤとその子たちが、つかさおよびさばきびととしてイスラエルの外事のために選ばれた。
30 ३० हेब्रोनी वंशातला, हशब्या व त्याचे भाऊबंद, एक हजार सातशे शूर वीर, यार्देनेच्या अलिकडे पश्चिमेस, परमेश्वराच्या सेवेसाठी व राजाच्या कामासाठी इस्राएलावर देखरेख करत होते.
ヘブロンびとのうちでは、ハシャビヤおよびその兄弟など勇士千七百人があって、ヨルダンのこなた、すなわち西の方でイスラエルの監督となり、主のすべての事を行い、王に奉仕した。
31 ३१ हेब्रोनी यांच्या वंशातला यरीया हा त्यांच्या वंशाचा प्रमुख होता, त्याच्या घराण्यावरुन त्याची मोजणी केली. दावीदाच्या राज्याच्या कारकिर्दीच्या चाळीसाव्या वर्षी त्यांचा तपास केला आणि त्यांना गिलाद मधल्या याजेर नगरात कर्तबगार अशी माणसे आढळली.
ヘブロンびとのうちでは、系図と氏族によってエリヤがヘブロンびとの長であったが、ダビデの治世の第四十年に彼らを尋ね求め、ギレアデのヤゼルで彼らのうちから大勇士を得た。
32 ३२ आपापल्या घराण्यांचे प्रमुख आणि पराक्रमी असे दोन हजार सातशे नातलग यरीयाला होते. देवाच्या प्रत्येक कार्यासाठी आणि राज्याचे कामकाज यासाठी, रऊबेनी, गादी आणि मनश्शेचा अर्धा वंश यांच्यावर देखरेख करणारे असे हे दोन हजार सातशे जण दावीदाने नेमले.
ダビデ王は彼とその兄弟など氏族の長たち二千七百人の勇士をルベンびと、ガドびと、マナセびとの半部族の監督となし、すべて神につける事と王の事とをつかさどらせた。

< 1 इतिहास 26 >