< 1 इतिहास 10 >

1 आणि पलिष्टी इस्राएलाविरूद्ध लढले. पलिष्ट्यांपुढून प्रत्येक इस्राएल मनुष्याने पळ काढला आणि गिलबोवात बरेच लोक मरून पडले.
וּפְלִשְׁתִּ֖ים נִלְחֲמ֣וּ בְיִשְׂרָאֵ֑ל וַיָּ֑נָס אִֽישׁ־יִשְׂרָאֵל֙ מִפְּנֵ֣י פְלִשְׁתִּ֔ים וַיִּפְּל֥וּ חֲלָלִ֖ים בְּהַ֥ר גִּלְבֹּֽעַ׃
2 पलिष्ट्यांनी शौल आणि त्याचे पुत्र यांचा पाठलाग चालूच ठेवला. त्यांना पकडले आणि ठार केले. योनाथान, अबीनादाब आणि मलकीशुवा या त्याच्या पुत्रांना पलिष्ट्यांनी मारले.
וַיַּדְבְּק֣וּ פְלִשְׁתִּ֔ים אַחֲרֵ֥י שָׁא֖וּל וְאַחֲרֵ֣י בָנָ֑יו וַיַּכּ֣וּ פְלִשְׁתִּ֗ים אֶת־יֹונָתָ֧ן וְאֶת־אֲבִינָדָ֛ב וְאֶת־מַלְכִּי־שׁ֖וּעַ בְּנֵ֥י שָׁאֽוּל׃
3 शौलाविरूद्ध त्यांनी घनघोर युध्द केले आणि तिरंदाजानी त्यास गाठले. तो तिरंदाजामुळे असह्य यातनेत होता.
וַתִּכְבַּ֤ד הַמִּלְחָמָה֙ עַל־שָׁא֔וּל וַיִּמְצָאֻ֖הוּ הַמֹּורִ֣ים בַּקָּ֑שֶׁת וַיָּ֖חֶל מִן־הַיֹּורִֽים׃
4 नंतर शौल आपल्या शस्त्रवाहकाला म्हणाला, “तुझी तलवार काढ आणि तिने मला जोराने आरपार भोसक. नाहीतर हे बेसुंती येऊन माझ्याशी वाइट रीतीने वागतील.” पण त्याचा शस्त्रवाहक तसे करण्यास तयार झाला नाही, तो फार घाबरला होता. म्हणून शौलाने स्वत: ची तलवार काढली आणि तिच्यावर तो पडला.
וַיֹּ֣אמֶר שָׁאוּל֩ אֶל־נֹשֵׂ֨א כֵלָ֜יו שְׁלֹ֥ף חַרְבְּךָ֣ ׀ וְדָקְרֵ֣נִי בָ֗הּ פֶּן־יָבֹ֜אוּ הָעֲרֵלִ֤ים הָאֵ֙לֶּה֙ וְהִתְעַלְּלוּ־בִ֔י וְלֹ֤א אָבָה֙ נֹשֵׂ֣א כֵלָ֔יו כִּ֥י יָרֵ֖א מְאֹ֑ד ס וַיִּקַּ֤ח שָׁאוּל֙ אֶת־הַחֶ֔רֶב וַיִּפֹּ֖ל עָלֶֽיהָ׃
5 जेव्हा त्याच्या शस्त्रवाहकाने शौल मेला हे पाहिले, तेव्हा त्याचप्रमाणे त्यानेही तलवार उपसून त्यावर पडला व मेला.
וַיַּ֥רְא נֹשֵֽׂא־כֵלָ֖יו כִּ֣י מֵ֣ת שָׁא֑וּל וַיִּפֹּ֥ל גַּם־ה֛וּא עַל־הַחֶ֖רֶב וַיָּמֹֽת׃ ס
6 अशाप्रकारे शौल आणि त्याचे तीन पुत्र व त्याच्या घरातील सर्व सदस्यांना एकत्र मरण आले.
וַיָּ֤מָת שָׁאוּל֙ וּשְׁלֹ֣שֶׁת בָּנָ֔יו וְכָל־בֵּיתֹ֖ו יַחְדָּ֥ו מֵֽתוּ׃
7 जेव्हा खोऱ्यात राहणाऱ्या प्रत्येक इस्राएल मनुष्याने पाहिले की, शौल व त्याचे पुत्र मरण पावले आहेत आणि त्यांनी पळ काढला. तेव्हा त्यांनीही आपली नगरे सोडून पळ काढला. नंतर पलिष्टी आले आणि त्यामध्ये राहू लागले.
וַ֠יִּרְאוּ כָּל־אִ֨ישׁ יִשְׂרָאֵ֤ל אֲשֶׁר־בָּעֵ֙מֶק֙ כִּ֣י נָ֔סוּ וְכִי־מֵ֖תוּ שָׁא֣וּל וּבָנָ֑יו וַיַּעַזְב֤וּ עָרֵיהֶם֙ וַיָּנֻ֔סוּ וַיָּבֹ֣אוּ פְלִשְׁתִּ֔ים וַיֵּשְׁב֖וּ בָּהֶֽם׃ ס
8 मग असे झाले की, दुसऱ्या दिवशी पलिष्टी मृतांच्या अंगावरील मौल्यवान चीजवस्तू लुटायला आले. तेव्हा गिलबोवा डोंगरावर त्यांना शौल आणि त्याचे पुत्र यांचे मृतदेह सापडले.
וַיְהִי֙ מִֽמָּחֳרָ֔ת וַיָּבֹ֣אוּ פְלִשְׁתִּ֔ים לְפַשֵּׁ֖ט אֶת־הֽ͏ַחֲלָלִ֑ים וַֽיִּמְצְא֤וּ אֶת־שָׁאוּל֙ וְאֶת־בָּנָ֔יו נֹפְלִ֖ים בְּהַ֥ר גִּלְבֹּֽעַ׃
9 त्यांनी त्याचे कपडे आणि त्याचे मस्तक व चिलखत काढून घेतले. ही बातमी आपल्या मूर्तींना आणि लोकांस कळवायला त्यांनी पलिष्ट्यांच्या देशभर दूत पाठवले.
וַיַּ֨פְשִׁיטֻ֔הוּ וַיִּשְׂא֥וּ אֶת־רֹאשֹׁ֖ו וְאֶת־כֵּלָ֑יו וַיְשַׁלְּח֨וּ בְאֶֽרֶץ־פְלִשְׁתִּ֜ים סָבִ֗יב לְבַשֵּׂ֛ר אֶת־עֲצַבֵּיהֶ֖ם וְאֶת־הָעָֽם׃
10 १० त्यांनी त्याचे चिलखत आपल्या देवाच्या मंदिरात आणि शिर दागोनाच्या मंदिरात टांगले.
וַיָּשִׂ֙ימוּ֙ אֶת־כֵּלָ֔יו בֵּ֖ית אֱלֹהֵיהֶ֑ם וְאֶת־גֻּלְגָּלְתֹּ֥ו תָקְע֖וּ בֵּ֥ית דָּגֹֽון׃ ס
11 ११ पलिष्ट्यांनी शौलाचे जे केले होते ते सर्व जेव्हा याबेश गिलाद नगरातील लोकांनी ऐकले.
וַֽיִּשְׁמְע֔וּ כֹּ֖ל יָבֵ֣ישׁ גִּלְעָ֑ד אֵ֛ת כָּל־אֲשֶׁר־עָשׂ֥וּ פְלִשְׁתִּ֖ים לְשָׁאֽוּל׃
12 १२ तेव्हा त्यांच्यातील सर्व सैनिक शौल आणि त्याची अपत्ये यांचे मृतदेह आणायला निघाली. ते मृतदेह त्यांनी याबेश येथे आणले. याबेश येथे एका मोठ्या एला वृक्षाखाली त्यांनी त्यांच्या अस्थी पुरल्या आणि सात दिवस उपवास केला.
וַיָּקוּמוּ֮ כָּל־אִ֣ישׁ חַיִל֒ וַיִּשְׂא֞וּ אֶת־גּוּפַ֣ת שָׁא֗וּל וְאֵת֙ גּוּפֹ֣ת בָּנָ֔יו וַיְבִיא֖וּם יָבֵ֑ישָׁה וַיִּקְבְּר֨וּ אֶת־עַצְמֹותֵיהֶ֜ם תַּ֤חַת הָאֵלָה֙ בְּיָבֵ֔שׁ וַיָּצ֖וּמוּ שִׁבְעַ֥ת יָמִֽים׃
13 १३ शौल परमेश्वराशी अविश्वासू होता म्हणून त्यास मरण आले. त्याने परमेश्वराने दिलेल्या सूचना यांचे पाळन केले नाही, परंतु भूतविद्या प्रवीण स्रिकडे सल्ला विचारण्यास गेला.
וַיָּ֣מָת שָׁא֗וּל בְּמַֽעֲלֹו֙ אֲשֶׁ֣ר מָעַ֣ל בַּֽיהוָ֔ה עַל־דְּבַ֥ר יְהוָ֖ה אֲשֶׁ֣ר לֹא־שָׁמָ֑ר וְגַם־לִשְׁאֹ֥ול בָּאֹ֖וב לִדְרֹֽושׁ׃
14 १४ त्याने परमेश्वराकडून मार्गदर्शन घेतले नाही. म्हणून परमेश्वराने त्यास मारले आणि इशायाचा पुत्र दावीद याच्याकडे राज्य सोपवले.
וְלֹֽא־דָרַ֥שׁ בַּֽיהוָ֖ה וַיְמִיתֵ֑הוּ וַיַּסֵּב֙ אֶת־הַמְּלוּכָ֔ה לְדָוִ֖יד בֶּן־יִשָֽׁי׃ פ

< 1 इतिहास 10 >