< 1 इतिहास 11 >

1 मग सर्व इस्राएल लोक हेब्रोन येथे दावीदाकडे आले व ते त्यास म्हणाले, “पहा, आम्ही तुझ्याच मांसाचे व हाडाचे आहोत.
Et tout Israël se rassembla vers David à Hébron, disant: Voici, nous sommes ton os et ta chair.
2 मागील दिवसात, शौल जेव्हा आमच्यावर राजा होता, तेव्हा लढाईत तू इस्राएलाचे नेतृत्व केले आहेस. परमेश्वर तुझा देव तुला म्हणाला, ‘तू माझ्या इस्राएल लोकांचा मेंढपाळ होशील आणि माझ्या इस्राएल लोकांवर राज्य करशील.”
Et autrefois, quand aussi Saül était roi, c’était toi qui faisais sortir et qui faisais entrer Israël; et l’Éternel, ton Dieu, t’a dit: Tu paîtras mon peuple Israël, et tu seras prince sur mon peuple Israël.
3 असे इस्राएल लोकांचे सर्व वडील राजाकडे हेब्रोन येथे आले आणि दावीदाने परमेश्वरासमोर त्यांच्याशी हेब्रोनात करार केला. तेव्हा त्यांनी दावीदाला इस्राएलावर राजा होण्यास अभिषेक केला. याप्रकारे शमुवेलाने सांगितलेले परमेश्वराचे वचन खरे ठरले.
Et tous les anciens d’Israël vinrent vers le roi à Hébron; et David fit alliance avec eux à Hébron, devant l’Éternel; et ils oignirent David pour roi sur Israël, selon la parole de l’Éternel par Samuel.
4 दावीद व सर्व इस्राएल लोक यरूशलेम म्हणजे यबूस याठिकाणी गेले. आता त्या देशाचे रहिवासी यबूसी लोक तेथे राहत होते.
Et David et tous ceux d’Israël s’en allèrent à Jérusalem, qui est Jébus; et là étaient les Jébusiens, habitants du pays.
5 यबूसचा रहिवासी दावीदाला म्हणाला, “तू येथे येणार नाहीस.” पण तरीही दावीदाने सियोनचा किल्ला घेतला. हेच दावीदाचे नगर आहे.
Et les habitants de Jébus dirent à David: Tu n’entreras point ici. Mais David prit la forteresse de Sion: c’est la ville de David.
6 दावीद म्हणाला, “जो कोणी यबूसी लोकांवर प्रथम हल्ला करील तोच माझा सेनापती होईल.” सरुवेचा पुत्र यवाब याने प्रथम हल्ला केला म्हणून त्यास सेनापती करण्यात आले.
Et David dit: Quiconque frappera le premier les Jébusiens, sera chef et capitaine. Et Joab, fils de Tseruïa, monta le premier, et fut chef.
7 मग दावीदाने किल्ल्यातच आपला मुक्काम केला म्हणून त्याचे नाव दावीद नगर पडले.
Et David habita dans la forteresse; c’est pourquoi on l’appela ville de David.
8 त्याने त्या नगराला चोहीकडून म्हणजे मिल्लोपासून ते सभोवार मजबूत कोट बांधला. नगराचा राहिलेला भाग यवाबाने मजबूत केला.
Et il bâtit la ville tout à l’entour, depuis Millo, et tout autour; et Joab releva le reste de la ville.
9 दावीद अधिकाधिक महान होत गेला कारण सेनाधीश परमेश्वर त्याच्याबरोबर होता.
Et David allait grandissant de plus en plus; et l’Éternel des armées était avec lui.
10 १० हे दावीदाजवळच्या पुढाऱ्यांतील होते, इस्राएलाविषयी परमेश्वराच्या वचनाप्रमाणे त्यास राजा करावे म्हणून समस्त इस्राएलाबरोबर त्याच्या राज्यात खंबीर राहिले.
Et ce sont ici les chefs des hommes forts que David avait, qui se fortifièrent dans son royaume avec lui, avec tout Israël, pour le faire roi, selon la parole de l’Éternel touchant Israël.
11 ११ दावीदाकडील उत्तम सैनिकांची यादी: याशबाम, हा हखमोनीचा पुत्र, तीस जणांचा सेनापती होता. त्याने एका प्रसंगी आपल्या भाल्याने तीनशे मनुष्यांना ठार मारले.
Et voici le nombre des hommes forts que David avait: Jashobham, fils de Hacmoni, chef des principaux capitaines; il leva sa lance contre 300 hommes, qu’il tua en une fois.
12 १२ त्यानंतर दोदय अहोही याचा पुत्र एलाजार तिघा पराक्रमी वीरांपैकी एक होता.
Et après lui, Éléazar, fils de Dodo, l’Akhokhite: il était l’un des trois hommes forts.
13 १३ पसदम्मीम येथे हा दावीदाबरोबर होता. पलिष्टे तेथे एकत्र होऊन लढावयाला आले होते. तेथे शेतात जवाचे पीक होते आणि पलिष्ट्यांपुढून सैन्य पळून गेले होते.
Il fut avec David à Pas-Dammim; et les Philistins s’étaient assemblés là pour combattre; et il y avait une portion de champ pleine d’orge, et le peuple avait fui devant les Philistins.
14 १४ तेव्हा त्यांनी त्या शेतात उभे राहून त्या पलिष्ट्यांना कापून काढले आणि रक्षण केले. परमेश्वराने त्यांची सुटका करून त्यांना मोठा विजय मिळवून दिला.
Et ils se placèrent au milieu du champ, et le sauvèrent, et frappèrent les Philistins; et l’Éternel opéra une grande délivrance.
15 १५ एकदा, दावीद अदुल्लामच्या गुहेत होता. पलिष्ट्यांचे सैन्य तेथून खाली रेफाईमच्या खोऱ्यात होते. त्यावेळी तीस वीरांपैकी तिघेजण गुहेत असलेल्या दावीदाकडे खडक उतरून गेले.
Et trois des trente chefs descendirent au rocher, vers David, dans la caverne d’Adullam, comme l’armée des Philistins était campée dans la vallée des Rephaïm.
16 १६ आणखी एकदा दावीद त्याच्या किल्ल्यांत, गुहेत, असताना पलिष्ट्यांचे सैन्य बेथलेहेममध्ये होते.
Et David était alors dans le lieu fort, et il y avait alors un poste des Philistins à Bethléhem.
17 १७ तेव्हा दावीदाला पाण्याची फार उत्कट इच्छा झाली. तो म्हणाला, “बेथलेहेमच्या वेशीजवळ विहीर आहे तिच्यातले पाणी जर मला कोणी आणून दिले तर किती बरे होईल!”
Et David convoita, et dit: Qui me fera boire de l’eau du puits de Bethléhem, qui est près de la porte?
18 १८ यावर त्या तिघांनी पलिष्ट्यांच्या छावणीतून मोठ्या हिंमतीने वाट काढली, बेथलेहेमच्या वेशीजवळच्या विहिरीतील पाणी काढले आणि ते त्यांनी दावीदाला आणून दिले. परंतु त्याने ते पाणी पिण्यास नकार दिला. त्याने ते जमिनीवर ओतून परमेश्वरास अर्पण केले.
Et les trois forcèrent le passage à travers le camp des Philistins, et puisèrent de l’eau du puits de Bethléhem, qui est près de la porte, et la prirent et l’apportèrent à David; et David ne voulut pas la boire, mais il en fit une libation à l’Éternel.
19 १९ तो म्हणाला “हे देवा, असले काम माझ्याकडून न होवो या ज्या मनुष्यांनी आपले जीव धोक्यात घातले त्यांचे हे रक्त मी प्यावे काय? त्यांनी आपला जीव धोक्यात घालून ते आणले आहे.” त्याने ते पिण्यास नकार दिला. त्या तीन शूरांनी हे कृत्ये केले.
Et il dit: Loin de moi, par mon Dieu, que je fasse cela! Boirais-je le sang de ces hommes [qui sont allés] au péril de leur vie? Car c’est au péril de leur vie qu’ils l’ont apportée. Et il ne voulut pas la boire. Ces trois hommes forts firent cela.
20 २० यवाबाचा भाऊ अबीशय हा या तिघांचा प्रमुख होता. त्याने आपल्या भाल्याने तीनशे जणांचा प्रतिकार केला आणि त्यांना ठार केले. या तिघा सैनिकांबरोबर त्याचा उल्लेख नेहमीच केला जातो.
Et Abishaï, frère de Joab, était chef de trois; il leva sa lance contre 300 hommes, qu’il tua. Et il eut un nom parmi les trois:
21 २१ या तिघांपेक्षा त्याचा मान जास्त झाला आणि त्यास त्यांचा नायक करण्यात आले, तरीपण, त्याची किर्ती त्या तीन सुप्रसिध्द सैनिकासारखी झाली नाही.
entre les trois il fut honoré à côté des deux, et il fut leur chef; mais il n’atteignit pas les trois [premiers].
22 २२ कबसेल येथला एक बलवान मनुष्य होता, त्याचा पुत्र यहोयादा बनाया याने पुष्कळ पराक्रम केले. त्याने मवाबातील अरीएलाच्या दोन पुत्रांना ठार केले. बर्फ पडत असताना गुहेत शिरुन त्याने सिंहाचा वध केला.
Benaïa, fils de Jehoïada, fils d’un homme vaillant, de Kabtseël, grand en exploits, lui, frappa deux lions de Moab; et il descendit, et frappa le lion dans une fosse, par un jour de neige.
23 २३ मिसरच्या एका मजबूत सैनिकालाही त्याने ठार मारले. हा सैनिक साडेसात फूट उंचीचा होता. त्याच्याजवळ चांगला लांब आणि भक्कम भाला होता. विणकराच्या मागावरील तुळईएवढा हा भाला होता. बनायाजवळ फक्त गदा होती. बनायाने त्या सैनिकाच्या हातून भाला हिसकावून घेतला आणि त्यानेच त्या मिसरी सैनिकाला ठार केले.
Et c’est lui qui frappa l’homme égyptien, dont la stature était de cinq coudées; et l’Égyptien avait en sa main une lance [qui était] comme l’ensouple des tisserands; et il descendit vers lui avec un bâton, et arracha la lance de la main de l’Égyptien, et le tua avec sa propre lance.
24 २४ यहोयादाचा पुत्र बनाया याने असे बरेच पराक्रम केले. त्याने अगदी तीन शूरवीरासारखे नाव मिळवले होते.
Voilà ce que fit Benaïa, fils de Jehoïada; et il eut un nom parmi les trois hommes forts:
25 २५ तीस शूरांपेक्षा बनाया अधिक सन्माननीय होता. पण तो त्या तिघांच्या पदास पोहचला नाही. दावीदाने बनायाला आपल्या अंगरक्षकांचा प्रमुख म्हणून नेमले.
voici, il fut plus honoré que les trente, mais il n’atteignit pas les trois [premiers]. Et David lui donna une place dans ses audiences privées.
26 २६ सैन्यातील शूर सैनिक यवाबाचा भाऊ असाएल, बेथलेहेमच्या दोदोचा पुत्र एलहानान,
Et les hommes vaillants de l’armée étaient: Asçaël, frère de Joab; Elkhanan, fils de Dodo, de Bethléhem;
27 २७ हरोरी शम्मोथ, हेलस पलोनी,
Shammoth, le Harorite; Hélets, le Pelonite;
28 २८ तकोइच्या इक्केशचा पुत्र ईरा, अनाथोथचा अबीयेजर
Ira, fils d’Ikkesh, le Thekohite; Abiézer, l’Anathothite;
29 २९ सिब्बखय हूशाथी, ईलाय अहोही.
Sibbecaï, le Hushathite; Ilaï, l’Akhokhite;
30 ३० महरय नटोफाथी, बाना नटोफाथी याचा पुत्र हेलेद,
Maharaï, le Netophathite; Héled, fils de Baana, le Netophathite;
31 ३१ बन्यामिनांच्या संतानांमधला गिबोथकर रीबय याचा पुत्र इत्तय, बनाया पिराथोनी,
Ithaï, fils de Ribaï, de Guibha des fils de Benjamin; Benaïa, le Pirhathonite;
32 ३२ गाशच्या झऱ्यांजवळचा हूरय, अबीएल अर्बाथी,
Huraï, des torrents de Gaash; Abiel, l’Arbathite;
33 ३३ अजमावेथ बहरुमी, अलीहाबा शालबोनी.
Azmaveth, le Bakharumite; Éliakhba, le Shaalbonite;
34 ३४ हामेश गिजोनी याचे पुत्र, शागे हरारी याचा पुत्र योनाथान,
Bené-Hashem, le Guizonite; Jonathan, fils de Shagué, l’Hararite;
35 ३५ हरारी साखार याचा पुत्र अहीयाम, ऊरचा पुत्र अलीफल,
Akhiam, fils de Sacar, l’Hararite; Éliphal, fils d’Ur;
36 ३६ हेफेर मखेराथी, अहीया पलोनी,
Hépher, le Mekérathite; Akhija, le Pelonite;
37 ३७ हेस्री कर्मेली, एजबयचा पुत्र नारय.
Hetsro, le Carmélite; Naaraï, fils d’Ezbaï;
38 ३८ नाथानचा भाऊ योएल, हग्रीचा पुत्र मिभार,
Joël, frère de Nathan; Mibkhar, fils d’Hagri;
39 ३९ सेलक अम्मोनी, सरुवेचा पुत्र यवाब याचा शस्त्रवाहक नहरय बैरोथी,
Tsélek, l’Ammonite; Nakharaï, le Bérothien, qui portait les armes de Joab, fils de Tseruïa;
40 ४० ईरा, इथ्री, गारेब, इथ्री,
Ira, le Jéthrien; Gareb, le Jéthrien;
41 ४१ उरीया हित्ती, अहलयाचा पुत्र जाबाद.
Urie, le Héthien; Zabad, fils d’Akhlaï;
42 ४२ शीजा रऊबेनी याचा पुत्र अदीना हा रऊबेन्याचा अधिकारी व तीस शूरांपैकी एक,
Adina, fils de Shiza, le Rubénite, un chef des Rubénites, et trente avec lui;
43 ४३ माकाचा पुत्र हानान आणि योशाफाट मिथनी,
Hanan, fils de Maaca; et Josaphat, le Mithnite;
44 ४४ उज्जीया अष्टराथी, होथाम अरोएरी याचे पुत्र शामा व ईयेल.
Ozias, l’Ashtarothite; Shama et Jehiel, les fils de Hotham, l’Aroérite;
45 ४५ शिम्रीचा यदीएल योहा तीसी आणि त्याचा भाऊ योहा
Jediaël, fils de Shimri, et Johka, son frère, le Thitsite;
46 ४६ अलीएल महवी व एलानामचे पुत्र यरीबय आणि योशव्या व इथ्मा मवाबी,
Éliel, de Makhavim; et Jeribaï et Joshavia, les fils d’Elnaam; et Jithma, le Moabite;
47 ४७ अलीएल, ओबेद आणि यासीएल मसोबायी.
Éliel, et Obed, et Jaasciel, le Metsobaïte.

< 1 इतिहास 11 >