< यूहन्ना 6 >
1 इना गल्ला ते बाद यीशु गलीलो रे समुद्रो दे, मतलब-तिबिरियास समुद्रो ते पार गये।
१या गोष्टी झाल्यानंतर येशू गालीलच्या सरोवराच्या दुसर्या बाजूस गेला ज्याला तिबिर्य सरोवरसुद्धा म्हणतात.
2 तेबे एक बड़ी पारी पीड़ तिना पीछे आईगी, कऊँकि जो सामर्थ रे काम यीशु बमारा पाँदे करो थे, सेयो तिना खे देखो थे।
२तेव्हा मोठा लोकसमुदाय त्याच्या मागोमाग चालला, कारण आजारी असलेल्यांवर तो जी चिन्हे करीत होता ती त्यांनी पाहिली होती.
3 तेबे यीशु पाह्ड़ो पाँदे चढ़ी की आपणे चेलेया साथे तेती बैठीगे।
३येशू डोंगरावर जाऊन तेथे आपल्या शिष्यांबरोबर बसला.
4 यहूदिया रा फसह रा त्योआर नेड़े था।
४आता वल्हांडण हा यहूद्यांचा सण जवळ आला होता.
5 तेबे यीशुए आपणिया आखी चकी की एक बड़ी पीड़ आपू गे आऊँदी ऊई देखी, तेबे फिलिप्पुसो खे बोलेया, “एबे आसे इना खे केथा ते रोटी खरीदी की ल्याऊँ?”
५तेव्हा येशू दृष्टी वर करून व लोकांचा जमाव आपल्याकडे येत आहे असे पाहून फिलिप्पाला म्हणाला, “आपण या लोकांस खायला भाकरी कोठून विकत आणणार?”
6 पर तिने ये गल्ल तेसखे परखणे खे बोली, कऊँकि सेयो आपू जाणो थे कि मां क्या करना।
६हे तर त्याने त्याची परीक्षा पाहण्याकरता म्हटले; कारण आपण काय करणार आहोत हे त्यास ठाऊक होते.
7 फिलिप्पुसे तिना खे बोलेया, “दो सौ चाँदिए रे सिक्केया रे मोलो री रोटी तिना खे थोड़ी-थोड़ी करी की बी पूरी नि ऊणी।”
७फिलिप्पाने त्यास उत्तर दिले, “त्यांच्यातल्या प्रत्येकाने थोडे थोडे घेतले तरी दोनशे चांदीच्या नाण्याच्या भाकरी पुरणार नाहीत.”
8 तिना रे चेलेया बीचा ते शमौन पतरसो रे पाईए अन्द्रियासे तिना खे बोलेया,
८त्याच्या शिष्यांतला एकजण, शिमोन पेत्राचा भाऊ अंद्रिया त्यास म्हणाला,
9 “एती एक पाऊ ए, जेसगे पाँज जौ रिया रोटिया और दो मछलिया ए, पर इतणे लोका खे यो केयी ऊणिया?”
९“येथे एक लहान मुलगा आहे. त्याच्याजवळ पाच जवाच्या भाकरी आणि दोन मासळ्या आहेत; परंतु इतक्यांना त्या कशा पुरणार?”
10 यीशुए बोलेया, “लोका खे बठयाल़ी देओ।” तेते जगा रे बऊत काआ था, तेबे लोक, जिना रे मर्दा री संख्या तकरीबन पाँज ह्जारा री थी, तेती बैठीगे।
१०येशू म्हणाला, “लोकांस बसवा.” त्या जागी पुष्कळ गवत होते, तेव्हा तेथे जे सुमारे पाच हजार पुरूष होते ते बसले.
11 तेबे यीशुए सेयो रोटिया लईया और धन्यवाद करी की बैठणे वाल़ेया खे बांडी तिया और तिंयाँ ई मछलिया बी जितणिया सेयो चाओ थे, तिना खे बांडी तिया।
११येशूने त्या पाच भाकरी घेतल्या आणि त्याने उपकार मानल्यावर त्या बसलेल्याना वाटून दिल्या. तसेच त्या मासळ्यांतून त्यांना हवे होते तितके दिले.
12 जेबे सेयो खाई की रज्जी गे, तेबे तिने आपणे चेलेया खे बोलेया, “बचे रे टुकड़े कट्ठे करी देओ, कुछ बी सेटणा नि।”
१२ते तृप्त झाल्यावर त्याने आपल्या शिष्यांना सांगितले, “उरलेले तुकडे गोळा करा, म्हणजे काही वाया जाऊ नये.”
13 तेबे तिने कट्ठे करी ते और बारा टोकरिया परी तिया, जबकि सेयो पांजा रोटिया रे टुकड़े थे, जो खाणे वाल़ेया ते बाद बची रिया थिया।
१३मग जेवणार्यांना पुरे झाल्यावर त्यांनी जवाच्या पाच भाकरींचे उरलेले तुकडे गोळा करून बारा टोपल्या भरल्या.
14 तेबे जो सामर्था रे काम यीशुए करी की दखाए, तिना देखी की लोक बोलणे लगे, “से भविष्यबक्ता जो दुनिया रे आऊणे वाल़ा था, पक्का येईए।”
१४तेव्हा त्याने केलेले चिन्ह पाहून ती माणसे म्हणू लागली, “जगात जो संदेष्टा येणार आहे तो खरोखर हाच आहे.”
15 यीशु ये जाणी की कि सेयो माखे राजा बनाणे खे पकड़ना चाओए, फेर सेयो पाह्ड़ो पाँदे कल्ले चली गे।
१५मग ते येऊन आपणास राजा करण्याकरिता बळजबरीने धरण्याच्या बेतात आहेत हे ओळखून येशू पुन्हा डोंगरावर एकटाच निघून गेला.
16 जेबे साँज ऊई, तेबे तिना रे चेले समुद्रो रे कनारे चली गे
१६संध्याकाळ झाल्यावर त्याचे शिष्य खाली सरोवराकडे गेले;
17 और किस्तिया रे चढ़ी की समुद्रो ते पार कफरनहूमो खे जाणे लगे। तेस बखते न्हेरा ऊईगा था और यीशु एबुए तक तिना गे नि पऊँछी रे थे।
१७आणि एका तारवात बसून सरोवराच्या दुसर्या बाजूस कफर्णहूमकडे जाऊ लागले. इतक्यात अंधार झाला होता आणि येशू त्यांच्याकडे आला नव्हता.
18 तेबे तूफानो री बजअ ते समुद्रो रे लईरा उठणे लगिया।
१८आणि मोठा वारा सुटून सरोवर खवळू लागले होते.
19 जेबे सेयो किस्तिया रे सैर करदे ऊए तकरीबन पाँज-छ: किलोमीटर निकल़ी गे, तेबे तिने यीशु समुद्रो रे चलदे ऊए और किस्तिया रे नेड़े आऊँदे ऊए देखे और सेयो डरी गे।
१९मग त्यांनी सुमारे सहा किलोमीटर वल्हवून गेल्यावर येशूला पाण्यावरून तारवाजवळ चालत येताना पाहिले आणि त्यांना भय वाटले.
20 पर तिने तिना खे बोलेया, “आऊँ ए, डरो नि।”
२०पण तो त्यांना म्हणाला, “मी आहे, भिऊ नका.”
21 तेबे सेयो तिना खे किस्तिया रे चढ़ाणे खे त्यार ऊईगे और तेबे से किस्ती फटाफट तेती पऊँछी गी, जेती सेयो जाणा चाओ थे।
२१म्हणून त्यास तारवात घेण्याची त्यांना इच्छा झाली. तेवढ्यात त्यांला जायचे होते त्याठिकाणी तारू किनाऱ्यास लावले.
22 दूजे दिने तेसे पीड़े, जो समुद्रो ते पार थी खड़ी री, तिने देखेया कि एती तो एक किस्तिया खे छाडी की ओर कोई किस्ती नि थी और यीशु आपणे चेलेया साथे तेसा किस्तिया रे नि चढ़े, पर बस तिना रेई चेले गये।
२२दुसर्या दिवशी जो लोकसमुदाय सरोवराच्या दुसर्या बाजूस उभा होता त्यांने पाहिले की, ज्या लहान होडीत त्याचे शिष्य बसले होते त्याच्याशिवाय तेथे दुसरे तारू नव्हते आणि येशू आपल्या शिष्यांबरोबर त्या तारवावर चढला नव्हता. तर त्याचे शिष्य मात्र निघून गेले होते.
23 तेबे बी ओर किस्तिया तिबिरियास नगरो ते तेते जगा रे नेड़े आईया, जेती तिने यीशुए रे धन्यवाद करने ते बाद रोटी खाई थी।
२३तरी प्रभूने उपकार मानल्यावर त्यांनी जेथे भाकर खाल्ली त्या ठिकाणाजवळ तिबिर्याहून दुसरी लहान तारवे आले होते.
24 तेबे जेबे पीड़े देखेया कि एती ना तो यीशु ए और ना तिना रे चेले, तेबे सेयो बी किस्तिया रे चढ़ी की यीशुए खे टोल़दे ऊए, कफरनहूम नगरो रे पऊँछी गे।
२४तेथे येशू नाही व त्याचे शिष्यही नव्हते हे जेव्हा लोकांनी बघितले तेव्हा त्यांनीही होड्या घेतल्या व येशूला शोधीत ते कफर्णहूमला आले.
25 समुद्रो ते पार जेबे सेयो यीशुए खे मिले तेबे तिने बोलेया, “ओ गुरू! तुसे एती कदी आये?”
२५आणि तो त्यांना सरोवराच्या पलीकडे भेटला तेव्हा ते त्यास म्हणाले, “रब्बी, आपण इकडे कधी आलात?”
26 यीशुए जवाब दित्तेया, “आऊँ तुसा खे सच-सच बोलूँआ कि तुसे माखे इजी री खातर नि टोल़दे कि तुसे मेरे सामर्था रे काम देखो, पर इजी री खातर कि तुसे रोटिया खाई की रज्जी गे।
२६येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “मी तुम्हास खरे खरे सांगतो, तुम्ही चिन्हे बघितलीत म्हणून नाही, पण भाकरी खाऊन तृप्त झालात म्हणून माझा शोध करता.
27 नाशवान रोटिया खे मईणत नि करो, पर तेसा रोटिया खे मईणत करो, जो अनन्त जीवनो देओई, जो मां माणूं रे पुत्रो तुसा खे देणी, कऊँकि पिता परमेशरे माखे इजी खे देणे रा अक्क देई राखेया।” (aiōnios )
२७नष्ट होणार्या अन्नासाठी श्रम करू नका, पण सार्वकालिक जीवनाकरता, टिकणार्या अन्नासाठी श्रम करा. मनुष्याचा पुत्र ते तुम्हास देईल, कारण त्याच्यावर देवपित्याने शिक्का मारला आहे.” (aiōnios )
28 तिने यीशुए खे बोलेया, “परमेशरो रे काम करने खे आसे क्या करुँ?”
२८तेव्हा ते त्यास म्हणाले, “आम्ही देवाची कामे करावीत म्हणून काय करावे?”
29 यीशुए बोलेया, “परमेशरो रा काम ये कि तुसे तेस पाँदे, जो तिने पेजी राखेया, विश्वास करो।”
२९येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “देवाचे काम हेच आहे की, ज्याला त्याने पाठवले आहे त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा.”
30 तेबे तिने तिना खे बोलेया, “तेबे तुसे कुण जा चिह्न् दखाओ कि आसे तेस देखी की तुसा पाँदे विश्वास करिए, तुसे कुण जा काम दखाओए?
३०म्हणून ते त्यास म्हणाले, असे कोणते चिन्ह आपण दाखवता की ते बघून आम्ही आपल्यावर विश्वास ठेवावा? आपण कोणते कृत्य करता?
31 आसा रे बाप-दादे जंगल़ो रे मन्ना खाया, जिंयाँ पवित्र शास्त्रो रे लिखी राखेया कि तिने तिना खे खाणे खे स्वर्गो ते रोटी दित्ती।”
३१आमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्ला; पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘त्याने त्यास स्वर्गातून भाकर खाण्यास दिली.’
32 यीशुए तिना खे बोलेया, “आऊँ तुसा खे सच-सच बोलूँआ कि मूसे सेयो रोटिया तुसा खे स्वर्गो ते नि दित्तिया, बल्कि मेरा पिता तुसा खे सच्ची रोटिया स्वर्गो ते देओआ।
३२तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हास खरे खरे सांगतो, मोशेने तुम्हास स्वर्गातील भाकर दिली असे नाही, तर माझा पिता स्वर्गातून येणारी खरी भाकर तुम्हास देतो.
33 कऊँकि परमेशरो री रोटी सेईए, जो स्वर्गो ते ऊतरी की दुनिया रे लोका खे जीवन देओई।”
३३कारण जी स्वर्गातून उतरते व जगाला जीवन देते तीच देवाची भाकर होय.”
34 तेबे तिने तिना खे बोलेया, “ओ प्रभु! एसा रोटिया आसा खे सदा देया कर।”
३४तेव्हा ते त्यास म्हणाले, “प्रभूजी, ही भाकर आम्हास नित्य द्या.”
35 यीशुए तिना खे बोलेया, “जीवनो री रोटी आऊँ ए; जो मांगे आऊणा, से कदी पूखा नि ऊणा और जेस मां पाँदे विश्वास करना, से कदी त्याया नि ऊणा।
३५तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “मीच जीवनाची भाकर आहे. माझ्याकडे जो येतो त्यास कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्यास कधीही तहान लागणार नाही.
36 पर मैं तुसा खे बोलेया था कि तुसे आऊँ देखी बी लया रा, तेबे बी विश्वास नि करदे।
३६परंतु तुम्ही मला पाहीले असताही विश्वास ठेवत नाही असे मी तुम्हास सांगितले.
37 जो कुछ पिता माखे देओआ, से सब मांगे आऊणा। जो कोई मांगे आऊणा से मां कदी नि निकयाल़ना।
३७पिता जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येईल आणि माझ्याकडे जो येतो त्यास मी कधीच घालवणार नाही.
38 कऊँकि आऊँ आपणी इच्छा नि बल्कि आपणे पेजणे वाल़े री इच्छा पूरी करने खे स्वर्गो ते उतरी रा।
३८कारण मी स्वर्गातून आलो तो स्वतःच्या इच्छेप्रमाणे करायला नाही, पण ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करायला आलो आहे.
39 और मेरे पेजणे वाल़े री इच्छा ये कि, जो कुछ तिने माखे देई राखेया, तिजी बीचा ते आऊँ कुछ नि रचाऊँ, पर तेस आखरी दिना रे फेर जिऊँदा करुँ।
३९आणि ज्याने मला पाठवले त्याची इच्छा हीच आहे की, त्याने मला जे सर्व दिले आहे त्यातून मी काहीही हरवू नये, पण शेवटच्या दिवशी मी ते उठवावे.
40 कऊँकि मेरे पिते री इच्छा ये कि जो कोई पुत्रो खे देखो और तेस पाँदे विश्वास करो, से अनन्त जीवन पाओ और मां से आखरी दिनो रे फेर जिऊँदा करना।” (aiōnios )
४०माझ्या पित्याची इच्छा हीच आहे की, जो कोणी पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्यास सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे; त्यास मीच शेवटच्या दिवशी उठवीन.” (aiōnios )
41 तेबे यहूदी तिना पाँदे कुड़कुड़ाणे लगे, कऊँकि तिने बोलेया था, “जो रोटी स्वर्गो ते उतरी, से आऊँ ई ये।”
४१“मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे” असे तो म्हणाला म्हणून यहूदी त्याच्याविषयी कुरकुर करू लागले.
42 तेबे तिने बोलेया, “क्या ये यूसुफो रा पाऊ यीशु निए, जेसरे माए-बाओ खे आसे जाणूंए? तेबे ये कऊँ बोलोआ कि आऊँ स्वर्गो ते उतरी रा?”
४२तेव्हा ते म्हणाले, “हा येशू योसेफाचा मुलगा नाही काय? याच्या पित्याला आणि आईला आम्ही ओळखतो. आता हा कसे म्हणतो, मी स्वर्गातून उतरलो आहे?”
43 यीशुए तिना खे जवाब दित्तेया, “आपू बीचे नि कुड़कुड़ाओ।
४३येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “तुम्ही आपआपल्यात कुरकुर करू नका.
44 कोई मांगे नि आयी सकदा, जदुओ तक पिता, जिने आऊँ पेजी राखेया, तेसखे खिंजी ना लओ और आऊँ तेसखे आखरी दिनो रे फेर जिऊँदा नि करी देऊँ।
४४ज्याने मला पाठवले आहे त्या पित्याने आकर्षिल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही. त्यास शेवटल्या दिवशी मी उठवीन.
45 भविष्यबक्ता रे लेखो रे ये लिखी राखेया, सेयो सब परमेशरो री तरफा ते सखाए रे ऊणे। जिने किने बी पिते ते सुणेया और सीखी राखेया, से मांगे आओआ।
४५संदेष्ट्यांच्या ग्रंथात लिहीले आहे की, ‘ते सगळे देवाने शिकवलेले असे होतील’, जो पित्याकडून ऐकून शिकला आहे तो माझ्याकडे येतो.
46 किने बी पिता परमेशर नि देखी राखेया, मांते अलावा, जो पिता री तरफा ते पेजी राखेया, बस तिने ई पिता देखी राखेया।
४६जो देवापासून आहे त्याने पित्याला पाहिले आहे. त्याच्याशिवाय कोणी पित्याला पाहिले आहे असे नाही.
47 “आऊँ तुसा खे सच-सच बोलूँआ कि जो कोई विश्वास करोआ, अनन्त जीवन तेसरा ईए। (aiōnios )
४७मी तुम्हास खरे खरे सांगतो, जो विश्वास ठेवतो त्यास सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. (aiōnios )
48 जीवनो री रोटी आऊँ ई ये।
४८मीच जीवनाची भाकर आहे.
49 तुसा रे बाप-दादे जंगल़ो रे मन्ना खाया और मरी गे।
४९तुमच्या पूर्वजांनी रानात मान्ना खाल्ला आणि ते मरण पावले.
50 ये से रोटी ये, जो स्वर्गो ते उतरोई, ताकि मांणू तिजी बीचा ते खाओ और मरो नि।
५०पण स्वर्गातून उतरणारी भाकर अशी आहे की ती जर कोणी खाल्ली तर तो मरणार नाही.
51 जीवनो री रोटी, जो स्वर्गो ते उतरी, से आऊँ ई ये। जे कोई इजी रोटिया ते खाओ, तो सदा जिऊँदा रणा। जो रोटी मां दुनिया रे लोका खे सदा री जिन्दगिया खे देणी, से मेरा शरीर ए।” (aiōn )
५१स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्वकाळ जगेल. जी भाकर मी देईन ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे.” (aiōn )
52 ये सुणी की यहूदी लोक आपू बीचे लड़ने लगे, “ये मांणू किंयाँ आसा खे आपणा मांस खाणे खे देई सकोआ?”
५२तेव्हा यहूद्यांनी आपआपल्यात वाद वाढवून म्हटले, “हा आम्हास आपला देह कसा खायला देऊ शकेल?”
53 यीशुए तिना खे बोलेया, “आऊँ तुसा खे सच-सच बोलूँआ कि जदुओ तक मां माणूं रे पुत्रो रा मांस नि खाओ और मेरा खून नि पियो, तुसा रे अनन्त जीवन निए।
५३यावरुन येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हास खरे खरे सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही व त्याचे रक्त प्याला नाही तर तुमच्यामध्ये जीवन नाही.
54 जो मेरा मांस खाओआ और मेरा खून पियोआ, अनन्त जीवन तेसरा ईए; और मां आखरी दिनो रे से फेर जिऊँदा करना। (aiōnios )
५४जो माझा देह खातो आणि माझे रक्त पितो त्यास सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि मीच त्यास शेवटल्या दिवशी पुन्हा उठवीन. (aiōnios )
55 कऊँकि मेरा मांस ई तो खाणे री चीज ए और मेरा खून ई तो पीणे री चीज ए।
५५कारण माझा देह खरे खाद्य आहे आणि माझे रक्त खरे पेय आहे.
56 जो मेरा मांस खाओआ और मेरा खून पियोआ, से मांदे पक्का बणेया रा रओआ और आऊँ तेसरे।
५६जो माझा देह खातो आणि माझे रक्त पितो तो माझ्यात राहतो आणि मी त्याच्यात राहतो.
57 जिंयाँ जिऊँदे पिता परमेशरे आऊँ पेजी राखेया और आऊँ पिते री बजअ ते जिऊँदा ए, तिंयाँ ई से बी, जो माखे खाओगा, जिऊँदा रणा।
५७जसे जिवंत पित्याने मला पाठवले आणि मी जसा पित्यामुळे जगतो, तसे जो मला खातो तोसुध्दा माझ्यामुळे जगेल.
58 आँऊ ई से रोटी ए जो स्वर्गो ते उतरी री। तेसा रोटिया जेड़ी निए, जो बाप-दादेया खाई और मरी गे, जो कोई एसा रोटिया खाओगा, से सदा जिऊँदा रणा।” (aiōn )
५८स्वर्गातून उतरलेली भाकर हीच आहे. तुमच्या पूर्वजांनी भाकर खाल्ली तरी ते मरण पावले. हे तसे नाही. ही भाकर जो खातो तो सर्वकाळ जगेल.” (aiōn )
59 यो गल्ला यीशुए कफरनहूम नगरो रे प्रार्थना रे कअरो रे, उपदेश देंदे ऊए बोलिया।
५९कफर्णहूमात शिक्षण देत असताना त्याने सभास्थानात या गोष्टी सांगितल्या.
60 तेबे तिना रे चेलेया बीचा ते कई जणे ये सुणी की बोलेया, “यो गल्ला तो कठोर ए, इना कुण सुणी सकोआ?”
६०त्याच्या शिष्यांतील पुष्कळांनी हे ऐकून म्हटले, “हे वचन कठीण आहे; हे कोण ऐकून घेऊ शकतो?”
61 यीशु आपणे मनो रे ये जाणी की कि मेरे चेले आपू बीचे एते गल्ला पाँदे कुड़कुड़ाओए, तिना ते पूछेया, “क्या तुसा खे इना गल्ला ते ठोकर लगोई?
६१आपले शिष्य याविषयी कुरकुर करीत आहे हे मनात ओळखून येशू त्यांना म्हणाला, “ह्यामुळे तुम्ही अडखळता काय?
62 और जे तुसे मां माणूं रे पुत्रो खे, जेती आँऊ पईले था, तेती ऊबे स्वर्गो खे जांदे ऊए देखोगे, तो क्या ऊणा?
६२मनुष्याच्या पुत्राला तो आधी होता जेथे होता तेथे जर वर चढताना पाहाल तर?
63 परमेशरो रा आत्मा ईए जो जीवन देणे वाल़ा ए, पर शरीर ये नि देई सकदा, जो मैं तुसा खे बोली राखिया, सेयो आत्मिक बी ए और जीवन बी ए।
६३आत्मा जीवन देणारा आहे, देहापासून काही लाभ घडवीत नाही. मी तुमच्याशी बोललो ती वचने आत्मा आणि जीवन अशी आहेत.
64 पर तुसा बीचा ते कई जणे तो एड़े ए, जो विश्वास नि करदे।” कऊँकि यीशु तो पईले तेई जाणो था कि जो विश्वास नि करदे, सेयो कूणे? और केस आऊँ पकड़वाणा?
६४तरी विश्वास ठेवत नाहीत असे तुम्हामध्ये कित्येक आहेत” कारण कोण विश्वास ठेवत नाही आणि आपल्याला कोण धरून देईल, हे येशू पहिल्यापासून जाणत होता.
65 और तिने बोलेया, “तेबेई तो मैं तुसा खे बोलेया था कि जदुओ तक केसी खे पिते री तरफा ते ये बरदान नि दित्तेया जाओ, तदुओ तक से मांगे नि आयी सकदा।”
६५तो म्हणाला, “म्हणून मी तुम्हास म्हणले की, कोणीही मनुष्य, त्यास पित्याने ते दिल्याशिवाय, तो माझ्याकडे येऊ शकत नाही.”
66 ये सुणी की तिना रे चेलेया बीचा ते कई जणे उल्टे फिरी गे और तिजी ते बाद तिना साथे नि चले।
६६त्यानंतर, त्याच्या शिष्यांतले पुष्कळजण परत गेले आणि ते पुन्हा कधी त्याच्याबरोबर चालले नाहीत.
67 तेबे यीशुए तिना बारा चेलेया खे बोलेया, “क्या तुसे बी जाणा चाओए?”
६७तेव्हा येशू बाराजणांना म्हणाला, “तुमची पण जायची इच्छा आहे काय?”
68 शमौन पतरसे तिना खे जवाब दित्तेया, “ओ प्रभु! आसे केसगे जाऊँ? अनन्त जीवनो री गल्ला तो तुसा गे ई ये (aiōnios )
६८तेव्हा शिमोन पेत्राने त्यास उत्तर दिले, “प्रभू, आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने तर आपणाकडे आहेत. (aiōnios )
69 और आसे विश्वास कित्तेया और जाणी गे रे कि परमेशरो रा पवित्र जन तूँ ई ये।”
६९आणि आम्ही विश्वास ठेवला आहे आणि जाणतो की, आपण देवाचे पवित्र पुरूष आपण आहात.”
70 यीशुए तिना खे बोलेया, “क्या मैं तुसे बारा जणे नि चूणी राखे? तेबे बी तुसा बीचा ते एक मांणू शैतान ए।”
७०येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हा बाराजणांना निवडून घेतले नाही काय? तरी तुमच्यातील एकजण सैतान आहे.”
71 ये तिने शमौन इस्करियोतियो रे पाऊ यहूदा रे बारे रे बोलेया था, कऊँकि येई तिना बारा चेलेया बीचा ते था, जो यीशुए खे पकड़वाणे वाल़ा था।
७१हे त्याने शिमोनाचा पुत्र यहूदा इस्कार्योत याच्याविषयी म्हणले होते; कारण बारा जणांतला तो एक असून त्यास धरून देणार होता.