< 1 इतिहास 23 >
1 १ आता दावीद म्हातारा झाला होता आणि त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसात होता, तेव्हा त्याने आपला पुत्र शलमोन याला इस्राएलाचा राजा केले.
大衛年紀老邁,日子滿足,就立他兒子所羅門作以色列的王。
2 २ त्याने इस्राएलमधील सर्व पुढारी मंडळी, याजक आणि लेवी यांना एकत्र बोलावून घेतले.
大衛招聚以色列的眾首領和祭司利未人。
3 ३ तीस आणि त्याहून अधिक वय असलेल्या लेवींची त्याने गणना केली. त्यांची संख्या एकंदर अडतीस हजार होती.
利未人從三十歲以外的都被數點,他們男丁的數目共有三萬八千;
4 ४ त्यांच्यातले, चोवीस हजार लेवी परमेश्वराच्या मंदिराच्या कामावर देखरेख करणारे होते आणि सहा हजार अधिकारी आणि न्यायाधीश होते.
其中有二萬四千人管理耶和華殿的事,有六千人作官長和士師,
5 ५ चार हजार द्वारपाल होते आणि दावीद म्हणाला, मी जी वाद्ये आराधना करायला करवून घेतली त्याच्या साथीने परमेश्वराची स्तुती करणारे चार हजार होते.
有四千人作守門的,又有四千人用大衛所做的樂器頌讚耶和華。
6 ६ लेवीचे पुत्र गेर्षोन, कहाथ आणि मरारी यांच्या घराण्यानुसार दावीदाने सर्व लेवींची तीन गटांमध्ये विभागणी केली.
大衛將利未人革順、哥轄、米拉利的子孫分了班次。
7 ७ गेर्षोन घराण्यात लादान आणि शिमी हे दोघे होते.
革順的子孫有拉但和示每。
8 ८ लादान याला तीन पुत्र. यहीएल हा थोरला. नंतर जेथाम व योएल.
拉但的長子是耶歇,還有細坦和約珥,共三人。
9 ९ शिमीचे पुत्र असे शलोमोथ, हजिएल व हारान. लादानच्या घराण्यांचे हे प्रमुख होते.
示每的兒子是示羅密、哈薛、哈蘭三人。這是拉但族的族長。
10 १० शिमीला चार पुत्र. यहथ, जीजा, यऊश आणि बरीया.
示每的兒子是雅哈、細拿、耶烏施、比利亞共四人。
11 ११ यहथ हा त्यांपैकी मोठा, दुसरा जीजा, यऊश आणि बरीया यांना मात्र फार संतती नव्हती त्यामुळे त्यांचे दोघांचे मिळून एकच घराणे धरले जाई.
雅哈是長子,細撒是次子。但耶烏施和比利亞的子孫不多,所以算為一族。
12 १२ कहाथाला चार पुत्र होते: अम्राम, इसहार, हेब्रोन आणि उज्जियेल.
哥轄的兒子是暗蘭、以斯哈、希伯倫、烏薛共四人。
13 १३ अहरोन आणि मोशे हे अम्रामचे पुत्र अहरोन आणि त्याच्या वंशजाची खास कामाकरता निवड केली गेली होती. परमेश्वराच्या उपासनेच्या पवित्र कामाच्या तयारीसाठी त्यांना कायमचे वेगळे काढले गेले होते. परमेश्वरापुढे धूप जाळणे, परमेश्वराचे याजक म्हणून सेवा करणे, लोकांस आशीर्वाद देणे अशी त्यांची कामे होती.
暗蘭的兒子是亞倫、摩西。亞倫和他的子孫分出來,好分別至聖的物,在耶和華面前燒香、事奉他,奉他的名祝福,直到永遠。
14 १४ मोशे हा देवाचा संदेष्टा होता. त्याचे पुत्र लेवीच्या वंशातच गणले जात.
至於神人摩西,他的子孫名字記在利未支派的冊上。
15 १५ गेर्षोम आणि अलियेजर हे मोशेचे पुत्र.
摩西的兒子是革舜和以利以謝。
16 १६ शबुएल हा गेर्षोमचा थोरला पुत्र.
革舜的長子是細布業;
17 १७ रहब्या हा अलियेजरचा थोरला पुत्र. हा एकुलता एक होता. रहब्याला मात्र बरीच अपत्य झाली.
以利以謝的兒子是利哈比雅。以利以謝沒有別的兒子,但利哈比雅的子孫甚多。
18 १८ शलोमीथ हा इसहारचा पहिला पुत्र.
以斯哈的長子是示羅密。
19 १९ हेब्रोनचे पुत्र याप्रमाणे: यरीया मोठा, अमऱ्या दुसरा, यहजिएल तिसरा, यकमाम चौथा.
希伯倫的長子是耶利雅,次子是亞瑪利亞,三子是雅哈悉,四子是耶加面。
20 २० उज्जियेलाचे पुत्र: पहिला मीखा आणि नंतरचा इश्शिया.
烏薛的長子是米迦,次子是耶西雅。
21 २१ महली आणि मूशी हे मरारीचे पुत्र. एलाजार आणि कीश हे महलीचे पुत्र.
米拉利的兒子是抹利、母示。抹利的兒子是以利亞撒、基士。
22 २२ एलाजाराला कन्या रत्नेच झाली. त्यास पुत्र नव्हता. या कन्यांचे विवाह नात्यातच झाले. त्या लग्न होऊन कीशाच्या घराण्यात गेल्या.
以利亞撒死了,沒有兒子,只有女兒,他們本族基士的兒子娶了她們為妻。
23 २३ मूशीचे पुत्र: महली, एदर आणि यरेमोथ.
母示的兒子是末力、以得、耶利摩共三人。
24 २४ हे झाले लेवीचे वंशज आपापल्या घराण्यांप्रमाणे त्यांची मोजणी झाली. ते घराण्यांचे प्रमुख होते. त्यांच्यापैकी प्रत्येकाच्या नावाची नोंद झालेली आहे. जे वीस किंवा त्याहून अधिक वयाचे होते त्यांनी परमेश्वराच्या मंदिरात सेवा करणे हे त्यांचे काम.
以上利未子孫作族長的,照着男丁的數目,從二十歲以外,都辦耶和華殿的事務。
25 २५ दावीद म्हणाला, “इस्राएलाचा देव परमेश्वर याच्यामुळे लोकांस शांती लाभली आहे. परमेश्वर यरूशलेमेला कायमच्या वास्तव्यासाठी आला आहे.
大衛說:「耶和華-以色列的上帝已經使他的百姓平安,他永遠住在耶路撒冷。
26 २६ तेव्हा लेवींना निवासमंडप आणि उपासनेतील सेवेचे इतर पात्रे सतत वाहण्याची गरज पडणारहि नाही.”
利未人不必再抬帳幕和其中所用的一切器皿了。」
27 २७ लेवी कुळातील वंशजांची मोजदाद करणे ही दावीदाची इस्राएल लोकांस अखेरची आज्ञा होती. त्यानुसार वीस वर्षे आणि त्यापुढील वयाच्या मनुष्यांची मोजणी झाली.
照着大衛臨終所吩咐的,利未人從二十歲以外的都被數點。
28 २८ अहरोनाच्या वंशजांना परमेश्वराच्या मंदीरातील सेवेत मदत करणे हे लेवीचे काम होते. मंदिराचे आवार आणि बाजूच्या खोल्या यांची देखभाल ही त्यांच्याकडे होती. मंदिरातील सर्व पवित्र गोष्टी शुध्द ठेवणे ही त्यांची जबाबदारी होती. देवाच्या मंदिरातील हे काम ते करत असत.
他們的職任是服事亞倫的子孫,在耶和華的殿和院子,並屋中辦事,潔淨一切聖物,就是辦上帝殿的事務,
29 २९ मंदिरातील समर्पित भाकर मेजावर ठेवणे, पीठ, अन्नार्पण करण्याच्या वस्तू बेखमीर भाकरी यावर त्यांची देखरेख होती. याखेरीज, तव्यावर भाजलेले, मळलेले सर्वकाही सिध्द करणे, मोजून मापून त्या वस्तूंची तयारी करणे हे ही काम त्यांच्याकडे होते.
並管理陳設餅,素祭的細麵,或無酵薄餅,或用盤烤,或用油調和的物,又管理各樣的升斗尺度;
30 ३० ते रोज सकाळ संध्याकाळ परमेश्वराचे आभार मानायला आणि त्याची स्तुती करायला उभे राहत.
每日早晚,站立稱謝讚美耶和華,
31 ३१ आणि परमेश्वरास शब्बाथ दिवशी, चंद्रदर्शनाच्या आणि नेमलेल्या सणाच्या दिवशी ठरलेल्या संख्येप्रमाणे नेहमी परमेश्वरापुढे सर्व होमार्पणे अर्पण करण्यास हजर राहत.
又在安息日、月朔,並節期,按數照例,將燔祭常常獻給耶和華;
32 ३२ ते दर्शनमंडप, पवित्रस्थानाचे प्रमुख होते. आणि त्यांचे सहकारी अहरोनाचे वंशज यांना ते परमेश्वराच्या मंदिराच्या सेवेत मदत करत होते.
又看守會幕和聖所,並守耶和華吩咐他們弟兄亞倫子孫的,辦耶和華殿的事。