< 1 इतिहास 25 >

1 दावीद आणि निवासमंडपाच्या अधिकाऱ्यांनी मिळून आसाफाच्या मुलांना एका खास कामासाठी निवडले. हेमान व यदूथून ही ती अपत्ये. वीणा, सतारी आणि झांजा ही वाद्ये, वाजवून देवाचा संदेश देणे असे त्यांच्या कामाचे स्वरूप होते. हे काम करणाऱ्या लोकांची यादी:
And David and the captains of the host set apart for service, unto the sons of Asaph and Heman and Jeduthun, such as should prophesy, with lyres, with harps, and with cymbals, —and, the number of the workers, for their service, was:
2 आसाफाच्या वंशातले: जक्कूर, योसेफ, नथन्या आणि अशेराला, हे आसाफाचे पुत्र राज्याच्या देखरेखीखाली आसाफाच्या मार्गदर्शनाखाली संदेश देत होते.
Of the sons of Asaph, Zaccur and Joseph and Nethaniah and Asarelah, the sons of Asaph, —under the direction of Asaph, who prophesied under the direction of the king.
3 यदूथूनाचे वंशज: गदल्या, सारी, यशया, हशब्या व मत्तिथ्या हे सहाजण, आपला पिता यदूथून याच्या मार्गदर्शनाखाली वीणा वाजवून परमेश्वराचे उपकारस्मरण आणि स्तवन करून संदेश देत असे.
Of Jeduthun, the sons of Jeduthun, —Gedaliah, and Zeri, and Jeshaiah, Hashabiah, and Mattithiah—six, under the direction of their father Jeduthun, with the lyre, as he prophesied, in giving thanks and offering praise unto Yahweh.
4 हेमानाचे वंशज: बुक्कीया, मत्तन्या, उज्जियेल, शबुएल, यरीमोथ, हनन्या, हनानी, अलियाथा, गिद्दल्ती, रोममती-एजेर, याश्बकाशा, मल्लोथी, होथीर आणि महजियोथ.
Of Heman, the sons of Heman—Bukkiah, Mattaniah, Uzziel, Shebuel, and Jeremoth, Hananiah, Hanani, Eliathah, Giddalti, and Romamti-ezer, Joshbekashah, Mallothi, Hothir, Mahazioth.
5 हेमान हा राजाचा संदेष्टा होता, हे सर्व हेमानाचे पुत्र शिंग वाजवायला होते. देवाने हेमानाला चौदा मुले आणि तीन मुली देऊन सन्मानीत केले.
All these, were sons of Heman, the seer of the king in the things of God, at the lifting of the horn. And God gave to Heman, fourteen sons and three daughters,
6 हे सर्व आपल्या पित्याच्या मार्गदर्शनाखाली परमेश्वराच्या घरात ही अपत्ये झांजा, सतारी आणि वीणा वाजवून गीते गाण्यासाठी आणि देवाच्या घरातील सेवेसाठी होते. आसाफ, यदूथून व हेमान हे राजाच्या देखरेखीखाली होती.
All these, were under the direction of their father, in the singing of the house of Yahweh, with cymbals, harps and lyres, for the service of the house of God, —Asaph and Jeduthun and Heman, under the direction of the king.
7 ते आणि त्यांचे नातेवाईक गायनकलेत पारंगत व परमेश्वरासाठी गायनाचे प्रशिक्षण घेतलेले दोनशे अठ्याऐशींजण होते.
And, the number of them—with their brethren, who were instructed in singing unto Yahweh, —even all the skilful, was two hundred and eighty-eight.
8 त्यांनी लहानथोर, गुरु-शिष्य सर्वानी आपल्या कामासाठी सारख्याच चिठ्ठ्या टाकल्या व कामे वाटून घेतली.
So they cast lots for their charges, all alike, as the small so the great, the teacher with the learner.
9 तेव्हा आसाफाच्या मुलांच्या संबंधीत: पहिली चिठ्ठी योसेफाची निघाली; दुसरी गदल्याची त्याची अपत्ये आणि भाऊबंद यांच्यातून बाराजणांना घेतले.
And the first lot came forth for Asaph, to Joseph, —Gedaliah, the second, he and his brethren and his sons, twelve.
10 १० तिसरी चिठ्ठी जक्कूरचे पुत्र आणि भाऊबंद यांच्यामधून, बाराजणांना घेतले.
The third, Zaccur, his sons and his brethren, twelve.
11 ११ चौथी चिठ्ठी इस्रीची, त्याचे पुत्र आणि आप्त यांच्यामधून बाराजणांना घेतले.
The fourth, to Izri, his sons and his brethren, twelve.
12 १२ पाचवी नथन्याची त्याचे पुत्र व नातलग यामधून बाराजण.
The fifth, Nethaniah, his sons and his brethren, twelve.
13 १३ सहावी चिठ्ठी बुक्कीयाची. त्याचे पुत्र आणि भाऊबंद यांमधून बाराजण.
The sixth, Bukkiah, his sons and his brethren, twelve.
14 १४ सातवी यशरेलाची. त्याचे पुत्र आणि भाऊबंद यांमधून बाराजण.
The seventh, Jesharelah, his sons and his brethren, twelve.
15 १५ यशयाची आठवी. या चिठ्ठीनुसार पुत्र आणि भाऊबंद यामधून बाराजण.
The eighth, Jeshaiah, his sons and his brethren, twelve.
16 १६ नववी मत्तन्याची. त्याचे पुत्र आणि नातलग यामधून बाराजण.
The ninth, Mattaniah, his sons and his brethren, twelve.
17 १७ दहावी शिमीची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण.
The tenth, Shimei, his sons and his brethren, twelve.
18 १८ अकरावी अजरेलाची. त्याचे पुत्र आणि नातलाग यांमधून बाराजण.
The eleventh, Azarel, his sons and his brethren, twelve.
19 १९ बारावी हशब्याची. त्याचे पुत्र आणि त्याचे नातलग यांमधून बाराजण.
The twelfth, to Hashabiah, his sons and his brethren, twelve.
20 २० तेरावी शूबाएलाची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण.
As the thirteenth, Shubael, his sons and his brethren, twelve.
21 २१ चौदावी मत्तिथ्याची. त्याचे पुत्र आणि नातलगामधून बाराजण.
As the fourteenth, Mattithiah, his sons and his brethren, twelve.
22 २२ पंधरावी यरेमोथची. त्याचे पुत्र आणि नातेवाईक यांमधून बारा.
As the fifteenth, to Jeremoth, his sons and his brethren, twelve.
23 २३ सोळावी हनन्याची. त्याचे पुत्र आणि भाऊबंद यांमधून बाराजण.
As the sixteenth, to Hananiah, his sons and his brethren, twelve.
24 २४ सतरावी याश्बकाशाची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण.
As the seventeenth, to Joshbekashah, his sons and his brethren, twelve.
25 २५ अठरावी हनानीची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण.
As the eighteenth, to Hanani, his sons and his brethren, twelve.
26 २६ एकुणिसावी मल्लोथीची. त्याचे पुत्र आणि आप्त यांमधून बाराजण.
As the nineteenth, to Mallothi, his sons and his brethren, twelve.
27 २७ विसावी अलीयाथची. त्याचे पुत्र आणि नातलगामधून बाराजण.
As the twentieth, to Eliathah, his sons and his brethren, twelve.
28 २८ एकविसावी होथीरची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण.
As the twenty-first, to Hothir, his sons and his brethren, twelve.
29 २९ बावीसावी गिद्दल्तीची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण.
As the twenty-second, to Giddalti, his sons and his brethren, twelve.
30 ३० तेविसावी महजियोथची. त्याचे पुत्र आणि भाऊबंद यांमधून बाराजण.
As the twenty-third, to Mahazioth, his sons and his brethren, twelve.
31 ३१ चोविसावी रोममती-एजेरची. त्याचे पुत्र आणि नातलगामधून बाराजण.
As the twenty-fourth, to Romamti-ezer, his sons and his brethren, twelve.

< 1 इतिहास 25 >