< 1 इतिहास 15 >

1 दावीदाने दावीद नगरात स्वत: साठी घरे बांधली. तसेच त्याने देवाचा कोश ठेवण्यासाठी एक स्थान तयार केले व त्यासाठी तंबू केला.
David si je v Davidovem mestu zgradil hiše in pripravil kraj za Božjo skrinjo in zanjo razpel šotor.
2 मग दावीद म्हणाला, “फक्त लेवींनाच देवाचा कोश वाहून आणण्याची परवानगी आहे. या कामासाठी आणि सर्वकाळ परमेश्वराची सेवा करण्यासाठीच त्यांची निवड झाली आहे.”
Potem je David rekel: »Božje skrinje ne bi smel nositi nihče razen Lévijevcev, kajti njih je Gospod izbral, da nosijo Božjo skrinjo in da mu služijo na veke.«
3 मग दावीदाने परमेश्वराच्या कोशासाठी जे ठिकाण तयार केले होते तेथे तो वर आणण्यासाठी सर्व इस्राएल लोकांस यरूशलेमेत एकत्र जमा केले.
David je skupaj zbral ves Izrael v Jeruzalemu, da prinese gor Gospodovo skrinjo na kraj, ki ga je pripravil zanjo.
4 दावीदाने अहरोनाचे वंशज आणि लेवी यांनाही एकत्र जमवले.
David je zbral Aronove otroke in Lévijevce.
5 कहाथाच्या घराण्यातील उरीएल त्यांचा प्रमुख होता व त्याचे नातेवाईक असे एकशें वीस माणसे होती.
Izmed Kehátovih sinov vodja Uriéla in sto dvajset njegovih bratov;
6 मरारीच्या कुळातला असाया हा त्यांचा नेता होता व त्याचे नातेवाईक दोनशे वीस माणसे होती.
izmed Meraríjevih sinov vodja Asajája in dvesto dvajset njegovih bratov;
7 गर्षोमच्या घराण्यातला योएल हा त्यांचा प्रमुख होता व त्याचे नातेवाईक असे एकशेतीस माणसे होती.
izmed Geršómovih sinov vodja Joéla in sto trideset njegovih bratov;
8 अलीसाफानच्या घराण्यापैकी त्यांचा नेता शमाया होता व त्याचे नातेवाईक दोनशे माणसे होते.
izmed Elicafánovih sinov vodja Šemajá in dvesto njegovih bratov;
9 हेब्रोनाच्या वंशातला अलीएल त्यांच्या नेता होता व त्याचे नातेवाईक ऐंशी माणसे होते.
izmed Hebrónovih sinov vodja Eliéla in osemdeset njegovih bratov;
10 १० उज्जियेलाच्या घराण्यातला अमीनादाब हा प्रमुख होता व त्याचे नातेवाईक एकशें बारा माणसे होती.
izmed Uziélovih sinov vodja Aminadába in sto dvanajst njegovih bratov.
11 ११ दावीदाने मग सादोक आणि अब्याथार याजकांना बोलावले. आणि तसेच उरीएल, असाया, योएल, शमाया, अलीएल आणि अमीनादाब या लेवींनाही बोलावून घेतले.
David je dal poklicati Cadóka, duhovnika Abjatárja in Lévijevce Uriéla, Asajá, Joéla, Šemajá, Eliéla in Aminadába
12 १२ दावीद त्यांना म्हणाला, “तुम्ही लेवी घराण्यांचे प्रमुख आहात. तुम्ही आपल्या भावांसहीत आपणास पवित्र करा. यासाठी की, इस्राएलाचा देव परमेश्वर याच्या कोशासाठी मी तयार केलेल्या जागेत तुम्ही तो आणावा.
ter jim rekel: »Vi ste vodje očetov Lévijevcev. Posvetite se tako vi kakor vaši bratje, da boste lahko prinesli gor skrinjo Gospoda, Izraelovega Boga, na kraj, ki sem ga pripravil zanjo.
13 १३ पहिल्या वेळी तुम्ही तो उचलून आणला नव्हता. आपण आपला देव परमेश्वर याच्या विधीचे पालन केले नाही किंवा त्याचा धावा आम्ही केला नाही, म्हणून त्याने आपल्याला शिक्षा दिली.”
Kajti ker tega niste najprej storili, je Gospod, naš Bog, nad nami naredil vrzel, ker ga nismo iskali po predpisanem redu.«
14 १४ यावरुन याजक व लेवी यांनी इस्राएलाचा देव परमेश्वर याचा कोश आणण्यासाठी आपणांस पवित्र केले.
Tako so se duhovniki in Lévijevci posvetili, da prinesejo gor skrinjo Gospoda, Izraelovega Boga.
15 १५ मोशेने परमेश्वराच्या वचनाप्रमाणे आज्ञा केली होती त्याप्रमाणे लेव्यांनी देवाच्या कोशास लावलेल्या त्याच्या काठ्या आपल्या खांद्यावर घेऊन वाहिला.
Lévijevi otroci so na svojih ramenih nosili Božjo skrinjo z njenima drogovoma v njej, kakor je zapovedal Mojzes, glede na Gospodovo besedo.
16 १६ दावीदाने लेवीच्या प्रमुखांना आज्ञा केली की, सतार, वीणा, ही तंतूवाद्ये, झांजा, ही संगीत वाद्ये मोठ्याने वाजवून आनंदाने उंच स्वराने गायन करणारे असे तुमच्या भावांतले गायकांची नेमणूक करा.
David je spregovoril vodju Lévijevcev, da določi svoje brate, da bodo pevci z glasbenimi instrumenti, plunkami, harfami in cimbalami, z dvigovanjem zvenečega radostnega glasu.
17 १७ लेवींनी मग हेमान आणि त्याचे भाऊ आसाफ आणि एथान यांना नेमले. हेमान हा योएलाचा पुत्र. आसाफ बरेख्याचा पुत्र. एथान कुशायाचा पुत्र. हे सर्वजण मरारीच्या घराण्यातले होते.
Tako so Lévijevci določili Joélovega sina Hemána in izmed njegovih bratov Berehjájevega sina Asáfa in izmed Meraríjevih sinov, njihovih bratov, Kušajájevega sina Etána
18 १८ याखेरीज लेवीचा आणखी एक गट होता. जखऱ्या, बेन, यजीएल, शमीरामोथ, यहीएल, उन्नी, अलीयाब, बनाया, मासेया, मत्तिथ्या, अलीफलेह, मिकनेया, ओबेद-अदोम आणि ईयेल हे ते होत. हे द्वारपाल होते.
in z njimi njihove brate druge stopnje: Zeharjája, Bena, Jaaziéla, Šemiramóta, Jehiéla, Uníja, Eliába, Benajája, Maasejája, Matitjája, Elifeléhuja, Miknejája, Obéd Edóma in Jeiéla, vratarje.
19 १९ हेमान, आसाफ आणि एथान हे गाणारे, यांना पितळेच्या झांजा मोठ्याने वाजवायला नेमले होते.
Tako so bili pevci Hemán, Asáf in Etán določeni, da igrajo na cimbale iz brona,
20 २० जखऱ्या, अजीएल, शमीरामोथ, यहीएल, उन्नी, अलीयाब, मासेया, बनाया हे अलामोथ या सुरावर तंतूवाद्ये वाजवायला नेमले होते.
Zeharjá, Jaaziél, Šemiramót, Jehiél, Uní, Eliáb, Maasejá in Benajá s plunkami na sopran,
21 २१ मत्तिथ्या, अलीफलेह, मिकनेया, ओबेद-अदोम, ईयेल आणि अजज्या हे शमीनीथ सुरावर वीणा वाजवण्याच्या कामावर होते.
in Matitjá, Elifeléhu, Miknejá, Obéd Edóm, Jeiél in Azazjá s harfami v oktavi, da vodijo.
22 २२ लेवींचा प्रमुख कनन्या हा मुख्य गायक होता. गायनात निपुण असल्यामुळे त्याच्यावर ही कामगिरी होती.
Kenanjá, vodja Lévijevcev, je bil za pesem. Poučil je glede pesmi, ker je bil vešč.
23 २३ बरेख्या आणि एलकाना हे कोशाचे रक्षक होते.
Berehjá in Elkaná sta bila vratarja za skrinjo.
24 २४ शबन्या, योशाफाट, नथनेल, अमासय, जखऱ्या, बनाया आणि अलियेजर हे याजक देवाच्या कोशापुढे चालताना कर्णे वाजवत होते. ओबेद-अदोम आणि यहीया हे कोशाचे आणखी दोन रक्षक होते.
Duhovniki Šebanjá, Józafat, Netanél, Amasáj, Zeharjá, Benajá in Eliézer so s trobentami trobili pred Božjo skrinjo; Obéd Edóm in Jehijá pa sta bila vratarja za skrinjo.
25 २५ अशाप्रकारे दावीद, इस्राएलमधील वडीलजन, हजारांवरचे सरदार हे परमेश्वराच्या कराराचा कोश ओबेद-अदोमाच्या घरातून उत्साहाने आणण्यासाठी तिकडे गेले.
Tako so David, Izraelove starešine in tisočniki odšli, da iz hiše Obéd Edóma z radostjo prinesejo gor Gospodovo skrinjo zaveze.
26 २६ परमेश्वराचा करार कोश उचलून आणणाऱ्या लेव्यांना देवाने साहाय्य केले. त्यांनी सात बैल आणि सात मेंढे यांचे यज्ञार्पण केले.
Pripetilo se je, ko je Bog pomagal Lévijevcem, da so nosili skrinjo Gospodove zaveze, da so darovali sedem bikcev in sedem ovnov.
27 २७ कराराचा कोश वाहून नेणाऱ्या सर्व लेव्यांनी तलम वस्त्राचे अंगरखे घातले होते. गायक प्रमुख कनन्या आणि इतर सर्व गायक यांनी तलम झगे घातले होते. दावीदाने तागाचे एफोद घातले होते.
David je bil oblečen s svečanim oblačilom iz tankega lanenega platna in vsi Lévijevci, ki so nosili skrinjo, pevci in Kenanjá, mojster pesmi s pevci; tudi David je imel na sebi efód iz lana.
28 २८ अखेर सर्व इस्राएल लोकांनी परमेश्वराचा कराराचा कोश आणला. जयघोष करत रणशिंगाच्या नादांत, कर्णे, झांजा, सतारी, वीणा अशी तंतूवाद्ये वाजवत त्यांनी तो आणला.
Tako je ves Izrael prinesel gor Gospodovo skrinjo zaveze z vriskanjem, z zvokom kornéta, s trobentami, cimbalami in igrali so s plunkami in harfami.
29 २९ पण परमेश्वराच्या कराराचा कोश दावीद नगरात पोहचला तेव्हा शौलाची कन्या मीखल हिने खिडकीतून बाहेर पाहिले. तिने दावीद राजाला नाचताना, जल्लोष करताना पाहून तिने आपल्या अंतःकरणात त्यास तुच्छ लेखले.
Pripetilo se je, medtem ko je Gospodova skrinja prišla v Davidovo mesto, da je Savlova hči Mihála, zroč skozi okno, videla kralja Davida plesati in igrati in ga v svojem srcu prezirala.

< 1 इतिहास 15 >