< Psalmi 82 >
1 Asafa dziesma. Dievs stāv Savā draudzē, Viņš tura tiesu starp tiem dieviem.
१आसाफाचे स्तोत्र देव दैवी मंडळीत उभा आहे, तो देवांच्यामध्ये न्याय देतो.
2 Cik ilgi jūs gribat netaisni tiesāt un uzlūkot bezdievīgo ļaužu vaigu? (Sela)
२कोठपर्यंत तुम्ही अन्यायाने न्याय कराल? आणि दुष्टांना पक्षपातीपणा दाखवाल?
3 Izdodiet tiesu nabagam un bāriņam, taisnojiet bēdīgo un nabagu.
३गरीबांना आणि पितृहीनांना संरक्षण दे; त्या पीडित व दरिद्री यांच्या हक्काचे पालन करा.
4 Izglābiet nabagu un bēdīgo, izraujiet viņu no bezdievīgo rokas.
४त्या गरीब व गरजवंताना बचाव करा. त्यांच्या दुष्टांच्या हातातून त्यांना सोडवा.
5 Bet tie to neatzīst un nesaprot, tie staigā tumsībā; par to zemes pamatiem jāšaubās.
५“ते जाणत नाहीत किंवा समजत नाहीत; ते अंधारात इकडेतिकडे भटकत राहतात; पृथ्वीचे सर्व पाये ढासळले आहेत.”
6 Gan Es esmu sacījis: jūs esat dievi, un visi tā Visuaugstākā bērni.
६मी म्हणालो, “तुम्ही देव आहात, आणि तुम्ही सर्व परात्पराची मुले आहात.”
7 Bet jūs nomirsiet kā cilvēki un iesiet bojā tāpat kā citi lieli kungi.
७तरी तुम्ही मनुष्यासारखे मराल, आणि एखाद्या सरदारासारखे तुम्ही पडाल.
8 Celies, ak Dievs, tiesā pasauli, jo Tev būs par mantību visas tautas.
८हे देवा, ऊठ! पृथ्वीचा न्याय कर, कारण तू सर्व राष्ट्रे वतन करून घेशील.