< लूका 21 >

1 तेबे यीशुए आखी चकी की अमीर लोक आपणा-आपणा दान पण्डारो रे पाँदे ऊए देखे।
येशूने दृष्टी वर करून श्रीमंत लोकांस दानपेटीत दान टाकतांना पाहीले.
2 तिने एक कंगाल़ बिदुआ खे बी तिदे दो दमड़िया पाँदे ऊई देखी।
त्याने एका गरीब विधवेलाही तांब्याची दोन नाणी म्हणजे एक दमडी टाकताना पाहिले.
3 तेबे तिने बोलेया, “आऊँ तुसा खे सच बोलूँआ कि एसे कंगाल़ बिदुए सबी ते जादा पाई राखेया।
तेव्हा तो म्हणाला, “मी तुम्हास खरे सांगतो, या गरीब विधवेने इतर सर्वांपेक्षा अधिक टाकले.
4 कऊँकि तिने सबी आपणिया सारिया सम्पतिया बीचा ते थोड़ा जा पाया, पर एसे आपणी कमाईया ते सारी आऊँदणी पाई ती।”
कारण या सर्वांनी आपल्या भरपूर संपत्तीमधून काही भाग दान म्हणून टाकले. परंतु हिने गरीब असूनही आपल्या उपजीविकेतील सर्वच टाकले.”
5 जेबे कई जणे मन्दरो रे बारे रे बोलणे लगी रे थे कि यो कितणे सुन्दर पात्थर और पेंटा रिया चीजा साथे सजाई राखेया, तेबे तिने बोलेया,
शिष्यातील काहीजण परमेश्वराच्या भवनाविषयी असे बोलत होते की, “ते सुंदर दगडांनी आणि अर्पणांनी सुशोभित केले आहे.” येशू म्हणाला,
6 “सेयो दिन आऊणे, जेबे, जो तुसे लगी रे देखणे, तिना बीचा ते एती जो पात्थरो पाँदे पात्थर लगी रे, सब टाल़े जाणे।”
“असे दिवस येतील की, हे जे तुम्ही पाहता त्यांतून जो पाडून टाकला जाणार नाही असा दगडावर दगड येथे राहणार नाही.”
7 तिने यीशुए ते पूछेया, “ओ गुरू! ये सब कदी ऊणा? और जेबे यो सब गल्ला पुरिया ऊणे वाल़िया ऊणिया, तेबे, तेस बखतो रा क्या चिह्न् ऊणा?”
त्यांनी त्यास प्रश्न विचारला, “गुरुजी या गोष्टी केव्हा घडतील? व या गोष्टी घडणार आहेत यासंबंधी कोणते चिन्ह असेल?”
8 यीशुए बोलेया, “चौकस रओ कि कोई तुसा खे बईकाओ नि जाओ, कऊँकि बऊत जणे मेरे नाओं ते आऊणे और बोलणा कि आऊँ सेईए और ये बी कि बखत नेड़े आईगा रा, तुसे तिना पीछे नि चली जाणा।
येशू म्हणाला, “तुम्हास कोणी फसवू नये म्हणून सावध राहा कारण माझ्या नावाने पुष्कळ येतील आणि ‘तो मी आहे’ असे म्हणतील आणि ते म्हणतील, ‘वेळ जवळ आली आहे. त्यांच्यामागे जाऊ नका!’
9 जेबे तुसे लड़ाई और हुड़दंगा रे बारे रे सुणो, तेबे कबराणा नि, कऊँकि इना रा पईले ऊणा जरूरी ए, पर तेस बखते तेबुई अंत नि ऊणा।”
जेव्हा तुम्ही लढाया व दंगे याविषयी ऐकाल तेव्हा घाबरु नका कारण या गोष्टी घडल्याच पाहिजेत. पण एवढ्यात शेवट होणार नाही.”
10 तेबे तिने तिना खे बोलेया, “जातिया पाँदे जातिया और राज्य पाँदे राज्य अमला करना
१०मग तो त्यांना म्हणाला, “एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर उठेल, एक राज्य दुसऱ्या राज्यावर उठेल.
11 और बऊत ईल्लण ऊणे और जगा-जगा अकाल़ और बमारिया पड़नियां और सर्गो रे डराऊणिया गल्ला और बड़े-बड़े चिह्न् प्रगट ऊणे।
११मोठे भूकंप होतील, दुष्काळ पडतील आणि वेगवेगळ्या ठिकाणी पीडा उद्भवतील, भितीदायक घटना घडतील आणि आकाशात मोठी चिन्हे घडतील.
12 पर इना सबी गल्ला ते पईले तिना तुसे मेरे नाओं ते पकड़ने और सताणे, प्रार्थना रे कअरो रे देई देणे, जेला रे पाणे और राजेया और हाकिमो सामणे लयी जाणे।
१२परंतु हे सर्व होण्यापूर्वी ते तुमच्यावर हात टाकतील आणि तुमचा छळ करतील. चौकशीसाठी ते तुम्हास सभास्थानासमोर उभे करतील आणि तुरुंगात टाकतील. माझ्या नावासाठी ते तुम्हास राजे व राज्यपाल यांच्यासमोर नेतील.
13 पर तुसा खे ये गवाई देणे रा मोका ऊई जाणा।
१३यामुळे तुम्हास माझ्याविषयी साक्ष देण्याची संधी मिळेल.
14 इजी री खातर आपणे-आपणे मनो रे ठाणी लो कि आसे पईले तेई जवाब देणे री चिन्ता नि करूँगे।
१४तेव्हा उत्तर कसे द्यावे याविषयी आधीच विचार करायचा नाही अशी मनाची तयारी करा,
15 कऊँकि मां तुसा खे एड़ा बोल और बुद्धि देणी कि तुसा रे सब बिरोदी तुसा रा सामणा या खण्डन नि करी सकदे।
१५कारण मी तुम्हास असे शब्द व अशी बुद्धी देईन की ज्यामुळे त्यांना तुमचा विरोध करायला किंवा तुमच्याविरुध्द बोलायला मुळीच जमणार नाही.
16 तुसा रे माए-बाओ, पाई-बईण, टब्बरो रे और दोस्ता बी तुसे पकड़वाणे, एथो तक कि तुसा बीचा ते कई जणे काई देणे।
१६परंतु आईवडील, भाऊ, नातेवाईक आणि मित्र तुमचा विश्वासघात करतील आणि तुम्हापैकी काही जणांना ठार मारतील.
17 मेरे नाओं री वजह ते सबी लोका तुसा ते बैर राखणा।
१७माझ्या नावामुळे सर्वजण तुमचा द्वेष करतील.
18 पर तुसा रे सिरो रा एक बी बाल़ बांगा नि ऊणा।
१८परंतु तुमच्या डोक्यावरील एक केसही नाहीसा होणार नाही.
19 आपणे सब्रो ते तुसा आपणे प्राण बचाणे।
१९तुम्ही आपल्या धीराने आपले जीव मिळवून घ्याल.
20 “जेबे तुसे यरूशलेमो खे सेना ते घिरे रा देखो, तो जाणी लणा कि तीजी रा नाश नेड़े ए।
२०तुम्ही जेव्हा यरूशलेम शहरास सैन्यानी वेढा घातलेला पाहाल, तेव्हा तुम्हास कळून येईल की, तिचा नाश होण्याची वेळ आली आहे.
21 तेबे जो यहूदिया प्रदेशो रे ओ, तिने पाह्ड़ो खे नठी जाणा और जो यरूशलेमो नगरो रे पीतरे ओ, सेयो बारे निकल़ी जाएओ और जो गांव रे ओ। सेयो तिदे नि जाओ।
२१जे यहूदीया प्रांतात आहेत त्यांनी डोंगरांमध्ये पळून गेले पाहिजे. जे रानात आहेत त्यांनी शहरात जाऊ नये.
22 कऊँकि यो बदला लणे रे एड़े दिन ऊणे, जिना रे लिखी रिया सारिया गल्ला पुरिया ऊई जाणिया।
२२ज्या सर्व गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या पूर्ण होण्यासाठी हे शिक्षेचे दिवस आहेत.
23 तिना दिना रे जो गर्भवती और दूद पल़याणे वाल़ी ऊणी, तिना खे हाय! हाय! कऊँकि देशो रे बड़ा क्ल़ेश और लोका पाँदे बड़ा प्रकोप ऊणा।
२३त्या दिवसात ज्या गरोदर स्त्रिया आहेत व ज्या बाळाचे पोषण करणाऱ्या स्त्रिया आहेत, त्यांच्यासाठी ते किती भयंकर होईल. अशा स्त्रियांची खरोखर दुर्दशा होईल कारण देशावर मोठे संकट येईल आणि लोकांवर क्रोध येईल.
24 सेयो तलवारा रे ग्रा ऊई जाणे और बऊत सारे देशो रे लोका बीचे बन्दुए ऊई की पऊँछाए जाणे और जदुओ तक दुजिया जातिया रा बखत पूरा नि ऊई जाणा, तदुओ तक यरूशलेम दुजिया जातिया साथे केसेया जाणा।
२४ते तलवारीच्या धारेने पडतील आणि त्यांना कैद करून राष्ट्रांत नेतील आणि परराष्ट्रीय लोकांचा काळ संपेपर्यंत परराष्ट्रीय यरूशलेम शहरास पायाखाली तुडवतील.
25 “सूरज, चाँद और तारेया रे चिह्न् दिखणे और तरतिया पाँदे देशो-देशो रे जातिया रे लोका खे संकट ऊणा, कऊँकि सेयो समुद्रो रे गिड़ने और लईरा री छेड़ा ते कबराई जाणे
२५सूर्य, चंद्र, तारे यांच्यात चिन्हे होतील, पृथ्वीवरील राष्ट्रे हतबल होतील व समुद्राच्या गर्जणाऱ्या लाटांनी ते घाबरुन जातील.
26 और डरो रे मारे और दुनिया रे आऊणे वाल़ी घटणा री बाट देखदे-देखदे लोका रे जानी पाँदे जान नि रणी, कऊँकि सर्गो रिया शक्तिया इलाईया जाणिया।
२६भीतीमुळे व जगावर कोसळणाऱ्या गोष्टींची वाट पाहण्याने मनुष्य मरणोन्मुख होतील व आकाशातील बळे डळमळतील.
27 तेबे तिना माणूं रा पुत्र सामर्थ और बड़ी महिमा साथे बादल़ो पाँदिए आऊँदा ऊआ देखणा।
२७नंतर ते मनुष्याच्या पुत्राला सामर्थ्याने आणि वैभवाने ढगांत येताना पाहतील.
28 जेबे यो गल्ला ऊणे लगो, तेबे सीदे ऊई की आपणा सिर ऊबे चकणा, कऊँकि तुसा रा छुटकारा नेड़े ऊणा।”
२८परंतु या गोष्टी घडण्यास आरंभ होईल, तेव्हा सरळ उभे राहा आणि तुमचे डोके वर करा, कारण तुमच्या सुटकेची वेळ जवळ येत आहे.”
29 यीशुए तिना खे एक उदारण बी बोलेया, “दाऊगल़े रे डाल़ो खे और सबी डाल़ा खे बी देखो।
२९नंतर त्याने त्यास एक दाखला सांगितला, “अंजिराचे झाड व इतर दुसऱ्या झाडांकडे पाहा.
30 जिंयाँ ई तिना रे पलँगूर निकल़ोए, तेबे तुसे देखी की आपू ई जाणी लओए कि तऊँदी नेड़े ए।
३०त्यांना पालवी येऊ लागली की, तुमचे तुम्हीच समजता की, उन्हाळा अगदी जवळ आला आहे.
31 ईंयां ई जेबे तुसे इना गल्ला खे ऊँदे ऊआ देखो, तेबे जाणी लो कि परमेशरो रा राज्य नेड़े ए।
३१त्याचप्रमाणे या गोष्टी घडताना तुम्ही पाहाल तेव्हा ओळखा की देवाचे राज्य जवळ आले आहे.
32 आऊँ तुसा खे सच लगी रा बोलणे कि जदुओ तक यो सब गल्ला पूरिया नि ऊई जाओगिया, तदुओ तक एसा पीढ़िया रे लोका री मौत नि ऊणी।
३२मी तुम्हास खरे सांगतो की, या सर्व गोष्टी घडून येईपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही.
33 सर्ग और तरती टल़ी जाओगी, पर मेरा वचन कदी नि टल़ना।
३३आकाश व पृथ्वी नाहीशी होतील पण माझी वचने मुळीच नाहीशी होणार नाही.
34 इजी री खातर सावधान रओ, एड़ा नि ओ कि तुसा रे मन, खुमार, मतवाल़ापण और एसा जिन्दगिया री चिन्ता ते सुस्त ऊई जाओ और सेयो दिन तुसा पाँदे फंदे जेड़ा अचाणक आयी जाओ।
३४परंतु तुम्ही स्वतःला सांभाळा, दारुबाजी आणि अधाशीपणा व या हल्लीच्या जीवनासंबंधीच्या चिंता यांनी तुमची अंतःकरणे भारावून जाऊ नये, तो दिवस पाशासारखा अकस्मात तुमच्यावर येईल.
35 “कऊँकि से सारी तरतिया पाँदे और सब रणे वाल़ेया पाँदे ईंयां ई पड़ना।
३५खरोखर, तो पृथ्वीवर असणाऱ्या सर्व लोकांवर येईल.
36 इजी री खातर जागदे रओ, हर बखत प्रार्थना करदे रओ, ताकि तुसे इना सबी आऊणे वाल़िया घटणा ते बचणे, और माणूं रे पुत्रो सामणे खड़े ऊणे जोगे बणो।”
३६यास्तव तुम्ही या सर्व होणाऱ्या गोष्टी चुकवायला व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहायला सबळ असावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागे राहा.”
37 यीशु दिने मन्दरो रे उपदेश करो थे और राती बारे जाई की जैतून नाओं रे पाह्ड़ो पाँदे रओ थे
३७प्रत्येक दिवशी तो परमेश्वराच्या भवनात शिक्षण देत असे आणि रात्री मात्र तो जैतूनाचा डोंगर म्हटलेल्या टेकडीवर राहत असे.
38 और प्यागा तड़के सब लोक तिना री सुणने खे मन्दरो रे तिना गे आया करो थे।
३८सर्व लोक भवनात जाण्यासाठी व त्याचे ऐकण्यासाठी पहाटेस उठून त्याच्याकडे येत असत.

< लूका 21 >