< 1 इतिहास 10 >
1 १ आणि पलिष्टी इस्राएलाविरूद्ध लढले. पलिष्ट्यांपुढून प्रत्येक इस्राएल मनुष्याने पळ काढला आणि गिलबोवात बरेच लोक मरून पडले.
Og filistarane stridde mot Israel, og Israels-mennerne flydde for filistarane, og det vart liggjande mange falne på Gilboafjellet.
2 २ पलिष्ट्यांनी शौल आणि त्याचे पुत्र यांचा पाठलाग चालूच ठेवला. त्यांना पकडले आणि ठार केले. योनाथान, अबीनादाब आणि मलकीशुवा या त्याच्या पुत्रांना पलिष्ट्यांनी मारले.
Og filistarane sette etter Saul og sønerne hans, og då felte dei Jonatan og Abinadab og Malkisua, sønerne hans Saul.
3 ३ शौलाविरूद्ध त्यांनी घनघोर युध्द केले आणि तिरंदाजानी त्यास गाठले. तो तिरंदाजामुळे असह्य यातनेत होता.
Då dei no søkte hardt innåt Saul sjølv, og bogeskyttarane kom yver han, og han fekk ein støkk i seg for skyttarane.
4 ४ नंतर शौल आपल्या शस्त्रवाहकाला म्हणाला, “तुझी तलवार काढ आणि तिने मला जोराने आरपार भोसक. नाहीतर हे बेसुंती येऊन माझ्याशी वाइट रीतीने वागतील.” पण त्याचा शस्त्रवाहक तसे करण्यास तयार झाला नाही, तो फार घाबरला होता. म्हणून शौलाने स्वत: ची तलवार काढली आणि तिच्यावर तो पडला.
Og Saul sagde til våpnsveinen sin: «Drag ut sverdet ditt og stikk det igjenom meg, so ikkje desse u-umskorne skal koma og fara ille med meg!» Men våpnsveinen hans vilde ikkje; for han var ovleg rædd. Då tok Saul sjølv sverdet og stupte seg på det.
5 ५ जेव्हा त्याच्या शस्त्रवाहकाने शौल मेला हे पाहिले, तेव्हा त्याचप्रमाणे त्यानेही तलवार उपसून त्यावर पडला व मेला.
Men då våpnsveinen såg at Saul var dåen, stupte han seg og på sitt sverd og døydde.
6 ६ अशाप्रकारे शौल आणि त्याचे तीन पुत्र व त्याच्या घरातील सर्व सदस्यांना एकत्र मरण आले.
So døydde då Saul og dei tri sønerne hans; og dei som høyrde til hans hus, døydde alle i ein gong.
7 ७ जेव्हा खोऱ्यात राहणाऱ्या प्रत्येक इस्राएल मनुष्याने पाहिले की, शौल व त्याचे पुत्र मरण पावले आहेत आणि त्यांनी पळ काढला. तेव्हा त्यांनीही आपली नगरे सोडून पळ काढला. नंतर पलिष्टी आले आणि त्यामध्ये राहू लागले.
Då so alle dei Israels-mennerne som var i dalen, såg at dei hadde flytt, og at Saul og sønerne hans var falne, so for dei frå byarne sine og rømde undan, og so kom filistarane og slo seg ned i deim.
8 ८ मग असे झाले की, दुसऱ्या दिवशी पलिष्टी मृतांच्या अंगावरील मौल्यवान चीजवस्तू लुटायला आले. तेव्हा गिलबोवा डोंगरावर त्यांना शौल आणि त्याचे पुत्र यांचे मृतदेह सापडले.
Andre dagen kom filistarane og skulde plundra liki, og dei fann då Saul og sønerne hans liggjande på Gilboafjellet.
9 ९ त्यांनी त्याचे कपडे आणि त्याचे मस्तक व चिलखत काढून घेतले. ही बातमी आपल्या मूर्तींना आणि लोकांस कळवायला त्यांनी पलिष्ट्यांच्या देशभर दूत पाठवले.
Og dei plundra honom, og tok med seg hovudet og våpni hans og sende deim ikring i Filistarlandet, og kunngjorde gledebodet for avgudarne sine og for folket.
10 १० त्यांनी त्याचे चिलखत आपल्या देवाच्या मंदिरात आणि शिर दागोनाच्या मंदिरात टांगले.
Og dei lagde våpni hans i gudshuset sitt; men hausen hans feste dei i Dagons-templet.
11 ११ पलिष्ट्यांनी शौलाचे जे केले होते ते सर्व जेव्हा याबेश गिलाद नगरातील लोकांनी ऐकले.
Då heile Jabes i Gilead høyrde alt det som filistarane hadde gjort med Saul,
12 १२ तेव्हा त्यांच्यातील सर्व सैनिक शौल आणि त्याची अपत्ये यांचे मृतदेह आणायला निघाली. ते मृतदेह त्यांनी याबेश येथे आणले. याबेश येथे एका मोठ्या एला वृक्षाखाली त्यांनी त्यांच्या अस्थी पुरल्या आणि सात दिवस उपवास केला.
drog dei av, alle våpnføre menner, og tok liket åt Saul og liket åt sønerne hans og førde deim til Jabes, og jorda beini deira under eiki i Jabes og heldt fasta i sju dagar.
13 १३ शौल परमेश्वराशी अविश्वासू होता म्हणून त्यास मरण आले. त्याने परमेश्वराने दिलेल्या सूचना यांचे पाळन केले नाही, परंतु भूतविद्या प्रवीण स्रिकडे सल्ला विचारण्यास गेला.
So let Saul livet for sin utruskap mot Herren, med di han ikkje hadde fylgt Herrens ord, og like eins for di han hadde spurt ei som mana fram draugar og søkt råd hjå henne.
14 १४ त्याने परमेश्वराकडून मार्गदर्शन घेतले नाही. म्हणून परमेश्वराने त्यास मारले आणि इशायाचा पुत्र दावीद याच्याकडे राज्य सोपवले.
Han hadde ikkje søkt råd hjå Herren; difor let Herren honom døy, og sidan let han David Isaison få kongedømet.