< 1 इतिहास 22 >

1 मग दावीद म्हणाला, “हेच ते परमेश्वर देवाचे मंदिर आहे. इस्राएलांची होमार्पणाची वेदीही इथेच केली जाईल.”
और दाऊद ने कहा, “यही ख़ुदावन्द ख़ुदा का घर और यही इस्राईल की सोख़्तनी क़ुर्बानी का मज़बह है।”
2 इस्राएलमध्ये जे परदेशी लोक राहत होते त्या सर्वांना दावीदाने त्याच्या सेवकांना आज्ञा देऊन एकत्र बोलवून घेतले. देवाचे मंदिर बांधण्यासाठी दगडाचे चिरे घडवण्याचे काम त्यांच्यावर सोपवले.
दाऊद ने हुक्म दिया कि उन परदेसियों को जो इस्राईल के मुल्क में थे जमा' करें, और उसने पत्थरों को तराशने वाले मुक़र्रर किए कि ख़ुदा के घर के बनाने के लिए पत्थर काट कर घड़ें।
3 दावीदाने दरवाजांसाठी खिळे आणि बिजागऱ्यासाठी लागणारे लोखंड पुरवले व त्याने वजन करता येणार नाही इतके पितळ,
और दाऊद ने दरवाज़ों के किवाड़ों की कीलों और क़ब्ज़ों के लिए बहुत सा लोहा, और इतना पीतल कि तौल से बाहर था,
4 सीदोन आणि सोर या नगरांतील लोकांनी गंधसरूचे पुष्कळ लाकूड दावीदाकडे आणले आणि ते लाकूड तर एवढे आले की त्यांची मोजदाद करणे कठीण होते.
और देवदार के बेशुमार लट्ठे तैयार किए, क्यूँकि सैदानी और सूरी देवदार के लट्ठे कसरत से दाऊद के पास लाते थे।
5 दावीद म्हणाला, “माझा पुत्र शलमोन अजून तरुण व अननुभवी आहे आणि परमेश्वराचे मंदिर मात्र विशेषतः उत्कृष्ट बांधले गेले पाहिजे, याकरिता की सर्व इतर देशात सुप्रसिध्द आणि वैभवशाली असे झाले पाहिजे. म्हणून मी त्याच्या बांधण्याची तयारी करीन.” असे म्हणून दावीदाने आपल्या मृत्यूपूर्वी बरीच तयारी केली.
और दाऊद ने कहा कि मेरा बेटा सुलेमान लड़का और ना तजुरबेकार है, और ज़रूर है कि वह घर जो ख़ुदावन्द के लिए बनाया जाए निहायत 'अज़ीम — उश — शान हो, और सब मुल्कों में उसका नाम और शोहरत हो। इसलिए मैं उसके लिए तैयारी करूँगा। चुनाँचे दाऊद ने अपने मरने से पहले बहुत तैयारी की।
6 मग त्याने आपला पुत्र शलमोन याला बोलावले. इस्राएलचा देव परमेश्वर याच्यासाठी मंदिर बांधण्याची त्याने त्यास आज्ञा दिली.
तब उसने अपने बेटे सुलेमान को बुलाया और उसे ताकीद की कि ख़ुदावन्द इस्राईल के ख़ुदा के लिए एक घर बनाए।
7 दावीद शलमोनाला म्हणाला, “माझ्या मुला, माझा देव परमेश्वर याच्या नावासाठी मंदिर बांधण्याची माझी इच्छा होती.
दाऊद ने अपने बेटे सुलेमान से कहा, यह तो खु़द मेरे दिल में था कि ख़ुदावन्द अपने ख़ुदा के नाम के लिए एक घर बनाऊँ।
8 पण परमेश्वर माझ्याकडे आला व म्हणाला, तू बऱ्याच लढाया केल्यास आणि त्यामध्ये पुष्कळ रक्त पाडले. तेव्हा तुला माझ्यासाठी मंदिर बांधता येणार नाही. कारण तू माझ्यापुढे भूमीवर पुष्कळ रक्त पाडले आहे.
लेकिन ख़ुदावन्द का कलाम मुझे पहुँचा, कि तू ने बहुत ख़ूँरेज़ी की है और बड़ी बड़ी लड़ाइयाँ लड़ा है; इसलिए तू मेरे नाम के लिए घर न बनाना, क्यूँकि तू ने ज़मीन पर मेरे सामने बहुत ख़ून बहाया है।
9 मात्र तुला पुत्र होईल तो शांतीप्रिय मनुष्य असेल. मी त्यास त्याच्या सर्व शत्रूपासून प्रत्येक बाजूने विसावा देईन. कारण त्याचे नाव शलमोन असे होईल आणि इस्राएलांस त्याच्या दिवसात मी शांतता आणि स्वस्थता देईन.
देख, तुझ से एक बेटा पैदा होगा, वह मर्द — ए — सुलह होगा; और मैं उसे चारों तरफ़ के सब दुश्मनों से अम्न बख़्शूँगा, क्यूँकि सुलेमान उसका नाम होगा और मैं उसके दिनों में इस्राईल को अम्न — ओ — अमान बख़्शूँगा।
10 १० तो माझ्याप्रीत्यर्थ मंदिर बांधील. तो माझा पुत्र आणि मी त्याचा पिता होईन. त्याचे राजासन मी इस्राएलावर सर्वकाळापर्यंत स्थापित करील.”
वही मेरे नाम के लिए घर बनाएगा। वह मेरा बेटा होगा और मैं उसका बाप हूँगा, और मैं इस्राईल पर उसकी हुकूमत का तख़्त हमेशा तक — क़ाईम रख्खूँगा।
11 ११ “आता माझ्या मुला, परमेश्वर तुझ्याबरोबर असो व तुला यशस्वी करो. त्याने तुला सांगितल्याप्रमाणे तू परमेश्वर देवाचे मंदिर बांध.
अब ऐ मेरे बेटे ख़ुदावन्द तेरे साथ रहे और तू कामयाब हो और ख़ुदावन्द अपने ख़ुदा का घर बना, जैसा उसने तेरे हक़ में फ़रमाया है।
12 १२ जेव्हा इस्राएलावर तो तुला अधिकार देईल तेव्हा परमेश्वर देवाचे नियम पाळायला फक्त परमेश्वरच तुला अंर्तज्ञान आणि समजूतदारपणा देवो.
अब ख़ुदावन्द तुझे अक़्ल — ओ — दानाई बख़्शे और इस्राईल के बारे में तेरी हिदायत करे, ताकि तू ख़ुदावन्द अपने ख़ुदा की शरी'अत को मानता रहे।
13 १३ इस्राएलसाठी परमेश्वराने मोशेला जे नियमशास्त्र सांगितले ते तू न विसरता पाळ म्हणजे तू यशस्वी होशील. बलवान हो व धैर्य धर. घाबरु नको किंवा नाउमेद होऊ नको.
तब तू कामयाब होगा, बशर्ते कि तू उन क़ानून और अहकाम पर जो ख़ुदावन्द ने मूसा को इस्राईल के लिए दिए एहतियात करके 'अमल करे। इसलिए हिम्मत बाँध और हौसला रख, ख़ौफ़ न कर, परेशान न हो।
14 १४ पाहा, परमेश्वराच्या मंदिरासाठी मी खूप कष्टाने एक लक्ष किक्कार सोने आणि दहा लक्ष किक्कार रुपे आणि पितळ व लोखंड यांचा मोठ्या प्रमाणात साठा करून तयारी केली आहे. मी दगड, लाकूडसुध्दा पुरवले आहे. तू या सर्वात अधिक भर घाल.
देख, मैंने मशक़्क़त से ख़ुदावन्द के घर के लिए एक लाख क़िन्तार सोना और दस लाख क़िन्तार चाँदी, और बेअंदाज़ा पीतल और लोहा तैयार किया है क्यूँकि वह कसरत से है, और लकड़ी और पत्थर भी मैंने तैयार किए हैं, और तू उनको और बढ़ा सकता है।
15 १५ तुझ्याजवळ पुष्कळ कामगार आहेत. पाथरवट, गवंडी आणि सुतार, आणि सर्व प्रकारच्या कामामध्ये कुशल असे हुशार लोक आहेत.
बहुत से कारीगर पत्थर और लकड़ी के काटने और तराशने वाले, और सब तरह के हुनरमन्द जो क़िस्म क़िस्म के काम में माहिर हैं तेरे पास हैं।
16 १६ जे कोणी सोने, रुपे, पितळ, लोखंड यावर काम करू शकतात, अशी असंख्य माणसे तुझ्याबरोबर आहेत. तेव्हा आता कामाला सुरवात कर. परमेश्वर तुझ्याबरोबर आहे.”
सोने और चाँदी और पीतल और लोहे का कुछ हिसाब नहीं है। इसलिए उठ और काम में लग जा, और ख़ुदावन्द तेरे साथ रहे।
17 १७ दावीदाने इस्राएलामधील सर्व पुढाऱ्यांनासुध्दा आपला पुत्र शलमोन याला सहकार्य करण्याची आज्ञा केली. तो म्हणाला,
इसके 'अलावा दाऊद ने इस्राईल के सब सरदारों को अपने बेटे सुलेमान की मदद का हुक्म दिया और कहा,
18 १८ “तुमचा देव परमेश्वर तुम्हासोबत आहे. आणि प्रत्येक बाजूने त्याने तुम्हास शांतता दिली आहे. कारण त्याने देशातले राहणारे माझ्या हाती दिले आहेत, परमेश्वराच्यापुढे आणि त्याच्या लोकांच्या आता हा देश ताब्यात आला आहे.
क्या ख़ुदावन्द तुम्हारा ख़ुदा तुम्हारे साथ नहीं है? और क्या उसने तुम को चारों तरफ़ चैन नहीं दिया है? क्यूँकि उसने इस मुल्क के बाशिंदों को मेरे हाथ में कर दिया है, और मुल्क ख़ुदावन्द और उसके लोगों के आगे मग़लूब हुआ है।
19 १९ तेव्हा आता अंत: करणपूर्वक तुम्ही परमेश्वर तुमचा देव याचा शोध करा. उठा व परमेश्वर देवाचे पवित्र मंदिर बांधा. कारण परमेश्वराच्या नावासाठी जे मंदिर बांधायचे आहे त्यामध्ये मग परमेश्वराच्या कराराचा कोश आणि देवाची इतर पवित्र वस्तू आणून ठेवा.”
इसलिए अब तुम अपने दिल को और अपनी जान को ख़ुदावन्द अपने ख़ुदा की तलाश में लगाओ, और उठो और ख़ुदावन्द ख़ुदा का मक़दिस बनाओ, ताकि तुम ख़ुदावन्द के 'अहद के सन्दूक़ को और ख़ुदा के पाक बर्तनों को उस घर में, जो ख़ुदावन्द के नाम का बनेगा ले आओ।

< 1 इतिहास 22 >