< 1 इतिहास 21 >
1 १ आणि सैतान इस्राएलाविरुध्द उठला व त्याने दावीदाला इस्राएलाची मोजणी करण्यास भाग पाडले.
時にサタンが起ってイスラエルに敵し、ダビデを動かしてイスラエルを数えさせようとした。
2 २ दावीद यवाबाला आणि सैन्याच्या अधिकाऱ्यांना म्हणाला, “जा बैर-शेबापासून दानापर्यंत सर्व इस्राएल लोकांची मोजणी करा आणि मग मला त्यांची एकंदर संख्या माहित व्हावी म्हणून मला परत येऊन अहवाल द्या.”
ダビデはヨアブと軍の将校たちに言った、「あなたがたは行って、ベエルシバからダンまでのイスラエルを数え、その数を調べてわたしに知らせなさい」。
3 ३ यवाब म्हणाला “परमेश्वर आपले सैन्य आहे त्यापेक्षा शंभर पटीने अधिक वाढवो. पण माझ्या प्रभू राजा, ते सर्व माझ्या धन्याचे सेवा करत नाही का? मग माझ्या धन्याला हे का पाहिजे? इस्राएलावर त्याने दोष का आणावा?”
ヨアブは言った、「それがどのくらいあっても、どうか主がその民を百倍に増されるように。しかし王わが主よ、彼らは皆あなたのしもべではありませんか。どうしてわが主はこの事を求められるのですか。どうしてイスラエルに罪を得させられるのですか」。
4 ४ पण राजाचा शब्द यवाबाविरुध्द अंतिम होता, यामुळे यवाब निघून गेला आणि सर्व इस्राएलातून फिरला. मग यरूशलेमाला परत आला.
しかし王の言葉がヨアブに勝ったので、ヨアブは出て行って、イスラエルをあまねく行き巡り、エルサレムに帰って来た。
5 ५ मग यवाबाने दावीदाला एकंदर लढाई करणाऱ्यांची मोजणी सांगितली. इस्राएलात अकरा लाख तलवार काढणारे पुरुष होते. यहूदात चार लाख सत्तर हजार पुरुष होते.
そしてヨアブは民の総数をダビデに告げた。すなわちイスラエルにはつるぎを抜く者が百十万人、ユダにはつるぎを抜く者が四十七万人あった。
6 ६ पण लेवी आणि बन्यामीन यांच्या घराण्यांची मोजदाद केली नव्हती, कारण यवाबाला राजाच्या आज्ञेचा अत्यंत तिटकारा आला होता.
しかしヨアブは王の命令を快しとしなかったので、レビとベニヤミンとはその中に数えなかった。
7 ७ देवाला या कृतीमुळे वाईट वाटले म्हणून त्याने इस्राएलावर मारा केला.
この事が神の目に悪かったので、神はイスラエルを撃たれた。
8 ८ मग दावीद देवाला म्हणाला, “मी ही गोष्ट करून महान पाप केले आहे. आता आपल्या सेवकाचे अपराध दूर कर, कारण मी फार मूर्खपणाची कृती केली आहे.”
そこでダビデは神に言った、「わたしはこの事を行って大いに罪を犯しました。しかし今どうか、しもべの罪を除いてください。わたしは非常に愚かなことをいたしました」。
9 ९ परमेश्वर दावीदाचा संदेष्टा गादला म्हणाला,
主はダビデの先見者ガデに告げて言われた、
10 १० “जाऊन दावीदाला सांग, ‘परमेश्वराचे म्हणणे असे आहे, मी तुझ्यापुढे तीन पर्याय ठेवतो. त्यातील एक निवड.”
「行ってダビデに言いなさい、『主はこう仰せられる、わたしは三つの事を示す。あなたはその一つを選びなさい。わたしはそれをあなたに行おう』と」。
11 ११ मग गाद दावीदाकडे गेला व त्यास म्हणाला, “परमेश्वराचे म्हणणे असे आहे, ‘त्यातून एक निवड.
ガデはダビデのもとに来て言った、「主はこう仰せられます、『あなたは選びなさい。
12 १२ तीन वर्षाचा दुष्काळ पडावा, किंवा तीन महिने तुझ्या शत्रूने तलवारीने तुझा पाठलाग करावा आणि तुझा नाश करावा किंवा इस्राएलाच्या सर्व देशात परमेश्वराचा दूत लोकांचा संहार करीत असताना देशात तीन दिवस परमेश्वराची तलवार म्हणजे मरी असावी? तर आता, ज्याने मला पाठवले, त्यास मी काय उत्तर द्यावे ते तू ठरवून मला सांग.”
すなわち三年のききんか、あるいは三月の間、あなたのあだの前に敗れて、敵のつるぎに追いつかれるか、あるいは三日の間、主のつるぎすなわち疫病がこの国にあって、主の使がイスラエルの全領域にわたって滅ぼすことをするか』。いま、わたしがどういう答をわたしをつかわしたものになすべきか決めなさい」。
13 १३ मग दावीद गादला म्हणाला, “मी गंभीर अडचणीत आहे. मला लोकांच्या हातात पडण्यापेक्षा परमेश्वराच्या हातात पडू दे, कारण त्याच्या दयेची कृती फार महान आहे.”
ダビデはガデに言った、「わたしは非常に悩んでいるが、主のあわれみは大きいゆえ、わたしを主の手に陥らせてください。しかしわたしを人の手に陥らせないでください」。
14 १४ तेव्हा परमेश्वराने इस्राएलावर मरी पसरवली आणि त्यामध्ये सत्तर हजार लोक मृत्युमुखी पडले.
そこで主はイスラエルに疫病を下されたので、イスラエルびとのうち七万人が倒れた。
15 १५ यरूशलेमेचा नाश करण्यास देवाने दूत पाठवला. तो तिचा नाश करणार, हे परमेश्वराने पाहिले व हानी करण्यापासून त्याचे मन बदलले. तो त्या नाश करणाऱ्या दूताला म्हणाला, “पुरे झाले, आता तुझा हात मागे घे.” त्यावेळी परमेश्वराचा दूत अर्णान यबूसी याच्या खळ्याजवळ उभा होता.
神はまたみ使をエルサレムにつかわして、これを滅ぼそうとされたが、み使がまさに滅ぼそうとしたとき、主は見られて、この災を悔い、その滅ぼすみ使に言われた、「もうじゅうぶんだ。今あなたの手をとどめよ」。そのとき主の使はエブスびとオルナンの打ち場のかたわらに立っていた。
16 १६ दावीदाने वर पाहिले व तेव्हा त्यास परमेश्वराचा दूत आकाश व पृथ्वी यांच्यामध्ये उभा असलेला दिसला. त्याच्या हातात उपसलेली तलवार असून त्याने ती यरूशलेमेवर उगारलेली होती. तेव्हा गोणताट घातलेले दावीद आणि वडील जमिनीकडे तोंड करून खाली पडले.
ダビデが目をあげて見ると、主の使が地と天の間に立って、手に抜いたつるぎをもち、エルサレムの上にさし伸べていたので、ダビデと長老たちは荒布を着て、ひれ伏した。
17 १७ दावीद देवाला म्हणाला, “सैन्याची मोजणी करण्याचा हूकूम मी दिला होता की नाही? मीच हे पाप केले आहे, मीच हे दुष्ट काम केले आहे. पण या मेंढरांनी काय केले आहे? हे परमेश्वरा माझ्या देवा, मी विनंती करतो तुझा हात माझ्यावर व माझ्या घराण्यावर पडून तू आम्हास शिक्षा दे, पण तुझ्या लोकांस या मरीने शिक्षा देऊ नको.”
そしてダビデは神に言った、「民を数えよと命じたのはわたしではありませんか。罪を犯し、悪い事をしたのはわたしです。しかしこれらの羊は何をしましたか。わが神、主よ、どうぞあなたの手をわたしと、わたしの父の家にむけてください。しかし災をあなたの民に下さないでください」。
18 १८ मग परमेश्वराच्या दूताने गादला आज्ञा केली की, तू दावीदाला सांग, दावीदाने वर जाऊन अर्णान यबूसी याच्या खळ्यात परमेश्वरासाठी एक वेदी बांधावी.
時に主の使はガデに命じ、ダビデが上って行って、エブスびとオルナンの打ち場で主のために一つの祭壇を築くように告げさせた。
19 १९ मग गादाने परमेश्वराच्या नावाने बोलून जे सांगितले त्यावरून दावीद वरती गेला.
そこでダビデはガデが主の名をもって告げた言葉に従って上って行った。
20 २० अर्णान तेव्हा गव्हाची मळणी करत होता, तो मागे वळला व त्याने देवदूताला पाहिले. तो व त्याचे चारही पुत्र त्याच्याबरोबर होते ते लपले.
そのときオルナンは麦を打っていたが、ふりかえってみ使を見たので、ともにいた彼の四人の子は身をかくした。
21 २१ आणि दावीद अर्णानाकडे आला, तेव्हा अर्णानाने वर दृष्टी करून व दावीदाला पाहिले. तो खळ्यातून निघाला आणि त्याने दावीदाला तोंड जमिनीपर्यंत लववून नमस्कार केला.
ダビデがオルナンに近づくと、オルナンは目を上げてダビデを見、打ち場から出て来て地にひれ伏してダビデを拝した。
22 २२ मग दावीद अर्णानला म्हणाला, “हे खळे मला विकत दे. त्याची पूर्ण किंमत मी तुला देईन. लोकांवरून मरी बंद व्हावी म्हणून तेथे मी परमेश्वराकरता वेदी बांधीन.”
ダビデはオルナンに言った、「この打ち場の所をわたしに与えなさい。わたしは災が民に下るのをとどめるため、そこに主のために一つの祭壇を築きます。あなたは、そのじゅうぶんな価をとってこれをわたしに与えなさい」。
23 २३ अर्णान दावीदाला म्हणाला, “माझ्या स्वामी राजाला जे काही तुमच्या दृष्टीने जे चांगले आहे ते करा. पाहा, होमार्पण करण्यासाठी मी बैल, तसेच वेदीवरील होमात जाळण्यासाठी मळणीची लाकडे, आणि अन्नार्पणासाठी गहू हे सर्व मी तुम्हास देईन.”
オルナンはダビデに言った、「どうぞこれをお取りなさい。そして王わが主の良しと見られるところを行いなさい。わたしは牛を燔祭のために、打穀機をたきぎのために、麦を素祭のためにささげます。わたしは皆これをささげます」。
24 २४ तेव्हा राजा दावीद अर्णानाला म्हणाला, “नाही, मी तुला त्याची पूर्ण किंमत देऊनच विकत घेईन. कारण जे तुझे आहे ते मी परमेश्वरासाठी घेणार नाही. आणि किंमत दिल्यावाचून घेतलेले होमार्पण मी अर्पण करणार नाही.”
ダビデ王はオルナンに言った、「いいえ、わたしはじゅうぶんな代価を払ってこれを買います。わたしは主のためにあなたのものを取ることをしません。また、費えなしに燔祭をささげることをいたしません」。
25 २५ आणि दावीदाने त्या जागेसाठी अर्णानाला सहाशें शेकेल सोने दिले.
それでダビデはその所のために金六百シケルをはかって、オルナンに払った。
26 २६ दावीदाने तेथे परमेश्वराकरता वेदी बांधली आणि त्यावर त्याने होमार्पणे आणि शांत्यर्पणे अर्पण केली. त्याने परमेश्वरास हाक मारली व त्याने स्वर्गातून होमार्पणाच्या वेदीवर अग्नी पाठवून उत्तर दिले.
こうしてダビデは主のために、その所に一つの祭壇を築き、燔祭と酬恩祭をささげて、主を呼んだ。主は燔祭の祭壇の上に天から火を下して答えられた。
27 २७ मग परमेश्वराने देवदूताला आज्ञा केली आणि त्याने आपली तलवार म्यानात परत घातली.
また主がみ使に命じられたので、彼はつるぎをさやにおさめた。
28 २८ त्या वेळेस, जेव्हा दावीदाने पाहिले की अर्णान यबूसीच्या खळ्यात परमेश्वराने आपल्याला उत्तर दिले तेव्हा त्याने तेथे यज्ञ केले.
その時ダビデは主がエブスびとオルナンの打ち場で自分に答えられたのを見たので、その所で犠牲をささげた。
29 २९ कारण मोशेने रानात केलेला परमेश्वराचा निवासमंडप आणि होमार्पणाची वेदी, त्याकाळी गिबोनामध्ये उच्च स्थानावर होती.
モーセが荒野で造った主の幕屋と燔祭の祭壇とは、その時ギベオンの高き所にあったからである。
30 ३० पण परमेश्वराच्या दूताच्या तलवारीच्या भीतीने दावीद देवापुढे मार्ग विचारायला जाण्यास घाबरत होता.
しかしダビデはその前へ行って神に求めることができなかった。彼が主の使のつるぎを恐れたからである。