< 1 इतिहास 15 >
1 १ दावीदाने दावीद नगरात स्वत: साठी घरे बांधली. तसेच त्याने देवाचा कोश ठेवण्यासाठी एक स्थान तयार केले व त्यासाठी तंबू केला.
다윗이 다윗성에서 자기를 위하여 궁궐을 세우고 또 하나님의 궤를 위하여 처소를 예비하고 위하여 장막을 치고
2 २ मग दावीद म्हणाला, “फक्त लेवींनाच देवाचा कोश वाहून आणण्याची परवानगी आहे. या कामासाठी आणि सर्वकाळ परमेश्वराची सेवा करण्यासाठीच त्यांची निवड झाली आहे.”
가로되 레위 사람 외에는 하나님의 궤를 멜 수 없나니 이는 여호와께서 저희를 택하사 하나님의 궤를 메고 영원히 저를 섬기게 하셨음이니라 하고
3 ३ मग दावीदाने परमेश्वराच्या कोशासाठी जे ठिकाण तयार केले होते तेथे तो वर आणण्यासाठी सर्व इस्राएल लोकांस यरूशलेमेत एकत्र जमा केले.
이스라엘 온 무리를 예루살렘으로 모으고 여호와의 궤를 그 예비한 곳으로 메어 올리고자 하여
4 ४ दावीदाने अहरोनाचे वंशज आणि लेवी यांनाही एकत्र जमवले.
아론 자손과 레위 사람을 모으니
5 ५ कहाथाच्या घराण्यातील उरीएल त्यांचा प्रमुख होता व त्याचे नातेवाईक असे एकशें वीस माणसे होती.
그핫 자손 중에 족장 우리엘과 그 형제 일백 이십인이요
6 ६ मरारीच्या कुळातला असाया हा त्यांचा नेता होता व त्याचे नातेवाईक दोनशे वीस माणसे होती.
므라리 자손 중에 족장 아사야와 그 형제 이백 이십인이요
7 ७ गर्षोमच्या घराण्यातला योएल हा त्यांचा प्रमुख होता व त्याचे नातेवाईक असे एकशेतीस माणसे होती.
게르솜 자손 중에 족장 요엘과 그 형제 일백 삼십인이요
8 ८ अलीसाफानच्या घराण्यापैकी त्यांचा नेता शमाया होता व त्याचे नातेवाईक दोनशे माणसे होते.
엘리사반 자손 중에 족장 스마야와 그 형제 이백인이요
9 ९ हेब्रोनाच्या वंशातला अलीएल त्यांच्या नेता होता व त्याचे नातेवाईक ऐंशी माणसे होते.
헤브론 자손 중에 족장 엘리엘과 그 형제 팔십인이요
10 १० उज्जियेलाच्या घराण्यातला अमीनादाब हा प्रमुख होता व त्याचे नातेवाईक एकशें बारा माणसे होती.
웃시엘 자손 중에 족장 암미나답과 그 형제 일백 십 이인이라
11 ११ दावीदाने मग सादोक आणि अब्याथार याजकांना बोलावले. आणि तसेच उरीएल, असाया, योएल, शमाया, अलीएल आणि अमीनादाब या लेवींनाही बोलावून घेतले.
다윗이 제사장 사독과 아비아달을 부르고 또 레위 사람 우리엘과 아사야와 요엘과 스마야와 엘리엘과 암미나답을 불러
12 १२ दावीद त्यांना म्हणाला, “तुम्ही लेवी घराण्यांचे प्रमुख आहात. तुम्ही आपल्या भावांसहीत आपणास पवित्र करा. यासाठी की, इस्राएलाचा देव परमेश्वर याच्या कोशासाठी मी तयार केलेल्या जागेत तुम्ही तो आणावा.
저희에게 이르되 너희는 레위 사람의 족장이니 너희와 너희 형제는 몸을 성결케 하고 내가 예비한 곳으로 이스라엘 하나님 여호와의 궤를 메어 올리라
13 १३ पहिल्या वेळी तुम्ही तो उचलून आणला नव्हता. आपण आपला देव परमेश्वर याच्या विधीचे पालन केले नाही किंवा त्याचा धावा आम्ही केला नाही, म्हणून त्याने आपल्याला शिक्षा दिली.”
전에는 너희가 메지 아니하였으므로 우리 하나님 여호와께서 우리를 충돌하셨나니 이는 우리가 규례대로 저에게 구하지 아니하였음이니라
14 १४ यावरुन याजक व लेवी यांनी इस्राएलाचा देव परमेश्वर याचा कोश आणण्यासाठी आपणांस पवित्र केले.
이에 제사장들과 레위 사람들이 이스라엘 하나님 여호와의 궤를 메고 올라가려 하여 몸을 성결케 하고
15 १५ मोशेने परमेश्वराच्या वचनाप्रमाणे आज्ञा केली होती त्याप्रमाणे लेव्यांनी देवाच्या कोशास लावलेल्या त्याच्या काठ्या आपल्या खांद्यावर घेऊन वाहिला.
모세가 여호와의 말씀을 따라 명한대로 레위 자손이 채로 하나님의 궤를 꿰어 어깨에 메니라
16 १६ दावीदाने लेवीच्या प्रमुखांना आज्ञा केली की, सतार, वीणा, ही तंतूवाद्ये, झांजा, ही संगीत वाद्ये मोठ्याने वाजवून आनंदाने उंच स्वराने गायन करणारे असे तुमच्या भावांतले गायकांची नेमणूक करा.
다윗이 레위 사람의 어른들에게 명하여 그 형제 노래하는 자를 세우고 비파와 수금과 제금등의 악기를 울려서 즐거운 소리를 크게 내라 하매
17 १७ लेवींनी मग हेमान आणि त्याचे भाऊ आसाफ आणि एथान यांना नेमले. हेमान हा योएलाचा पुत्र. आसाफ बरेख्याचा पुत्र. एथान कुशायाचा पुत्र. हे सर्वजण मरारीच्या घराण्यातले होते.
레위 사람이 요엘의 아들 헤만과 그 형제 중 베레야의 아들 아삽과 그 동종 므라리 자손 중에 구사야의 아들 에단을 세우고
18 १८ याखेरीज लेवीचा आणखी एक गट होता. जखऱ्या, बेन, यजीएल, शमीरामोथ, यहीएल, उन्नी, अलीयाब, बनाया, मासेया, मत्तिथ्या, अलीफलेह, मिकनेया, ओबेद-अदोम आणि ईयेल हे ते होत. हे द्वारपाल होते.
그 다음으로 형제 스가랴와 벤과 야아시엘과 스미라못과 여히엘과 운니와 엘리압과 브나야와 마아세야와 맛디디야와 엘리블레후와 믹네야와 문지기 오벧에돔과 여이엘을 세우니
19 १९ हेमान, आसाफ आणि एथान हे गाणारे, यांना पितळेच्या झांजा मोठ्याने वाजवायला नेमले होते.
노래하는 자 헤만과 아삽과 에단은 놋제금을 크게 치는 자요
20 २० जखऱ्या, अजीएल, शमीरामोथ, यहीएल, उन्नी, अलीयाब, मासेया, बनाया हे अलामोथ या सुरावर तंतूवाद्ये वाजवायला नेमले होते.
스가랴와 아시엘과 스미라못과 여히엘과 운니와 엘리압과 마아세야와 브나야는 비파를 타서 여창에 맞추는 자요
21 २१ मत्तिथ्या, अलीफलेह, मिकनेया, ओबेद-अदोम, ईयेल आणि अजज्या हे शमीनीथ सुरावर वीणा वाजवण्याच्या कामावर होते.
맛디디야와 엘리블레후와 믹네야와 오벧에돔과 여이엘과 아사시야는 수금을 타서 여덟째 음에 맞추어 인도하는 자요
22 २२ लेवींचा प्रमुख कनन्या हा मुख्य गायक होता. गायनात निपुण असल्यामुळे त्याच्यावर ही कामगिरी होती.
레위 사람의 족장 그나냐는 노래에 익숙하므로 노래를 주장하여 사람에게 가르치는 자요
23 २३ बरेख्या आणि एलकाना हे कोशाचे रक्षक होते.
베레갸와 엘가나는 궤 앞에서 문을 지키는 자요
24 २४ शबन्या, योशाफाट, नथनेल, अमासय, जखऱ्या, बनाया आणि अलियेजर हे याजक देवाच्या कोशापुढे चालताना कर्णे वाजवत होते. ओबेद-अदोम आणि यहीया हे कोशाचे आणखी दोन रक्षक होते.
제사장 스바냐와 요사밧과 느다넬과 아미새와 스가랴와 브나야와 엘리에셀은 하나님의 궤 앞에서 나팔을 부는 자요 오벧에돔과 여히야는 궤 앞에서 문을 지키는 자더라
25 २५ अशाप्रकारे दावीद, इस्राएलमधील वडीलजन, हजारांवरचे सरदार हे परमेश्वराच्या कराराचा कोश ओबेद-अदोमाच्या घरातून उत्साहाने आणण्यासाठी तिकडे गेले.
이에 다윗과 이스라엘 장로들과 천부장들이 가서 여호와의 언약궤를 즐거이 메고 오벧에돔의 집에서 올라왔는데
26 २६ परमेश्वराचा करार कोश उचलून आणणाऱ्या लेव्यांना देवाने साहाय्य केले. त्यांनी सात बैल आणि सात मेंढे यांचे यज्ञार्पण केले.
하나님이 여호와의 언약궤를 멘 레위 사람을 도우셨으므로 무리가 수송아지 일곱과 수양 일곱으로 제사를 드렸더라
27 २७ कराराचा कोश वाहून नेणाऱ्या सर्व लेव्यांनी तलम वस्त्राचे अंगरखे घातले होते. गायक प्रमुख कनन्या आणि इतर सर्व गायक यांनी तलम झगे घातले होते. दावीदाने तागाचे एफोद घातले होते.
다윗과 궤를 멘 레위 사람과 노래하는 자와 그 두목 그나냐와 모든 노래하는 자도 다 세마포 겉옷을 입었으며 다윗은 또 베 에봇을 입었고
28 २८ अखेर सर्व इस्राएल लोकांनी परमेश्वराचा कराराचा कोश आणला. जयघोष करत रणशिंगाच्या नादांत, कर्णे, झांजा, सतारी, वीणा अशी तंतूवाद्ये वाजवत त्यांनी तो आणला.
이스라엘 무리는 크게 부르며 각과 나팔을 불며 제금을 치며 비파와 수금을 힘있게 타며 여호와의 언약궤를 메어 올렸더라
29 २९ पण परमेश्वराच्या कराराचा कोश दावीद नगरात पोहचला तेव्हा शौलाची कन्या मीखल हिने खिडकीतून बाहेर पाहिले. तिने दावीद राजाला नाचताना, जल्लोष करताना पाहून तिने आपल्या अंतःकरणात त्यास तुच्छ लेखले.
여호와의 언약궤가 다윗성으로 들어올 때에 사울의 딸 미갈이 창으로 내어다보다가 다윗 왕의 춤추며 뛰노는 것을 보고 심중에 업신여겼더라