< 1 इतिहास 13 >

1 दावीदाने हजारांचे आणि शंभरांचे सेनापती यापैकी प्रत्येक पुढारी यांचा सल्ला घेतला.
And David consulted with the captains of thousands, and of hundreds, and with all the commanders.
2 मग दावीदाने इस्राएलमधील सर्व मंडळीस म्हटले. “तुम्हास जर हे योग्य वाटत असेल आणि आपला देव परमेश्वर याच्याकडून हे असेल तर आपले भाऊ, इस्राएलाच्या सर्व प्रदेशात राहिलेले आहेत त्यास आपापल्या नगरांत व खेड्यांत त्यांच्याबरोबर जे याजक आणि लेवी आहेत त्यांना आपणाकडे एकत्र जमण्यास त्यांच्याकडे दूत पाठवू.
And he said to all the assembly of Israel: If it please you; and if the words which I speak come from the Lord our God, let us send to the rest of our brethren into all the countries of Israel, and to the priests, and the Levites, that dwell in the suburbs of the cities, to gather themselves to us,
3 आपल्या देवाचा कोश आपणाकडे पुन्हा आणू. शौल राज्य करत असताना आपण त्याचा शोध केला नाही.”
And let us bring again the ark of our God to us: for we sought it not in the days of Saul.
4 तेव्हा सर्व मंडळीने या गोष्टी करण्याची सहमती दिली कारण ती गोष्ट सर्व लोकांच्या दृष्टीने बरोबर होती.
And all the multitude answered that it should be so: for the word pleased all the people.
5 किर्याथ-यारीमाहून देवाचा कोश आणण्यासाठी दावीदाने मिसरमधील शीहोर नदीपासून लेबो हमाथच्या प्रदेशापर्यंत पसरलेल्या सर्व इस्राएल लोकांस एकत्र जमवले.
So David assembled all Israel from Sihor of Egypt, even to the entering into Emath, to bring the ark of God from Cariathiarim.
6 करुबांवरती राहणारा देवाचा कोश, ज्याला परमेश्वर देवाचे नाव ठेवले आहे तो, यहूदातील बाला म्हणजेच किर्याथ-यारीम येथून आणावा म्हणून दावीदासह सर्व इस्राएली तिकडे चढून वर गेले.
And David went up with all the men of Israel to the hill of Cariathiarim which is in Juda, to bring thence the ark of the Lord God sitting upon the cherubims, where his name is called upon.
7 मग त्यांनी देवाचा कोश अबीनादाबाच्या घरातून काढून, तो नव्या गाडीवर ठेवला. उज्जा आणि अह्यो हे दोघेजण ही गाडी हाकत होते.
And they carried the ark of God upon a new cart, out of the house of Abinadab. And Oza and his brother drove the cart.
8 दावीद आणि सर्व इस्राएल आपल्या सर्व शक्तीने देवापुढे जल्लोष करत चालले होते. ते स्तुतिगीते गात, वीणा, सतार, डफ झांजा, कर्णे इत्यादी वाद्ये वाजवत ते चालले होते.
And David and all Israel played before God with all their might with hymns, and with harps, and with psalteries, and timbrels, and cymbals, and trumpets,
9 किदोनाच्या खळ्यापर्यंत ते पोहचले. तेव्हा गाडी ओढणारे बैल अडखळले. तेव्हा उज्जाने कोश धरण्यास हात पुढे केला.
And when they came to the floor of Chidon, Oza put forth his hand, to hold up the ark: for the ox being wanton had made it lean a little on one side.
10 १० तेव्हा परमेश्वराचा उज्जावर कोप भडकला व उज्जाने कोशाला हात लावला म्हणून त्याने त्यास मारले आणि तेथे तो देवासमोर मेला.
And the Lord was angry with Oza, and struck him, because he had touched the ark; and he died there before the Lord.
11 ११ परमेश्वराने उज्जाला असा मार दिला. याचे दावीदाला वाईट वाटले. तेव्हापासून आजपर्यंत त्या ठिकाणाचे नाव पेरेस-उज्जा असे आहे.
And David was troubled because the Lord had divided Oza: and he called that place the Breach of Oza to this day.
12 १२ दावीदाला त्यादिवशी देवाची भीती वाटली. तो म्हणाला, “आपल्या घरी मी देवाचा कोश कसा आणू?”
And he feared God at that time, saying: How can I bring in the ark of God to me?
13 १३ त्यामुळे दावीदाने दावीद नगरात तो कोश आणला नाही, पण तो ओबेद-अदोम गीत्ती याच्या घरात एकाबाजूला नेऊन ठेवला.
And therefore he brought it not home to himself, that is, into the city of David, but carried it aside into the house of Obededom the Gethite.
14 १४ मग देवाचा कोश ओबेद-अदोम याच्या घरात तीन माहिने राहिला. परमेश्वराने त्याच्या घराला आणि त्याचे जे काही होते त्या सगळ्याला आशीर्वादित केले.
And the ark of God remained in the house of Obededom three months: and the Lord blessed his house, and all that he had.

< 1 इतिहास 13 >