< 1 इतिहास 18 >
1 १ यानंतर असे झाले की, दावीदाने पलिष्ट्यांवर स्वारी केली आणि त्यांचा पराभव केला. त्याने पलिष्ट्यांच्या हातातून गथ आणि त्यांची गावे घेतली.
Depois disso, David derrotou os filisteus e os subjugou, e tirou Gate e suas cidades da mão dos filisteus.
2 २ मग त्याने मवाबाचा पराभव केला आणि मवाबी लोक दावीदाचे सेवक झाले आणि त्यास कर देऊ लागले.
Ele derrotou Moab; e os moabitas tornaram-se servos de David e trouxeram tributo.
3 ३ मग सोबाचा राजा हद्देजर आपल्या राज्याची सीमा फरात नदीपर्यंत स्थिर करण्यास जात असता दावीदाने हमाथाजवळ त्याचा पराभव केला.
David derrotou Hadadezer, rei de Zobah, em direção a Hamath, quando ele foi estabelecer seu domínio junto ao rio Eufrates.
4 ४ दावीदाने त्याच्याकडून एक हजार रथ, सात हजार सारथी, आणि वीस हजार पायदळ एवढे घेतले. दावीदाने रथाच्या जवळपास सर्व घोड्यांच्या शिरा तोडल्या पण त्यातून शंभर रथाचे घोडे मात्र त्याने शाबूत ठेवले.
David tirou dele mil carruagens, sete mil cavaleiros e vinte mil criados de libré; e Davi empurrou todos os cavalos das carruagens, mas reservou deles o suficiente para cem carruagens.
5 ५ जेव्हा दिमिष्क नगरातील अरामी लोक सोबाचा राजा हद्देजर याच्या मदतीला आले, त्यांच्यापैकी बावीस हजार लोकांसही दावीदाने जिवे मारले.
Quando os sírios de Damasco vieram para ajudar Hadadezer, rei de Zobah, David atingiu vinte e dois mil homens dos sírios.
6 ६ नंतर अराममधील दिमिष्कात दावीदाने बस्थान बसविले. अरामी लोक दावीदाचे सेवक होऊन त्यास कर देऊ लागले. अशाप्रकारे दावीद जेथे जेथे जात असे तेथे परमेश्वर त्यास जय देत असे.
Então Davi colocou guarnições na Síria de Damasco; e os sírios se tornaram servos de Davi e trouxeram tributo. Yahweh deu vitória a Davi onde quer que ele fosse.
7 ७ हद्देजराच्या सेवकांच्या सोन्याच्या ढाली दावीदाने काढून घेतल्या आणि त्या यरूशलेमेला आणल्या.
David pegou os escudos de ouro que estavam sobre os servos de Hadadezer, e os trouxe para Jerusalém.
8 ८ हद्देजराची नगरे टिमथ आणि कून यातून दावीदाने पुष्कळ पितळही हस्तगत केले. हे पितळ वापरुन नंतर शलमोनाने पितळी समुद्र, गंगाळ व स्तंभ आणि पितळी भांडी बनवली.
De Tibhath e de Cun, cidades de Hadadezer, Davi tomou muito bronze, com o qual Salomão fez o mar de bronze, os pilares, e os vasos de bronze.
9 ९ जेव्हा दावीदाने सोबाचा राजा हद्देजर याच्या सर्व सैन्याचा पराभव केल्याची बातमी तोवू हमाथ नगराचा राजा याने ऐकली.
Quando Tou, rei de Hamath, soube que Davi havia atingido todo o exército de Hadadezer, rei de Zobah,
10 १० तेव्हा त्याने हदोराम या आपल्या पुत्राला दावीद राजाचे क्षेमकुशल विचारण्यासाठी आणि त्याचे अभिनंदन करण्यासाठी त्याच्याकडे पाठवले, कारण दावीद हद्देजराविरुध्द लढला व त्याचा पराभव केला, तोवू आणि हद्देजर यांच्यात लढाया होतच असत. हदोरामने आपल्याबरोबर सोने, रुपे, पितळ याची भांडी आणली.
ele enviou Hadoram, seu filho, ao rei Davi para saudá-lo e abençoá-lo, porque ele havia lutado contra Hadadezer e o atingiu (pois Hadadezer tinha guerras com Tou); e ele tinha com ele todos os tipos de vasos de ouro, prata e bronze.
11 ११ जे सोने रुपे त्याने सर्व राष्ट्रांपासून, अदोम, मवाब, अम्मोनी, पलिष्टी आणि अमालेकी यांच्यापासून घेतले होते, ती भांडीही दावीद राजाने परमेश्वरास समर्पिली.
O rei David também os dedicou a Iavé, com a prata e o ouro que ele levou de todas as nações: de Edom, de Moab, dos filhos de Amon, dos filisteus, e de Amalek.
12 १२ सरुवेचा पुत्र अबीशय याने क्षार खोऱ्यात अठरा हजार अदोमी लोकांस मारले.
Moreover Abishai, filho de Zeruiah, atingiu dezoito mil dos Edomitas no Vale do Sal.
13 १३ अदोमामध्ये अबीशयने मजबूत बस्थान बसविले आणि सर्व अदोमी दावीदाचे सेवक झाले. परमेश्वराने दावीदाला जेथे कोठे तो गेला तेथे त्यास जय मिळवून दिला.
Ele colocou guarnições em Edom; e todos os edomitas se tornaram servos de Davi. Yahweh deu vitória a Davi onde quer que ele fosse.
14 १४ दावीदाने सर्व इस्राएलावर राज्य केले आणि त्याने त्याच्या सर्व लोकांचा योग्य न्याय करत असे व नीतिने वागत असे.
David reinou sobre todo Israel; e ele executou justiça e retidão para todo o seu povo.
15 १५ सरुवेचा पुत्र यवाब हा दावीदाच्या सैन्याचा मुख्य अधिकारी होता. अहीलुदाचा पुत्र यहोशाफाट अखबारनवीस त्याचा अधिकारी होता.
Joabe, filho de Zeruia, estava sobre o exército; Jeosafá, filho de Ailude, era gravador;
16 १६ अहीटूबचा पुत्र सादोक आणि अब्याथारचा पुत्र अबीमलेख याजक होते. शवूशा हा नियमशास्त्र शिक्षक होता.
Zadoque, filho de Aitube, e Abimeleque, filho de Abiatar, eram sacerdotes; Shavsha, escriba;
17 १७ यहोयादाचा पुत्र बनाया हा करेथी व पलेथी लोकांवरील जबाबदार अधिकारी होता. दावीदाचे पुत्र राजाचे मुख्य सल्लागार होते.
e Benaia, filho de Jeoiada, estava sobre os queretitas e os peletitas; e os filhos de Davi eram oficiais principais ao serviço do rei.