< 1 इतिहास 18 >

1 यानंतर असे झाले की, दावीदाने पलिष्ट्यांवर स्वारी केली आणि त्यांचा पराभव केला. त्याने पलिष्ट्यांच्या हातातून गथ आणि त्यांची गावे घेतली.
Történt ezután, megverte Dávid a filiszteusokat és megalázta őket és elvette Gátot és leányvárosait a filiszteusok kezéből.
2 मग त्याने मवाबाचा पराभव केला आणि मवाबी लोक दावीदाचे सेवक झाले आणि त्यास कर देऊ लागले.
Megverte Móábot és lettek a Móabbeliek szolgái Dávidnak, ajándékvivők.
3 मग सोबाचा राजा हद्देजर आपल्या राज्याची सीमा फरात नदीपर्यंत स्थिर करण्यास जात असता दावीदाने हमाथाजवळ त्याचा पराभव केला.
Megverte Dávid Hadádézert, Cóba királyát Chamátban, mikor elindult, hogy megállapítsa hatalmát az Eufrátesz folyamnál.
4 दावीदाने त्याच्याकडून एक हजार रथ, सात हजार सारथी, आणि वीस हजार पायदळ एवढे घेतले. दावीदाने रथाच्या जवळपास सर्व घोड्यांच्या शिरा तोडल्या पण त्यातून शंभर रथाचे घोडे मात्र त्याने शाबूत ठेवले.
S elfogott Dávid tőle ezer szekeret, hétezer lovast és húszezer gyalogos embert, és Dávid megbénította az egész szekérhadat és hagyott belőle száz szekeret.
5 जेव्हा दिमिष्क नगरातील अरामी लोक सोबाचा राजा हद्देजर याच्या मदतीला आले, त्यांच्यापैकी बावीस हजार लोकांसही दावीदाने जिवे मारले.
Ekkor jött Arám-Darmészek, hogy segítsen Hadádézernek, Cóba királyának, és megvert Dávid Arám közt huszonkétezer embert.
6 नंतर अराममधील दिमिष्कात दावीदाने बस्थान बसविले. अरामी लोक दावीदाचे सेवक होऊन त्यास कर देऊ लागले. अशाप्रकारे दावीद जेथे जेथे जात असे तेथे परमेश्वर त्यास जय देत असे.
És elhelyezett Dávid őrsöket Arám-Darmészekben és Dávidé lett Arám, ajándékot vivő, szolgákul. Így segített az Örökkévaló Dávidnak, valamerre ment.
7 हद्देजराच्या सेवकांच्या सोन्याच्या ढाली दावीदाने काढून घेतल्या आणि त्या यरूशलेमेला आणल्या.
És elvette Dávid az aranypajzsokat, melyek Hadádézer szolgáin voltak, és bevitte azokat Jeruzsálembe.
8 हद्देजराची नगरे टिमथ आणि कून यातून दावीदाने पुष्कळ पितळही हस्तगत केले. हे पितळ वापरुन नंतर शलमोनाने पितळी समुद्र, गंगाळ व स्तंभ आणि पितळी भांडी बनवली.
Tibchatból pedig és Kúnból, Hadádézer városaiból, elvett Dávid igen sok rezet. Abból készítette Salamon a réztengert és az oszlopokat és a rézedényeket.
9 जेव्हा दावीदाने सोबाचा राजा हद्देजर याच्या सर्व सैन्याचा पराभव केल्याची बातमी तोवू हमाथ नगराचा राजा याने ऐकली.
Meghallotta Tóú, Chamát királya, hogy megverte Dávid Hadádézernek, Cóba királyának egész seregét.
10 १० तेव्हा त्याने हदोराम या आपल्या पुत्राला दावीद राजाचे क्षेमकुशल विचारण्यासाठी आणि त्याचे अभिनंदन करण्यासाठी त्याच्याकडे पाठवले, कारण दावीद हद्देजराविरुध्द लढला व त्याचा पराभव केला, तोवू आणि हद्देजर यांच्यात लढाया होतच असत. हदोरामने आपल्याबरोबर सोने, रुपे, पितळ याची भांडी आणली.
Ekkor elküldte fiát Hadórámot Dávid királyhoz, hogy megkérdezze békéje felől és hogy üdvözölje azért, hogy harcolt Hadádézer ellen és megverte – mert Tóúnak hadfele volt Hadádézer – és mindennemű arany, ezüst és rézedényt.
11 ११ जे सोने रुपे त्याने सर्व राष्ट्रांपासून, अदोम, मवाब, अम्मोनी, पलिष्टी आणि अमालेकी यांच्यापासून घेतले होते, ती भांडीही दावीद राजाने परमेश्वरास समर्पिली.
Azokat is szentelte Dávid király az Örökkévalónak, együtt azon ezüsttel és arannyal, amelyet elvitt mind a nemzetektől: Edómtól, Móábtól, Ammón fiaitól, a filiszteusoktól és Amáléktől.
12 १२ सरुवेचा पुत्र अबीशय याने क्षार खोऱ्यात अठरा हजार अदोमी लोकांस मारले.
És Absáj, Cerúja fia, megverte Edómot a Sósvölgyben, tizennyolcezret.
13 १३ अदोमामध्ये अबीशयने मजबूत बस्थान बसविले आणि सर्व अदोमी दावीदाचे सेवक झाले. परमेश्वराने दावीदाला जेथे कोठे तो गेला तेथे त्यास जय मिळवून दिला.
És elhelyezett őrsöket Edómban és lettek mind az Edómbeliek szolgái Dávidnak. Így segítette az Örökkévaló Dávidot, valamerre ment.
14 १४ दावीदाने सर्व इस्राएलावर राज्य केले आणि त्याने त्याच्या सर्व लोकांचा योग्य न्याय करत असे व नीतिने वागत असे.
Király volt Dávid egész Izrael fölött; és szolgáltatott jogot és igazságot egész népének.
15 १५ सरुवेचा पुत्र यवाब हा दावीदाच्या सैन्याचा मुख्य अधिकारी होता. अहीलुदाचा पुत्र यहोशाफाट अखबारनवीस त्याचा अधिकारी होता.
Jóáb, Cerúja fia, a sereg fölött volt; Jehósáfát, Achilúd fia, kancellár;
16 १६ अहीटूबचा पुत्र सादोक आणि अब्याथारचा पुत्र अबीमलेख याजक होते. शवूशा हा नियमशास्त्र शिक्षक होता.
Cádók, Achítúb fia, és Abímélekh, Ebjátár fia, papok; Savsa író;
17 १७ यहोयादाचा पुत्र बनाया हा करेथी व पलेथी लोकांवरील जबाबदार अधिकारी होता. दावीदाचे पुत्र राजाचे मुख्य सल्लागार होते.
Benájáhú, Jehójádá fia, a keréti és peléti felett, Dávid fiai pedig elsők a király oldalán.

< 1 इतिहास 18 >