< 1 इतिहास 20 >
1 १ आणि असे झाले की, राजे लढाईला बाहेर पडतात अशावेळी म्हणजे वर्षारंभी यवाबाने सैन्य घेऊन अम्मोन्यांच्या नगरात शिरले आणि त्यांनी तो देश उद्ध्वस्त केला. मग त्यांनी राब्बा नगराला वेढा घातला. पण दावीद यरूशलेमेमध्येच राहिला. यवाबाने राब्बा नगरावर हल्ला केला व त्यांचा पराभव केला.
És lőn az esztendőnek fordulásával, mikor a királyok harczba menni szoktak, elindítá Joáb a hadat, és elpusztítá az Ammon fiainak földjét. És elmenvén megszállá Rabbát, (Dávid pedig Jeruzsálemben marada) és elfoglalá Joáb Rabbát és elrontá azt.
2 २ दावीदाने, त्यांच्या राजाच्या डोक्यावरील मुकुट काढला. त्या सोन्याच्या रत्नजडित मुकुटाचे वजन एक किक्कार होते. तो दावीदाच्या डोक्यावर ठेवण्यात आला. त्यांना त्या नगरातून मोठ्या प्रमाणात पुष्कळ लूट मिळाली.
És elvevé Dávid az ő királyuknak fejéről a koronát, mely egy tálentom arany súlyú vala, s melyben drágakövek valának. És Dávid fejére tette azt, s a városból is temérdek zsákmányt vitt el.
3 ३ त्या नगरातील लोकांस बाहेर काढून त्यांच्याकडून करवती, कुऱ्हाही, लोखंडी दाताळे या हत्यारांनी करायच्या कष्टाच्या कामाला जुंपले. अम्मोन्यांच्या सर्व नगरांमध्ये दावीदाने हेच केले. मग दावीद आणि त्याचे सैन्य यरूशलेमेला परतले.
A város népét pedig kihozatá és fűrészszel vágatá, és vasboronákkal és fejszékkel. Így cselekedék Dávid az Ammon fiainak minden városával; azután megtére Dávid az egész néppel Jeruzsálembe.
4 ४ यानंतर असे झाले की गेजेर येथे इस्राएल लोकांचे पलिष्ट्यांशी युध्द झाले. या लढाईत सिब्बखय हूशाथी याने सिप्पय याला ठार मारले. तो रेफाई वंशातला होता. व पलिष्टी लोक त्यांना शरण आले.
Ezután ismét had támada Gézerben a Filiszteusok ellen; és akkor ölé meg a Husátites Sibbékai az óriások nemzetségéből való Sippait; és ilyen módon megaláztatának.
5 ५ पुढे पुन्हा एकदा पलिष्ट्यांशी लढाई झाली. त्यावेळी याईराचा पुत्र एलहानान याने गथच्या गल्याथचा भाऊ लहमी याला ठार केले. ज्याच्या भाल्याची काठी विणकऱ्याच्या तुळईसारखी होती.
Ismét lőn had a Filiszteusok ellen, a melyben megölé Elhanán, a Jáir fia a Gáthbeli Lákhmit, a Góliát atyjafiát; és az ő dárdájának nyele hasonló vala a szövők zúgolyfájához.
6 ६ गथ येथे पलिष्ट्यांशी पुन्हा एकदा लढाई झाली. या गावात एक मोठा उंच मनुष्य होता. त्याच्या हातापायांना प्रत्येकी सहासहा, अशी एकंदर चोवीस बोटे होती. तोही रेफाईच्या वंशातला होता.
Ezek után ismét versengés támadt Gáthban, hol egy magas ember vala, a kinek hat-hat, vagyis huszonnégy ujja volt; ez is óriás fia vala.
7 ७ त्याने इस्राएल सैन्याची निंदा केली तेव्हा दावीदाचा भाऊ शिमी याचा पुत्र योनाथानाने त्यास ठार केले.
És szidalommal illeté Izráelt, és megölé őt Jonathán, Dávid testvérének, Simeának fia.
8 ८ ही गथ रेफाईच्या नगरातील संतती होती. आणि ते दावीदाच्या व त्याच्या सैन्याच्या हाताने त्यांना मारण्यात आले.
Ezek ugyanazon egy óriásnak fiai voltak Gáthban, a kik elveszének Dávidnak és az ő szolgáinak keze által.