< 1 इतिहास 13 >
1 १ दावीदाने हजारांचे आणि शंभरांचे सेनापती यापैकी प्रत्येक पुढारी यांचा सल्ला घेतला.
Então Davi teve conselho com os capitães de milhares e de centenas, [e] com todos os chefes.
2 २ मग दावीदाने इस्राएलमधील सर्व मंडळीस म्हटले. “तुम्हास जर हे योग्य वाटत असेल आणि आपला देव परमेश्वर याच्याकडून हे असेल तर आपले भाऊ, इस्राएलाच्या सर्व प्रदेशात राहिलेले आहेत त्यास आपापल्या नगरांत व खेड्यांत त्यांच्याबरोबर जे याजक आणि लेवी आहेत त्यांना आपणाकडे एकत्र जमण्यास त्यांच्याकडे दूत पाठवू.
E Davi disse a todo a congregação de Israel: Se bem vos parece, e se vem do SENHOR nosso Deus, enviemos depressa [mensageiros] aos nossos irmãos que restaram em todas as terras de Israel, aos sacerdotes e aos levitas que estão com eles em suas cidades e em seus arredores, para que se ajuntem conosco.
3 ३ आपल्या देवाचा कोश आपणाकडे पुन्हा आणू. शौल राज्य करत असताना आपण त्याचा शोध केला नाही.”
E tragamos de volta a nós a arca de nosso Deus, porque não a buscamos desde o tempo de Saul.
4 ४ तेव्हा सर्व मंडळीने या गोष्टी करण्याची सहमती दिली कारण ती गोष्ट सर्व लोकांच्या दृष्टीने बरोबर होती.
Então toda a congregação disse que assim se fizesse, porque isso pareceu correto aos olhos de todo o povo.
5 ५ किर्याथ-यारीमाहून देवाचा कोश आणण्यासाठी दावीदाने मिसरमधील शीहोर नदीपासून लेबो हमाथच्या प्रदेशापर्यंत पसरलेल्या सर्व इस्राएल लोकांस एकत्र जमवले.
Assim Davi ajuntou a todo Israel, desde Sior do Egito, até chegar a Hamate, para que trouxessem a arca de Deus de Quriate-Jearim.
6 ६ करुबांवरती राहणारा देवाचा कोश, ज्याला परमेश्वर देवाचे नाव ठेवले आहे तो, यहूदातील बाला म्हणजेच किर्याथ-यारीम येथून आणावा म्हणून दावीदासह सर्व इस्राएली तिकडे चढून वर गेले.
Então Davi subiu com todo Israel a Baalá, [que é] Quriate-Jearim, em Judá, para dali trazerem acima a arca de Deus, o SENHOR, que habita entre os querubins, a qual é chamada pelo seu nome.
7 ७ मग त्यांनी देवाचा कोश अबीनादाबाच्या घरातून काढून, तो नव्या गाडीवर ठेवला. उज्जा आणि अह्यो हे दोघेजण ही गाडी हाकत होते.
E levaram a arca de Deus da casa de Abinadabe sobre uma carruagem nova, e Uzá e seu irmão guiavam o carro.
8 ८ दावीद आणि सर्व इस्राएल आपल्या सर्व शक्तीने देवापुढे जल्लोष करत चालले होते. ते स्तुतिगीते गात, वीणा, सतार, डफ झांजा, कर्णे इत्यादी वाद्ये वाजवत ते चालले होते.
E Davi e todo Israel celebravam diante de Deus com toda força; e com canções, harpas, saltérios, tamboris, címbalos e com trombetas.
9 ९ किदोनाच्या खळ्यापर्यंत ते पोहचले. तेव्हा गाडी ओढणारे बैल अडखळले. तेव्हा उज्जाने कोश धरण्यास हात पुढे केला.
E quando chegaram à eira de Quidom, Uzá estendeu sua mão para segurar a arca, pois os bois tropeçaram.
10 १० तेव्हा परमेश्वराचा उज्जावर कोप भडकला व उज्जाने कोशाला हात लावला म्हणून त्याने त्यास मारले आणि तेथे तो देवासमोर मेला.
Então a ira do SENHOR se acendeu contra Uzá, e o feriu, por ele ter estendido sua mão à arca; e morreu ali diante de Deus.
11 ११ परमेश्वराने उज्जाला असा मार दिला. याचे दावीदाला वाईट वाटले. तेव्हापासून आजपर्यंत त्या ठिकाणाचे नाव पेरेस-उज्जा असे आहे.
E Davi teve desgosto, porque o SENHOR havia atingido Uzá; por isso ele chamou aquele lugar Perez-Uzá, até hoje.
12 १२ दावीदाला त्यादिवशी देवाची भीती वाटली. तो म्हणाला, “आपल्या घरी मी देवाचा कोश कसा आणू?”
E Davi temeu a Deus naquele dia, dizendo: Como trarei a mim a arca de Deus?
13 १३ त्यामुळे दावीदाने दावीद नगरात तो कोश आणला नाही, पण तो ओबेद-अदोम गीत्ती याच्या घरात एकाबाजूला नेऊन ठेवला.
Por isso Davi não trouxe a arca a si, à cidade de Davi; em vez disso ele a trouxe à casa de Obede-Edom, o geteu.
14 १४ मग देवाचा कोश ओबेद-अदोम याच्या घरात तीन माहिने राहिला. परमेश्वराने त्याच्या घराला आणि त्याचे जे काही होते त्या सगळ्याला आशीर्वादित केले.
Assim a arca de Deus ficou na casa de Obede-Edom, em sua casa, por três meses; e o SENHOR abençoou a casa de Obede-Edom, e tudo quanto ele tinha.