< 1 इतिहास 12 >
1 १ कीशाचा पुत्र शौल याच्या भीतीने दावीद सिकलागला, लपून राहत असताना त्याच्याकडे आलेली माणसे ही होती. ते त्याच्या सैनिकांपैकी असून लढाईत मदत करणारे होते.
[投奔達味的戰士]當達味尚在逃避克士的兒子撒烏耳時,這些人就來到戚刻拉格,投奔達味。他們都是些勇士,善於作戰,
2 २ धनुष्यबाण चालवणे किंवा गोफणगुंडा मारणे या गोष्टी ते डाव्या व उजव्या दोन्ही हातांनी करीत होते. बन्यामीनच्या वंशात जे शौलाचे नातेवाईक होते.
能左右開弓,發石射傷的人,是本雅明人,為撒烏耳的同族兄弟;
3 ३ अहीएजर हा त्यांच्यातला प्रमुख होता. मग योवाश, गिबा येथील शमा याचे हे पुत्र त्यानंतर यजिएल आणि पेलेट. हे अजमावेथ याचे पुत्र. अनाथोच येथील बराका व येहू.
為首的是阿希厄則耳,其次為基貝亞人舍瑪亞的兒子約阿士,阿次瑪委特的兒子耶齊耳和培肋特,貝辣加和阿納托特人耶胡,
4 ४ गिबोन येथील इश्माया हा तीन वीरांपैकी एक आणि त्या तीन वीरांचा प्रमुख. गदेराथ लोकामधून यिर्मया, यहजिएल, योहानान आणि योजाबाद.
基貝紅人依市瑪雅,他在三十勇士之中,且是三十勇士的首領; 還有耶勒米雅,雅哈齊耳,約哈南和革德爾人的約匝巴得,
5 ५ एलूजय, यरीमोथ, बाल्या, शमऱ्या, हरुफी शफट्या
厄路齋,耶黎摩特,貝阿里雅,舍瑪黎雅和哈黎夫人舍法提雅,
6 ६ एलकाना, इश्शिया, अजरेल, योबेजर आणि याशबाम हे कोरहाचे वंशज,
厄耳卡納,依史雅,阿匝勒耳,約厄則爾和瑪芍貝罕,科辣黑人,
7 ७ तसेच यरोहाम गदोरी याचे पुत्र योएला आणि जबद्या.
又有革多爾人耶洛罕的兒子約厄拉和則巴狄雅。
8 ८ गादी यांच्यातील काही लोक दावीदाकडे तो वाळवंटातील गढीत असताना आले. ते चांगले शूर लढवय्ये होते. ढाल व भालाफेक हाताळणारे होते. त्यांची तोंडे सिंहाच्या तोंडासारखी भयानक होती. ते डोंगरावरील हरणासारखे वेगाने धावणारे होते.
有些加得人到曠野的山岩中歸順了達味;他們是孔武有力,精於作戰,能使藤牌槍矛的勇士,面貌相似獅子,敏捷有如山上的羚羊:
9 ९ गाद वंशातील एजेर हा सैन्याचा प्रमुख होता. ओबद्या दुसरा, अलीयाब तिसरा.
首為厄則爾,次為敖巴狄雅,三為厄里雅布,
10 १० मिश्मन्ना चौथा क्रमाकांवर तर यिर्मया पाचव्या वर होता.
四為米舍曼納,五為耶勒米雅,
11 ११ अत्तय सहावा, अलीएल सातवा,
六為阿泰,七為厄里耳,
12 १२ योहानन आठवा, एलजाबाद नववा,
八為約哈南,九為厄耳匝巴得,
13 १३ यिर्मया दहावा, मखबन्नय अकरावा.
十為耶勒米雅烏,十一為瑪革邦乃:
14 १४ हे गादी सैन्यातील सरदार होते. त्यांच्यातला जो लहान तो शंभरावर आणि जो मोठा तो हजारांवर होता.
這些人都是加得的子孫,軍隊的首領,小者可抵百人,大者可抵千人。
15 १५ वर्षाच्या पहिल्या महिन्यात यार्देन नदी दुथडी भरून वाहत होती तेव्हा त्यांनी ती ओलांडून जाऊन खोऱ्यात राहणाऱ्यांना त्यांनी पार पूर्वेला आणि पश्चिमेला पळवून लावले.
就是這些人,在一月裏,約但何水漲到兩岸時,渡過了河,使平原所有的居民東奔西逃。
16 १६ बन्यामीन आणि यहूदा वंशातील लोकही दावीदाला गढीत येऊन मिळाले.
此外,又有本雅明人和猶大人來到山砦見達味,
17 १७ दावीदाने त्यांचे स्वागत केले व त्यांना तो म्हणाला, “मला मदत करायला तुम्ही शांतीने आला असाल तर तुम्ही मला सामील होऊ शकता. पण माझ्या हातून काही अपराध झालेला नसताना कपट करायला आला असलात तर आमच्या पूर्वजांचा देव ते पाहून त्याचा निषेध करो.”
達味出來迎接他們說:「如果你們帶來平安,有意協助我,我的心就與你們相契合;如果你們來是為將我這無辜的人出賣於敵人,願我們祖先的天主,予以鑑察,予以審判。」
18 १८ अमासय याच्यावर आत्मा आला, तो तीस जणांचा प्रमुख होता. तो म्हणाला “दावीदा, आम्ही तुझे आहोत. इशायाच्या मुला, आम्ही तुझ्या बाजूचे आहोत. शांती, तुला शांती असो! तुला मदत करणाऱ्यांनाही शांती असो, कारण तुझा देव तुला मदत करतो.” तेव्हा दावीदाने त्यांना आपल्यात सामावून घेतले आणि त्यांना सैन्याचे अधिकारी केले.
當時,天主的神充滿在那三十個勇士的首領阿瑪賽身上,他遂說:「達味! 我們屬於你;葉瑟的兒子! 我們來協助你;平安! 願協助你的也都平安! 因為你的天主扶助了你。」達味便收留了他們,委他們為部隊隊長。
19 १९ मनश्शेचे काहीजणही दावीदाला येऊन मिळाले. तो पलिष्टंयाबरोबर शौलाशी लढायला गेला तेव्हा ते आले. पण त्यांनी पलिष्ट्यांना फारशी मदत केली नाही. कारण पलिष्ट्यांच्या पुढाऱ्यांनी आपसात सल्ला करून त्यांनी दावीदाला परत पाठवून दिले. ते म्हणाले, “दावीद जर आपला धनी शौल याच्याकडे परत गेलाच तर आपल्या जीवाला धोका होईल.”
當達味與培肋舍特人一同去攻打撒烏耳時,也有些默納協人歸順了達味。其實達味並沒有協助培勒舍特人,因為培肋舍特人的首領議決將他遣回,說:「怕達味拿我們的頭去向他的主人撒烏耳投誠。」
20 २० तो जेव्हा सिकलागला गेला. त्याच्याबरोबर आलेले मनश्शेचे लोक अदनाह, योजाबाद, यदीएल, मीखाएल, योजाबाद, अलीहू, आणि सिलथय. हे सर्व मनश्शे वंशातील सरदार होते.
達味回漆刻拉格時,默納協人阿德納,約匝巴得,耶狄厄耳,米加耳,約匝巴得,厄里胡和漆肋泰,都歸順了他;他們都是默納協人中的千夫長。
21 २१ लुटारुंच्या टोळीविरुध्द तोंड द्यायला त्यांनी दावीदाला मदत केली. ते लढणारे माणसे होते. दावीदाच्या सैन्यात ते अधिकारपदावर चढले.
這些人偕同達味攻擊了一群賊寇;他們皆是孔武有力的勇士,成了軍中的官長。
22 २२ देवाच्या सैन्यासारखे मोठे सैन्य होईपर्यंत दावीदाच्या मदतीला येणाऱ्यांत दिवसेंदिवस भर पडत गेली.
前來協助達味的人日漸增多,以致成了一強大的兵團,有如天主的軍旅。[擁護達味為王的戰士]
23 २३ आणि परमेश्वराच्या वचनाप्रमाणे हेब्रोन नगरात शौलाचे राज्य दावीदाच्या हाती द्यावे म्हणून सशस्त्र सैनिक त्याच्याकडे आले.
來到赫貝龍達味前,欲把撒烏耳的王位,依照上主的命令,交於達味,而準備出征的人數如下:
24 २४ यहूदाच्या घराण्यातील सहा हजार आठशे, सैनिक ढाल आणि भाले यांसह लढाईस सशस्त्र होते.
猶大子孫中,執盾持槍的武裝戰士六千八百人;
25 २५ शिमोनाच्या कुळातून सात हजार शंभर लढाईस तयार असे शूर सैनिक होते.
西默盎子孫中,英勇有力的戰士七千一百人;
26 २६ लेवीच्या कुळातून चार हजार सहाशें शूर वीर होते.
肋未子孫中,四千六百人;
27 २७ अहरोनाच्या घराण्याचा पुढारी यहोयादा होता. त्याच्याबरोबर तीन हजार सातशे लोक होते.
亞郎家族的族長約雅達,與他的侍從三千七百人,
28 २८ सादोक तरुण बलवान आणि धैर्यवान वीर असून त्याच्या वडिलाच्या घराण्यातील बावीस सरदार त्याने बरोबर आणले होते.
少年勇士匝多克和他的家人二十二個軍官;
29 २९ बन्यामीनच्या वंशातील तीन हजार जण होते. ते शौलाचे नातेवाईक होते. तोपर्यंत ते बहुतेक शौलाच्या घराण्याशी एकनिष्ठ होते.
撒烏耳的同族本雅明子孫中三千人。直到那時止,他們多半支持撒烏耳家;
30 ३० एफ्राइमाच्या घराण्यातील आपल्या वडिलांच्या घराण्यात नावाजलेले असे वीस हजार आठशे शूर सैनिक होते.
厄弗辣因子孫中,二萬零八百人,都是有力的勇士,在自己家族中也是有名望的人;
31 ३१ मनश्शेच्या अर्ध्या वंशातील अठरा हजार लोक दावीदास राजा करण्यास आले. त्यांची नावे नोंदण्यात आली.
默納協半支派中,報名來立達味為王者一萬八千人;
32 ३२ इस्साखाराच्या घराण्यातील दोनशे जाणती व जबाबदार माणसे आली. इस्राएलने केव्हा काय करणे योग्य आहे हे समजण्याचे त्यांना चांगले ज्ञान होते. त्यांचे भाऊबंद त्यांच्या आज्ञेत होते.
依撒加爾子孫中,識時務,指導以色列應如何行事的人,有族長二百人,同族的人都聽他們的指揮;
33 ३३ जबुलून घराण्यातले पन्नास हजार अनुभवी सैनिक तयार होते. सर्व शस्त्रे ते कुशलतेने हाताळू शकत. दावीदाशी ते एकनिष्ठ होते.
則步隆子孫中,能上陣作戰,會用各種武器,一心一意助戰的,有五萬人;
34 ३४ नफतालीच्या घराण्यातून एक हजार सरदार आले. त्यांच्याबरोबर ढाली आणि भाले बाळगणारे सदतीस हजार लोक होते.
納裴塔里子孫中,能上陣作戰的,有二萬八千六百人;
35 ३५ दानच्या वंशातून अठ्ठावीस हजार जण युध्दाला तयार होते.
丹子孫中,能上陣作戰的,有二萬八千六百人;
36 ३६ आशेर वंशातून चाळीस हजार सैनिक युध्दावर जायला तयार असे होते.
阿協爾子孫中,能上陣作戰的,有四萬人;
37 ३७ यार्देन नदीच्या पूर्वेकडील रऊबेनी, गादी आणि मनश्शेच्या अर्ध्या वंशातील एक लाख वीस हजार लोक सर्व प्रकारच्या हत्यारांसह सज्ज होते.
約但河東岸,勒烏本族,加得族,默納協半支派中,能持各種兵器作戰的,共有十二萬人:
38 ३८ हे सर्वजण पराक्रमी होते. दावीदाला इस्राएलाचा राजा करायचे याबाबतीत इतर इस्राएल लोकांची एकवाक्यता होती. म्हणूनच ते हेब्रोन येथे एकत्र आले. इस्राएलमधील इतर लोकांचीही दावीदाने राजा व्हावे हीच इच्छा होती.
以上這些人都是軍人,有行伍訓練的戰士,誠心來到赫貝龍,要立達味為全以色列的君王;其餘的眾以色列人,也都一心要立達味為王。
39 ३९ त्यांनी तेथे दावीदाबरोबर तीन दिवस घालवले. खाण्याचा व पिण्यांचा आस्वाद त्यांनी घेतला, कारण त्यांच्या नातलगांनी त्याच्याबरोबर सर्व अन्नपुरवठा देऊन पाठवले होते.
他們在那裏與達味同住了三天,一同飲食,因為有他們的弟兄為他們預備好了一切。
40 ४० याखेरीज इस्साखार, जबुलून, नफताली अशा आसपासच्या भागात राहणाऱ्यांनी गाढव, उंट, खेचरे, व गाई बैल यांच्या पाठीवर लादून अनेक खाद्यपदार्थ आणले. कणीक, अंजीराच्या ढेपा, मनुकांचे घोस, द्राक्षरस, तेल, गाई बैल व मेंढरे असे बरेच काही आणले. कारण इस्राएलमध्ये उत्सव चालला होता.
附近的人,以及遠至依撒加爾,則步隆和納斐塔里的人,都用驢、駱駝、騾和牛,給他們載來大批食品:麵餅、無花果餅、葡萄乾餅、由和牛羊,因為當時在以色列充滿了快樂。